Home Blog Page 20

आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या निवासस्थानी अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार मा. उमेश उर्फ चंदू भाऊ यावलकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली मार्गदर्शन केले, लखन जगताप

आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या निवासस्थानी अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार मा. उमेश उर्फ चंदू भाऊ यावलकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली मार्गदर्शन केले, यावेळी भाऊंचा सत्कार, तेली गल्ली, माळी गल्ली, शिवाजी चौक, बटर गल्ली, कासार पट्टा, शास्त्री चौक, इंदापूर शहरातील या सर्व गल्लीतील गणेश उत्सव मित्र मंडळाने व जगताप परिवारातर्फे, व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर शहर अध्यक्ष.

लखन (भैया )जगताप, पंचायतराज पुणे जिल्हा उपाध्यक्ष.ज्योतीराम कुर्डे, नवनाथजी बाबरे,ओंकार हिंगमिरे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मयुर शिंदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रसाद राऊत, भटक्या विमुक्त मोर्चा अध्यक्ष गणेशजी देवकर व, भारतीय जनता पार्टी इंदापूर पूर्व ग्रामीण मंडल सरचिटणीस नवनाथजी शिंदे सर, इंदापूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष. माधुरी (ताई) भराटे, उपाध्यक्षा. सलमा (ताई) खान तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष दादा नायकुडे, या सर्वांच्या वतीने आमच्या निवासस्थानी भव्य सत्कार समारंभ करण्यात आला

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी  बाळगोपाळ यांनी मनमुराद लुटला आनंद

संपादकीय:-

चेतना इंटरनॅशनल स्कूल चेतना जुनिअर कॉलेज सरडेवाडी येथे गोपाळ कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्या देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने , संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

नर्सरी पासून ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले.

नर्सरी ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये राधाकृष्णा च्या वेशभूषणे कार्यक्रमाचे रंगत वाढवली तसेच लहान मुलींनी कार्यक्रमांमध्ये राधाकृष्ण वर आधारित असणाऱ्या गाण्यावरती नृत्यही केले.

युवराज शिंदे सर यांनी राधा कृष्णाची कहानी सांगून मुलांना मार्गदर्शन केले. व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल यांनीही विद्यार्थ्यांना दहीहंडी हा पारंपारिक सण असून त्याचे महत्त्व पिढ्यानपिढ्या माहिती व्हावे म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम स्कूलमध्ये घेण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहावीच्या व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली मुलांना खाऊ वाटप झाला व कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजन प्रांजली सुतार यांनी केले. व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनीही सहकार्य केले

बावडा महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

बावडा दि. 21 येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि मा. सहकार व संसदीय कार्यमंत्री, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात दि. 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये पारंपरिक खेळ आट्यापाट्या, बुद्धिबळ, क्रिकेट, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रस्सीखेच, हॉलीबॉल स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कला विभागाच्या संघाने आट्यापाट्या स्पर्धेचे तर विज्ञान विभागाच्या संघाने क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मा. हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 145 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा सिद्धार्थ चितारे, प्रा. तायाजी लोंढे, प्रा.प्रवीण घोगरे, आनंदराज माने पाटील, प्राध्यापिका सौ दीप्ती पाटील, अर्चना हरिहर, पूजा पाटील, अंकिता भगत, प्राजक्ता बागल, रोहिणी सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. लहू वावरे यांनी या उपक्रमासाठी विशेष मार्गदर्शन केले. संस्थेचे ज्येष्ठ संचालक उदयसिंहजी पाटील, उपाध्यक्ष मनोजभाऊ पाटील, सचिव किरणकाका पाटील, व सर्व संचालक यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे दि.19 :- यंदाचा गणेशोत्सव हा शासनाने राज्योत्सव म्हणून जाहिर केले आहे पूर्वीपासून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिध्द आहे. यावर्षी सुध्दा गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे आणि मोठ्या उत्सहात साजरा व्हावा यासाठी प्रशासन, महानगरपालिका, पोलिस विभाग व सर्व गणेशमंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

शहरातील गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा या दृष्टीने शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठकीचे आज बाल गंधर्व रंग मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त् मनोज पाटील, शहरातील गणपती मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीला गणपती मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या यानंतर बोलतांना पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार म्हणाले की, शासनाने यावेळी गणेशोत्सवास राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे. पूर्वीपासूनच आपल्या शहरातील गणेशोत्सव खूप प्रसिध्द आहे त्यामुळेच आपल्या शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने, शांततेत व निर्विघ्नपणे तसेच निर्भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शहरातील गणपती मंडळांनी कोणतेही वाद विवाद घडतील असे देखावे करू नयेत. पाऊस सुरू आहे त्यामुळे वीजेची कामे करतांना काळजी घ्यावी. मंडळांनी आपल्या मंडळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. आपातकालीन घडना घडू नयेत यासाठी सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी. पोलिस विभागाकडून वाहतूकीसंदर्भात, गर्दीच्या नियोजनाबाबत योग्य दक्षता घेण्यात येत आहे.

गणपती मंडळांनी विर्सजन मिरवणूकीबाबत व इतर काही मांडलेल्या अडचणीबाबत लोकप्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशासन आणि पोलिस विभाग गणपती मंडळांच्या मदतीसाठी सदैव सोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, आपल्या जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव खूप उत्सहाने व मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावेळी गणेशोत्सवाला शासनाने राज्योत्सव म्हणून जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने गणेशोत्सवामध्ये शासनामार्फत विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्व मंडळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा. आपल्या शहरातील गणेशोत्सव आपल्या शहरापुरता मर्यादित न रहाता त्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्सव साजरा करतांना मंडळांना सुरळीत वीज पुरवठा, वाहतूकीबाबतच्या अडचणी तसेच इतर काही अडचणी सोडविण्यासाठी व सोई सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रभाग निहाय गट तयार करण्यात आले असून त्यांच्या मार्फत आपल्या सर्व अडचणी सोडवल्या जातील व गणेशोत्सवात गणेश भक्तांना, नागरिकांना जास्तीत जास्त सोई सुविधा देखील पुरवल्या जातील.

तसेच गणपती मंडळांनी मांडलेल्या अडचणी देखील सोडविण्यात येतील व सूचनांचा देखील विचार करण्यात येईल. गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गणेशोत्सवावेळी महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोई सुविधा विषयक माहिती दिली. तसेच मागील वर्षी देण्यात आलेल्या सोई सुविधा पेक्षा जास्त सोई सुविधा यावर्षी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे इंग्रजांच्या काळापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या गणेशोत्सवामधून सामाजिक बांधिलकी जपली जाते. यावर्षी गणपती मंडळांनी देखावे सादर करताना सामाजिक संदेश असलेले देखावे सादर करावेत. सर्व शासकीय विभागातील अधिकारी देखील गणेशोत्सवात सहभागी होवून आपणाला कोणत्याही सोई सुविधेची कमतरता भासणार नाही यासाठी नियोजनबध्द काम करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले.

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई:-महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे, जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली असून, त्याचा मोठा फटका हा शेतीला बसला आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, शेतांना नदीचं स्वरुप आलं आहे, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान पुढील तीन दिवस राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान संकट अजून टळलं नसून हवामान विभागाकडून मंगळवारी देखील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच कोकण आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उद्या कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग प्रति तास 50-60 किमी राहण्याची शक्यता आहे, तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्यानं जोरदार पाऊस, वादळ आणि विजा असं तिहेरी संकट आहे.*

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर आणि मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. आज पावसाची तीव्रता वाढली असून मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे,रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केले असून, पुढील ४८ तासांत मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीत काळजी घ्यावी, गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आले आहे.*

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण

कोल्हापूर:-गेल्या अनेक वर्षांपासून सर्किट बेंचसाठी सुरू असलेला कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा लढा अखेर संपुष्टात आला. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. शाहूनगरीत होत असलेला सोहळा, कोल्हापूररांकडून झालेले आदरातिथ्य आणि शाहू छत्रपती-बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेमपूर्वक संबंधांचा उल्लेख सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात केलाच परंतु सर्किट बेंचसाठी सुरू असलेल्या संघर्ष काळात महाराष्ट्रातील नेत्यांचा ‘गुवाहाटी दौरा’ सुरू होता, अशी टिप्पणी त्यांनी केली. यादरम्यान चर्चेत असलेला ‘काय ती झाडी-काय ते डोंगर’ अशा संवादाचा उल्लेखही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात केल्याने मंचावर उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हसू अनावर झाले.

कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे, शाहूनगरीचे खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह ६ जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे यासाठी लढा सुरू होता. अखेर याला यश मिळाल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या सहा जिल्ह्यातील जवळपास ७० हजार प्रकरणे आता खंडपीठामध्ये चालवली जाणार आहेत.

विवेक घाडगे पाटील, संग्राम देसाई मला आग्रह करायचे की कोल्हापुरात कार्यक्रमासाठी या. मुंबईत बार काऊन्सिल ऑफ इंडियाची परिषद होती. त्या परिषदेत विवेक घाडगे पाटील यांचे भाषण ऐकले. कोल्हापूरबद्दल ते भरभरून बोलत होते. अगदी त्याच वेळी महाराष्ट्रातील नेत्यांचा गुवाहाटी दौरा सुरू होता. घाडगे पाटलांचे भाषण ऐकून काय ते झाडी.. काय ते डोंगर… असा संवाद मला आठवला, असे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. कोल्हापूरच्या कार्यक्रमासाठी मला अनेकदा बोलवणे आले परंतु मी ठरवले होते की कोल्हापूरला येईल तर नियतीने साथ दिली तर १४ मे २०२५ नंतरच येईल आणि सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठीच येईल… असे सरन्यायाधीश गवई म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. आपल्याला मिळालेला अधिकार हा राजवैभव, राजविलास उपभोग घेण्यासाठी नसून आपल्या रंजलेल्या गांजलेल्या प्रजेसाठी आहे, असे शाहू महाराजांनी सांगितले होते. त्यांच्या या वाक्याचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे.

पद हे अधिकार गाजविण्यासाठी नाही, नियतीने सेवा करण्याची दिलेली संधी आहे, त्यानुसार मी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, असे सरन्यायाधीशांनी आदरपूर्वक स्पष्ट केले. तसेच त्यांचे सर्वोच्च न्यायालयातील सहकारी समरेंद्र निंबाळकर यांनी शाहू महाराज यांच्यावर केलेली खास कविताही ऐकवली. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात शाहू महाराज यांचे अमूलाग्र स्थान राहिले. लंडनमधून अर्धवट शिक्षण सोडून आलेल्या बाबासाहेबांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत करून पुन्हा लंडनला पाठवले. त्याचवेळी ‘बाबासाहेबांनी द प्रोब्लेम ऑफ रुपी’ हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला ज्यावर आपली अर्थव्यवस्था उभी आहे, असा विशेष उल्लेख सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे स्मारकात रुपांतर केले. मी तिथे दोन तीन वेळा जाऊन आलो. तसेच शाहू महाराजांचे हस्ताक्षर असलेले डॉ. आंबेकरांना लिहिलेले पत्र लंडनच्या स्मारकात आहे, अशी विशेष आठवणही सरन्यायाधीश गवई यांनी सांगितली.

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई:- राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक केलं आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणात हवामान विभागाने हाय अलर्ट दिले आहेत. मराठवाड्यात पुढील चार दिवस काही जिल्ह्यात पावसाची हजेरी राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवली आहे. संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

सचेत ॲपमार्फत नागरिकांना सूचना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात आजपासून ते 21 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ज्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

तर मराठवाडामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ज्यामध्ये वीज चमकणे, गडगडाटांसह 40-50 किमी प्रति तास वादळी वारे वाहण्याची ही शक्यता वर्तवली आहे. वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजानुसार आज सकाळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा, सखल भागात किंवा नदी, नाल्याकाठी असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याच आव्हान करण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच कुंडलीका नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तर खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गावातील सरपंचापासून ते ग्रामसेवकापर्यंत आता सर्वांवर असणार केंद्र सरकारची नजर ! सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई:-तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. केंद्रातील सरकारने अशा मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा बंदोबस्त करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.या नव्या प्रणालीचा 15 ऑगस्ट पासून अर्थातच स्वातंत्र्य दिनापासून शुभारंभ झाला असून या नव्या प्रणालीमुळे ग्रामीण शासन व्यवस्थेत पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय.*

 

*👉🔴🟥🟥👉खरे तर ग्रामपंचायतीत सरपंचाकडून तसेच तेथील ग्रामसेवकांकडून मनमानी कारभार चालवला जातोय असा आरोप सातत्याने केला जातो. गावागावांमध्ये असे प्रकार बिनधास्त सुरू आहेत. या लोकांना शासनाचा अजिबात वचक राहिलेला नाही. काही गावांमध्ये ग्रामसभाच घेतल्या जात नाहीत. ग्रामसभा फक्त कागदावर राहते. मात्र आता यापुढे अशी कोणतीच घटना होणार नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय च्या मदतीने ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कारभारावर करडी नजर ठेवली जाणार आहे.यासाठी केंद्र सरकारने सभासार ही नवीन प्रणाली लॉन्च केली आहे. या नव्या प्रणालीमुळे पंचायत समितीमधील आणि ग्रामपंचायत मधील कारभार अधिक पारदर्शक होईल आणि सर्वसामान्य नागरिकांची होरपळ थांबेल अशी आशा आहे. अनेकदा ग्रामपंचायतीमध्ये तसेच पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची कुचंबना होते.*

 

*👉🛑🅾️🛑नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत, त्यांची आर्थिक पिळवणूक सुद्धा होत असते. पण भविष्यात असे कोणतेच प्रकार आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. नवीन सभासार प्रणाली ग्रामीण स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी होण्यासाठी मदत करणार आहे. अनेक गावांमध्ये ग्रामसभा होत नाहीत आणि यामुळे त्या गावाचा विकास खंडित होतो. ग्रामसभा झालीच नाही तर निधीचा योग्य वापर शक्य आहे. याचमुळे आता केंद्रातील सरकारने देशभरातील 2.68 लाख ग्रामपंचायतींमध्ये सभासार प्रणाली लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे.*

 

*👉🅾️🅾️👉या नव्या प्रणाली बाबत सरकारकडून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सरकारने सांगितले आहे की ही प्रणाली एआय द्वारे चालवली जाणारी एक बैठक सारांश प्रणाली राहणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या बैठकीचे इतिवृत्त, घेतलेले निर्णय, त्यांचे डेटा विश्लेषण या सर्व गोष्टींच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. या कामात एआय मदत करणार आहे.या नव्या प्रणालीमुळे बैठकींचे रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग सहज शक्य होणार आहे आणि यामुळे कामांमधील पारदर्शकता वाढणार आहे. या नव्या प्रणालीमुळे ग्रामविकास निधीचा योग्य वापर झाला का, घेतलेले निर्णय अंमलात आले का, यावरही देखरेख ठेवता येणे शक्य होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत त्या राज्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यास प्राधान्य राहील. टप्प्याटप्प्याने देशातील सर्वच राज्यांमध्ये ही प्रणाली लागू केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून ही प्रणाली लागू करण्याचे काम सुरू होणार आहे.*

निमसाखर,एज्युकेशन सोसायटीचे एन. ई. एस. स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे आज 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

इंदापूर – निमसाखर,एज्युकेशन सोसायटीचे एन. ई. एस. स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे आज 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय नंदकुमार सूर्यकांत रणवरे यांनी स्वीकारले होते. त्यावेळी संस्थेचे सचिव आदरणीय धनंजय भैया उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त मेजर श्री सचिन पांडुरंग रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत काळे, आदरणीय जगताप भाऊसाहेब, भगवानराव रणसिंग, ग्रामपंचायतचे सदस्य सौ नीता माने,गोरख शेळके, मेजर शिवाजीराव खिलारे, व त्यांचे काही सहकारी तसेच विद्यालयातील आजी-माजी कर्मचारी ज्येष्ठ व कनिष्ठ ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. या नूतन साठी समस्त ग्रामस्थ व उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगते देखील व्यक्त केले. संस्था सचिव धनंजय भैय्यांनी सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या

व उपस्थित सर्व ग्रामस्थ पालक वर्ग आजी-माजी सैनिक विद्यालयाचे आजी-माजी कर्मचारी सर्व विद्यार्थी वर्गाचे मनापासून स्वागत केले ,कौतुक केले व आभार मानले. प्राचार्य श्री चंद्रकांत रणवरे सर यांनी देखील कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले व उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले
त्याचवेळी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मेजर श्री सचिन पांडुरंग रणवरे यांनी विद्यालयाच्या विकासासाठी 21 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय मधुकर खरात सर यांच्या तर्फे त्यांच्या वडिलांचा शतकीपार आनंद व्यक्त करताना सर्व विद्यार्थी व उपस्थित यांना खाऊ वाटपाचै नियोजन केले. हा कार्यक्रम उत्तमपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सन्माननीय वैभव हणमंते सर यांनी सर्वांचे आभार मानून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बारामती उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना विशेष सेवा पदक प्रदान

बारामती उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याकरिता केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्य शासनाच्यावतीने ‘विशेष सेवा पदक’ जाहीर करण्यात आले, आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते डॉ. राठोड यांना विशेष सेवा पदक प्रदान करुन त्यांनी गडचिरोली येथे केलेल्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी ‘मेरा भारत महान’ देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला, याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!