Home शासकीय राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू, अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होणार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू, अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होणार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू, अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होणार

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.

राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, 23 फेब्रुवारी ते बुधवार, 25 मार्च 2026 पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. तसेच 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठक, विधानपरिषद आणि विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये शोक प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिवेशन काळात शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज होणार आहे आणि सोमवार, 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. 19 मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच 20 मार्च रोजी देखील विधिमंडळ कामकाज होणार नाही.

अधिवेशनामध्ये येणारे महत्त्वाचे विषय!

 

● संयुक्त राष्ट्र संघाने सन 2026 हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा केली जाणार.

● जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी दोन्ही सभागृहात चर्चा होणार.

● मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार.

● सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!