सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती
*नवी दिल्ली:-उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर रेड्डी यांना केवळ 300 मते मिळाली आहेत. निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे विरोधकांच्या दाव्यांना मोठा धक्का बसला. राधाकृष्णन शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.*
*👉🅾️🅾️👉आमच्या उमेदवाराला ३१५ मते मिळतील, असे दावा इंडिया आघाडीकडून केला गेला होता. परंतु प्रत्यक्षात ३०० मतेच मिळाल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. ईव्हीएममधून मतचोरी होत असल्याचा मुद्दा पुढे करून विरोधी पक्षाकडून मतपत्रिकेचा आग्रह होत असताना मतपत्रिकेवरच झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे १५ खासदार फुटल्याने इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बी सुदर्शन रेड्डी १०० टक्के जिंकतील, असा दावा इंडिया आघाडीकडून होत होता. सत्ताधाऱ्यांमधील काही पक्ष संतुष्ट नसल्याचे सांगून आम्ही या निवडणुकीत इतिहास घडवू, असेही इंडिया आघाडीकडून सांगितले जात होते.*
*👉🔴🔴👉परंतु इंडिया आघाडीचेच १५ खासदार फुटल्याने बिहार विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला सर्वांत मोठा झटका बसला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देऊन आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी यांच्याकडे पाठवला. त्यांच्या राजीनाम्यामुळे घटनेनुसार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेणे कायद्याने अनिवार्य होती. एनडीकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान झाले. आज सायंकाळी साडे सात वाजता जाहीर झालेल्या निकालानुसार सी. पी. राधाकृष्णन यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहे.*