Home Blog Page 19

जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने ‘सायकल बँक’ लोकार्पण सोहळा. मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते १११ विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण.

पुणे- ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनींना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. या प्रवासामुळे त्यांची शालेय हजेरी कमी होते तसेच शिक्षणात अडथळे निर्माण होतात. या समस्येवर मात करून मुलींच्या शिक्षणात गती यावी, शाळेत नियमित उपस्थिती वाढावी आणि प्रवासाचा त्रास कमी व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने ‘सायकल बँक’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते इंदापूर येथे संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुक्यातील पाचवी ते आठवी वर्गातील १११ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू या उपक्रमाचे महत्व अधोरेखित करीत होते.

कृषी मंत्री श्री. भरणे यांनी यावेळी सांगितले की, “पुणे जिल्हा परिषद शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ‘सायकल बँक’ ही योजना मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारी आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सोपे होईल, प्रवासाचा त्रास कमी होईल आणि नियमित हजेरीत वाढ होईल. शिक्षणाच्या प्रवाहात कोणतीही मुलगी मागे राहू नये, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. पुढेही जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.”

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती इंदापूरचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक संधींना नवी दिशा मिळणार असून, सायकल ही केवळ प्रवासाचे साधन न राहता शिक्षणाची गती वाढविणारे माध्यम ठरणार आहे.

 

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना न्याय देण्याकरिता आयोग कटिबद्ध- उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

पुणे- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्यायाची प्रतिबद्धता दाखविण्यासोबतच ती प्रतिष्ठापित करण्याकरिता आयोग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केले.

ॲड. मेश्राम म्हणाले, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची १ मार्च २००५ रोजी स्थापना झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२४ मध्ये आयोगाचे पृथक्करण करत वैधानिक दर्जा देण्याचे काम केले. यामाध्यमातून सामाजिक न्यायाबद्दल असलेली त्यांची प्रतिबद्धता, संवेदनशीलता दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यासंस्थेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येते. यामध्यमातून त्यांचे राज्याच्या जडणघडण आणि विकासामध्ये योगदान निर्मितीच्या अनुषंगाने या संस्थेच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. या संस्थेच्या कामकाजावर आयोगाचे लक्ष असून कामकाजात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

काल पार पडलेल्या जन सुनावणीमध्ये बँकिंग सोल्यूशन (बीएस) एज्युकेशन संस्थेबाबत विविध माध्यमातून प्राप्त तक्रारीची दखल घेत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल आयोगाकडे १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, या अहवालानुसार संबंधित संस्थेवर उचित कार्यवाही करण्यात येईल, असेही ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये परावर्तन होत असतांना नगर विकास प्रशासनाच्यावतीने सफाई कर्मचारी या पदाचा आकृतीबंधात समावेश केलेला नाही, त्यामुळे अशा कर्मचारी, त्यांच्या कुटुंबियांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागले, याबाबत आयोगाने गंभीर दखल घेत नगर विकास प्रशासनाला तात्काळ प्रभावासह कारणे दाखवा नोटीस बजावली असून या पदाला आकृतीबंधात समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे, असेही
ॲड. मेश्राम म्हणाले.

पळसदेवचे सामाजिक कार्यकर्ते किरण काळे यांच्या पत्नी मोनिका यांचे गौरी सजावटीमध्ये “ऑपरेशन सिंदुर”चे प्रदर्शन

पळसदेवचे सामाजिक कार्यकर्ते किरण काळे यांच्या पत्नी मोनिका यांचे गौरी सजावटीमध्ये “ऑपरेशन सिंदुर”चे प्रदर्शन*
इंदापूर तालुका भाजपचे उपाध्यक्ष मा.श्री.किरण(भाऊ)बाळासो काळे यांच्या पत्नी सौ.मोनिका किरण काळे यांनी गौराई गणपतीच्या सणानिमित्त गौरी सजावटी मध्ये “ऑपरेशन सिंदूर”च्या बॅनरचे प्रदर्शन केले होते… किरण काळे यांच्या घरी दरवर्षी गौरी सजावटीमध्ये ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर डेकोरेशन तयार केले जाते. या डेकोरेशनच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे कार्य ते करीत असतात. या अगोदर २०१८ पासून आतापर्यंत त्यांनी वृक्ष वाचवा देश वाचवा, वृक्षारोपण काळाची गरज, पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिक बंदी, मुलगी वाचवा देश वाचवा, स्त्री भ्रूण हत्या, मुलगी शिकली प्रगती झाली अशा विविध सामाजिक प्रश्नांवर ते गेल्या आठ वर्षांपासून गौरी सजावटीमध्ये डेकोरेशन करून समाज जागृती करण्याचे कार्य करीत आहेत. गौरी सजावटीमध्ये सामाजिक प्रश्नांवर डेकोरेशन करण्याचे किरण काळे यांचे हे सलग आठवे वर्ष आहे.

किरण काळे हे पळसदेवचे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. किरण काळे यांना नुकतेच जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त “युवा महाराष्ट्र फाउंडेशन” या सामाजिक संस्थेतर्फे “आदर्श युवा सामाजिक कार्यकर्ता” (महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२५)या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्या भावनेने प्रेरित होऊनच ते हे कार्य करीत आहेत. त्यांच्या लग्ना अगोदर त्यांच्या आई सौ.सुनंदा बाळासो काळे व बहिण सौ.सोनल बाळासो काळे ह्या त्यांना या कार्यात मदत करीत होत्या. लग्नानंतर त्यांच्या पत्नी सौ.मोनिका या त्यांना मोलाची साथ देत आहेत…

पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर; गौरी पूजनला राहणार सुट्टी

पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर; गौरी पूजनला राहणार सुट्टी

 

पुणे, दि. ३१  सन २०२५ या वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शाळांसाठी स्थानिक सुट्ट्यांची घोषणा विभागीय आयुक्त पुणे विभाग डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली आहे. शासन, सामान्य प्रशासन विभागाने दि. १४ मार्च १९८३ रोजी काढलेल्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश करण्यात आला असून, त्यानुसार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना गौरीपूजन, घटस्थापना आणि नरक चतुर्दशी या उत्सवांच्या दिवशी सुट्टी मिळणार आहे.

जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांमध्ये सोमवार, दि. ०१ सप्टेंबर २०२५ रोजी गौरीपूजन, सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापना आणि सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी नरक चतुर्दशीचा समावेश आहे.

भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाकसे यांची निवड

भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाकसे यांची निवड

संपादकीय

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर भाजप पुणे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांनी पुणे दक्षिणची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. मागील काळात झालेल्या लोकसभा विधानसभेची निवडणूक ओबीसी मोर्चाचे काम उत्कृष्ट करण्यात आले होते. वाकसे यांच्या संपूर्ण टीमने पूर्ण दक्षिण विभागांमध्ये अहोरात्र काम केल्याची दखल व

 

घेत पुन्हा एकदा गजानन वाकसे यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी दिले आहे. यावेळी पक्षाने माझ्यावरती दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन. पक्षाचे असलेले विचार ध्येय सामान्य जनतेपर्यंत पर्यंत नेण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे गजानन वाकसे यांनी सांगितले.

मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन स्थळी समाज बांधवांना प्राथमिक आरोग्य सुविधा, पाणी वितरण व अल्पहार वितरण करण्यासाठी 🚩राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या🚩 स्वयंसेवकांचे सेवाकार्य.🚩 

#मराठा_आंदोलन

मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन स्थळी समाज बांधवांना प्राथमिक आरोग्य सुविधा, पाणी वितरण व अल्पहार वितरण करण्यासाठी 🚩राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या🚩 स्वयंसेवकांचे सेवाकार्य.🚩

हा सेवा स्टॉल CST स्टेशनच्या समोर मॅकडोनाल्डच्या जवळ आहे.

#Seva4Society #RSS100 #मराठा_आरक्षण

मराठा आरक्षणास राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष) निवडणूक चिन्ह बासरी यांचे अध्यक्ष माननीय एडवोकेट श्रीहरी बागल साहेब यांचा जाहीर पाठिंबा

एक मराठा कोटी कोटी मराठा… संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या गरजवंत मराठ्यांचा लढा ,मुंबई वारी, मराठा आरक्षणास राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष) निवडणूक चिन्ह बासरी यांचे अध्यक्ष माननीय एडवोकेट श्रीहरी बागल साहेब यांचा जाहीर पाठिंबा. मराठा मुक मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात होण्याच्या आधीपासून एडवोकेट श्रीहरी बागल यांची तशी मागणी राहिलेली आहे .अण्णासाहेब जावळे पाटील साहेब यांच्याही सभेला त्यांनी हजेरी लावून मराठा समाजाच्या हिताचे काम केले आहे व नेहमी तशी मागणी राहिली आहे मराठा मूक मोर्चा च्या आंदोलनासाठी मोर्चामध्ये अनेक समाज बांधव घेऊन हे सहभागी झाले होते स्वतः मराठा असल्याने पक्षांमध्ये बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते हे मराठा असल्याने गरीब शेतकरी कुटुंबातील सर्व कोर कमिटी असल्याने समाजाचे झालेले नुकसान हा पक्ष डोळ्याने बघू शकत नसल्याने त्यांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना हा राजकीय पक्ष स्थापन करून शक्य ते समाज उपयोगी कार्य केले आहे. आज श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर विधिवत पूजा करून मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बोरवली पूर्व मुंबई येथे तातडीची बैठक घेऊन मराठा योद्धा , संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब हे सखळ मराठा समाजाचे काळीज असल्याने दादांना पाठिंबा देण्याचे ठरले . महाराष्ट्रातील येणारे सर्व मराठा व इतर समाजाचा जाहीर पाठिंबा असलेल्या ने सर्व समाजाचे बांधव यांचे भव्य असे स्वागत करून आम्ही मुंबईतले मराठा रहिवासी म्हणून त्यांना इतर सेवा पुरवण्याचे काम करणार असेही या बैठकीत ठरले आहे. विधानसभा 2024 निवडणूक राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाने स्वबळावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी बासरी निवडणूक चिन्ह दिल्याने बासरी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती फक्त मुंबईमध्ये जवळजवळ वीस विधानसभा ठिकाणी राष्ट्रीय स्वरा सेनेने उमेदवार दिले होते समाजाने भरघोस मतांनी त्यांचा विजय करण्यासाठी प्रयत्न हि केला होता मराठा समाजाच्या मागण्या 50% च्या आत मध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण या मायबाप सरकारने जाहीर करावे तसा अध्यादेश त्वरित जाहीर करावा अन्यथा राष्ट्रीय स्वराज्य सेना येऊ घातलेली बीएमसी BMC निवडणूक व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवतील. संघर्ष योद्धा मराठ्यांचं काळीज असलेले माननीय श्री मनोज दादा पाटील साहेब यांची मुंबईमध्ये स्वागताची जय्यत तयारी चालू केलेली आहे मुंबई व परिसरातील लाखो मराठे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग होऊन आंदोलनाच्या ठिकाणी समाज उपयोगी सेवा पुरवण्याचे काम करणार आहेत. माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे सहकार्य केले तसे सहकार्य सध्याचे मुख्यमंत्री असलेले माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी करावे व सकळ मराठा समाजाला त्वरित न्याय द्यावा व मुंबई पोलीस आयुक्त साहेब माननीय पोलीस महासंचालक मॅडम यांनीही ह्या शांतता मार्गाने कायदेशीर चालू असलेले आंदोलनास सहकार्य करावे व समाजाला न्याय द्यावा . महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्वरित तोडगा काढून समाजाला न्याय द्यावा .समाजाचा रोष राग या सरकारला परवडणारा नाही याचाही या सरकारने अभ्यास करावा. शासनाने हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट त्वरित लागू करून मराठा समाजाला हक्काचे आरक्षण द्यावे सकळ मराठा समाज या सरकारला डोक्यावर घेऊन नाचेल . जय शिवराय जय शंभुराजे. – ॲड. श्रीहरी बागल.

राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय पक्ष ) Registered by ECI ( new Delhi)

निवडणूक चिन्ह – बासरी🪈. -9820305909

जिल्हास्तरीय शासकीय समितीवर उत्तम फाळके यांची नियुक्ती 

जिल्हास्तरीय शासकीय समितीवर उत्तम फाळके यांची नियुक्ती 

पंडित दीनदयाळ हिरक महोत्सव निमित्त एकात्म मानव दर्शन या पुणे जिल्हास्तरीय समिती च्या अशासकीय सदस्य पदी श्री उत्तम फाळके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पुणे जिल्हास्तरीय समिती चे अध्यक्ष पुण्याचे मा. जिल्हाधिकारी मा जितेंद्र डुडी हे आहेत. या समितीमध्ये पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे , मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे सहीत असे शासनाच्या पुणे जिल्ह्यातील 16 शासकीय खात्याचे प्रमुख सदस्य आहेत या समितीचे काम एकात्म मानव दर्शनाचा विचार वेगवेगळ्या घटकांपर्यंत विविध रित्या पोहोचवणे, प्रसार करणे हे आहे. .या समितीच्या अनुषंगाने एक अभ्यास गट पण तयार करण्यात आलेला आहे. या समितीच्या माध्यमातून एक लाख पुस्तके छापून जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार व राज्य शासन ज्या विचारावर चालत आहे ते पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शनाचा लोक कल्याणकारी विचार समाजातील सर्व स्तरावर व युवा पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे .राज्यातील युवा वर्गाच्या सर्वांगीण विकास करणे . जिल्हास्तरीय समिती मार्फत पंडितजी यांचे कार्य विचार प्रणाली व एकात्म मानव दर्शन हा शालेय विद्यार्थी , शिक्षक,महिला,शेतकरी , कामगार ,सनदी लेखापाल आणि अध्यात्मिक क्षेत्र या महत्त्वाच्या व्यक्ती इत्यादी घटकापर्यंत पोहोचविणे. समितीची एक बैठक मा. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या समवेत नुकतीच पुणे येथे पार पडली . प्रत्येक महिन्याला समितीची बैठक होणार आहे.

ग्रामपंचायत शहा गावचे सरपंच माननीय श्री दिलीप (बापू) पाटील व ग्रामपंचायत शहायांच्या संयुक्त विद्यमाने आज शिंगाडे वस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत शहा गावचे सरपंच माननीय श्री दिलीप (बापू) पाटील व ग्रामपंचायत शहायांच्या संयुक्त विद्यमाने आज शिंगाडे वस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिंगाडे वस्तीचे ग्रामस्थ त्याचबरोबर इंदापूर पंचायत समितीचे राऊत साहेब हजर होते.

दौंड तालुक्याचे भाजपचे लोकप्रिय आरोग्यदूत आमदार ॲड.मा.श्री.राहुल(दादा)कुल यांची भाजपचे युवा नेते मा.श्री.किरण(भाऊ)काळे यांच्या घरी सदिच्छा भेट

दौंड तालुक्याचे भाजपचे लोकप्रिय आरोग्यदूत आमदार ॲड.मा.श्री.राहुल(दादा)कुल हे काल संध्याकाळी पळसदेव या ठिकाणी “शिवशाही व भिमशाही युवा प्रतिष्ठान” यांनी आयोजित केलेल्या भव्य दहिहंडी कार्यक्रमासाठी आले असता दादांनी भाजपचे युवा नेते मा.श्री.किरण(भाऊ)काळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली…

 

यावेळी मा.श्री.राहुल(दादा)कुल यांच्यासमवेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती, भाजपचे युवा नेते मा.श्री.प्रविण(भैय्या)माने, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.श्री.मयुरसिंह पाटील, पुणे जिल्हा भाजपचे महामंत्री मा.श्री.आकाशजी कांबळे, पश्चिम मंडलाचे इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष मा.श्री.तेजसजी देवकाते यांच्यासह पळसदेव गावातील व इंदापूर तालुक्यातील भाजपचे सर्व आजी माजी पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते…

🌹🌹💐💐❤️❤️🙏

error: Content is protected !!