Home Blog Page 23

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे

*”संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय – डॉ. पंकज देशमुख”*

 

पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५:

महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली.

 

सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी स्वयंसेवकांना कायद्याविषयी प्रशिक्षण देण्याचा हा २३ वा उपक्रम होता.

पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या काळात महिला, मुली आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, चोरी किंवा लहान मुलांच्या अपहरणासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे हा होता. या कार्यक्रमात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी २० पोलीस ठाणे येथील दक्षता समितीच्या महिलांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख यांनी ‘सण आणि महिला सुरक्षितता: कायदेसंरक्षण यंत्रणा व समाजाची भूमिका’ या विषयावर संवाद साधला. स्त्री आधार केंद्र आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी काम करताना कोणतीही समस्या सोडवणे अधिक परिणामकारक आणि सुलभ होते. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्यासाठी नेहमीच अत्यंत उपयुक्त ठरते असे श्री देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोपट येले यांनी स्फोटके आणि बॉम्बशोधक पथकाच्या जबाबदारीबद्दल माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक श्री. विवेक नायडू यांनी शहरी आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.

 

डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गणेशोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे, मात्र सार्वजनिक गर्दीत महिलांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. स्वयंसेवकांची उपस्थिती महिला, मुली आणि लहान मुलांसाठी खूप आश्वासक असेल. तसेच, सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या प्रत्येक महिला कार्यकर्त्याच्या योगदानाला त्यांनी दाद दिली.

 

यावेळी, फ्रान्समधील जीझेल पेलिकॉ यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे उदाहरण देत, डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्येक अन्यायग्रस्त महिलेने त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. या कार्यशाळेमुळे पुणे शहरातील गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत सामाजिक यंत्रणा तयार होत आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणाचा अनुभव कार्यकर्त्यांना आगामी काळात काम करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

 

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेमार्फत राज्यभरात महिलांसाठी बचत गट आणि कायदेविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात. प्रशिक्षित स्वयंसेवक गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या वेळी पोलिसांना मदत करतील. गेल्या वर्षी देखील या स्वयंसेवकांनी हरवलेल्या लहान मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मदत केली होती. गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तयार करणे, छेडछाड थांबवणे, आणि गरजेनुसार मदत पुरवणे अशा अनेक कामांसाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात आले.

अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळाच्या इमारतीचे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते उद्घाटन

बाल बंदींमधील ऊर्जेला योग्य वाट देत त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

पुणे, दि. २: बाल न्याय मंडळात दाखल होणाऱ्या बालकांना त्यांच्या पूर्वायुष्यात योग्य मार्गदर्शन, साहाय्य न मिळाल्याने अजाणतेपणी गुन्हा घडतो. अशा बाल बंदीच्या समस्या, अडचणी समजून घेऊन त्यांच्यातील ऊर्जेला योग्य वाट देऊन जीवनात यशस्वी होण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले.

अतिरिक्त न्याय दंडाधिकारी बाल न्याय मंडळ, येरवडा या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन होते. याप्रसंगी महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्रमुख न्यायदंडाधिकारी, बाल न्याय मंडळ श्रीमती जी. एन. बागडोरिया, अतिरिक्त न्याय दंडाधिकारी श्रीमती एल. के. सपकाळ, महाराष्ट व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ए. यु. पठाण, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड आदी या उपस्थित होते.

पुणे येथे मोठ्या प्रमाणात बाल न्याय मंडळाकडे खटले प्रलंबित असल्याने हे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून न्यायमूर्ती श्रीमती मोहिते डेरे म्हणल्या, बाल न्याय मंडळासाठी आवश्यक त्या सर्व बाबी येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. निरीक्षणगृहात या बालबंदींना योग्य मार्गदर्शन, सहाय्य देण्याची यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास ते भविष्यात निश्चितच यशस्वी होतात, त्यादृष्टीने डोंगरी येथील बाल निरीक्षण गृह देशात आदर्श बनविण्यात आले. या बालकांमधील ऊर्जेला वाट करून देण्यासाठी बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले. व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले. निरीक्षणगृहातील प्रत्येक खोलीला वेगवेगळी रंग संगती देण्यात आल्यामुळे मुलांमध्ये एक सकारात्मक परिणाम दिसू आला. त्यांच्यातील समस्या तपासणीची व्यवस्था, संस्कारक्षम चित्रपट दाखविणे आदी सुविधा निर्माण करण्यात आल्यामुळे त्यातून यशस्वी नागरिक घडले आहेत. या ठिकाणी येऊन इतर बालबंदींना प्रेरणा देत आहेत. याच धर्तीवर राज्यातील सर्व निरीक्षणगृहांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, बाल न्याय मंडळाशी संबंधित सर्वाधिक खटले मुंबई, ठाण्याबरोबरच पुणे येथे प्रलंबित आहेत. पुणे येथे जवळपास ५ हजार खटले प्रलंबित असून दरवर्षी नव्याने १२०० दाखल आणि तितकेच निर्गत होतात. आधीचे खटले तसेच प्रलंबित राहत असल्यामुळे अतिरिक्त बाल न्याय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खटले निकाली निघण्यास वेग येणार आहे. या ठिकाणी ४० बालबंदींना नव्या वस्तूत राहायला मिळणार आहे.

श्रीमती गुंडे म्हणाल्या, महिला व बाल विकास विभागामार्फत प्रलंबित खटले गतीने निकाली व्हावेत यासाठी राज्यातील सहा जिल्ह्यात बाल न्याय मंडळांवर सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात लवकरच करण्यात येणार आहे. विभागामार्फत बालकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. दहा हजार बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आली आहेत २०२३- २५ मध्ये अनाथ आरक्षणाअंतर्गत ७४० मुलांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले असून ही संख्या वाढत जाणार आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत एक लाखापेक्षा अधिक मुलांना २ हजार २५० रुपये इतके दरमहा अनुदान, केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविडमुळे पालक गमावलेल्या ३३ हजार मुलांना ४ हजार रुपये डीबीटीद्वारे दिले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बालकांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी श्री. झंजाड यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास विविध न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर दरड कोसळली; दोन जवान शहीद

लेह:-लडाखमध्ये मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये लष्कराच्या ताफ्यातील वाहन दरडीखाली आले आणि दुर्घटना घडली. यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे.

लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ३० जुलैला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास लडाखच्या खोऱ्यांत ही घटना घडली आहे. एक मोठी दरड कड्यावरुन खाली कोसळली आणि लष्कराच्या ताफ्यातील एका वाहनावर आदळली. वाहनातील दोन जवानांना आपला प्राण गमवावा लागला आहे. शहीद जवानांची ओळख लेफ्टनंट कर्नल भानू प्रकाप सिंग आणि लान्स दफादार दलजीत सिंग अशी झाली आहे. या प्रदेशात कार्यरत असलेल्या एका युनिटमध्ये ते काम करत होते. अपघातात त्यांनी गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे.

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने एक्स हँडलवर पोस्ट केली आहे की, ३० जुलै २०२५ ला सकाळी ११.३० वाजता लडाखमध्ये एका लष्करी वाहनाच्या ताफ्यावर एका कड्यावरुन मोठी दरड कोसळली. परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासोबतच कॉर्प्सने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, ‘जीओसी फायर अँड फ्युरी आणि सर्व रँक लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप सिंग आणि लान्स दफादार यांनी सलाम करत आहोत. ३० जुलैला देशसेवेचे कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. या दु:खद प्रसंगी शोकाकुल कुटुंबाप्रती तीव्र संवेदना आम्ही व्यक्त करतो.

अखेर कोल्हापूर येथील खंडपीठाला मान्यता! 18 ऑगस्ट पासून सुरू होणार कोल्हापूर खंडपीठ

कोल्हापूर:-मागील कित्येक वर्षापासून कोल्हापूर येथे नागपूर औरंगाबाद खंडपीठाप्रमाणेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशा प्रकारची मागणी जनता तसेच विधिज्ञांकडून केली जात होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणारे खटले हे कोल्हापुरातून चालवले जात नसल्यामुळे नागरिकांची फार मोठी गैरसोय होत होती.आता मात्र बऱ्याच वर्षांची ही मागणी शासनाने मान्य केल्याचे नोटिफिकेशन जाहीर झाले असल्याने आता कोल्हापूर खंडपीठ दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत होणार आहे.*

*👉🅾️🅾️👉रत्नागिरी येथील ज्येष्ठ विधिज्ञ विनय आंबुलकर यांनी या वृत्ताचे स्वागत केले असून या खंडपीठामुळे रत्नागिरीकरांची देखील गैरसोय दूर होईल असे सांगितले.यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व नेते विधीज्ञ आणि नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन!*

यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही; ही शेवटची संधी म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

मुंबई:-राज्यातील महायुतीच्या काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधान आणि कृतीमुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारची बदनामी होत आहे. या सर्व घटनानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मंत्र्यांची चांगलीच शाळा घेतली. २० मिनिटं त्यांनी या मंत्र्यांचा क्लास घेतला आणि आता एकही चूक खपवून घेणार नाही, असं त्यांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगत चांगलीच कानउघडणी केली.*

*👉🔴🔴👉दरम्यान, मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० मिनिटे सर्वच मंत्र्यांना काही सूचना केल्या. यात वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. तसेच असेच प्रकार होत राहिले तर सरकारची बदनामी होते. त्यामुळे ही शेवटची संधी आहे. यानंतर काय कारवाई करायची ती करूच,पण पुढे एकही प्रकार खपवून घेणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना वाँर्निंग दिली. तसेच त्यांनी सर्व मंत्र्यांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. जरा कमी बोलायला शिका, जितके कमी बोलाल तितके चांगलं आहे असा मोलाचा सल्लाही या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शिवाय या पुढेही तुम्ही असेच वादग्रस्त वक्तव्य करत राहीलात तर दरवेळी तुम्हाला कुणी वाचवणार नाही, असा सज्ज्ड दमही त्यांनी यावेळी दिल्याचे समजते.*

*👉🟥🟥👉गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारचे मंत्री वादात सापडले आहेत. यापैकी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण सर्वाधिक गाजले. विधिमंडळात कायदा आणि सुव्यवस्था, राज्याचा विकास याबाबत महत्त्वाचे कायदे केले जातात. याच विधिमंडळाच्या सभागृहात माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमीचा जुगार खेळताना दिसले. त्यांचे गेम खेळत असतानाचे काही व्हिडीओ समोर आले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. याआधाही कोकाटे यांनी काही वादग्रस्त विधानं केली होती. रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकार भिकारी आहे, असेही एक विधान केले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरुममध्ये पैशांनी भरलेली कथित बॅग असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या सर्वच घडामोडींमुळे फडणवीसांनी आपल्या मंत्र्यांना तंबी दिली आहे.*

खुर्ची डोक्यात जाता कामा नये”, सरन्यायाधीश भूषण गवई असे का म्हणाले?

खुर्ची डोक्यात जाता कामा नये”, सरन्यायाधीश भूषण गवई असे का म्हणाले?

 

पद मिळाले की अनेकांच्या डोक्यात खुर्ची जाते. या सारखे दुसरे पाप नाही, काही नवोदित प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हे चाळीस, पन्नास वर्ष वकिली करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांसोबत ज्या पद्धतीने वागतात, ते चुकीचे असते. एक न्यायाधीश कनिष्ठ वकिलाला इतके रागावून बोलले की तो बिचारा वकील न्यायालयातच बेशुद्ध पडला, न्यायालयातील वातावरण हे खेळीमेळीचे असले पाहिजे, वकील आणि न्यायाधीश हे न्यायव्यवस्थेची दोन चाके आहेत. दोघेही समान आहेत. वकिलांना बाईट वागणूक देऊन तुमचा अहंकार जपला जात असेल, पण ते तुमचे काम नाही, अशा शब्दात देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनेकांचे कान टोचले, दर्यापूर येथील न्यायमंदीर, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय, वरिष्ठस्तर या नूतन न्यायालयीन इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आयोजित

कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण पाटील, दर्यापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष धर्मेद्र आठवले, जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वार्लगड्डा तसेच दर्यापूर जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके आदी उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा प्राण आहे. यामुळे संविधानाला आदर्श मानून न्यायदानाचे कार्य करावे, या क्षेत्रात

 

अनुभव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. न्यायाधीश आणि वकील यांचे संबंध सलोख्याची असावे, शासनाने अनेक महत्त्वपूर्ण कायदे लागू केले आहेत. महिला सबळीकरण कायद्यान्वये सियांना त्यांचा हक्क मिळत आहे. उत्तम न्याय व्यवस्थेमुळे आज आपला देश प्रगतीपथावर आहे. राज्यघटनेचे मौलिक अधिकार आणि जबाबदारी याचे योग्य पालन होणे गरजेचे आहे. सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, दर्यापूर डेथील न्यायमंदिराचे उद्घाटन ही घटना माझ्यासाठी विशेष आनंदाची आहे, मी मूळचा दारापूरचा असल्यामुळे माझ्यासाठी ही अभिमानाची व समाधानाची बाब आहे. मी या कार्यक्रमाला सरान्यायाधीश म्हणून आलो नसून एक ग्रामस्थ म्हणून आलेलो आहे, या नवीन न्यायालयीन इमारतीमुळे सुसज्ज यंत्रणेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लवकर न्याय मिळेल, न्यायदानाचे कार्य कोणताही पूर्वग्रहदूषित भाब न बाळगता करावे लागते, म्हणून खऱ्या अर्थाने हे एक पवित्र कार्य

यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा होणार चार वर्गासाठी इयत्ता चौथी, पाचवी अन् सातवी, आठवीचा समावेश

चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवी, आठवी या चार वर्गासाठी घेण्यात येणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दिला असून याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार आहे.

पूर्वी चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, २०१६ पासून त्यात बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. याचा मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी प्राथमिक शाळांना बसला आहे. या बदलामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील

स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळा या चौथी अथवा सातवीपर्यंत ● आहेत. त्यामुळे पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याचा फटका शाळांना बसला आहे. परिणामी पटसंख्या घटत चालले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याने पालकही आपल्या पाल्यांना या शाळांत दाखल करत नाहीत. ही बाब सर्वच शिक्षक संघटनांनी प्रशासनासह शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुसार लवकरच आदेश काढण्यात येणार आहे.

– नीलेश देशमुख, राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना

पटसंख्या घटत चालली आहे. यावर उपाययोजनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मे महिन्यात बोलावलेल्या ऑनलाइन बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ही बाब शिक्षणमंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण सहसंचालक यांच्यासह जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारीही उपस्थित होते.

या बैठकीत प्राथमिक शिक्षक

संघटनांच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवीसाठी सुरू करावी, अशी एकमुखी आग्रही मागणी केली. त्यास शिक्षण आयुक्तांनी तत्काळ हिरवा कंदील दाखवला. तसेच शिक्षणमंत्री भुसे यांनीही अनुकूलता दर्शवली. त्यानुसार यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व पाचवी आणि इयत्ता सातवी व आठवीसाठी घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार लवकरच सरकारी आदेश काढण्यात येणार आहे. यास शालेय शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे.

उपचारासाठी मदत हवीय? ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून मदत कशी मिळवायची जाणून घ्या.!

उपचारासाठी मदत हवीय? ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून मदत कशी मिळवायची जाणून घ्या.!

 

पुणे:-जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी हा आशेचा किरण बनला आहे. या निधीतून यंदा जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यात पावणेदोन हजारांहून अधिक रुग्णांना १७ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचाराकरिता सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यात ४४५ रुग्णालये संलग्नित आहेत.*

 

*👉🔴🔴👉मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचारासाठी मदत करण्यात येते. मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५ हजार रुपये, ५० हजार, १ लाख आणि जास्तीत जास्त २ लाख रुपयांची आजारनिहाय मदत करण्यात येते. आता जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दुर्धर आजारावरील उपचारांसाठी मदत, तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साहाय्य याबाबत नागरिकांना जिल्हास्तरावर सुविधा देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे. साहाय्यता निधीतून पुणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत १ हजार ७८५ रुग्णांना १७ कोटी २८ लाख रुपयांची मदत झाली आहे. मात्र, या साहाय्यता निधीतून उपचार पूर्ण झालेल्या रुग्णाला, तसेच राज्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मदत केली जात नाही.*

 

*👉🟥🟥👉जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांनी या कक्षाद्वारे मदत मिळविण्यासाठी https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, कक्षाच्या ई-मेल cmrfpune@gmail.com यावर ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष कक्षात येऊन अर्ज सादर करता येतो. ई-मेलद्वारे अर्ज केलेल्यांनी मूळ अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रे एकत्रितरीत्या aao.cmrf-mh@gov.in या ई-मेलवर पीडीएफ स्वरूपात पाठवावीत. मदतीचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली.*

 

*👉🔴🔴👉कोणत्या आजारांना मदत?*

 

*मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ठरावीक आजारांसाठी मदत दिली जाते. त्यात हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, अस्थिमज्जा, हात, खुबा, गुडघा प्रत्यारोपण, अंतस्थ कर्णरोपण (कॉकलीअर इम्प्लाँट), कर्करोग, अस्थिबंधन शस्त्रक्रिया, नवजात शिशू, लहान बालकासंबंधित आजार, रस्ते अपघात, मेंदू आजार, हृदयरोग, डायलिसीस, जळीत रुग्ण आणि विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारांसाठी मदत करण्यात येते.*

देशाच्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याचा आणि मराठी संस्कृतीचा गौरव!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जेएनयू, नवी दिल्ली येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्रा’ची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्रा’चे उदघाटन संपन्न झाले.

 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठी नव्हे, तर संपूर्ण भारताचे सार्वकालिक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या अद्वितीय सामरिक योजनांचा आणि स्थापत्यशास्त्राचा युनेस्कोने ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’ म्हणून गौरव करत 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले, हे अत्यंत गौरवाचे आहे.

 

मराठ्यांच्या जाज्वल्य लढ्यांपासून पानिपतच्या बलिदानापर्यंत, संपूर्ण भारतासाठी लढण्याची त्यांची विजिगीषू वृत्ती ही या अध्यासन केंद्रात अभ्यासली जाणार आहे. युद्धनीती, संरक्षणशास्त्र आणि स्वराज्यनिर्मितीचा हा वारसा जेएनयूमध्ये अभ्यासाचा विषय ठरणार, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेवरही प्रकाश टाकत सांगितले की, मराठी ही भारतातील अतीप्राचीन व समृद्ध भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, ही केवळ शासकीय मान्यता नव्हे तर तो भाषेला मिळालेला राजाश्रय आहे. ‘मराठीने देशाला समृद्ध केले आहे,’ असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

 

मराठी नाट्य, साहित्य, रंगभूमी ही देशातील सर्वोत्तम असल्याचे सांगताना त्यांनी मराठी ही केवळ भाषा नसून संपूर्ण भारतासाठी एक सांस्कृतिक वारसा असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी असेही स्पष्ट केले की, संकुचित विचार ही मराठी माणसाची प्रवृती नाही, ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘पसायदाना’ची वैश्विक परंपरा आहे, ती इतर भारतीय भाषांच्या सन्मानातूनच जपली पाहिजे.

 

छत्रपती शिवराय म्हणजे आपल्या अस्मितेचा उगम आणि प्रेरणेचा अखंड झरा आहे. त्यांचं स्मरण म्हणजे आपल्या ऊर्जा स्रोताशी जोडले जाणं. आज या जेएनयूमध्ये त्यांच्या अध्यासन केंद्राची पायाभारणी होत असताना, लवकरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय, नौसेनेच्या ध्वजावर राजमुद्रेला दिलेला सन्मान, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि आज विशेष अध्यासन केंद्र, ही सर्व उदाहरणं स्पष्ट करतात की, शिवराय ही केवळ आपली ओळख नाही, तर भविष्यातील उर्जेचा पाया आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार अनिल बोंडे, खासदार अजित गोपचडे, खासदार धनंजय महाडिक, तंजावरचे छत्रपती बाबाजी राजे भोसले, जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

धाडसाला सलाम जळगावात तहसीलदारांनी वाळू चोरट्यांना शिकवला चांगलाच धडा  थेट नदीत उडी घेतली अन् पोहत जात वाळू चोरट्यांचा केला पाठलाग

तहसीलदार साहेब आपल्याकडे येत असल्याचे समजताच वाळू चोरट्यांनी घाबरून ठोकली धूम

तहसीलदारांच्या धाडसाची होतेय चर्चा

*जळगाव:-सरकारी अधिकाऱ्याच्या मनात आलं तर संपूर्ण व्यवस्था बदलू शकते. तशी काही उदाहरणंही समोर आलेली आहेत. काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसलाही हलगर्जीपणा न करता समाजात आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत. सध्या अशाच एका तहसीलदार साहेबांची राज्यभरात चर्चा होत आहे. वाळूतस्करी रोखण्यासाठी या तहसीलदार साहेबांनी एकट्याने नदीपात्रात पोहून वाळूची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.*

 

*👉🔴🔴👉मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ धरणगावच्या तहसीलदारांचा आहे. जळगावात वाळू चोरट्यांना पकडण्यासाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी कपडे काढून थेट गिरणा नदीपात्रातून घेतली आणि तस्करापर्यंत ते पोहत गेले आहेत. महेंद्र सूर्यवंशी थेट नदीपात्रात उतरले.*

 

*👉🟥🟥👉तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून बैठक आटोपून धरणगावकडे जात होते. त्याचवेळी त्यांना गिरणा नदीपात्रात वाळू चोरी होत असल्यासं दिसून आलं. यानंतर महेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचं वाहन उभे करून ते थेट नदीपात्रात उतरले. कपडे काढून नदीतून पोहत जाऊन त्यांनी वाळू चोरट्यांचा पाठलाग केला.चक्क तहसीलदार आपल्याकडे येत असल्याचे समजताच वाळू चोरी करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. त्यांनी लगेच तिथून पळ काढला. चोरी करणारे ट्रॅक्टर तसेच कामगार तिथून पसार झाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तहसीलदार साहेब पोहोत तस्करांपर्यंत जाताना आणि वाळू चोर घाबरून तिथून पळून जाताना या व्हिडीओत दिसत आहे.*

*👉🔴🔴👉तहसीलदारांच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक*

*दरम्यान, अनेक सरकारी अधिकारी वाळू तस्करांना घाबरून असतात. वाळू तस्करीसाठी आडकाठी केल्यामुळे अनेकांनी तहसीलदारांवर हल्ला केल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र कशाचीही तमा न बाळगता वाळू चोरट्यांवरील कारवाईसाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि कर्तव्य निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी एकटेच कारवाईसाठी नदीपात्रातून पोहत गेल्याचा या कारवाईच्या प्रयत्नाची तसेच त्यांनी दाखवलेल्या धाडसाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनीही या व्हिडिओसह बातमीला दुजोरा दिला आहे.*

error: Content is protected !!