Home Blog Page 24

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय *श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त..

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय *श्री देवेंद्र फडणवीस* यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद,गायकवाडवस्ती शाळेला भेट देऊन शालेय वस्तू टिफिन बॅग,पाणी बॉटल,खाऊ,शालेय वह्या व पुस्तके देण्यात आली.त्यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सदस्य उपस्थित होते.तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष दादासाहेब नामदेव नायकुडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

श्री गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेचा १००% निकाल

हिंदी परीक्षेचा १००% निकाल

 

पिंपरी : श्री गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेचा १००% निकाल लागला. संस्थेचे मानद सचिव अॅडव्होकेट राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव प्रा. अनिलकुमारजी कांकरिया, प्राचार्य हनुमंत मारकड, पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे, शिक्षक प्रतिनिधी सीमा जंगले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मा.नितीन गडकरींना 2025 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

️ नितीन गडकरींना 2025 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 

➡️नितीन गडकरी यांना 2025 चा 43 वा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

➡️ऑगस्ट 01 रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येईल.

 

➡️लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे स्वरूप आहे.

 

➡️1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना प्रदान करण्यात आला होता.

 

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते :-

 

2021 :- सायरस पूनावाला

2022 :- डॉ. टेसी थॉमस

2023 :- नरेंद्र मोदी

2024 :- सुधा मूर्ती

2025 :- नितीन गडकरी 👍

दुर्दैवानं महाराष्ट्रात मला काही अनुभव आले आहेत. कृपया मला जास्त बोलायला लावू नका. अन्यथा आम्हाला ईडीबद्दल बरंच कठोर बोलावं लागेल. राजकीय लढाया निवडणुकीत लढायला हव्यात. त्यासाठी तुमचा वापर का होतोय ? भूषण गवई (सरन्यायाधीश)

दुर्दैवानं महाराष्ट्रात मला काही अनुभव आले आहेत. कृपया मला जास्त बोलायला लावू नका. अन्यथा आम्हाला ईडीबद्दल बरंच कठोर बोलावं लागेल. राजकीय लढाया निवडणुकीत लढायला हव्यात. त्यासाठी तुमचा वापर का होतोय ?

 

भूषण गवई (सरन्यायाधीश)

इंदापूर नगरपालिकेचा राज्यात प्रथम क्रमांक आला इंदापूरकर म्हणून अभिमान वाटतो, नगरपालिका कर्मचारी यांचे अभिनंदन पण….

इंदापूर नगरपालिकेचा राज्यात प्रथम क्रमांक आला इंदापूरकर म्हणून अभिमान वाटतो, नगरपालिका कर्मचारी यांचे अभिनंदन पण…..

एवढा आनंदमय शहराचं वातावरण निर्माण झाले असताना पडस्थळ रोड वरील रो हाऊस मध्ये जिथं लहान मुले खेळतात ती नगरपालिकाची बगीचा आहे, बगीच्यात

ड्रेनेजचा शोश खड्डा नगरपालिकेडुन खोदला जातो ही खेदाची बाब आहे, दुर्गंधी येते,लहान मुले खेळताना पडु नये म्हणून वर्गणी करून जाळी टाकावी लागते,तो शोश खड्डा कधी बुजेल या कडे लहान मुले पहात आहेत व नगरपालिकेडुन बगीचा कधी होणार,याचे उत्तर कोणाकडे विचारायचं हा प्रश्न आहे,अशी खंत, तेथे राहणाऱ्या सर्व लोकांनी नाराजी व्यक्त केली

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी  पहिल्या वेतन आयोगापासून ते सातवा वेतन आयोगापर्यंत किती टक्के पगारवाढ झाली 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
पहिल्या वेतन आयोगापासून ते सातवा वेतन आयोगापर्यंत किती टक्के पगारवाढ झाली

नवी दिल्ली:-16 जानेवारी 2025, हा तोच दिवस ज्या दिवशी केंद्रातील मोदी सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. खर तर आठव्या वेतन आयोगाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती मात्र या नव्या वर्षाची सुरुवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन पहाट ठरली.

मोदी सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांची बहुचर्चित मागणी पूर्ण केली. अजून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही पण लवकरच या आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे आणि त्यानंतर मग समितीकडून आपल्या शिफारशी सरकारकडे सादर केल्या जातील.

सरकारकडे समितीच्या शिफारशी पोहोचल्यात की मग सरकारकडून या शिफारशी स्वीकारल्या जातील आणि प्रत्यक्ष नवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना लागू होणार आहे. खरे तर चौथ्या वेतन आयोगापासून प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे.यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत आता आपण पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोग पर्यंत कोणत्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना किती टक्के पगार वाढ मिळाली याचा आढावा घेऊयात.

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला

पहिला वेतन आयोग1948 मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाला आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने या वेतन आयोगातून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40% ने वाढवला.

दुसरा वेतन आयोग1959 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने दुसरा वेतन आयोग लागू केला. दुसऱ्या वेतन आयोगात काँग्रेस सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 50 टक्क्यांनी वाढवण्यात आला.

तिसरा वेतन आयोग 1973 मध्ये तिसरा वेतन आयोग लागू झाला. तत्कालीन काँग्रेस सरकारने तिसऱ्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

चौथा वेतन आयोग1986 मध्ये चौथा वेतन आयोग लागू झाला. चौथ्या वेतन आयोगातून तत्कालीन काँग्रेस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

पाचवा वेतन आयोग :1996 मध्ये पाचवा वेतन आयोग लागू झाला. पाचव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 35 टक्क्यांनी वाढला.

सहावा वेतन आयोग 2006 मध्ये सहावा वेतन आयोग लागू झाला. सहाव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40 टक्क्यांनी वाढला.

  1. सातवा वेतन आयोग 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला. एक जानेवारी 2016 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोग लागू आहे. दरम्यान सातव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 14 टक्क्यांनी वाढला. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगात सगळ्यात कमी वेतन वाढ मिळाली आहे.

इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग पायलटच्या ‘पॅन पॅन पॅन’ मेसेजमुळे विमानतळावर धावपळ मोठा अनर्थ टळला

इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
पायलटच्या ‘पॅन पॅन पॅन’ मेसेजमुळे विमानतळावर धावपळ मोठा अनर्थ टळला

मुंबई :- दिल्लीहून गोव्याला 191 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं मुंबईतील छत्रपती शिवाजी मराराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. बुधवारी रात्री 9.53 वाजता विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरले. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेवेळी वैमानिकांनी दिलेल्या ‘मेडे मेडे’ मेसेजची चर्चा होती. तर कालच्या इमर्जन्सी लँडिंगवेळी वैमानिकाने “पॅन पॅन पॅन” असा मेसेज दिला.

दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो 6E 6271 विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांनी जीव मुठीत धरला. काही मोठं घडण्याआधी पायलटने विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग मुंबई विमानतळावर केलं. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लॅण्डिंग करावं लागलं. या विमानात एकूण 191 प्रवासी आणि क्रू मेंबर होते. सुदैवानं पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. सगळे प्रवासी सुखरुप आणि सुरक्षित आहेत. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नियोजित वेळेनुसार रात्री 9:42 मिनिटांनी पोहोचणार होतं.

मात्र, विमानाच्या उड्डाणादरम्यान एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं. पायलटने रात्री 9:25 मिनिटांनी ‘पॅन-पॅन-पॅन’ कॉल दिला. हा एक प्रकारचा इमरजन्सी संदेश असतो. त्यानंतर विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री 9:52 वाजता सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं. एअरबस A320 निओ सारख्या विमानांमध्ये दोन इंजिन्स असतात आणि हे विमान एका इंजिनवरही सुरक्षित उड्डाण आणि लँडिंग करू शकतं. याच तांत्रिक क्षमतेमुळे पायलटने प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतला आणि मोठी दुर्घटना टळली. इंडिगो एअरलाइनने या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक  डॉ. बाहुबली शहा यांच्या मुंबई येथील आमरण उपोषणाची राज्यसरकारने तातडीने घेतली दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसात कायम स्वरूपी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची दिली ग्वाही !

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक

डॉ. बाहुबली शहा यांच्या मुंबई येथील आमरण उपोषणाची राज्यसरकारने तातडीने घेतली दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसात कायम स्वरूपी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची दिली ग्वाही !

इंदापूर, डॉ. संदेश शहा. राज्यातील सीसीएमपी ( सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मोकोलॉजी ) उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदे तील नोंदणीचा प्रश्न येत्या आठ दिवसांत कायमस्वरूपी सोडवू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते ऊसाचा रस घेऊन मागे घेतले. हा विषय कायम स्वरूपी न सुटल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने खोटया व अर्धसत्य माहितीच्या आधारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्र्याची दिशाभूल केल्याने सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीसाठी चाप बसला. त्यामुळे संतप्त होमिओपॅथिक डॉक्टरांनी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक व मार्गदर्शक डॉ. बाहुबली शहा यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक १६ जुलै रोजी सुरू केलेल्या आंदोलनास उस्फुर्त पाठिंबा दिला. आंदोलनात राज्यातून २० हजारहून जास्त डॉक्टर सहभागी झाले तर इतर डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून आंदोलनास उस्फुर्त पाठिंबा दिल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्था ठप्प झाली. यावेळी डॉ. बाहुबली शहा यांनी श्वासात श्वास असेपर्यंत होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताच उपस्थित डॉक्टरांनी बाहुबली बाहुबली असा जयघोष केला.

यावेळी आमदार डॉ. संजय कुटे, डॉ. हिम्मत उढान, आ. सुरेश धस, आ. रवि राणा आ. नारायण कुचे, आ. देवेंद्र भोयर, आ. चैनसुख संचेती यांच्या सह ३० हून जास्त आमदारांनी आंदोलनस्थळी येत आंदोलनास जाहीर पाठिंबा दिल्याने जोरदार वातावरण निर्मिती झाली. राज्यातील सर्व भागातून हजारो डॉक्टर्स येत असल्याचे पाहून संध्याकाळी मंत्रालयातून चर्चेसाठी येण्याचा निरोप आल्यानंतर डॉ. बाहुबली शहा, डॉ. रजनीताई इंदुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा झाली. यावेळी डॉ. बाहुबली शहा यांनी सविस्तर कायदेशीर माहिती मुख्यमंत्री महोदय यांना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांवर अन्याय होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रालयातील न्याय व विधी विभागाच्या सचिवांसह चर्चा करून हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविला जाईल, हा अभ्यासक्रम बंद केला जाणार नाही तसेच होमिओपॅथिक डॉक्टर्स यांच्यावर अन्याय केला जाणार नाही अशी ग्वाही दिली तर सर्व प्रक्रियावर आपले वैयक्तिक लक्ष असेल असे सूचित करून डॉ. बाहुबली शहा यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने डॉ. शहा यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर उपस्थित डॉक्टरांनी एकच जल्लोष केला.

यावेळी डॉ. शहा म्हणाले, सीसीएमपी अभ्यासक्रम हा जनते च्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने कायद्यास मंजुरी दिली. त्यानंतर नाशिक आरोग्य विद्यापीठाने मंजूर कायद्यान्वये या अभ्यासक्रमाची निर्मिती केली. शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात याचे शिक्षण देण्यात आले, या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व डॉक्टरांच्या परीक्षा देखील आधुनिक चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी घेतल्या. या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी सन २०१७ मध्ये बाहेर पडली असून आजपर्यंत दहा हजार हून जास्त डॉक्टरांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. वैध अभ्यासक्रम साडेपाच वर्षाचा असून तो एमबीबीएस सम तुल्य आहे. होमिओपॅथी अभ्यासक्रम अधिक १ वर्षाचा क्लिनिकल रोटेशन, प्रात्यक्षिकासह आधुनिक चिकित्सा पद्धतीतील औषध शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे सीसीएमपी अर्हताधारक डॉक्टर आधुनिक चिकित्सा पद्धतीने रुग्णोपचार करण्यास सक्षम आहेत.

महाराष्ट्र वैद्यक परिषद कायदा १९६५ मधील तरतूदीनुसार सीसीएमपी अर्हता अधिनियमाच्या अनुसूचित २८ व्या क्रमांकाने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिनियमातील तरतुदींना अनुसरून

सीसीएमपी अर्हता धारकांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद करणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेस अनिवार्य आहे. गेली आठ वर्षे त्यासाठी टाळाटाळ होत आहे. विधी व न्याय विभाग अभिप्रायासह वैद्यकीय शिक्षण विभागाने पत्र पाठवल्यानंतर एमएमसी कडून नोंदणी प्रक्रिया दिनांक १५ जुलै पासून सुरू करण्याची अधिसूचना देण्यात आली. या पूर्णपणे वैध प्रक्रियेस आयएमएने विरोध करून ही प्रकिया बंद पाडली तसेच मंत्रिमंडळ म्हणजेच विधिमंडळ म्हणजे कायदामंडळ असून देखील आयएमएने शासनावर अविश्वास व्यक्त केला. संविधान व त्यानुसार केलेल्या कायद्याप्रती आयएमए अविश्वास व्यक्त करत असून त्यांच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध म्हणून तसेच सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना न्याय देण्यासाठी आपण हे प्राणांतिक आंदोलन सुरू केले होते. मात्र शासनाने चार दिवसात कायमस्वरूपी होणाऱ्या निर्णयास कोणीही आव्हान देऊ नये असे सूतोवाच केले. शिष्टमंडळाने शासनाने आठ दिवस घ्यावे मात्र सीसीएमपी डॉक्टरांवर अन्याय होऊ देऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. शहा यांनी केली. त्यामुळे येत्या आठ दिवसांत कायमस्वरूपी सकारात्मक निर्णय होईल अशी आशा

डॉ. बाहुबली शहा यांनी व्यक्त केली.

दरम्यान डॉ. अरुण भस्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषण सुरू झाल्यानंतर आझाद मैदानावर होमिओपॅथिक डॉक्टरांचा जनसागर उसळला. यावेळी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणारे आमदार सदाभाऊ खोत व रोहित पवार, डॉ. दीपक जगताप, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. राजेंद्र पाटुकले, डॉ. संदेश शहा आदींनी भाषणातून होमिओपॅथिक डॉक्टरांना राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. विधिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील होमिओपॅथिक डॉक्टरांचा प्रश्न उपस्थित केल्यावर सर्वांनी जल्लोष केला. व्यासपीठ व्यवस्थापन डॉ. शिवदास भोसले, डॉ. नितीन गावडे, डॉ. अवचार, डॉ. मिनाक्षी सेठ, डॉ. सुनील मुळीक व सहकाऱ्यांनी केले.

शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग

न्यूयाँर्क:- भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला वीस दिवसांच्या अंतराळवारीनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्सचं ड्रॅगन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील समुद्र किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये सुखरूपपणे उतरले.

शुभांशु शुक्ला हे राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले. तसेच, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (ISS) पोहोचणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांनी अवकाश स्थानकात सतरा दिवस वास्तव्य केले. या काळात शुभांशु शुक्ला यांनी साठपेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग केले, ज्यात भारतातील सात प्रयोगांचा समावेश होता. त्यांनी हाडांच्या आरोग्याविषयी अभ्यास केला. 28 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला आणि तिरुअनंतपुरम, बंगळूरू, लखनऊ येथील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 6 जुलैला इस्रोमधील शास्त्रज्ञांशी गगनयान मोहिमेविषयी चर्चा केली. शुभांशु शुक्ला यांनी आयएसएसच्या क्युपोला मॉड्यूलमधून पृथ्वीची अद्भुत फोटोग्राफीही केली.

 

शुभांशु यांची ही मोहीम आगामी गगनयान मोहिमेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या मोहिमेमुळे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला नवी उंची मिळाली आहे. शुभांशू शुक्ला 25 जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात गेले होते. ते अमेरिका, पोलंड आणि हंगेरीमधील तीन सहकारी अंतराळवीरांसोबत 14 जुलै रोजी दुपारी 4.45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे रवाना झाले. अखेरीस, हे सर्व अंतराळवीर आज 15 जुलै रोजी पृथ्वीवर पोहोचले. दरम्यान, कॅलिफोर्नियातील समुद्र किनाऱ्याजवळ शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीरांना घेऊन येणारं यान उतरल्यानंतर सर्व अंतराळवीरांना यानातून सुखरूपपणे बाहेर काढून वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले. आता त्यांना सुमारे १० दिवस क्वारेंटाईनमध्ये ठेवलं जाईल. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवलं जाईल. त्यानंतर शुभांशू शुक्ला भारतात परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा क्षण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार

मुंबई:-राज्यात अनेक ठिकाणी धर्मांतर करण्याच्या घटना घडत असल्याचा मुद्दा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. यावर पंकज भोयर यांनी स्पष्टीकरण देत समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.*

 

*👉🟥🟥👉पंकज भोयर म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही जबरदस्तीने धर्मांतर करण्याची परवानगी नाही. परंतु, एक समिती स्थापन करून अभ्यास करण्यात आला, तेव्हा जवळजवळ ३५ केसेस घडल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वत:हून धर्मांतर केल्याचे समोर आले. साधे सरळ जे लोक असतात त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न काही संस्था करत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून पुढील महिन्यात याचा अहवाल येणार आहे.तसेच शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला की देशातील १० राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे, आपल्या राज्यात लागू होणार का? यावर पंकज भोयर म्हणाले ११ वे राज्य हे महाराष्ट्र असणार आहे आणि अतिशय कडक कायदा केला जाणार आहे.*

error: Content is protected !!