भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाकसे यांची निवड
संपादकीय
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर भाजप पुणे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांनी पुणे दक्षिणची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. मागील काळात झालेल्या लोकसभा विधानसभेची निवडणूक ओबीसी मोर्चाचे काम उत्कृष्ट करण्यात आले होते. वाकसे यांच्या संपूर्ण टीमने पूर्ण दक्षिण विभागांमध्ये अहोरात्र काम केल्याची दखल व
घेत पुन्हा एकदा गजानन वाकसे यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी दिले आहे. यावेळी पक्षाने माझ्यावरती दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन. पक्षाचे असलेले विचार ध्येय सामान्य जनतेपर्यंत पर्यंत नेण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे गजानन वाकसे यांनी सांगितले.