Home इंदापूर तालुका एआय तंत्रज्ञान भविष्यासाठी वरदान- श्री. उदयसिंह पाटील साहेब

एआय तंत्रज्ञान भविष्यासाठी वरदान- श्री. उदयसिंह पाटील साहेब

एआय तंत्रज्ञान भविष्यासाठी वरदान- श्री. उदयसिंह पाटील साहेब

बावडा .दि. 5. श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा व निलया फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ए आय टेक्नॉलॉजी व विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाची स्किल स्किल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निल्या फाउंडेशनचे प्रमुख व्याख्याते श्री चेतन गोडबोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री उदयसिंह पाटील साहेब उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) म्हणजे मानवी बुद्धीप्रमाणे काम करणाऱ्या यंत्रांची निर्मिती. AI म्हणजे संगणक किंवा मशीनला मानवासारखे विचार करायला, शिकायला आणि निर्णय घ्यायला शिकवणे. AI मुळे भविष्यात

आरोग्यसेवा,अर्थव्यवस्था,शिक्षण, शेती, वाहतूक, ग्राहक सेवा,मनोरंजन या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होतील. AI वेगाने विकसित होत आहे आणि भविष्यात त्याचे समाजावर मोठे परिणाम होतील. तंत्रज्ञानातील प्रगती, वाढलेली गुंतवणूक आणि लोकांचा AI कडे बघण्याचा दृष्टीकोन यामुळे AI चे भविष्य खूप आशादायक आहे, असे मत व्यक्त केले. AI तंत्रज्ञानाची भीती अनाठायी असून त्या विषयाचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. चेतन गोडबोले यांनी केले. श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ए आय तंत्रज्ञान जाणीव जागृती व विद्यार्थ्यात नवीन स्किल विकसित करणे या कार्यक्रमात ते बोलत होते.
AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत मात्र त्यांचे स्वरूप बदलेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य आत्मसात करावी लागतील. ए आय तंत्रज्ञान वैयक्तिक आंतरक्रिया करू शकणार नाही. या तंत्रज्ञानामुळे कम्युनिकेशन गॅप भरून निघण्यास मदत होते. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. तायाजी लोंढे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक सौ. दीप्ती पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका पूजा पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब उपाध्यक्ष मनोज पाटील सचिव किरणराव पाटील व सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!