उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समिती यांचेकडून शेतकरी मच्छीमार बांधवांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये खालील मुद्द्यांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्व धरणग्रस्त व मच्छीमार बांधव यांना उपस्थित राहण्याचे आवाहन उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे
यामध्ये प्रामुख्याने 1)शासन निर्णय 17 जून 2019 व शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2025 रद्द झाला पाहिजे 2) शेतकरी उजनी संपादित जमीन पूर्वपरंपरा गत वहिवाट करीत असून त्यावर आपली उपजीविका करत आहे ती जमीन वाचली पाहिजे 3) उजनी धरणातील जलसाठ्यामुळे मच्छिमार करणारे लोक मच्छीमारी करून आपली उपजीविका करीत आहेत त्यांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे 4) संपादित जमिनी शेतकऱ्यांकडून काढून घेऊन ती खाजगी कंपन्यांना किंवा उद्योगपतींना देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे 5) महाराष्ट्र शासनाने धरणासाठी संपादित केलेली परंतु अध्यापन वापरलेली जमीन मूळ शेतकऱ्यांना परत किंवा करारावर द्यावी अशी आणि विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सात वाजता कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी संघर्ष समितीच्या वतीने सर्व शेतकरी बांधव मच्छीमार बांधव यांना उपस्थित राहण्याचे नम्र विनंती