Home शैक्षणिक चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी  बाळगोपाळ यांनी मनमुराद लुटला आनंद

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी  बाळगोपाळ यांनी मनमुराद लुटला आनंद

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी   बाळगोपाळ यांनी मनमुराद लुटला आनंद

संपादकीय:-

चेतना इंटरनॅशनल स्कूल चेतना जुनिअर कॉलेज सरडेवाडी येथे गोपाळ कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्या देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने , संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

नर्सरी पासून ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले.

नर्सरी ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये राधाकृष्णा च्या वेशभूषणे कार्यक्रमाचे रंगत वाढवली तसेच लहान मुलींनी कार्यक्रमांमध्ये राधाकृष्ण वर आधारित असणाऱ्या गाण्यावरती नृत्यही केले.

युवराज शिंदे सर यांनी राधा कृष्णाची कहानी सांगून मुलांना मार्गदर्शन केले. व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल यांनीही विद्यार्थ्यांना दहीहंडी हा पारंपारिक सण असून त्याचे महत्त्व पिढ्यानपिढ्या माहिती व्हावे म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम स्कूलमध्ये घेण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहावीच्या व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली मुलांना खाऊ वाटप झाला व कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजन प्रांजली सुतार यांनी केले. व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनीही सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!