Home Blog Page 25

विभागीय लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी

पुणे,दि. १४: विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी आज लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी घेतली.

 

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या दोन प्रकरणांवर यावेळी श्रीमती द्विवेदी यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. यात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. स्वातंत्र्य सैनिक वारस प्रमाणपत्र मिळण्याबाबत व खरेदी खत दस्त करुन मिळणे आदी तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी संपली सुप्रीम कोर्ट आता सोक्षमोक्ष लावणार ऑगस्टमध्ये सर्वात मोठी सुनावणी होणार.

नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.

आता या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्क्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणूक येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकते. परंतु, निवडणूक संपल्यानंतर म्हणजे 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. ही ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत या प्रकरणाला दोन वर्षे झाली असून आता या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा, असे संकेत दिले. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार का परत उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ कुणाचा? आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

 

*मुंबई:-शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात केली आहे. या प्रकरणाच्या अंतिम निर्णयापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येणार आहे.*आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पक्ष कोर्टात ही मागणी करणार आहे. शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना दिलं होतं. तर मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना दिलं होतं. 17 फेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं हा आदेश दिला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेत, सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.*

जून 2022 मध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंड केले. यानंतर, शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. यानंतर, शिंदे यांनी शिवसेनेवर आपला दावा मांडला. ठाकरे गटाचा आरोप आहे की शिंदे यांनी असंवैधानिकरित्या सत्ता बळकावली आहे आणि ते असंवैधानिक सरकारचे नेतृत्व करत आहेत. 16 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून स्वीकारले.*

तसेच, शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह (बाण-धनुष्य) वापरण्याची परवानगी देण्यात आली. उद्धव गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने सभापती राहुल नार्वेकर यांना यावर निर्णय घेण्यास सांगितले होते. 10 जानेवारी 2024 रोजी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून वर्णन केले होते. याविरुद्ध ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 22 जानेवारी 2024 रोजी न्यायालयाने शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती.*

फार्मसी किंवा औषधनिर्माणशास्त्र म्हणजे नेमकं काय प्रा. डॉ. गणेश शंकर म्हस्के, प्राचार्य, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर, पुणे.

फार्मसी किंवा औषधनिर्माणशास्त्र म्हणजे नेमकं काय

तर, हे एक शास्त्र आहे जे औषधांच्या निर्मिती, त्यांचे गुणधर्म, त्यांची चाचणी, त्यांचा वापर आणि मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करते. आपण जी औषधे घेतो ती तयार झाल्यावर थेट रुग्णांना दिली जात नाहीत; त्याआधी त्यांची सखोल परीक्षण केले जाते. कारण ती रसायनांपासून बनवलेली असतात. या औषधांमधील रसायनांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घेणं फार्मसीचं मुख्य कार्य आहे. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचे उत्पादन फार्मास्युटिकल कंपन्या करतात. थोडक्यात, एखादा आजार ओळखणे, रोखणे, तपासणे आणि त्यावर उपचार करण्यासाठी संशोधन करणे. या सर्व गोष्टींसाठी फार्मसी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

फार्मसी करियर एक सुवर्णसंधी

 

कोरोना आणि इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे लसीकरणावर जगभर संशोधन सुरू आहे. याचप्रमाणे सॅनिटायझर आणि इतर सुरक्षात्मक उपायांचे महत्त्वही वाढले आहे. यामुळे औषधनिर्माण शास्त्रातील संधी पुन्हा एकदा उजागर झाल्या आहेत. औषध उत्पादन, संशोधन आणि क्लिनिकल ट्रायल्सच्या क्षेत्रात करिअरसाठी मोठ्या संधी उघडल्या आहेत. ज्यांना संशोधनाची आवड आहे आणि त्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी औषधनिर्माण शास्त्र एक उत्तम पर्याय ठरतो. औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) हा एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. रुग्णांच्या जीवनात औषधांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. जिथे वैद्यकशास्त्र रोगांचे निदान शिकवते, तिथे औषधनिर्माण शास्त्र त्या रोगावर योग्य औषध कसे वापरावे आणि ते कसे तयार करावे, हे शिकवते. प्रत्येकाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या आजारासाठी औषध घेणे आवश्यक असते, म्हणूनच औषधनिर्माण शास्त्र हे वैद्यकशास्त्र आणि रुग्ण यामधील महत्त्वाचे दुवा आहे. विविध क्षेत्रातील संधीबद्दल माहिती खालीलप्रमाणे,

 

सरकारी क्षेत्रातील करिअर संधीमध्ये प्रामुख्याने, ड्रग इन्स्पेक्टर, ड्रग कंट्रोल अॅडमिनिस्ट्रेशन, रिसर्च आणि डेव्हलपमेंट संस्था, अन्न व औषध प्रयोगशाळा, रेल्वे व संरक्षण सेवा इ.

 

खाजगी क्षेत्रातील करिअर संधीमध्ये औषध निर्माण कंपन्यामध्ये प्रामुख्याने, प्रॉडक्शन, क्वालिटी कंट्रोल (QC), क्वालिटी अॅश्युरन्स (QA), रिसर्च अँड डेव्हलपमेंट, फार्मास्युटिकल मार्केटींग, क्लिनिकल रिसर्च असोसिएट, रेग्युलेटरी अफेअर्स एग्जीक्यूटिव, मेडिकल कोडिंग व मेडिकल रायटिंग, रिटेल आणि हॉस्पिटल फार्मसी, मार्केटिंग आणि सेल्स प्रतिनिधि, ऑनलाइन फार्मसी

शिक्षणक्षेत्र, कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन सायंटिस्ट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट बँड मॅनेजमेंट कॉस्मेटिक सल्लागार/सौंदर्य क्लिनिकमध्ये करिअर इ.

 

उच्च शिक्षण (M. Pharm, MBA in Pharma Management, Pharm. D/Clinical Pharmacy, PG Diploma in Regulatory Affairs/Clinical Research/Pharmacovigilance, GRE/TOEFL परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परदेशात शिक्षण व नोकरी इ.

 

उद्योजकतेच्या संधी मध्ये औषध विक्रीचे मेडिकल स्टोअर व एजन्सी, ई-फार्मसी, औषध निर्मिती उद्योग, क्लिनिकल रिसर्च संस्था/ फार्माकोविजिलन्स सेवा, नवीन हेल्थकेअर प्रॉडक्ट्स / सप्लिमेंट्स डेव्हलप करणे, फार्मसी कोचिंग क्लासेस/शैक्षणिक संस्था, फार्मा मार्केटिंग कन्सल्टंसी, FMCG व हेल्थकेअर प्रॉडक्ट्सची फ्रँचायझी, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणे इ.

 

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्स ड्रग डिस्कवरी, डेटा अॅनालिटिक्स, पर्सनलायझ्ड मेडिसिन, डिस्पेन्सिंगमधील ऑटोमेशन, बायोइन्फॉर्मेटिक्स, फार्माकोजिनोमिक्स, फार्मकोविजिलन्स डेटा सायंटिस्ट, फार्माकोइकोनॉमिक्स इ.

 

फार्मसी प्रवेश पात्रता –

 

1. D. Pharm (डी. फार्मसी कालावधी- २वर्षे)

 

१२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

भौतिकशास्त्र (PHYSICS), रसायनशास्त्र (CHEMISTRY) आणि जीवशास्त्र (BIOLOGY) किंवा गणित (MATHEMATICS) आवश्यक आहेत.

 

PCM किंवा PCB दोन्ही ग्रूप असेल तरी चालेल किंवा, दोन्ही पैकी एक ग्रूप असेल तरी चालेल.

 

2. B. Pharm (बी. फार्मसी कालावधी-४वर्षे)

 

१२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण – Physics, Chemistry, आणि Biology/Mathematics.

 

PCM किंवा PCB दोन्ही ग्रूप असेल तरी चालेल किंवा, दोन्ही पैकी एक ग्रूप असेल तरी चालेल.

MHT-CET 2025/NEET 2025 परीक्षेत NON-ZERO SCORE/ असणे आवश्यक आहे. म्हणजेच MHT-CET 2025/NEET 2025 परीक्षेत शून्य मार्क नसावेत.

प्रवेश प्रक्रिया कशी असते –

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतली जाणारी सीईटी (MHT-CET) परीक्षा देणे आवश्यक असते. डी. फार्मसी प्रवेशासाठी कोणतीही सीईटीप्रवेश परीक्षा आवश्यक नसते.

 

शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून महाराष्ट्र शासन नियमांच्या अंतर्गत सर्व मुलींना १२वी नंतर सर्व पदवी, पदविका, पदवोत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

१२वी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी किमान ४५% (खुला वर्ग) आणि ४०% (राखीव वर्ग) गुण आवश्यक होते ती “किमान गुणांची अट रद्द करण्यात आली आहे.

 

१२ वी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण दोन्ही गटांतील (Group A व Group B) विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

 

यानंतर विद्यार्थ्यांना डी. फार्म कालावधी (कालावधी-दोनवर्ष), बी. फार्म (कालावधी- चारवर्ष) किंवा फार्म. डी (कालावधी- सहावर्ष) या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. डी. फार्म उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी, बी. फार्मसी द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ शकतात. बी. फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला असताना पदवीत्तर पदवी शिक्षण प्रवेश प्रक्रियासाठी जीपॅट परीक्षा द्यावी लागते. यानंतर एम. फार्म (कालावधी- दोनवर्ष) किंवा फार्म. डी. (पोस्ट बॅचलरेट) च्या चौथ्या वर्षाला प्रवेश मिळतो. पदवीत्तर पदवी म्हणजेच एम. फार्म झाल्यानंतर पीएच.डी (कालावधी तीन ते चार वर्षे करता येते. बी. फार्म पूर्ण झाल्यानंतर एमबीए, एलएलबी यासारख्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. पदवी अभ्यासक्रमानंतर परदेशात जाऊन एम. एस., पीएच. डी देखील करता येते. ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात आवड आहे ते आयसीआरआय पदवीत्तर पदवी पातळीवर जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात परदेशी संस्था कडून हुशार विद्यार्थ्यांना यासाठी फेलोशिप मिळण्याची ही संधी उपलब्ध आहे. करियर घडविण्यासाठी फार्मसी हे क्षेत्र फारच योग्य आहे.

देशांतर्गत संधी शिवाय परदेशातही जसे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया व इतर अनेक देशांमध्ये फार्मसी क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रानंतर फार्मसी हे एकमेव क्षेत्र आहे की, ज्यात झपाट्याने वाढ झालेली दिसून येते. औषध क्षेत्रातील उलाढाल पाहता आपला देश विकसित देशा समवेत गणला जातो. औषधनिर्माणशास्त्र

अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या पूर्वीपासूनच लक्षणेनीय राहिलेली आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत या अभ्यासक्रमाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.

राज्य व केंद्र सरकारचा औषधनिर्मिती शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक असून त्या प्रमाणात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. म्हणूनच येणाऱ्या काळात फार्मसी करिअर एक उत्तम सुवर्णसंधी आहे.

फार्मसी पदवीधर केवळ नोकरीपुरते मर्यादित नाहीत, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून अनेकांची आरोग्यसेवा सुधारण्यास मदत करू शकतात. औषध, तंत्रज्ञान आणि सेवा यांचा संगम योग्य प्रकारे केल्यास फार्मसीमध्ये उद्योजकतेसाठी मोठी संधी आहे. व्यवसायातील कल्पकता, शिस्त आणि सामाजिक भान ठेवून या क्षेत्रात यश मिळवता येते.

लेखनः

प्रा. डॉ. गणेश शंकर म्हस्के,

प्राचार्य,

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर, पुणे.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक  डॉ. बाहुबली शहा हे दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून आझाद मैदानावर करणार आमरण उपोषण, होमिओपॅथिक डॉक्टरांचा त्यांच्या उपोषणास पाठिंबा. डॉ संदेश शहा

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक

डॉ. बाहुबली शहा हे दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून आझाद मैदानावर करणार आमरण उपोषण, होमिओपॅथिक डॉक्टरांचा त्यांच्या उपोषणास पाठिंबा.

इंदापूर, डॉ. संदेश शहा.

महाराष्ट्र राज्यातील सीसीएमपी ( सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मोकोलॉजी ) उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदे तील नोंदणी बाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने खोटया व अर्धसत्य माहितीच्या आधारावर मिडिया, आंदोलने, मोर्चे यामधून सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांच्या स्वााभिमानाला ठेच लागेल अशा प्रकारची वक्तव्ये करत राज्य शासन व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर दबाव आणला आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा हे दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा वाजे पासून मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्याने त्यासाठी रीतसर परवानगी दिली आहे. त्यांच्या उपोषणाच्या निर्णयामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून त्यांना राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सीसीएम पी होमिओपॅथिक डॉक्टर्स व आयएमए संघटनेत संघर्ष अटळ आहे. मात्र दोन्ही संघटनाच्या डॉक्टरांची नागरिकांना गरज असून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेस वेठीस न धरता मक्तेदारीला विषय न करता सर्वसमावेशक पद्धतीने तोडगा काढावा असे आवाहन नागरिकांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाव्दारे आमरण उपोषणाची माहिती देण्यात आली आहे.

सीसीएमपी अभ्यासक्रम ही जनतेच्या आरोग्याची गरज असून महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने संमत केलेल्या कायद्या न्वये या अभ्यास क्रमाची निर्मिती करण्यात आली असून त्यास शासन मान्यता आहे. या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी सन २०१७ मध्ये बाहेर पडली असून आजपर्यंत हजारो डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केला आहे. हा वैध अभ्यासक्रम साडेपाच वर्षाचा एमबीबीएस समतुल्य होमिओपॅथी अभ्यासक्रम अधिक १ वर्षाचा क्लिनिकल रोटेशन, प्रात्यक्षिकासह आधुनिक चिकित्सा पद्धतीतील औषध शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे सीसीएम पी अर्हताधारक आधुनिक चिकित्सा पद्धतीने रुग्णोपचार करण्यास सक्षम आहेत.

कायदा किंवा कोर्स यावर उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळविण्याचे आयएमए चे वारंवार केलेले सर्व प्रयत्न निष्फळ झाले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ च्या औषधशास्त्र विभागाने तयार केलेल्या व नॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्च मध्ये प्रसिद्ध अहवालानुसार सीसीएमपी कोर्स नंतर आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र वैद्यक परिषद कायदा

१९६५ मधील तरतूदी नुसार सीसीएमपी अर्हता अधिनियमाच्या अनुसूचित २८ व्या क्रमांकाने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिनियमातील तरतुदींना अनुसरून सी सीएमपी अर्हता धारकांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद करणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेस अनिवार्य आहे. या परिषदेतील तत्कालीन सत्ताधारी आयएमए च्या दबावाखाली कायद्याची पायमल्ली करून सीसीएमपी अर्हता धारकांची नोंद करण्यास गेली आठ वर्षे टाळाटाळ करत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एम एमसी प्रबंधकांनी विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन केले होते. विधी व न्याय विभागाच्या अभिप्राया सह वैद्यकीय शिक्षण विभागाने पत्र पाठवल्यानंतर एमएम सी कडून नोंदणी प्रक्रिया दिनांक १५ जुलै पासून सुरू करण्या बाबत अधिसूचना देण्यात आली. या पूर्णपणे वैध प्रक्रियेस विरोध करताना आयएमए शासनावर नाहक हेत्वारोप व वैद्यकीय सेवा बंद करून जनतेस वेठीस धरण्याच्या धमकीसह इतर मार्गानी शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आयएमए च्या

जनतेस वेठीस धरून राज्यात आरोग्य अराजकता माजवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याकरिता आयुष डॉक्टर शासनास पूर्ण ताकदीने सहकार्य करण्यास तयार आहेत. संविधान व त्यानुसार केलेल्या कायद्याप्रती आयएमए अविश्वास व्यक्त करत असून त्यांच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध म्हणून तसेच सी सीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा १६ जुलै पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार आहेत.

चौकट : होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलना च्या वतीने आमरण उपोषण, धरणे आंदोलन, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टरांचे न्याय हक्क

यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी

रविवार दिनांक १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता नवी मुंबई येथे महात्मा ज्योतीबा फुले स्मृती भवन, प्लॉट नंबर १२/१३, सेक्टर ३ वाशी पोलीस स्टेशन जवळ, वाशी, मुंबई येथे सभेचे नियोजन करण्यात आले असून येथे महाराष्ट्र होमिओपॅथिक युनायटेड टीमच्या वतीने पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे डॉ. शिवदास भोसले यांनी सांगितले.

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने भाजप-शिंदे सेनेची डोकेदुखी वाढली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी खलबतं चर्चांना उधाण.

 

मुंबई:-वरळीतील मराठी विजयी मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

राज ठाकरे यांनी वरळीतील मेळाव्यात जरी थेट युतीची घोषणा केली नसली तरी उद्धव ठाकरेंबरोबर सहकार्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिका ही केवळ महापालिका नसून, तिच्याकडे हजारो कोटींचे बजेट असल्याने ती महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर भाजप-शिंदे गटासाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. भाजपने या युतीच्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करवले असून, त्याचे निष्कर्ष अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना दिले. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा पर्याय, तसेच तांत्रिक अडचणींच्या माध्यमातून वेळ घेण्याची चर्चा देखील झाल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुका होईपर्यंत कोणताही भाजप किंवा शिंदे गटाचा नेता यांनी वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असा स्पष्ट सल्ला अमित शहांनी दिल्याचे समजते. शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या अलीकडच्या कृती आणि वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले असून, भाजपनेही या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता महायुतीमधील ‘एकसंधतेचा संदेश’ जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचे सांगितल्याचे समजते. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय रेटला होता. या निर्णयाला राज ठाकरेंनी प्रखर विरोध दर्शवला होता. याच मुद्यावरून शिंदे सरकारने राज ठाकरेंना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले, अशी माहिती अमित शहांनी शिंदेंकडून घेतली. त्रिभाषा सूत्र आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवरही भाजप नेतृत्व चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर भाजप-शिंदे गटाला कोणते नेते, पक्ष सोबत घेता येतील, याची चाचपणी सुरू झाली आहे. हिंदी भाषिक मतदारांचा कल, मराठी अस्मितेवर आधारित प्रचार, तसेच राजकीय संधींचा योग्य वापर या सगळ्यांचा सविस्तर आढावा शहांनी घेतल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत उडणार?निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता

 

*मुंबई:-स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कार्यकर्ते, पुढारी, नेते, नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षांचा वनवास आता संपणार आहे. आता शहराशहरात आणि गावागावात चैतन्य संचारणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर पालिका, महापालिकांमध्ये निवडणुकीचे वारे घुमू लागले आहे. त्यातच पालिका निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची शक्यता समोर येत आहे. 1 जुलै पर्यंतची मतदार यादी वापरावी असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. प्राथमिक तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठक पार पडली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पालिका निवडणुकीचा बार उडणार असल्याचे समजते. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हा सुगीचा हंगाम ठरेल. या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला 6.5 लाख ईव्हीएमची गरज आहे. अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे एकाच टप्प्यात मतदान घेणे अशक्य आहे. ईव्हीएमची संख्या कमी असल्याने आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३४९ पंचायत समित्या आणि इतर मिळून एकूण ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला सुमारे साडेसहा लाख ईव्हीएमची आवश्यकता आहे. मात्र, अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे आयोगासमोर एकाच टप्प्यात मतदान घेणे हे एक मोठे आव्हान आहे. यावर तोडगा म्हणून, आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत विभागण्याची योजना आखली आहे. या संभाव्य वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यात पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. त्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदांसाठी मतदान घेतले जाईल, आणि शेवटच्या व सर्वात मोठ्या टप्प्यात, डिसेंबर महिन्यात सर्व महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ११ जुलै रोजी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतीच या संदर्भात एक आढावा बैठक घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे आता लवकरच निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

उड्डाण घेताच काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद’,* *👉🔴🔴👉एअर इंडिया विमान अपघाताचं कारण आलं समोर!*

 

*नवी दिल्ली :- भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था – AAIB) अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला याचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.*

*👉🔴🔴👉एएआयबीच्या प्राथमिक तपासानुसार, एअर इंडियाचे विमान एआय-१७१ ने १२ जून रोजी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन मोडवरून कटऑफ मोडवर गेले होते. दरम्यान कॉकपिटमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारले की, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेले नाही’ हा संवादही अहवालातून समोर आला आहे.*

*👉🅾️🅾️👉एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर होते, दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांना पुरेसा विश्रांतीचा कालावधी मिळाला होता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.*

*👉🔴🔴👉१२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात २६० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विमानात एकूण २४२ लोक होते. त्यापैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला.*

*👉🅾️🅾️👉अहवालात पुढे नमूद केले की, काही सेकंद कटऑफची स्थिती राहिल्यानंतर ते बदलून पूर्ववत करण्यात आले. मात्र तोपर्यंत विमानाची उंची कमी झाल्यामुळे सुरक्षित पातळी गाठण्यासाठी वेळ मिळाला नाही. टेकऑफ आणि क्रॅश दरम्यान सुमारे ३० सेकंद विमान चालले, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या बोईंग ७८७-८ विमान आणि GE GEnx-1B इंजिनच्या ऑपरेटरवर कोणत्याही कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही.*

छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे हार्दिक अभिनंदन!

छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे हार्दिक अभिनंदन!

शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं… अंतिम सत्य

शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं… अंतिम सत्य

 

एक निवृत्त पोलिस कमिश्नर, जे आधी आपल्या सरकारी बंगल्यात राहत होते, ते आता कॉलनीतल्या स्वत:च्या घरी राहायला आले. त्यांना आपल्याबद्दल प्रचंड अभिमान होता.

 

दररोज संध्याकाळी ते कॉलनीतल्या पार्कमध्ये चालायला जायचे, पण तिथे येणाऱ्या कोणालाही काही बोलायचे नाही, त्यांच्या दिशेने पाहायचेही नाही. त्यांना वाटायचं – “हे लोक माझ्या लेव्हलचे नाहीत!”

 

एक दिवस ते एका बाकावर बसले होते, तेव्हा एक म्हातारा तिथे येऊन त्यांच्या शेजारी बसला आणि सहज गप्पा मारायला लागला.

 

पण कमिश्नर साहेबांनी त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ते फक्त आपल्या बद्दलच बोलत राहिले – आपण काय पदावर होतो, आपली प्रतिष्ठा काय आहे, आपण किती मोठे आहोत…

ते म्हणाले, “मी इथे राहतो कारण हे माझं स्वत:चं घर आहे!”

 

असं काही दिवस चाललं. म्हातारा फक्त शांतपणे ऐकत राहिला.

 

शेवटी एक दिवस त्या म्हाताऱ्याने बोलायला सुरुवात केली –

“ऐका कमिश्नर साहेब, विजेचा बल्ब असतो ना – तो जोपर्यंत पेटतो, तोपर्यंत त्याचं महत्त्व. पण एकदा का फ्यूज झाला, की मग तो १० वॅट असो, २०, ४०, १०० – काही फरक पडत नाही. दिसायला तो बल्बच राहतो, पण प्रकाश देत नाही.

 

मी इथे पाच वर्षांपासून राहतो. पण मी आजवर कुणालाही सांगितलं नाही की मी दोन वेळा संसद सदस्य होतो.”

 

हे ऐकल्यावर कमिश्नर साहेबांचा चेहरा बदलला.

 

म्हातारा पुढे म्हणाला –

“तुमच्या उजव्या बाजूला जे वर्मा बसले आहेत, ते रेल्वेमध्ये जनरल मॅनेजर होते. समोर हसत-हसत बोलणारे रावसाहेब – आर्मीमधून लेफ्टिनंट जनरल म्हणून रिटायर झालेत. आणि कोपऱ्यात जे पांढऱ्या कपड्यांत शिवाजी बसले आहेत – ते ISRO चे चेअरमन होते. पण त्यानेही कधी कोणाला हे सांगितलं नाही.

 

माझं फक्त एवढंच म्हणणं आहे – हे सगळे लोक इथे आहेत, मोठमोठ्या पदांवरून आलेत, पण आज सगळे एकसारखे आहेत.

 

मी आधीच सांगायला पाहिजे होतं – सगळे फ्यूज झालेले बल्ब एकाच गटात येतात.

कोणताही बल्ब – झिरो वॅट, १०, २०, ४०, ६०, १०० – पेटतो तोपर्यंतच महत्त्वाचा. एकदा का बंद झाला, की मग तो LED असो, CFL, हॅलोजन, डेकोरेटिव – सगळे सारखेच!

 

आम्ही सगळे इथे बसलेले – तुमच्यासकट – फ्यूज झालेले बल्ब आहोत.

 

पोवर गेले की, पोलिस कमिश्नर आणि पोलिस कॉन्स्टेबल – फरक राहत नाही.

 

उगवता सूर्य आणि मावळता सूर्य – दोघंही सुंदरच असतात. पण लोक नमस्कार फक्त उगवत्या सूर्यालाच करतात. मावळत्याला कोणी विचारत नाही. हे वास्तव आपण मान्य केलंच पाहिजे.

 

आपण जे पद, प्रतिष्ठा, सत्ता यांमध्ये जगत असतो – ती आपली ओळख नसते. ती काही काळापुरती असते. आणि जर आपण त्यालाच आयुष्य समजत असू, तर लक्षात घेतलं पाहिजे – की एक दिवस हे सगळं संपणारच.

 

शतरंजात राजा, राणी, उंट, घोडा, प्यादा – यांचं महत्त्व फक्त खेळ सुरू असेपर्यंतच असतं.

एकदा का खेळ संपला – सगळेच एकाच पेटीत जातात. डब्बा बंद!

 

आजचा दिवस शांत आहे याचा आनंद घ्या, उद्याही शांती लाभो हीच आशा बाळगा…

 

आणि शेवटी… आयुष्यात कितीही सर्टिफिकेट्स, मेडल्स, पुरस्कार मिळाले – शेवटी सगळ्यांना मिळणारं एकच प्रमाणपत्र असतं… *‘मृत्यू प्रमाणपत्र!’* *अंतिम सत्य🙏*(copy paste)

error: Content is protected !!