Home Blog Page 18

आता प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध ; जिल्ह्यात 1062 केंद्र सुरु

पुणे दि.११ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा)ग्रामविकास विभागाने अधिसूचित केलेल्या सेवांचा विस्तार करत राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण 1062 सेवा आता थेट प्रत्येक ग्रामपंचायतीत कार्यरत होणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय दि. 28 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला असून, ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील 1087 ग्रामपंचायतींसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत महाआयटीला माहिती देण्यात आली होती. जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 1014 ग्रामपंचायतींना युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले आहेत. सदर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सुहास मापारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून तालुका पातळीवर हँड्स-ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरच ग्रामपंचायत पातळीवर सेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवांचा दिलासा एका ठिकाणी मिळणार असून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

नागरिकांना आता सरकारी सेवा अन् योजना व्हॉट्अपवर मिळणार डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्नमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई-मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, याची आपल्याला कल्पना आहे. आता आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार, नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे, याचा अभ्यास केला आहे. आता आपण डिजिटाइज पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकांकडून जी मागणी येते, त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते. त्यामुळे, डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचं काम सरकार सुरू करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणार आहेत, त्यामध्ये 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाइज पद्धतीचा पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर, 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारकडील रेकॉर्ड वरुनच आपण माहिती भरणार आहोत. त्यामुळे, आपले सरकारचं हे दुसरं व्हर्जन येत आहे. त्यामध्ये, 4 टप्पे असतील, त्यामुळे नागरिकांना केलेला अर्ज सध्या कुठे आहे? हेही पाहाता येणार आहे. लोकांना डिजिटल सेवा मिळणं आणि प्रेडेक्टिबल होणार, व्हॉट्सॲपवर देखील सेवा उपलब्ध करुन देणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे, शासन दरबारी मारावे लागणारे खेटे कमी होतील, असेच दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील गुंतवणुकीत आपण जी आघाडी घेतली आहे, ती पुन्हा एकदा 1 लाख 500 हजार कोटींवर गेली असून याचे करार झाले आहेत. त्यामुळे, आज याचा आनंद वाटतो आहे, ज्यातून 47 हजार जणांना रोजगार मिळेल. डेटा सैंटरची उभारणी रायगडमध्ये होईल, नाशिकमध्ये नंदूरबारमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्यातून 600 लोकांना रोजगार मिळेल. विदर्भात रिलायन्स फूड पार्क आणि शीतपेय पार्क तयार करणार आहोत. तिथे 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहोत. अदानींची देखील 70 हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे, असे म्हणत राज्यातील उद्योजकीय गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

 

*नवी दिल्ली:-उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर रेड्डी यांना केवळ 300 मते मिळाली आहेत. निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे विरोधकांच्या दाव्यांना मोठा धक्का बसला. राधाकृष्णन शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.*

 

*👉🅾️🅾️👉आमच्या उमेदवाराला ३१५ मते मिळतील, असे दावा इंडिया आघाडीकडून केला गेला होता. परंतु प्रत्यक्षात ३०० मतेच मिळाल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. ईव्हीएममधून मतचोरी होत असल्याचा मुद्दा पुढे करून विरोधी पक्षाकडून मतपत्रिकेचा आग्रह होत असताना मतपत्रिकेवरच झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे १५ खासदार फुटल्याने इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बी सुदर्शन रेड्डी १०० टक्के जिंकतील, असा दावा इंडिया आघाडीकडून होत होता. सत्ताधाऱ्यांमधील काही पक्ष संतुष्ट नसल्याचे सांगून आम्ही या निवडणुकीत इतिहास घडवू, असेही इंडिया आघाडीकडून सांगितले जात होते.*

 

*👉🔴🔴👉परंतु इंडिया आघाडीचेच १५ खासदार फुटल्याने बिहार विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला सर्वांत मोठा झटका बसला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देऊन आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी यांच्याकडे पाठवला. त्यांच्या राजीनाम्यामुळे घटनेनुसार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेणे कायद्याने अनिवार्य होती. एनडीकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान झाले. आज सायंकाळी साडे सात वाजता जाहीर झालेल्या निकालानुसार सी. पी. राधाकृष्णन यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहे.*

विविध उपक्रमातून जनजागृतीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. धनंजय देशमुख यांचा सन्मान

विविध उपक्रमातून जनजागृतीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. धनंजय देशमुख यांचा सन्मान

 

यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेच्या ज्युनिअर विभागाकडील प्रा. धनंजय देशमुख यांना व्यसनमुक्तीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक ज्येष्ठ कीर्तनकार,युवकमित्र ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र,शाल,श्रीफळ देऊन प्रा. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्त युवक संघाचे राज्याध्यक्ष दिपक जाधव, माजी अध्यक्ष शहाजी काळे(दौंड), मार्गदर्शक बाळासाहेब शेरेकर(कराड), नंदकुमार देशमुख (जेजुरी),समाधान पराडे (बाभुळगाव),सुनील पाटिल (बोंडले),विजय पराडे (सोलापूर जिल्हाध्यक्ष)आदी उपस्थित होते.

प्रा.धनंजय देशमुख यांनी व्यसनमुक्तीचे उल्लेखनीय कार्य करत असताना विधायक ३१ डिसेंबर-दारू नको,दूध प्या या उपक्रमाचे मागील १७ वर्षांपासून आयोजन करून अनेक युवकांना व्यसनांपासून परावृत्त केले आहे. त्याचबरोबर १ जानेवारी व्यसनमुक्त संकल्प दिन, पारंपरिक पद्धतीने होळी न करता चला व्यसनांची होळी करूया – निरोगी जीवन जगूया असे उपक्रम राबवतात. वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय,मंडळ या ठिकाणी ते व्यसनमुक्तीचे प्रबोधन करतात. योगशिक्षक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्राणायाम शिबिराच्या माध्यमातून अनेक युवकांना त्यांनी व्यसनमुक्त केले आहे. अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेऊन त्यांना करिअर मार्गदर्शनही ते करतात. प्रा.देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रदान करून आजपर्यंत ३९ वेळा रक्तदान केले आहे. शालेय उपक्रमामध्ये व्यवसाय मार्गदर्शन शिबिर नोकरी भरती मिळावे याचे ते आयोजन करतात. प्रा. धनंजय देशमुख यांच्या झालेल्या सन्मानाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे,मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याध्यक्ष दिपक जाधव यांनी तर सुत्रसंचलन व आभार जगन्नाथ शिंदे यांनी केले.

राज्यात आरोग्य संवर्धनाचा इंदापूर तालुक्याचा आदर्श बिजवडी पॅटर्न निर्माण करणारे आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी सात सप्टेंबर रोजी होणार सत्कार.

राज्यात आरोग्य संवर्धनाचा इंदापूर तालुक्याचा आदर्श बिजवडी पॅटर्न निर्माण करणारे आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी सात सप्टेंबर रोजी होणार सत्कार.

सलग ३ वर्षे जिल्हा स्तरीय कायाकल्प पुरस्कार प्राप्त, डास निर्मूलनाच्या “बिजवडी पॅटर्न” चे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांचे समोर मंत्रालयात सादरीकरण झालेल्या तसेच मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रम यशस्वी पणे राबविल्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पत्राद्वारे अभिनंदन केलेल्या मदर प्राथमिक आरोग्य केंद्र – बिजवडी अंतर्गत अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या २०० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या यशोगाथेचा उद्या रविवार, दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते २.०० दरम्यान राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय ( मामा ) भरणे यांच्या हस्ते तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान होणार आहे. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीणभैय्या माने, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गटविकास अधिकारी डॉ. सचिन खुडे, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बिजवडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा म्हणाले, आमच्या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नियोजनबध्द काम केल्यामुळे राज्यासह जिल्ह्यात विविध विक्रम झाले आहेत. साथीचे रोग खूप कमी झाले आहेत. माझे सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने आम्ही हे विक्रमी काम करू शकलो. त्यास मंत्री दत्तात्रय भरणे मामा तसेच उपरोक्त मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

चेतना स्कूल ऑफ फार्मसी सरडेवाडी येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा

इंदापूर (ता. इंदापूर): सरडेवाडी येथील चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, चेतना इंटरनॅशनल स्कूल व चेतना ज्युनिअर कॉलेज येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रातःकाळी मंगलमय वातावरणात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना व पूजा करून झाली. या वेळी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी चेतना इंटरनॅशनल स्कूलतर्फे गणेश मूर्ती सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन आपले गुणदर्शन घडवले.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना एकात्मता, सामाजिक बंधुभाव आणि सांस्कृतिक जपणुकीचे महत्त्व अधोरेखित केले.

उत्सवामुळे संपूर्ण कॉलेज परिसरात आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन उत्सव संस्मरणीय केला.

या कार्यक्रमाला चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे, सचिव श्री विलास भोसले, खजिनदार श्री सोमनाथ माने, सभासद श्री बाळू बोराटे चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. श्री गणेश म्हस्के, तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ निकिता माने उपस्थित होते.

चेतना फार्मसी कॉलेज तर्फे आज अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. हा संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सुंदर रितीने पार पडला. शेवटी महाआरती व महाप्रसाद वितरण करून उत्सवाची सांगता करण्यात आली.

फार्मास्युटिकल संशोधन आणि शिक्षणामध्ये शैक्षणिक-औद्योगिक भागीदारी: चेतना फार्मसी कॉलेज आणि प्राडो यांच्यातील सामंजस्य करार

फार्मास्युटिकल संशोधन आणि शिक्षणामध्ये शैक्षणिक-औद्योगिक भागीदारी: चेतना फार्मसी कॉलेज आणि प्राडो यांच्यातील सामंजस्य करार

इंदापूर येथील चेतना फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच पुणे येथील प्राडो प्रीक्लिनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन प्रा. लि. या संस्थेला एक महत्त्वाची शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश औषधनिर्मिती उद्योगात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक संशोधनाच्या पद्धती आणि तांत्रिक प्रक्रियांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे हा होता. या भेटीचे रूपांतर एका महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारीत झाले, ज्यामध्ये दोन्ही संस्थांमध्ये औपचारिक सामंजस्य करार (Memorandum of Understanding) करण्यात आला.

हा सामंजस्य करार पारंपरिक शैक्षणिक कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात चेतना फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना प्राडोमध्ये इंटर्नशिप, प्रशिक्षण आणि संयुक्त संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील. ही भागीदारी केवळ दोन संस्थांमधील सहकार्याचा एक टप्पा नसून, ती भारतातील फार्मास्युटिकल शिक्षण आणि उद्योगांमधील कौशल्य दरी भरून काढण्यासाठी एक महत्त्वाचा आदर्श म्हणून उदयास आली आहे. या अहवालात या भेटीच्या आणि सामंजस्य कराराच्या प्रत्येक तांत्रिक आणि धोरणात्मक पैलूचे सखोल विश्लेषण केले आहे.

प्रस्तावना: फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधनात नवीन आदर्श तयार करणे. आजच्या स्पर्धात्मक युगात, केवळ सिद्धांतिक ज्ञानावर आधारित शिक्षण पुरेसे नाही. फार्मास्युटिकल उद्योगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणातील कामाची आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे . या गरजेला प्रतिसाद म्हणून, चेतना फार्मसी कॉलेजने एक अभिनव उपक्रम राबवून आपल्या डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील प्राडो प्रीक्लिनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन प्रा. लि. या एका प्रमुख संशोधन संस्थेच्या भेटीचे आयोजन केले. ही भेट केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला पूरक नसून, त्यांना उद्योगाची आव्हाने आणि अपेक्षा समजून घेण्यास मदत करणारी होती.

या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या ‘प्रीक्लिनिकल संशोधन’ (preclinical research) आणि त्याच्या विविध शाखांची ओळख करून देणे होता. ही प्रक्रिया मानवी चाचण्या सुरू होण्यापूर्वी औषधांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी केली जाते. या भेटीचे औचित्य साधून, दोन्ही संस्थांनी भविष्यातील सहकार्यासाठी एक सामंजस्य करार केला, जो शैक्षणिक आणि औद्योगिक जगतातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

*इंदापूर येथील चेतना फार्मसी कॉलेज: उपयोजित शिक्षणाचे एक उदाहरण*

चेतना फार्मसी कॉलेज, इंदापूर, हे बाहेरील जगात शिक्षण आणि आरोग्य सेवांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या एका शिक्षण संस्थेचा भाग आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञाना नुसार, समाजातील उपेक्षित आणि गरीब घटकांपर्यंत शिक्षणाचे फायदे पोहोचवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. ही संस्था एक सुसंघटित, उत्तम शैक्षणिक प्रणाली आणि अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण देत असल्याचे नमूद केले आहे. या संस्थेच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे *”व्यावहारिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे” (Focusing on Practicals).*

डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राडोसारख्या संशोधन संस्थेची शैक्षणिक भेट आयोजित करण्याचा निर्णय याच तत्त्वज्ञानाचा एक परिणाम आहे. हा उपक्रम हे दर्शवतो की महाविद्यालय केवळ अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणच देत नाही, तर विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक कौशल्यांवरही लक्ष केंद्रित करते. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते आणि सिद्धांतिक अभ्यास आणि औद्योगिक गरजा यांच्यातील मोठी दरी कमी होण्यास मदत होते.

*प्राडो प्रीक्लिनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट: उत्कृष्टतेची एक संशोधन संस्था*

प्राडो (PRADO) ही २०१० मध्ये स्थापन झालेली एक खासगी प्रीक्लिनिकल कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन (CRO) आहे. फार्मास्युटिकल, बायोफार्मा, बायोटेक, ॲग्रोकेमिकल्स, वैद्यकीय उपकरणे आणि बियाणे उत्पादन यांसारख्या विविध उद्योगांना उच्च दर्जाच्या प्रीक्लिनिकल सेवा पुरवणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रीक्लिनिकल संशोधन हे एखाद्या औषध किंवा उपचाराला मानवी चाचण्यांमध्ये आणण्यापूर्वी केले जाणारे आवश्यक संशोधन आहे. प्राडोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रल्हाद वांगीकर यांच्या मते, ही संस्था सुरक्षित आणि प्रभावी आरोग्य सेवा उत्पादनांचा विकास जलदगतीने करण्यासाठी मदत करते.

प्राडोची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे तिच्या सुविधा जीएलपी-प्रमाणित (GLP-Certified) आणि सीपीसीएसईए-मंजूर (CPCSEA-approved) आहेत. जीएलपी (Good Laboratory Practices) हे प्रयोगशाळेतील गैर-नैदानिक सुरक्षा अभ्यासांसाठी मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे आहेत, जे डेटाची अखंडता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करतात. सीसीएसईए (Committee for the Purpose of Control and Supervision of Experiments on Animals) ही प्राण्यांवर केलेल्या संशोधनाचे नैतिक नियमन करणारी एक भारतीय संस्था आहे. या प्रमाणपत्रांमुळे प्राडोमध्ये तयार झालेला डेटा जगभरातील नियामक प्राधिकरणांद्वारे स्वीकारार्ह मानला जातो, ज्यामुळे तिच्या कार्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळते.

प्राडोच्या तांत्रिक विभागांचे सर्वसमावेशक परीक्षण

या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांना प्राडोच्या विविध विभागांची सखोल माहिती मिळाली, ज्यातून प्रीक्लिनिकल संशोधनातील गुंतागुंतीच्या प्रक्रिया आणि त्यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. टॉक्सिकोलॉजी आणि पॅथोलॉजी

टॉक्सिकोलॉजी विभाग नवीन औषधांचे सुरक्षितता प्रोफाइल आणि संभाव्य विषारी परिणामांचे मूल्यांकन करतो. हे औषध मानवी वापरासाठी सुरक्षित आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या विभागामध्ये इन-व्हिव्हो (in-vivo) आणि इन-व्हिट्रो (in-vitro) चाचण्यांद्वारे प्राण्यांवर (उंदीर, ससा, आणि घुशी) औषधांचे परिणाम तपासले जातात.

इन-व्हिव्हो अभ्यास: हे जिवंत प्राण्यांमध्ये केले जातात आणि औषध संपूर्ण जैविक प्रणालीमध्ये कसे कार्य करते, चयापचय प्रक्रिया (metabolism) आणि अवयवांवर त्याचे होणारे परिणाम कसे आहेत, याची माहिती देतात. हे अभ्यास जास्त वेळ घेणारे आणि खर्चिक असले तरी, ते सर्वात जास्त शारीरिकदृष्ट्या सुसंगत (physiologically relevant) असतात.

इन-व्हिट्रो अभ्यास: हे प्रयोगशाळेतील डिश किंवा टेस्ट ट्यूबमध्ये, वेगळ्या केलेल्या पेशी किंवा ऊतकांवर केले जातात. या चाचण्या जलद आणि जास्त खर्च-प्रभावी असतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात संयुगांची चाचणी करणे शक्य होते.

या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना हे समजले की या दोन्ही पद्धती एकमेकांना पूरक आहेत, आणि एकत्रितपणे औषधाच्या सुरक्षिततेचे संपूर्ण चित्र देतात. यासोबतच, पॅथोलॉजी आणि क्लिनिकल पॅथोलॉजी विभागांनी औषधांचे विषारी परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती पुरवली. यामध्ये रक्त गोळा करून विविध चाचण्या करणे [वापरकर्ता क्वेरी], तसेच हेमॅटोलॉजी (hematology), क्लिनिकल केमिस्ट्री आणि ऊतींचे सूक्ष्म तपासणी (histopathology) यांसारख्या चाचण्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या चाचण्यांबद्दल आणि संबंधित नैतिक नियमांबद्दल माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांना संशोधनातील वैज्ञानिक आवश्यकता आणि नैतिक जबाबदाऱ्या या दोन्हीची जाणीव झाली.

ईकोटॉक्सिकोलॉजी: पर्यावरणीय सुरक्षिततेची आघाडी

ईकोटॉक्सिकोलॉजी विभाग हा पर्यावरणावर होणाऱ्या विषारी परिणामांचा अभ्यास करतो. फार्मास्युटिकल्स आणि त्यांचे मेटाबोलाइट्स आता पर्यावरणातील “उद्भवणारे सेंद्रिय प्रदूषक” (emerging organic contaminants) म्हणून ओळखले जातात, जे जलचर आणि भूचर परिसंस्थेवर परिणाम करतात.

या विभागात, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पर्यावरणातील औषधांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती पाहिल्या. यामध्ये अलगी कल्चर ग्रोथ (Algae culture growth), फिश कल्चर (विशेषतः झेब्रा फिश), डॅफ्निया (Daphnia) आणि अर्थवॉर्म (Earthworm) यांचा वापर करून चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांद्वारे, औषध उत्पादने पर्यावरणात सोडल्यास त्यांचे काय परिणाम होतात, याची माहिती मिळवली जाते. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर औषधांच्या व्यापक पर्यावरणीय परिणामांवरही लक्ष देण्याची गरज असल्याचे समजले.

ॲनालिटिकल आणि बायोअ‍ॅनालिटिकल विभाग: गुणवत्ता नियंत्रणाचा कणा

हा विभाग औषधांची आणि रसायनांची शुद्धता, क्षमता आणि स्थिरता तपासतो. येथे वापरल्या जाणाऱ्या प्रमुख तंत्रज्ञानापैकी एक म्हणजे हाय-परफॉर्मन्स लिक्विड क्रोमेटोग्राफी (HPLC). एचपीएलसी एक शक्तिशाली विश्लेषण तंत्रज्ञान आहे, जे औषध विकास आणि उत्पादन प्रक्रियेत आवश्यक आहे.

या विभागात, आयसीएच (ICH) (International Council for Harmonisation) मार्गदर्शक तत्त्वांनुसार फार्मास्युटिकल तपासणी केली जाते. आयसीएच हा एक जागतिक स्तरावरील मानक-निर्धारण करणारा मंच आहे, जो औषधांच्या विकासासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक मानके तयार करतो. प्राडोमध्ये आयसीएच मानकांचे पालन केले जाते, याचा अर्थ ते तयार करत असलेला डेटा जागतिक नियामक संस्थांना (उदा. FDA) सादर करण्यास योग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर जागतिक दर्जाच्या गुणवत्ता नियंत्रणाचे महत्त्वही समजले.

सहायक पायाभूत सुविधा: आर्काइव्ह, आयटी आणि त्यापलीकडे

संशोधनातील डेटा आणि नोंदी व्यवस्थापित आणि सुरक्षित ठेवणे हे नियामक अनुपालनासाठी अत्यावश्यक आहे. प्राडोमध्ये अर्काइव्ह डिपार्टमेंट आहे, जेथे सर्व महत्त्वाच्या नोंदी सुरक्षित ठेवल्या जातात. येथे ‘ओला’ (wet) आणि ‘सुका’ (dry) आर्काइव्ह असतो आणि नियामक आवश्यकतांनुसार ९ वर्षांनंतर जुना डेटा नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाते . डेटा व्यवस्थापन आणि सुरक्षिततेची जबाबदारी आयटी (IT) विभाग सांभाळतो. या विभागांची उपस्थिती हे दर्शवते की प्राडो केवळ वैज्ञानिक प्रयोगशाळाच नाही, तर एक सुसंघटित, नियम-पालन करणारी व्यावसायिक संस्था आहे, जिथे डेटाची सत्यता आणि गोपनीयता अत्यंत महत्त्वाची आहे.

प्राडोमधील प्रमुख विभाग आणि त्यांची प्रीक्लिनिकल संशोधनातील भूमिका विभाग मुख्य कार्ये प्रमुख तंत्रज्ञान/संकल्पना

टॉक्सिकोलॉजी औषधांची सुरक्षितता आणि विषारी परिणामांचे मूल्यांकन करणे. इन-व्हिव्हो (in-vivo) आणि इन-व्हिट्रो (in-vitro) चाचण्या, प्राण्यांचे मॉडेल (उंदीर, ससा, घुशी), डोस-रेंजिंग.

पॅथोलॉजी आणि क्लिनिकल पॅथोलॉजी .औषध-प्रेरित रोगांचे आणि शारीरिक बदलांचे निदान करणे. हिस्टोपॅथोलॉजी, हेमॅटोलॉजी, क्लिनिकल केमिस्ट्री, प्लाझ्मा/सीरम विश्लेषण, सीबीसी (Complete Blood Count).

ईकोटॉक्सिकोलॉजी पर्यावरणावर औषधांच्या विषारी परिणामांचा अभ्यास करणे. अल्गा कल्चर ग्रोथ, फिश कल्चर (झेब्रा फिश), डॅफ्निया आणि अर्थवॉर्मचा वापर, पर्यावरणीय प्रदूषकांचा अभ्यास.

ॲनालिटिकल आणि बायोअ‍ॅनालिटिकल औषध आणि रसायनांची शुद्धता, क्षमता आणि स्थिरता सुनिश्चित करणे. हाय-परफॉर्मन्स लिक्विड क्रोमेटोग्राफी (HPLC), आयसीएच (ICH) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन.

आर्काइव्ह नियामक आवश्यकतांनुसार संशोधन डेटा आणि नोंदी सुरक्षित ठेवणे. ओला आणि सुका आर्काइव्ह, डेटा नष्ट करण्याचे धोरण.

आयटी (IT) डेटा व्यवस्थापन आणि सुरक्षा सुनिश्चित करणे. डेटाबेस व्यवस्थापन, सायबर सुरक्षा.

सामंजस्य करार: परस्पर लाभासाठी एक उत्प्रेरक

या शैक्षणिक भेटीचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे चेतना फार्मसी कॉलेज आणि प्राडो यांच्यात झालेला सामंजस्य करार (MOU).सामंजस्य करार हा एक कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसलेला दस्तऐवज असतो, जो दोन संस्थांमधील सहकार्याचे उद्देश आणि हेतू स्पष्ट करतो. या करारामुळे चेतना फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्राडोमध्ये इंटर्नशिप, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या भागीदारीमुळे दोन्ही ऑर्गनायझेशनला मोठे फायदे मिळतील:चेतना कॉलेज-प्राडो सामंजस्य कराराचे बहुआयामी फायदे

लाभार्थी विशिष्ट फायदे-

 

*चेतना फार्मसी कॉलेज अभ्यासक्रमाला औद्योगिक प्रासंगिकता:* विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळतो, ज्यामुळे त्यांच्या सैद्धांतिक ज्ञानाला पूरकता मिळते. *कौशल्य दरी कमी करणे:* विद्यार्थ्यांना उद्योगाला आवश्यक असलेले कौशल्य आणि तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांची रोजगार क्षमता वाढते.

*संशोधनाचे मार्ग:* प्राध्यापकांना उद्योगाशी संबंधित संशोधनात सहभागी होण्याची संधी मिळते, ज्यामुळे नवीन ज्ञान निर्मितीला चालना मिळते.

*उच्च-कुशल प्रतिभांचा स्रोत:* प्राडोला कामासाठी तयार असलेल्या आणि चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांचा थेट स्रोत मिळतो.

*संशोधन आणि विकास वाढवणे:* शैक्षणिक संस्थांच्या प्रतिभेचा उपयोग करून R&D प्रक्रियेला गती मिळू शकते आणि दोन्ही बाजूंना खर्च व धोका कमी करता येतो.

*सहकार्याची संधी:* प्राडोला नवीन संशोधन आणि नवकल्पनांसाठी एक व्यासपीठ मिळते, जे त्यांना उद्योग-आधारित समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते.

ही भागीदारी एक आदर्श उदाहरण आहे की शैक्षणिक संस्था आणि उद्योग एकमेकांच्या ताकदीचा कसा उपयोग करू शकतात. चेतना कॉलेजला एक प्रगतीशील संशोधन भागीदार मिळतो, तर प्राडोला उच्च-गुणवत्तेच्या प्रतिभावंतांचा एक निरंतर प्रवाह उपलब्ध होतो.

भागीदारीचे शिल्पकार: दूरदृष्टीचे नेतृत्व

*या सामंजस्य कराराच्या मागे दोन दूरदृष्टीचे नेते आहेत:* प्राडोचे मुख्य कार्यकारी अधिकारी –

डॉ. प्रल्हाद वांगीकर हे प्राडोचे संस्थापक-संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते एक पशुवैद्यकीय पॅथोलॉजिस्ट (Veterinary Pathologist) आणि अमेरिकन बोर्ड ऑफ टॉक्सिकोलॉजी (DABT) चे डिप्लोमॅट आहेत. त्यांच्याकडे प्रीक्लिनिकल सुरक्षितता मूल्यांकनाचा २७ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांचा प्रवास इंटॉक्स, रॅनबॅक्सी रिसर्च लॅबोरेटरीज आणि रिलायन्स लाईफ सायन्सेससारख्या प्रमुख संस्थांमधून झाला आहे, जिथे त्यांनी जीएलपी आणि एएएलएसी (AAALAC) प्रमाणपत्रे मिळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा अनुभव प्राडोच्या जागतिक मानकांच्या अनुपालनाला अधिकृतता देतो आणि विद्यार्थ्यांना उद्योगाच्या मागणी बद्दल मार्गदर्शन करतो.

*निष्कर्ष आणि भविष्यातील दृष्टीकोन:* शैक्षणिक-औद्योगिक सुसंवादासाठी एक आदर्श

इंदापूर येथील चेतना फार्मसी कॉलेज आणि प्राडो प्रीक्लिनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्यातील सामंजस्य करार हे फार्मास्युटिकल शिक्षण आणि उद्योगाच्या सहकार्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही भागीदारी केवळ विद्यार्थ्यांना थेट औद्योगिक अनुभव देत नाही, तर त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक कौशल्यांचा पाया देखील तयार करते. प्राडोसारख्या जीएलपी-प्रमाणित संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन, विद्यार्थी जागतिक स्तरावरील संशोधन मानके आणि व्यावसायिक नैतिकता शिकतात.

हा उपक्रम भारतातील इतर शैक्षणिक संस्था आणि उद्योगांसाठी एक आदर्श ठरू शकतो, ज्यामुळे देशाच्या जैव वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला गती मिळू शकते. दोन्ही संस्थांनी आपल्या परस्पर सामर्थ्याचा उपयोग करून एक टिकाऊ आणि फलदायी संबंध प्रस्थापित केला आहे, जो देशाच्या फार्मास्युटिकल आणि आरोग्य सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी आणि नवकल्पनांसाठी योगदान देईल. हा सामंजस्य करार हा केवळ औपचारिक संबंध नाही, तर एका प्रगतीशील, सहकार्याच्या युगाची सुरुवात आहे, जिथे शिक्षण आणि उद्योग हातात हात घालून काम करतात.

या प्रसंगी चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के,प्रा.शिवानी भापकर,प्रा.तनुजा काशीद प्रा. किरण सातपुते, प्रा. नम्रता मोरे, श्री. चिन्मय देशपांडे, श्री. दत्ता कडवळे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त प्रत्यक्ष संशोधन आणि उद्योगाची माहिती मिळाली, जी त्यांच्या पुढील करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

 

 

 

 

भारतीय गणित हे जगात सर्वश्रेष्ठ गणित आहे:-सुधीर करगळ 

भारतीय गणित हे जगात सर्वश्रेष्ठ गणित आहे:-सुधीर करगळ

शिवराज करिअर अकॅडमी इंदापूर येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतीय गणिताचा वारसा जपणारे लक्ष्मण तात्या गुणवरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय गणित हे जगातील सर्वश्रेष्ठ गणित आहे असे प्रतिपादन लक्ष्मण तात्या गुणवरे यांनी केले. गुगलमुळे गणितामध्ये अनेक चुकीच्या पद्धती शिरले आहेत असं त्यांनी सांगितले. गणिताचा सराव केल्याने बौद्धिक क्षमता वाढते तसेच निर्णय क्षमता वाढते असे त्यांनी सांगितले.

 यावेळी त्यांनी मुलांशी हितगुज व मुलांचे समाधान ही केले. लक्ष्मण तात्या गुणवरे यांचा सत्कार शिवराज अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आला.

श्रीमती रत्नाप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब यांच्यामध्ये सामंजस्य करार

श्रीमती रत्नाप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब यांच्यामध्ये सामंजस्य करार

आज दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी बावडा येथील श्रीमती रत्नाप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा व कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालय यांच्यामध्ये हिंदी विभागांतर्गत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून असणाऱ्या उद्देशपूर्तीकरिता हा सामंजस्य करार महत्वपूर्ण ठरणार आहे. या करारानुसार अध्यापन, अध्यापन सहाय्य, संशोधन कार्य, तंत्रज्ञान, जीवन कौशल्ये आणि मूल्ये विकास, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्यामध्ये नवीन क्षमता निर्माण, कौशल्य वाढ, व्यक्तिमत्व विकास, अनुवाद, प्रूफरीडिंग, सेमिनार, कार्यशाळा, वेबिनार इत्यादींद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण असे विविध उपक्रम राबवणे व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे अशा विद्यार्थी विकासाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

या करारासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. अशोक काळंगे व IQAC समन्वयक डॉ प्रशांत शिंदे यांचे मार्गदर्शन या करिता महत्वपूर्ण ठरले. या वेळी श्रीमती रत्नाप्रभादेवी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.लहु वावरे , IQAC समन्वयक व हिंदी विभाग प्रमुख डॉ. तायाजी लोंढे, प्रा. सुदर्शन गोळे, प्रा. प्रवीण घोगरे, प्रा. पूजा पाटील, प्रा. दीप्ती पाटील, प्रा. सिद्धार्थ चितारे तसेच विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. बबन साळवे, डॉ. अमर वाघमोडे, डॉ संदीप पवार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील, सचिव किरण काका पाटील तसेच इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष श्रीमती आनंदी काकी रणसिंग, उपाध्यक्ष श्री प्रकाश बापू कदम तसेच सचिव विरसिंह रणसिंग(भैय्या)आदी मान्यवर यांनी पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.

चेतना पदविका फार्मसी महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा उत्तम दर्जा प्राप्त.

चेतना पदविका फार्मसी महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा उत्तम दर्जा प्राप्त.

चेतना फाऊंडेशन संचालित चेतना फार्मसी महाविद्यालयाच्या संस्थेच्या पदविका अभ्यासक्रमास फार्मसी, सरडेवाडी इंदापूर या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई द्वारे करण्यात आलेल्या बाह्य संस्था सर्वेक्षण मध्ये उत्तम दर्जा प्रदान करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी दिली. मंडळामार्फत नेमणूक केलेल्या देखरेख समितीच्या पथकाद्वारे सदर सर्वेक्षण करण्यात येते. देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास भेट दिली. त्या वेळी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, सर्व महाविद्यालयात रुग्ण समुपदेशन, पायाभूत सुविधा, संगणक कक्ष, महाविद्यालयाचा पालक सभा, औद्योगिक भेट, निकाल, अनुभवी शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहली, ग्रीन कॅम्पस आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले उपक्रम, नोकरी साठीचे नामांकित कंपन्यांचे मुलींच्या वसतिगृहातील दर्जेदार सोयी सुविधा आणि रोजगार मेळावे अशा अनेक उपक्रमांमुळे निकालातील सातत्यपूर्ण प्रगती या गोष्टींचा आढावा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घेण्यात आला. या सर्व क्षेत्रात महाविद्यालयाने साधलेली भरीव प्रगती व गुणवत्ता पाहून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी उत्तम दर्जा प्रदान केला आहे.

 

महाविद्यालयाची भव्य व सुसज्ज इमारत मुला-मुलींचे वसतिगृह, भव्य खेळाचे मैदान आहे, असे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी नमूद केले.

या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे व सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांचे मोठे योगदान असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी सांगितले.

error: Content is protected !!