Home Blog Page 22

पुण्यात गुन्हेगारांचा होणार आता बंदोबस्त; पुण्यात नवीन ५ पोलीस ठाणे आणि १००० पोलीसांचा स्टाफ मंजूर करण्यात येईल👉मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

पुणे:-पुण्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. पुण्यात नवीन ५ पोलीस ठाणे देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करण्यात येईल, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.*

 

*👉🟥🟥👉मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. एमएसव्ही म्हणजे एक छोटं पोलीस आयुक्तालय म्हणून काम करतील. पाच पोलीस ठाणे एकाचे उद्घाटन आणि ४ चे भूमिपूजन केलं. पुण्याने ७ पोलीस ठाणे मागितले एका झटक्यात आम्ही पोलीस ठाणे मंजूर केलं आणि ८०० जणांचा स्टाफ मंजूर केला. पुण्याचं काही आलं तर मी आणि अजितदादा हो म्हणतो, मी घोषणा करतो की, अजून नवीन ५ पोलीस ठाणे पुण्याला देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करू, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.*

 

*👉🔴🔴👉१० वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१५ मध्ये पुण्यातील सीसीटीव्ही पहिला फेज सुरू केला. देशातील सर्वात आधुनिक सी सी टिव्ही प्रणालीचे उद्घाटन पुण्यात होतं आहे. अत्याधुनिक कॅमेरा, नाइट व्हिजन कॅमेरा आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारांचे ट्रॅकिंग, ट्रॅफिकचे नियोजन या प्रणालीमधून करण्यात येतील. एखादा व्यक्ती करून पसार झाला तर त्याला तात्काळ पकडण्यात येईल. ‘बच के रहना रे, तुझं पे नजर है’, हे गाणं मला आठवलं. अनेक ब्लॅक स्पॉट आहेत. तिथे पोलिसिंग करणे सोपं नाही, त्यातील पहिलं बोपदेव घाट याचं काम झालं आहे. पुढील २ महिन्यात इतर टेकड्यांवरचे काम पूर्ण होईल’ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.*

इंदापूर येथे “आर्थिक समावेशन योजनांकरिता विशेष मोहीम” यशस्वीरित्या पार

इंदापूर येथे “आर्थिक समावेशन योजनांकरिता विशेष मोहीम” यशस्वीरित्या पार

संपादकी

युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा इंदापूर यांच्या सौजन्याने दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी “आर्थिक समावेशन योजनांकरिता विशेष मोहीम” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा सांस्कृतिक भवन, दत्तनगर रोड, इंदापूर येथे करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमात अटल पेन्शन योजना, अपघाती विमा योजना, कर्ज योजना, डिजिटल फसवणूक प्रतिबंध, बँक व्यवहार, शेती कर्ज योजना तसेच नमो ड्रोन दीदी, लखपती दीदी, पीएमएफएमई योजना, युनियन सेल्फ हेल्प ग्रुप (CC व टर्म लोन) याविषयी माहिती देण्यात आली आणि नावनोंदणीही करण्यात आली.

 

कार्यक्रमासाठी महाप्रबंधक श्री. विपिन शुक्ला (पुणे विभाग), क्षेत्रीय प्रमुख श्री. मयंक भारद्वाज (पुणे मेट्रो), आणि गटविकास अधिकारी श्री. सचिन खुडे (पं.स. इंदापूर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सूत्रसंचालन युनियन बँकेचे उपक्षेत्रीय प्रमुख श्री. श्रीपाद भालवणकर यांनी केले.

 

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. विजयकुमार बोडके (कृषी विभाग) यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजनांची माहिती दिली, तर श्री. कैलास दळवी (क्षेत्रीय कार्यालय, पुणे मेट्रो) यांनी वित्तीय समावेशनाच्या योजना समजावून सांगितल्या.

 

या कार्यक्रमात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत

श्री. रोहन देवकर आणि किशोर सरडे यांना विमा सर्टिफिकेट वाटप करण्यात आले, तसेच

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत लता काटे व नागनाथ निकम यांना सर्टिफिकेट वितरित करण्यात आले.

 

पोल्ट्री उद्योगासाठी अमोल सरडे यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले.

 

कार्यक्रमाची सांगता शाखा प्रमुख श्री. जयपाल तोरणे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.

 

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील युनियन बँकेचे नामांकित ग्राहक –

अंकुश दुके, रुशांत सरक, जे. के. शिंदे, दयानंद व्यवहारे, स्वप्नील राऊत, बापू गदादे, अनिल राऊत, राहुल शिंदे, सत्यवान साळुंखे, पंकज चौधरी, पंकज करे, चंद्रकांत करे, राजेंद्र भिसे – यांनी उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

कार्यक्रमास सुमारे ५०० नागरिकांची उपस्थिती होती, ज्यात महिलांचा लक्षणीय सहभाग उल्लेखनीय ठरला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण विकास अधिकारी अशोक भिसे, तुषार भगत, श्रीकृष्ण सोळंके, तुषार निकम, पूजा काळे, ऋषिकेश गोमे, अशोक शिंदे आणि गणेश जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले.

इंदापूर येथील क्रीडा संकुलाच्या अत्याधुनिकरणासाठी तब्बल 55 कोटी 16लाख रुपये निधी मंजूर

इंदापूर -. इंदापूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे क्रीडा क्षेत्रातील विविध कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून 55 कोटी 16 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे असे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माहिती दिली.                                                                                   ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडा सुविधा देणे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा शासनाचा मुख्य उद्देश असल्यामुळे महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण २०१२ अन्वये प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुलन उभारणे ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे व तसेच यामुळे खेळाडूंना अनेक फायदे होणार आहेत.                                                                                              या निधीमुळे इंदापूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राचा वेगाने विकास होणार आहे व तसेच स्थानिक व ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली कौशल्य खुलवण्यासाठी एक उत्कृष्ट असे व्यासपीठ इंदापूर तालुक्यात होणार आहे यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व क्रीडा प्रेमींनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे आभार मानले.

एआय तंत्रज्ञान भविष्यासाठी वरदान- श्री. उदयसिंह पाटील साहेब

बावडा .दि. 5. श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा व निलया फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ए आय टेक्नॉलॉजी व विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाची स्किल स्किल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निल्या फाउंडेशनचे प्रमुख व्याख्याते श्री चेतन गोडबोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री उदयसिंह पाटील साहेब उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) म्हणजे मानवी बुद्धीप्रमाणे काम करणाऱ्या यंत्रांची निर्मिती. AI म्हणजे संगणक किंवा मशीनला मानवासारखे विचार करायला, शिकायला आणि निर्णय घ्यायला शिकवणे. AI मुळे भविष्यात

आरोग्यसेवा,अर्थव्यवस्था,शिक्षण, शेती, वाहतूक, ग्राहक सेवा,मनोरंजन या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होतील. AI वेगाने विकसित होत आहे आणि भविष्यात त्याचे समाजावर मोठे परिणाम होतील. तंत्रज्ञानातील प्रगती, वाढलेली गुंतवणूक आणि लोकांचा AI कडे बघण्याचा दृष्टीकोन यामुळे AI चे भविष्य खूप आशादायक आहे, असे मत व्यक्त केले. AI तंत्रज्ञानाची भीती अनाठायी असून त्या विषयाचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. चेतन गोडबोले यांनी केले. श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ए आय तंत्रज्ञान जाणीव जागृती व विद्यार्थ्यात नवीन स्किल विकसित करणे या कार्यक्रमात ते बोलत होते.
AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत मात्र त्यांचे स्वरूप बदलेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य आत्मसात करावी लागतील. ए आय तंत्रज्ञान वैयक्तिक आंतरक्रिया करू शकणार नाही. या तंत्रज्ञानामुळे कम्युनिकेशन गॅप भरून निघण्यास मदत होते. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. तायाजी लोंढे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक सौ. दीप्ती पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका पूजा पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब उपाध्यक्ष मनोज पाटील सचिव किरणराव पाटील व सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

थोर विचारवंतांच्या विचाराचे पाईक होण्याची गरज. डॉ. वावरे

बावडा दि.1. अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे पाईक होण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लहु वावरे यांनी केले.बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये शुक्रवार (दि. 1) रोजी इतिहास आणि सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बोलत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. सिद्धार्थ चितारे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. तायाजी लोंढे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा ऊहापोह केला. याप्रसंगी केदार पवार, राधिका वाघमारे, अमृता जाधव, सिमरन मुलाणी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राध्यापिका सौ. पुजा पाटील, अंकिता भगत, रोहिणी सावंत. प्रा. प्रविण घोगरे उपस्थित होते. सूत्रसंचालन इम्रान काझी आणि प्रियंका खंडागळे यांनी केले, तर प्राध्यापिका अर्चना हरिहर यांनी आभार मानले.

राज्याच्या कृषी मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज मंत्रालयात दत्तात्रय भरणे यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

महाराष्ट्र – मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असून, शेती आणि शेतकऱ्यांचे हित हेच माझे सर्वोच्च प्राधान्य राहील.

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील.

आज पदभार स्वीकारताना कृषी विभागातील १३ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांवर स्वाक्षरी करून सेवेत रुजू करण्यात आले.
राज्याच्या कृषी विकासाचा नवा अध्याय सुरू करताना मी पूर्ण समर्पण आणि जबाबदारीने काम करू, अशी ग्वाही दिली

अगस्त क्रांति २०२१ः हिंदू महापंचायत के उपलक्ष में वार्षिक समारोह

अगस्त क्रांति २०२१ः हिंदू महापंचायत के उपलक्ष में वार्षिक समारोह

 

नेताजी पार्लियामेंट (लालधरी मुत्या महाराज समाधी स्थल) कलबुर्गी मार्ग, जयसिंहनगर, ता. हुमनाबाद. जि. बीदर. कर्नाटक.

सविनय निवेदन है कि आजाद हिंद गवर्नमेंट कमेटी विश्व पुरोहित यजमान न्यास परिषद एवं भारत वर्षीय साधु संत समाज परिषद के संयुक्त सानिध्य में ८,९ अगस्त २०२५ को नेताजी पार्लियामेंट जयसिंहनगर, हुमनाबाद, बीदर, कर्नाटक में “अगस्त क्रांती २०२१ : हिंदु महापंचायत” कार्यक्रम आयोजित किया गया है। इस कार्यक्रम में विभन्नि राज्यों से साधु संत, पुरोहीतगण, सामाजिक कार्यकर्ता, स्वतंत्रता सेनानी परिवार के उत्तराधिकारी, लोकतंत्रता सेनानी, मिशन फार् ग्लोबलू चेंज, स्यलुट तिरंगा, क्राईम् अॅड करपशन् फ्री भारत, पूर्व संसद संघ एवम् राष्ट्र पुनर्निर्माण हेतु जनजागृती एवम् सामुहीक प्रार्थना में शामील होने का आव्हान किया जा रहा है। सभी राष्ट्रप्रेमीयों की उपस्थिति प्रार्थनीय है।

शुक्रवार ८ अगस्त २०२५

पंजीकरण :- सुबह ९:०० बजे

ध्वजारोहण : सुबह ९:३० बजे

उद्घाटन सत्र : – १०:०० बजे से दोपहर १:०० बजे तक

भोजन अवकाश : दोपहर १:०० से ३:०० तक

दूसरा सत्र : – ३:०० बजे से श्याम ७:०० बजे तक

शनिवार ९ अगस्त २०२५

त्रतीय सत्र : सुबह ९:०० बजे से दोपहर १:०० बजे तक

भोजन अवकाश : दोपहर १:०० से ३:०० तक

समारोप सत्र : ३:०० बजे से श्याम ७:०० बजे तक

व्यवस्था : ७ तारीख श्याम ७:०० बजे से १० तारीख की सुबह तक रहने का व भोजन प्रसाद निशुल्क रहेगा.

संपर्क सुत्र :

सचिन पाटील ८६००१०७९७५; संतराम मुरजानी ९८९०८७५२२८; नागरेड्डी ८१९७८६६४६१ विठ्ठल मक्कै ९९८६३३६०६४; श्रीमंत ९६११६३५२६५; प्रभुरेड्डी ९४४८७१६४९६; रुक्मोद्दिन ७२०४२९०६४९

आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी.

महाराष्ट्र,- महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन वॉर्ड/प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार असून सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला आहे. नवीन प्रभाग रचने आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी तसेच नव्या प्रभागरचनेला विरोध करणाऱ्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.त्यामुळे 27 टक्के आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022 च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी, अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. ही निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने अधिसूचित केले होते. त्यामुळे आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड/प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सुप्रीम कोर्टाने आज आणखी एक याचिका फेटाळून लावली. त्यात ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आमच्या 6 मे 2025 च्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील. सुप्रीम कोर्टाने आज स्पष्टपणे सांगितले की, वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्य विधिमंडळाने तसा कायदा केला आहे आणि या कायद्याला स्थगिती नसल्याने हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचा आहे.

नवी प्रभाग रचना की जुनी प्रभाग रचना याविषयी वाद सुरू होता. महाविकास आघाडीच्या काळात प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते, मग पुन्हा शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा त्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने आज आदेशात स्पष्ट केले आहे की, वॉर्ड रचना कशी असावी याचा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे, त्यानुसार प्रभाग रचना होईल. जी प्रभाग रचना राज्य सरकार ठरवेल त्यानुसारच निवडणुका होईल.

युक्रेनचा रशियावर भीषण हल्ला; लष्करी तळ, तेल कारखाना केला उद्धवस्त; ३ जणांचा मृत्यू

कीव:-रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबता थांबत नसून यु्क्रेनने यावेळी रशियात घुसून हल्ला केला आहे. थेट लक्ष्यांना टार्गेट करत रशियातील लष्करी तळ आणि तेल कारखानाच उडवला आहे. या हल्ल्यात रशियातील दोन्ही ठिकाणांची राखरांगोळी झाली आहे. तसेच यात तिघांचा मृत्यू झाला, त्यामुळे आता दोन्ही देशातील संघर्ष आणखीनच तीव्र झाला आहे.

युक्रेन आणि रशियामधील सुरू असलेल्या युद्धाने पुन्हा नवा संघर्ष उभा केला आहे. सीमेवरच नाही तर आता दोन्ही देश परस्परविरोधात अंतर्गत हल्ले करत आहेत. रशियाच्या अंतर्गत महत्वपूर्ण भागांना लक्ष्य करून युक्रेनने आपले लष्करी किती लांब पल्ल्याची आहे हे दाखवून देण्याचाच हा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांच्या मालिकेमुळे रशियाच्या तेल पायाभूत सुविधा, लष्करी तळ आणि औद्योगिक प्रतिष्ठानांचे गंभीर नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

युक्रेनने हा हल्ला करुन रशियाला इशारा दिला आहे की, आम्ही तुमच्या अंतर्गत ठिकाणांवर हल्ला करु शकतो, यातून हेच स्पष्ट होते की, युक्रेन मागे हटायला तयार नाही. बलाढ्य रशियाच्या नाकीनऊ आणण्याचा यु्क्रेनकडून प्रकार होत आहे. ही युद्धाच्या बदलत्या स्वरूपाची झलक असून पारंपारिक लढाईऐवजी जिथे तंत्रज्ञान आणि ड्रोन हल्ले वाढवले जात आहेत कारण ते अधिक प्रभावी ठरत आहेत. युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये किमान तीन लोक ठार झाले. हे हल्ले रशियातील समारा, पेन्झा आणि रोस्तोव्ह सारख्या भागात झाले, जिथे पडलेल्या ड्रोनच्या ढिगाऱ्यांमुळे घरांना आग लागली आणि एका सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला. पेन्झा येथील इलेक्ट्रॉनिक कारखान्यावर झालेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला.                                                                                                  युक्रेनियन गुप्तचर संस्थांच्या मते, या हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य रियाझान तेल शुद्धीकरण कारखाना, व्होरोनेझ तेल साठवणूक आणि प्रिमोर्स्को-अख्तरस्क लष्करी विमानतळ होते. याशिवाय, रशियाच्या लष्करी औद्योगिक व्यवस्थेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे एक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक्स कारखाना देखील नुकसानग्रस्त झाले. युक्रेनच्या या रणनीतीवरून असे दिसून येते की ते आता केवळ आघाडीवरच नाही तर शत्रूच्या मुळावरही हल्ला करत आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने युक्रेनमधून ३३८ ड्रोन यशस्वीरित्या नष्ट केले. त्याच वेळी, युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की रशियाने त्यांच्यावर ५३ ड्रोन हल्ले केले. त्यापैकी ४५ पाडण्यात आले. दरम्यान, रशियाने आणखी एक मोठा दावा केला आहे की त्यांनी पूर्व युक्रेनमधील एका गावावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, या दाव्याची निश्चिती झालेली नाही. जर ते खरे असेल तर ते युक्रेनसाठी आणखी एक धोरणात्मक धक्का असू शकते.

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे

*”संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय – डॉ. पंकज देशमुख”*

 

पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५:

महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली.

 

सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी स्वयंसेवकांना कायद्याविषयी प्रशिक्षण देण्याचा हा २३ वा उपक्रम होता.

पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या काळात महिला, मुली आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, चोरी किंवा लहान मुलांच्या अपहरणासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे हा होता. या कार्यक्रमात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी २० पोलीस ठाणे येथील दक्षता समितीच्या महिलांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख यांनी ‘सण आणि महिला सुरक्षितता: कायदेसंरक्षण यंत्रणा व समाजाची भूमिका’ या विषयावर संवाद साधला. स्त्री आधार केंद्र आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी काम करताना कोणतीही समस्या सोडवणे अधिक परिणामकारक आणि सुलभ होते. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्यासाठी नेहमीच अत्यंत उपयुक्त ठरते असे श्री देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोपट येले यांनी स्फोटके आणि बॉम्बशोधक पथकाच्या जबाबदारीबद्दल माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक श्री. विवेक नायडू यांनी शहरी आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.

 

डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गणेशोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे, मात्र सार्वजनिक गर्दीत महिलांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. स्वयंसेवकांची उपस्थिती महिला, मुली आणि लहान मुलांसाठी खूप आश्वासक असेल. तसेच, सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या प्रत्येक महिला कार्यकर्त्याच्या योगदानाला त्यांनी दाद दिली.

 

यावेळी, फ्रान्समधील जीझेल पेलिकॉ यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे उदाहरण देत, डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्येक अन्यायग्रस्त महिलेने त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. या कार्यशाळेमुळे पुणे शहरातील गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत सामाजिक यंत्रणा तयार होत आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणाचा अनुभव कार्यकर्त्यांना आगामी काळात काम करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

 

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेमार्फत राज्यभरात महिलांसाठी बचत गट आणि कायदेविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात. प्रशिक्षित स्वयंसेवक गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या वेळी पोलिसांना मदत करतील. गेल्या वर्षी देखील या स्वयंसेवकांनी हरवलेल्या लहान मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मदत केली होती. गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तयार करणे, छेडछाड थांबवणे, आणि गरजेनुसार मदत पुरवणे अशा अनेक कामांसाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात आले.

error: Content is protected !!