Home Blog Page 2

कार्यकर्त्यांसाठी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करू:- युवानेते प्रवीण माने

कार्यकर्त्यांसाठी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करू:- युवा नेते प्रवीण माने

इंदापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद व पद वाटप मेळावा काल पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा अध्यक्ष शेखरजी वढणे उपस्थित होते. युवकांचे आशास्थान युवा हृदय सम्राट सन्माननीय प्रवीण भैया माने हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष हा देशातील एक नंबरचा पक्ष असून तो महाराष्ट्रात ही एक नंबरचा पक्ष आहे आणि इंदापूर मध्येही हा पक्ष एक नंबरचा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन शिखरजी वडणे साहेब यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केले.

युवकांचे नेतृत्व असलेले प्रवीण भैया माने यांनी पक्षाने आदेश दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्यात स्वबळावर ती लढवण्यास तयार असल्याचं सुतवाच केले. इच्छुक उमेदवारांसाठी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करू असे आश्वासन प्रवीण भैया माने यांनी कार्यकर्त्यांना दिले. प्रवीण भैय्याच्या या आव्हानानंतर तरुणांमध्ये एक प्रकारचं उत्साह निर्माण झालं व नेता असावा तर असा अशी चर्चाही त्या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान असे नेतृत्व इंदापूर तालुक्याला प्रवीण भैया माने यांच्या स्वरूपाने मिळालेले पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाला आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये नवं आणि जुनं असं काहीही बदल नसतं सर्व कार्यकर्त्यांना समान मान दिला जातो. कार्यकर्त्यांची केलेली तालुक्यातील निवड येत्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पार्ट निश्चितच मजबूत होईल असे सदरच्या कार्यक्रमातून दिसून आले.

आदर्श शिक्षक पुरस्काराने अमोल बाळासाहेब बंडगर सन्मानित.                                    

आदर्श शिक्षक पुरस्काराने अमोल बाळासाहेब बंडगर सन्मानित.                                    

 

रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने सन २०२५ साठीचा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, श्रीपूर येथील जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक अमोल बाळासाहेब बंडगर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोलीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

दरवर्षी शैक्षणिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय सन्मान देण्यात येतो. त्याच परंपरेत यंदा अमोल बाळासाहेब बंडगर यांना पुणे येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून नंदकुमार रामहरी गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन, पुणे उपस्थित होते.

 

बंडगर सर विद्यार्थ्यांच्या अडचणींवर सतत लक्ष ठेवून त्यांच्या शंकांचे निरसन करणारे, प्रत्येक विद्यार्थ्याला आपलेसे मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

 

या यशाच्या निमित्ताने श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी, सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. रामदास देशमुख, उपाध्यक्षा शुभांगी ताई देशमुख, सचिव भारत कारंडे, सदस्य यशराज भय्या देशमुख यांनी बंडगर सरांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी संदेश दिला.

 

अमोल बाळासाहेब बंडगर यांचा हा सन्मान केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, श्री चंद्रशेखर विद्यालय, नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय आणि संपूर्ण श्रीपूर परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या कार्यातून भविष्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मोबाईल व्यसन मुक्ती वर अतिथि व्याख्यान

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मोबाईल व्यसन मुक्ती वर अतिथि व्याख्यान

आजच्या युगात मोबाईलचा वापर हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले असले, तरी त्याचा अतिरेक हा अनेक मानसिक व शारीरिक समस्यांना आमंत्रण देत आहे. या पार्श्वभूमीवर चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज सोमवार २९ सप्टेंबर या दिवशी “मोबाईल व्यसनमुक्त जीवन” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. तुषार रंजनकर, डायरेक्टर अल्फा बाईट कॉम्पुटर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचे आहारी जाण्याची समस्या, झोपेवर होणारे परिणाम, एकाग्रतेचा अभाव इत्यादी मुद्द्यांवर सविस्तर प्रकाश टाकला.
त्यांनी मोबाईलचा संतुलित वापर कसा करावा, वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, दिवसातील ठराविक वेळेसाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ करणे, मित्र-परिवारासोबत प्रत्यक्ष संवाद वाढवणे आणि छंद जोपासणे या उपायांची माहिती दिली
चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की झोपता-उठताना वापरताय मोबाईल, ब्रेन आणि बॉडीवर होईल जीवघेणा परिणाम असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात, प्रत्येकाची सकाळ एकाच गोष्टीने सुरू होते. अलार्मचा आवाज ऐकताच, तुम्ही डोळे उघडता आणि मोबाईल फोन थेट तुमच्या हातात येतो. प्रथम तुम्ही नोटिफिकेशन तपासता, नंतर तुम्ही इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपवर पोहोचता. मित्राचा नवीन फोटो, कोणाचा तरी स्टेटस अपडेट आणि नंतर ईमेल किंवा ऑफिस मेसेजेस. काही वेळात, बेडवरून उठल्याशिवाय अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ जातो. ही सवय आता जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनली आहे. पण सकाळी उठल्याबरोबर मोबाईलकडे पाहण्याची ही सवय आपल्या मनावर, शरीरावर, मूडवर किती खोलवर परिणाम करत आहे.
नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. किरण सातपुते यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा ऋतुजा धायगुडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला.

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्धसो

मवार दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज एल.जी. बनसुडे विद्यालय पळसदेव, इंदापूर येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना फार्मसी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात करिअर निवड ही विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान असून या व्यासपीठातून विद्यार्थ्यांना फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, माहिती-तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा, तसेच उद्योजकता अशा विविध क्षेत्रांबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळाले.

 

तज्ज्ञांनी आपल्या भाषणात आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्यविकास, संवादकौशल्य, नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच योग्य करिअर निवड आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

 

कार्यक्रमात प्रश्नोत्तर सत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या व्यासपीठामुळे आपल्या आवडी-क्षमता ओळखून करिअर घडवण्यासाठी दिशा मिळाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले असून, दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली एल.जी.बनसुडे विद्यालयाच्या प्राचार्या.सौ.व्हि. एन. बनसुडे, विभागप्रमुख.मदने पी.डी सर तसेच चेतना फार्मसीचे प्रा. चिंतामणी रणवरे यांचे सहकार्य मिळाले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वर्ल्ड फार्मसिस्ट दिना निमित्त वृक्षरोपण

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वर्ल्ड फार्मसिस्ट दिना निमित्त वृक्षरोपण 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकाराम महाराजांचा पणती तून दिसून येते की, वृक्ष हा आपले सोयरे आहेत. 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट डे व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वृक्षा रोपण करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सत्वशील पाटील यांच्या हस्ते वृक्ष रोपण केले. चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी विचार रुजवण्यात यावेत व त्याची गरज काय असते हे पटवून सांगितले. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये ३० हून अधिक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. कॅम्पसमध्ये अनेक औषधी वनस्पती लावण्यात आल्या होत्या. झाडे वाचवणे; पर्यावरण वाचवणे या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपणाबाबत जागरूकता,प्रदूषणाचा परिणाम कमी करा, औषधी वापरासाठी वनस्पतींचा वापर करा, वाढत्या प्रदूषणामुळे आणि विकासामुळे वृक्षारोपण, वनौषधी झाडे औषधी उद्देशाने उपयुक्त आहेत.त्यानंतर प्रा. अनिकेत सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना अनेक औषधी वनस्पती, त्यातील फायटोकेमिकल घटक आणि त्यांचे उपयोग याबद्दल समजावून सांगितले. त्यांनी कृत्रिम औषध आणि हर्बल औषधां बद्दल मार्गदर्शन केले आणि सर्व कृत्रिम औषधां पेक्षा हर्बल औषधाचे महत्त्व सांगितले.

संपूर्ण जगाने कोरोना सारख्या महामारीत ऑक्सिजनची कमतरता पाहिलेली आहे. त्याचा एक भाग म्हणून आपण वृक्ष रोपण केले पाहिजे. पर्यावरणाच्या संतुलन बिघडल्यामुळे वातावरणात बदल होत आहे, तो बदल कमी करण्यासाठी आपण वृक्ष रोपण केले पाहिजे.

या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. या आयोजन करण्याकरता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण सातपुते, प्रा. अनिकेत सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे उच्च शिक्षण व भविष्यातील करियर नियोजन विषयी तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे उच्च शिक्षण व भविष्यातील करियर नियोजन विषयी तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन

आज शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इंदापूर येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना फार्मसी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अकरावी व बारावी v विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात करिअर निवड ही विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान असून, या पार्श्वभूमीवर करियर कसे निवडावे, स्पर्धा परीक्षा तयारी कशी करणार, जीवनात कष्ट, आत्मविश्वास, चिकाटी कशी महत्त्वाची असते, उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत असा विविध विचार व्यक्त केले. तसेच आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, शासकीय सेवा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांविषयी उपयुक्त माहिती दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, योग्य दिशेने पाऊल टाकण्यासाठी या व्याख्यानाचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत प्रा. विजय धेंडे सरांनी व्यक्त केले.

 

या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली. सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य.श्री.संजयकुमार शिंगारे सर, प्रा. विजय धेंडे सर तसेच चेतना फार्मसीचे प्रा. चिंतामणी रणवरे आणि श्री. विकास हुबाले सर यांचे सहकार्य मिळाले.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आज मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापुर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती तसेच अंत्योदय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती तसेच अंत्योदय दिवस

 

आज मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापुर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती तसेच अंत्योदय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळेस प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. गजानन कदम यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापन समिती सदस्य प्रेमकुमार जगताप यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शनN.Aवैराळ, सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्री.राम खत्री सर यांनी केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे फोटो पूजन करून झाली.

 

*यावेळी संस्थेतील सर्व निदेशक ए. बी सोनटक्के, विकास जाधव कर्मचारी स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.*

चेतना फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

चेतना फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

 

इंदापूर- (सरडेवाडी )येथील चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मसी दिवस अतिशय उत्साह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पाचव्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. “Think Health Think Pharmacist “या घोषवाक्य खाली आयोजित केले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सत्यशील पाटील, इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. शितल बोरा आणि इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. सुहास पवार यांनी भूषवले. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,खजिनदार सोमनाथ माने ,सदस्य बापू बोराटे व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. गणेश मस्के आधी उपस्थित होते.

या सप्ताहात औषध सुरक्षेचे बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पोस्टर प्रेसेंटेशन, क्वीझ स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वृक्षारोपण व वादविवाद स्पर्धा अशा उपक्रमाचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आठवड्याचा कार्यक्रम अधिकच स्मरणीय केला. वर्ल्ड फार्मसिस्ट डे चे औचित्य साधून या दिवशी समारोप करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सत्यशील पाटील अध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन तथा चेअरमन इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी व श्री शितल बोरा उपाध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन श्री सुभाष पवार वरिष्ठ उपाध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट ची समाजातील भूमिका व जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले.

शेवटी विविध स्पर्धेमध्ये विजेत्यांचे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांना औषध सुरक्षा जबाबदारी, फार्मसी व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल जागरूकता करणे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सत्यशील पाटील यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्र हे एखाद्या कल्पवृक्षा प्रमाणे असून रोजगार, व्यवसाय संशोधन, शैक्षणिक तसेच आयटी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध करून देत आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट ची कर्तव्ये व सेवा देण्यासाठी तत्पर राहण्यासाठी आवाहन केले.

चेतना फाउंडेशन अध्यक्ष उदय देशपांडे यांच्याबरोबर विलास भोसले आणि खजिनदार सोमनाथ माने प्राचार्य आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली फार्मसी विद्यालयाच्या प्रा. प्राजक्ता झगडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले

भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यानिमित्त माननीय पंडित दीनदयाल यांची जयंती श्री राम मंदिर येथे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली त्यानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी मिळून श्रीराम मंदिर व अंबिका मंदिर इंदापूर येथे सर्वांनी मिळून स्वच्छता केली या कार्यक्रमाचे संयोजक माननीय दादासाहेब नायकुडे युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका पूर्व मंडल व इतर पदाधिकारी दादासाहेब नायकुडे, राम आसबे, सचिन सावंत, महेश देशमुख सुनील खाडे तानाजी देशमुख लखन जगताप पप्पू गायकवाड समाधान शिंदे केशव गायकवाड नवनाथ शिंदे नवनाथ बाबरे गणेश गवळी नागेश गायकवाड संतोष निकम तुळशीराम बोराडे राजेश अवचर नितीन आरडे गुरुदेव घोगरे विक्रम रिसवडकर दादा ढवळे सोनू बोबडे सागर आसबे प्रसाद थोरात सोमनाथ पिपरे शरद पालवे शिवा सूर्यवंशी सलमा खान शितल साबळे माधुरी भराडे स्वाती अवचर व सर्व कार्यकर्ता

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये उत्साहात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा – स्वयंसेवकांनी राबवली स्वच्छता मोहीम

इंदापूर – आज दिनांक २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षा मार्फत सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत महाविद्यालय परिसरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छते पासूनच समृद्ध आरोग्याचा आरंभ होतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः युवकांनी या मोहिमेत पुढाकार घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले.

 

यानंतर NSS युनिट चे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय परिसरात, प्रवेशद्वाराजवळ, उद्यान भागात तसेच आसपासच्या रस्त्यांवर झाडू मारून, कचरा गोळा करून स्वच्छतेचे कार्य हाती घेतले. या उपक्रमात स्वयंसेवकांनी “स्वच्छ भारत – स्वस्थ भारत” या संदेशा सह नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जन जागृतीही केली. परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देणारे फलकही या वेळी लावण्यात आले.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण सातपुते महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संपूर्ण NSS विभागाचे स्वयंसेवक पूर्ण उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदानातून समाजसेवेचा आदर्श ठेवत परिसरात स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.

 

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा आणि एकात्मतेची भावना अधिक बळकट झाली. यामुळे परिसरात स्वच्छतेबाबत एक सकारात्मक संदेश पसरला असून, नागरिकांमध्येही जागरुकता निर्माण झाली आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळू बोराटे व इतर मान्यवरांनी विशेष कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!