Home Blog Page 21

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल -उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि.१५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन देईल, स्वातंत्र्य दिनी मिळालेल्या या अमूल्य देणगीची जतन करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

नटराज नाट्य कला मंदिराच्या परिसरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर, रवींद्र लाड, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

*स्वातंत्र्यलढ्यात बारामतीकरांचा सहभाग*

श्री. पवार म्हणाले, कवीवर्य मोरोपंत यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बारामती शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध देशभक्त आणि क्रांतिकारकांमध्ये बारामतीकरांचा सहभाग होता. सन १९४२ चा लढा तसेच १९४९ च्या स्वातंत्र्य लढ्यात विविध स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. नगर परिषदेच्यवतीने सन १९७३ यावर्षी संविधान स्तंभ उभा केला, यामध्ये तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिकांच्या नावांचा शिलालेख समाविष्ट आहे.

*राष्ट्रध्वज स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचे प्रतिक*

राष्ट्रध्वज देशाच्या स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचे प्रतिक आहे, त्यामधील केशरी रंग हा धैर्य आणि त्याग, पांढरा रंग शांती आणि सत्य आणि हिरवा रंग समृद्धी आणि विश्वास तसेच मध्यभागी असलेले अशोक चक्र कायदा आणि प्रगतीचे प्रतिक आहे. महात्मा गांधी, शहिद भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देवून राष्ट्रध्वज उंचावला आहे.

*नटराज नाट्य कला मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान*

आज शहरात नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज स्तंभ बारामतीकरांकरिता अभिमान आणि आनंदाची बाब आहे. स्तंभ उभारण्याकरिता मंडळाने केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक करुन हा स्तुत्य असा उपक्रम आहे. गेल्या ४५ वर्षात मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, ऐतिहासिक, भावस्पर्शी कथनावरील नाटकांचा समावेश असलेले तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे सुद्धा आयोजन केले असून या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार कलाविष्कार पाहायला मिळाला असेल, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

*इंदोर शहराच्या धर्तीवर शहराचा विकास करण्याचा मानस*

इंदोर शहराच्या धर्तीवर बारामती शहराचा विकास करण्याचा मानस व्यक्त करुन श्री. पवार म्हणाले, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात येणार आहे. शहरात अनधिकृत जाहिरात फलक लागणार नाही, स्वच्छता राहिली पाहिजे, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखली पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी. याकरिता नागरिकांनी प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,

नागरिकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा मिळवून देण्याकरिता तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच विकास कामाच्या अनुषंगाने विधायक सूचनाही कराव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तीन हत्ती चौकाला ‘तिरंगा सर्कल’ असे नाव देण्यात आले असून या नामफलकाचे श्री. पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

*उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना विशेष सेवा पदक प्रदान*

उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याकरिता केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्य शासनाच्यावतीने ‘विशेष सेवा पदक’ जाहीर करण्यात आले, आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते डॉ. राठोड यांना विशेष सेवा पदक प्रदान करुन त्यांनी गडचिरोली येथे केलेल्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी ‘मेरा भारत महान’ देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला, याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती दि. १५:- भारतीय स्वातंत्र्याचा ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव सचिन यादव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , तहसीलदार गणेश शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.

श्री. नावडकर यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

चेतना फाऊंडेशन मध्ये ७९ स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

इंदापूर:- सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि चेतना जुनियर कॉलेज येथे ७९ स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी पतंजली योग समितीचे प्रमुख इंदापूरचे माननीय दत्तात्रेय अनपट तसेच माननीय उद्योजक संदीप जाधव आणि माननीय गोपीनाथ मोरे, निर्मिती कन्स्ट्रक्शन चे सर्वेसर्वा यांनी भूषवले.यावेळी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य, डॉ. गणेश म्हस्के व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य निकिता माने आधी उपस्थित होते याप्रसंगी प्रथम वर्ष बी. फार्मसी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या यशस्वी मुलींचे ही सत्कार करण्यात आले. तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग केलेला होता. त्याच्यामध्ये भाषण, लेझीम, मास पीटी अशा विविध कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय अनपट साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले, तसेच शरीरासाठी योगासने कसे महत्त्वाचे आहेत, असेही त्यांनी पटवून सांगितले. माननीय संदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि खेळ याविषयी माहिती सांगितली. तसेच माननीय गोपीनाथ मोरे साहेब यांनी स्वातंत्र्य वीर पुरुषांचा इतिहास मांडला आणि मुलांना त्याविषयी माहिती दिली. तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी आणि स्वातंत्र्याविषयी माहिती दिली व शुभ संकल्प करण्यास प्रेरित केले. अशाप्रकारे आजचा दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. चेतना फाउंडेशन अध्यक्ष उदय देशपांडे यांच्याबरोबर विलास भोसले आणि सोमनाथ माने, प्राचार्य आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा.प्राजक्ता झगडे आणि स्कूलच्या प्रा. प्रांजली सुतार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी याठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

इंदापूर- सरडेवाडी(ता. इंदापूर) दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, सौ सुनिता रणनवरे मॅडम, सौ चित्रा राऊत मॅडम मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडा फडकवण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले मुलांना खाऊ वाटप केले. शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राऊत मॅडम यांनी केले आभार सौ रणनवरे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे , दि. 15 :- भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अधिकारी नामदेव टिळेकर, संगिता राजापूरकर, पल्लवी घाडगे, चारुशीला देशमुख, उप विभागीय अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. डुडी यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अवयवदान उपक्रमाअंतर्गत मरणोत्तर अवयवदान करणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे दि. 15 :- भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

हर घर तिरंगा या मोहिमेला शिवराज करियर अकॅडमि इंदापूर येथे मुलांना राष्ट्रीय ध्वज तिरंगा देऊन सुरवात

इंदापूर – हर घर तिरंगा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवराज करिअर अकॅडमी मार्फत आज मुलांना राष्ट्रीय स्वतंत्र ध्वज देऊन प्रत्येकाने तो 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावरती लावावा अशी सूचना त्यांना देण्यात आली यावेळी शिवराज ॲकॅडमीचे संचालक सुधीर शिवाजी करगळ व प्राध्यापक विजय धेंडे सर यांच्या हस्ते मुलांना राष्ट्रीय ध्वज देण्यात आला.

प्रत्येकाला आपल्या घरावरती तिरंगा फडकवता यावा असं प्रत्येकाला वाटत असेल अशा या प्रत्येकाचे स्वप्न आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यामार्फत पूर्ण होत आहे याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटतो.

तिरंग्या विषयी प्रत्येकाला अभिमान असून यातील प्रत्येक रंग हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारची माहिती देत असतो यातील हिरवा रंग हा आपल्याला भारतातील समृद्धीची माहिती देतो तर पांढरा रंग आपणाला शांततेची प्रतिक दर्शवतो तर केसरी रंग हा भारतीय स्वतंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्यांना झालेले ने लढलेल्यांनी दिलेली आहुती यांचं स्मरण करून देतो आपल्याला त्यागाचं शौर्याचे प्रतिक दर्शवतो.

राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुंबई – राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज संपली आहे. आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलीस पदांच्या भरतीसंदर्भात निर्णय झाला आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक महिने थांबलेल्या भरती प्रक्रियेला वेग येणार असून, पोलिस दलाला ताज्या दमाचे मनुष्यबळ मिळणार आहे.

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सुरू होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रशासकीय कारणांमुळे ती लांबणीवर गेली. यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे. या भरतीद्वारे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील तसेच शहरातील हजारो उमेदवार पोलीस दलात सामील होण्यासाठी सज्ज आहेत. महायुती सरकारने राज्यातील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस दलात ताज्या आणि ऊर्जावान तरुणांचा समावेश झाल्याने कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यांचा समावेश असणार आहे. तसेच पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्याचा सरकारचा मानस आहे. महायुती सरकार आल्यानंतर पोलीस भरतीच्या तारखेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरला आहे.

वीर सरदार मालोजीराजे गढी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावर हिंगणगाव येथे भर उन्हात रस्ता रोको आंदोलन.

इंदापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीर सरदार मालोजीराजे यांची इंदापूर येथील गढी अतिक्रमण मुक्त करावी, त्यांची समाधी शोधून त्याचे संवर्धन करावे, त्यासाठी आराखड्यात योग्य बदल करावेत या प्रमुख मागण्यासाठी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे भर उन्हात सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली एक तासाहून जास्त काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता रोको आंदोलनानंतर पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी यासंदर्भात सर्वसमावेशक बैठक घेऊन हा प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.
हिंगणगाव येथे आंदोलन प्रसंगी आमदार महेश लांडगे म्हणाले, वीर सरदार मालोजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा संवर्धन करण्यासाठी आम्ही आंदोलन केले. यापूर्वी देखील मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले मात्र प्रशासनाने त्यांची दिशाभूल केली. मात्र आता दिशाभूल चालणार नाही. मालोजीराजे गढी आराखड्यात योग्य बदल होणे गरजेचे असून त्यासाठी आमच्या माणसांना सोबत घेणे गरजेचे आहे. मी पिंपरी चिंचवड येथे ९४० क्षेत्र २५० जेसीबी, १०० पोकलेन लावून सपाट केलेला माणूस असून प्रशासनाने माझी नीट माहिती घ्यावी. मी मतदान मिळवण्यासाठी आंदोलनात उतरलो नसून आमची अस्मिता जपण्यासाठी उतरलो आहे. पोलीसांनी कार्यकर्त्यांचे पत्ते, फोन नंबर घेतले असले तरी तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर फक्त माझ्यावर करा असे सूतोवाच त्यांनी केले.
यावेळी शिवभक्त अनिल देवळे महाराज, सोनाई दूध संघाचे संचालक तथा माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, महेश बोधले महाराज, प्रेमकुमार जगताप यांची भाषणे झाली.
यावेळी बाबासाहेब चवरे, सदानंद शिरदाळे, माऊली चवरे, पवनराजे घोगरे, प्रवीण पवार, किरण गानबोटे, राजकुमार जठार, राम आसबे, तेजस देवकाते, भारत जामदार, धीरज शहा, तानाजी देशमुख उपस्थित होते.
वीरश्री मालोजीराजे भोसले यांना इंदापूर मध्ये वीरमरण आले.
सध्या मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या सुशोभीकरणाचे काम राज्य सरकारकडून सुरू असून जोपर्यंत मालोजीराजे यांचे समाधीस्थळ सापडत नाही, तोपर्यंत चालू असणारं सुशोभीकरण काम थांबवण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांसह शेकडो शिवभक्तांनी लावून धरली होती अखेर प्रशासनाने नमते घेत चालू असणारे काम थांबवण्याचे आदेश तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिल्यानंतर शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेवून त्यांना निवेदन दिले. भगव्या टोप्या परिधान केलेल्या आंदोलकापेक्षा पोलिसांची संख्या जास्त होती. केंद्र व राज्यात भाजप प्रणित सरकार असताना देखील भाजप च्या तीन आमदारांनी मालोजीराजे गढी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले हे विशेष आहे. त्यामुळे सरकार व प्रशासनापुढे हा संवेदनशील प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान आहे.
दरम्यान तहसीलदार जीवन बनसोडे, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजीराजे गढी वरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली. यासंदर्भात प्रशासनाने १४ कुटुंब प्रमुख यांना अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते पैकी ४ जणांचे अतिक्रमण हटविण्यात आले असून एकाने वैद्यकीय कारणासाठी स्टे घेतला असून अतिक्रमण हटविण्याची प्रकिया जोरात सुरू आहे.

 न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी याठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

इंदापूर- दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी रक्षाबंधन चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब
न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, शिक्षिका सौ रणनवरे मॅडम, शिक्षिका सौ राऊत मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मुलींनी आपल्या लाडक्या भावासाठी आणलेल्या राख्या आपल्या लाडक्या भावांच्या हातावर बांधल्या मुलांनीही मोठ्या प्रेमाने आणलेले खोडरबर पेन्सिल आपल्या लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून दिल्या सौ रणनवरे मॅडम यांनी बहिण भावाच्या नात्याविषयी व त्यांच्या मधील ऋणानुबंध कसे असावेत याविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे बहिण भावाचं नातं काय असते याची माहिती दिली. अशा पद्धतीने रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राऊत मॅडम यांनी केले आभार सौ रणनवरे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

error: Content is protected !!