Home शैक्षणिक चेतना फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

चेतना फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

चेतना फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

चेतना फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

 

इंदापूर- (सरडेवाडी )येथील चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मसी दिवस अतिशय उत्साह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पाचव्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. “Think Health Think Pharmacist “या घोषवाक्य खाली आयोजित केले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सत्यशील पाटील, इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. शितल बोरा आणि इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. सुहास पवार यांनी भूषवले. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,खजिनदार सोमनाथ माने ,सदस्य बापू बोराटे व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. गणेश मस्के आधी उपस्थित होते.

या सप्ताहात औषध सुरक्षेचे बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पोस्टर प्रेसेंटेशन, क्वीझ स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वृक्षारोपण व वादविवाद स्पर्धा अशा उपक्रमाचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आठवड्याचा कार्यक्रम अधिकच स्मरणीय केला. वर्ल्ड फार्मसिस्ट डे चे औचित्य साधून या दिवशी समारोप करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सत्यशील पाटील अध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन तथा चेअरमन इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी व श्री शितल बोरा उपाध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन श्री सुभाष पवार वरिष्ठ उपाध्यक्ष इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट ची समाजातील भूमिका व जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले.

शेवटी विविध स्पर्धेमध्ये विजेत्यांचे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांना औषध सुरक्षा जबाबदारी, फार्मसी व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल जागरूकता करणे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सत्यशील पाटील यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्र हे एखाद्या कल्पवृक्षा प्रमाणे असून रोजगार, व्यवसाय संशोधन, शैक्षणिक तसेच आयटी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध करून देत आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट ची कर्तव्ये व सेवा देण्यासाठी तत्पर राहण्यासाठी आवाहन केले.

चेतना फाउंडेशन अध्यक्ष उदय देशपांडे यांच्याबरोबर विलास भोसले आणि खजिनदार सोमनाथ माने प्राचार्य आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली फार्मसी विद्यालयाच्या प्रा. प्राजक्ता झगडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!