Home Blog Page 17

चेतना फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

चेतना फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

 

इंदापूर- (सरडेवाडी )येथील चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मसी दिवस अतिशय उत्साह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पाचव्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. “Think Health Think Pharmacist “या घोषवाक्य खाली आयोजित केले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सत्यशील पाटील, इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. शितल बोरा आणि इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. सुहास पवार यांनी भूषवले. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,खजिनदार सोमनाथ माने ,सदस्य बापू बोराटे व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. गणेश मस्के आधी उपस्थित होते.

या सप्ताहात औषध सुरक्षेचे बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पोस्टर प्रेसेंटेशन, क्वीझ स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वृक्षारोपण व वादविवाद स्पर्धा अशा उपक्रमाचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आठवड्याचा कार्यक्रम अधिकच स्मरणीय केला. वर्ल्ड फार्मसिस्ट डे चे औचित्य साधून या दिवशी समारोप करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सत्यशील पाटील अध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन तथा चेअरमन इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी व श्री शितल बोरा उपाध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन श्री सुभाष पवार वरिष्ठ उपाध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट ची समाजातील भूमिका व जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले.

शेवटी विविध स्पर्धेमध्ये विजेत्यांचे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांना औषध सुरक्षा जबाबदारी, फार्मसी व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल जागरूकता करणे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सत्यशील पाटील यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्र हे एखाद्या कल्पवृक्षा प्रमाणे असून रोजगार, व्यवसाय संशोधन, शैक्षणिक तसेच आयटी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध करून देत आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट ची कर्तव्ये व सेवा देण्यासाठी तत्पर राहण्यासाठी आवाहन केले.

चेतना फाउंडेशन अध्यक्ष उदय देशपांडे यांच्याबरोबर विलास भोसले आणि खजिनदार सोमनाथ माने प्राचार्य आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली फार्मसी विद्यालयाच्या प्रा. प्राजक्ता झगडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले

भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यानिमित्त माननीय पंडित दीनदयाल यांची जयंती श्री राम मंदिर येथे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली त्यानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी मिळून श्रीराम मंदिर व अंबिका मंदिर इंदापूर येथे सर्वांनी मिळून स्वच्छता केली या कार्यक्रमाचे संयोजक माननीय दादासाहेब नायकुडे युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका पूर्व मंडल व इतर पदाधिकारी दादासाहेब नायकुडे, राम आसबे, सचिन सावंत, महेश देशमुख सुनील खाडे तानाजी देशमुख लखन जगताप पप्पू गायकवाड समाधान शिंदे केशव गायकवाड नवनाथ शिंदे नवनाथ बाबरे गणेश गवळी नागेश गायकवाड संतोष निकम तुळशीराम बोराडे राजेश अवचर नितीन आरडे गुरुदेव घोगरे विक्रम रिसवडकर दादा ढवळे सोनू बोबडे सागर आसबे प्रसाद थोरात सोमनाथ पिपरे शरद पालवे शिवा सूर्यवंशी सलमा खान शितल साबळे माधुरी भराडे स्वाती अवचर व सर्व कार्यकर्ता

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये उत्साहात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा – स्वयंसेवकांनी राबवली स्वच्छता मोहीम

इंदापूर – आज दिनांक २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षा मार्फत सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत महाविद्यालय परिसरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छते पासूनच समृद्ध आरोग्याचा आरंभ होतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः युवकांनी या मोहिमेत पुढाकार घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले.

 

यानंतर NSS युनिट चे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय परिसरात, प्रवेशद्वाराजवळ, उद्यान भागात तसेच आसपासच्या रस्त्यांवर झाडू मारून, कचरा गोळा करून स्वच्छतेचे कार्य हाती घेतले. या उपक्रमात स्वयंसेवकांनी “स्वच्छ भारत – स्वस्थ भारत” या संदेशा सह नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जन जागृतीही केली. परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देणारे फलकही या वेळी लावण्यात आले.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण सातपुते महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संपूर्ण NSS विभागाचे स्वयंसेवक पूर्ण उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदानातून समाजसेवेचा आदर्श ठेवत परिसरात स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.

 

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा आणि एकात्मतेची भावना अधिक बळकट झाली. यामुळे परिसरात स्वच्छतेबाबत एक सकारात्मक संदेश पसरला असून, नागरिकांमध्येही जागरुकता निर्माण झाली आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळू बोराटे व इतर मान्यवरांनी विशेष कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये उत्साहात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा – स्वयंसेवकांनी राबवली स्वच्छता मोहीम

इंदापूर – आज दिनांक २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षा मार्फत सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत महाविद्यालय परिसरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छते पासूनच समृद्ध आरोग्याचा आरंभ होतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः युवकांनी या मोहिमेत पुढाकार घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले.

 

यानंतर NSS युनिट चे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय परिसरात, प्रवेशद्वाराजवळ, उद्यान भागात तसेच आसपासच्या रस्त्यांवर झाडू मारून, कचरा गोळा करून स्वच्छतेचे कार्य हाती घेतले. या उपक्रमात स्वयंसेवकांनी “स्वच्छ भारत – स्वस्थ भारत” या संदेशा सह नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जन जागृतीही केली. परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देणारे फलकही या वेळी लावण्यात आले.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संपूर्ण NSS विभागाचे स्वयंसेवक पूर्ण उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदानातून समाजसेवेचा आदर्श ठेवत परिसरात स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.

 

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा आणि एकात्मतेची भावना अधिक बळकट झाली. यामुळे परिसरात स्वच्छतेबाबत एक सकारात्मक संदेश पसरला असून, नागरिकांमध्येही जागरुकता निर्माण झाली आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळू बोराटे व इतर मान्यवरांनी विशेष कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.

शासकी योजना पोचवण्यात अनुलोमचे कार्य उल्लेखनिय विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, 

अनुगामी लोकराज्य मह पुणे विभाग

पुणे, शासननामा न्यूज (दि २२ सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अनुलोम संस्थेच्या माध्यमातून शासकीय अधिकारी आणि अनुलोम मित्रांचा परिचय मेळावा पुण्यातील मॉडर्न कॉलेज च्या सभागृहात संपन्न झाला. पुणे विभागाच्या या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, प्रमुख पाहुणे म्हणून ऑपरेशन सिन्दुर चे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर आणि राष्ट्रपती पदक विजेते देवेंद्र अवताडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी “सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ” असे ब्रीद वाक्य असणाऱ्या अनुलोम च्या कामाबद्दल कौतुक केले. सरकारी योजना पोचवत असतानाच सामाजिक भावना जपत अनुलोम चे सर्व कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने तळागाळापर्यंत पोचत आहेत. पुढील काळात स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर मोठे काम उभे करण्यासाठी अनुलोम च्या सर्व अनुलोम मित्रांनी शासनाला मदत करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.

भारतीय वायू सेनेमध्ये विंग कमांडर म्हणून कार्यरत असलेले आणि राष्ट्रपती यांच्या कडून गौरव करण्यात आलेले देवेंद्र औताडे यांनी राबवलेल्या ऑपरेशन सिन्दुर च्या यशाचे गमक उपस्थितांना सांगताना सर्व अनुलोम मित्र भारावून गेले होते.

पहिल्या सत्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुणे जिल्हा प्रमुख डॉ. मानसिंग साबळे, पुणे मनपा चे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, पुणे जिल्ह्याचे कृषी अधीक्षक संजय काचोळे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे पुणे जिल्हा व्यवस्थापक यशवंत गायकवाड या शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यातील सरकारी योजनांबद्दल सर्व अनुलोम मित्रांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभाग प्रमुख शिरीष भालेकर, सूत्रसंचालन उपविभाग जनसेवक सौरभ शिंगाडे, तसेच आभार प्रदर्शन विभाग संवादिनी सुनंदा ताई आदिक यांनी केले. यावेळी अनुलोमचे प्रांत प्रमुख स्वानंदजी ओक, चंद्रकांत पवार विजय मोरगुलवार, संध्या पुरोहित आणि पुणे जिल्ह्यातील सर्व जनसेवक उपस्थित होते.

सेट परीक्षेत अमोल बाळासाहेब बंडगर सरांचे यश

श्रीपूर (ता. माळशिरस): शिक्षण ही फक्त नोकरी मिळविण्याची साधनं नसून समाजाला दिशा देणारी, संस्कार रुजवणारी आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शिक्षक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल बाळासाहेब बंडगर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (SET) मध्ये यश संपादन करून विद्यार्थ्यांसाठी तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

बंडगर सरांनी जीवन विज्ञान या विषयामधून 15 जून 2025 रोजी पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र SET परीक्षेला बसले होते. 30 ऑगस्ट 2025 रोजी निकाल जाहीर झाला असता ते यशस्वी ठरले. यामुळे ते आता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. SET परीक्षा ही UGC मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र तसेच गोवा राज्यांतील उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक असलेली अत्यंत प्रतिष्ठेची पात्रता मानली जाते.

सध्या बंडगर सर अकरावी-बारावी विज्ञान शाखेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना विषय समजावून देताना त्यांची पद्धत, संयम आणि विज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करते. “शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरते ज्ञान नसून जीवन जगण्याची कला आहे,” हे ते प्रत्यक्ष अध्यापनातून विद्यार्थ्यांना पटवून देतात.

काल निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल बंडगर सरांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेकांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे श्रीपूरसह माळशिरस तालुक्याचा अभिमान वाढला आहे.

अमोल बंडगर यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि तरुण शिक्षकांना दिशा देणारे आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती चिकाटी असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

श्रीपूर परिसरातील विद्यार्थी व पालकवर्ग त्यांच्या या यशाकडे अभिमानाने पाहत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आणखी उंच भरारी घ्यावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत करिअर मार्गदर्शनावर विशेष अतिथी व्याख्यान आयोजित

शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज कालठण नं.1 इंदापूर येथील जिजाऊ महाविद्यालय येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या शक्यता, तयारी आणि योग्य दिशा निवडण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले, तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे व त्यांचे महत्त्व समजून सांगितले. टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्याचे आवाहन केले.

 

या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या स्वारस्याने भाग घेतला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली.जिजाऊ महाविद्यालयाच्या प्राचार्य जगताप मॅडम तसेच चेतना फार्मसी चे प्रा. चिंतामणी रणवरे आणि दत्ता कडवळे यांचे सहकार्य मिळाले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विजय भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आंतरमहाविद्यालयीन जल्लोष युवक महोत्सवात इंदापूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भरघोस यश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17/09/2025 रोजी दादा पाटील महाविद्यालय कर्जत जि अहमदनगर या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदविला. यामध्ये प्रामुख्याने वादविवाद स्पर्धेत अक्षय यादव आणि सायली मखरे या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक-सुवर्णपदक मिळाले तसेच भारतीय वैयक्तिक गायन स्पर्धेत सरदार मुलाणी या विद्यार्थ्याला तृतीय क्रमांक-कांस्य पदक प्राप्त झाले तसेच ओंकार कदम या विद्यार्थ्याला तालवाद्य या प्रकारात द्वितीय क्रमांक-रौप्य पदक मिळाले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, कला विभाग प्रमुख डॉ. भरत भुजबळ, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे, प्रा. प्रकाश करे प्रा. सचिन आरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेजमध्ये 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

संपादकीय,

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज सरडेवाडी येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिन विलास भोसले ,

खजिनदार सोमनाथ भोसले संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले

युवराज शिंदे सर यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व समजावून सांगून तसेच हिंदी दिवसाचे प्रस्तावना 1938 साली महात्मा गांधींनी केली होती परंतु 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाल्यानंतर 14 सप्टेंबरला अधिकृत हिंदी दिवस म्हणून घोषित करण्यात आले.

तसेच रिटा घोष मॅडम यांनी हिंदी दिवसाबद्दल सांगताना म्हणाले की हिंदी दिवसाची सुरुवात देवनागरी मधून झाली

कार्यक्रमाचे आयोजन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!

राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!

 

1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)

2. पालघर – अनुसुसूचित जमाती

3. रायगड- सर्वसाधारण

4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण

6. नाशिक -सर्वसाधारण

7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

8. नंदूरबार-अनुसूचित जमाती

9. जळगांव – सर्वसाधारण

10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)

11. पुणे -सर्वसाधारण

12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

13. सांगली – सर्वसाधारण (महिला)

14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)

16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण

17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

18. बीड – अनुसूचित जाती (महिला)

19. हिंगोली -अनुसूचित जाती

20. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग

21. धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

22. लातूर – सर्वसाधारण (महिला)

23. अमरावती – सर्वसाधारण (महिला)

24. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)

25. परभणी – अनुसूचित जाती

26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)

27. बुलढाणा -सर्वसाधारण

28. यवतमाळ सर्वसाधारण

29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

30. वर्धा- अनुसूचित जाती

31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग

32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)

33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)

34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

error: Content is protected !!