चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती स्मरणार्थ वाचन प्रेरणा दिवस दिमाखात साजरा
संपादकीय:-
आज बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती दिमाखात साजरी करण्यात केली.
पारंपारिक पद्धतीने यावेळी सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर कॉलेजमधील ग्रंथपाल प्रा. विकास हुबाळे आणि शिक्षण विभाग प्रमुख प्रा.गीतांजली कांबळे यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यबदल प्रकाश टाकणारे महत्वाचे भाषण दिले.
चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की “जर लोक मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवतील, तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल…” असे डॉ. एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे.
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी, भारत देशातील सर्वात प्रशंसनीय शास्त्रज्ञ, शिक्षक आणि माजी राष्ट्रपतींपैकी एक असलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येते.
हा दिवस केवळ विज्ञान आणि सार्वजनिक सेवेतील त्यांच्या कामगिरीलाच नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या आजीवन वचनबद्धतेला श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.
डॉ. कलाम यांनी कल्पना केल्याप्रमाणे, तरुण मनांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्टता आणि नवोपक्रमाचा पाठलाग करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. आजच्याआधुनिक युगात विद्यार्थ्यांना इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ माहिती संपन्न होऊ शकते परंतु ज्ञानसंपन्न होत नाही. ज्ञानसंपन्न होण्यासाठी ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. वाचनाने ज्ञान, विवेकशीलता, प्रसन्नता, शांती व आनंद प्राप्त होतो तसेच व्यक्तीचा सर्वांगीण विकासही होतो असे प्रतिपादन त्यांनी केले व विद्यार्थ्यांनी नियमित ग्रंथालयास भेट देऊन सर्व विषयांचे वाचन करावे असे आवाहन ही केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने फार्मसी चे विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. अनिकेत सुर्वे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.अजिंक्य देशपांडे यांनी केले.