Home Blog Page 26

पोलीस इन्स्पेक्टर साहेब तुम्हीच आमचे विठ्ठल रुक्मिणी इंदापुरा चे पोलीस कर्मचारी

तुम्हीच आमचे विठ्ठल रुक्मिणी

इंदापूर नगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस इन्स्पेक्टर मा. सूर्यकांत कोकणे यांचा जन्मदिवस व गुरुपौर्णिमा याचे अवचित साधून इंदापूर पोलीस स्टेशन मधील कर्तव्यावर कार्य करणारे पोलीस कर्मचारी यांनी आपले विठ्ठल रुक्मिणी म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा जन्मदिन तुळशीच्या पानापासून व तुळशीच्या मंजुळा पासून खूप मोठा असा हारा गुरु दक्षिणा म्हणून गळ्यामध्ये घालून जन्मदिन साजरा केला व यामधूनच गुरुपौर्णिमा हा पण उत्सव सुंदर असा साजरा केला यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कार्य करणारे ट्राफिक पोलीस इंदापूर पोलीस व पत्रकार बंधू मानवाधिकार कमिटीचे जिल्हाध्यक्ष, हिंदुस्तान 24  न्यूज ची टीम मेंबर इंदापूर शहरातील मोठे व्यावसायिक यांनी यामध्ये सहभाग घेऊन पंढरपूर मधून नामांकित खाव्या पासून बनवलेला केक आणून केक कापला जसा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो त्याच पद्धतीने पोलीस इन्स्पेक्टर साहेबांचा जन्मदिन पण सुंदर असा साजरा केला यांना पंढरपूर मधून आणलेला तुळशीच्या पानाचा व मंजुळांचा बनवलेला हार सह पत्नी घालण्यात आला व साहेबांचा वाढदिवस सुंदर असा साजरा करण्यात आला वाढदिवस साजरा करताना इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे कर्मचारी यांनी आपले वरिष्ठ यांना तुम्हीच आमचे विठ्ठल रुक्मिणी असे बोलून गळ्यामध्ये सुंदर असा पंढरपूर मधून बनवून आणलेला तुळशीच्या फुलाचा व मंजुळाचा हार घातला

चेतना फाउंडेशन सरडेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

इंदापूर – सरडेवाडी (ता.इंदापूर) येथील चेतना फाउंडेशन संचलित, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि चेतना ज्युनिअर कॉलेज येथे गुरुपौर्णिमा अतिशय उत्तम साजरी करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ तसेच माजी मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. हर्षवर्धन पाटील साहेब यांनी भूषविले. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.गणेश म्हस्के व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या निकिता माने आधी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री. हर्षवर्धन पाटील साहेब यांनी गुरूंचे महत्त्व सांगितले व ग्रामीण भागातील मुलांचे कौतुक केले व जीवनात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आयुष्यात गुरू चे महत्व त्यांनी सांगितले. शिक्षण आणि समाजसेवा यातील दुवा समजून सांगितला.

तसेच चेतना फाउंडेशन चे खजिनदार श्री.सोमनाथ माने सर यांनी आदर्श विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थी कसा घडवायचा हे सांगितले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील पवित्र नाते याबद्दल माहिती दिली.
चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.गणेश म्हस्के सर यांनी गुरुपौर्णिमा आणि गुरूचा आपल्या जीवनात असलेला मोलाचा वाटा याबद्दल उत्तम विचार मांडले.
जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम गुरू करतात तसेच प्रत्येक व्यक्ती च्या आयुष्यामध्ये गुरूंचे अनन्य साधारण महत्त्व असते हे सांगितले.
आदर्श जीवन आपल्या डोळ्यासमोर असतात, संकटावर मात करण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते . दुःख आले तरी सावरण्याची शक्ती निर्माण करते. कितीही आनंद झाला आणि कितीही मोठे झाले तरी आपण जमिनीवर उभे राहिले पाहिजे याची शिकवण दिली. अशा गुरूंच्या आशीर्वाद घेण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून मी स्वतःला धन्य समजतो की आज इथे चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, चेतना फाउंडेशन आणि आमचे व्यासपीठावर बसलेले अध्यक्ष उदय देशपांडे त्याचबरोबर विलास भोसले उपस्थित असलेल्या आपल्या कॉलेजचे प्राचार्य आमच्याबरोबर आलेले दत्ता पांढरे आणि उपस्थित सर्व आमचे गुरुवर्य सर्व शिक्षक वर्ग , विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो खरं म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित वाटलं मी ऐकून होतो जाता येता या गोष्टींची माझ्या कानावर माहिती येत होती पण प्रत्यक्षपणे आज आल्यानंतर मला खरंच इतकं समाधान वाटतं इथे व्यासपीठावर बसलेल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आयुष्यात सगळ्यात चांगलं काम कोणतं केलं असेल तर नवीन पिढी घडवण्याचं काम आपण केले. तरी याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो व अभिनंदन करतो. ही संस्था आपण सुरू केली आणि मला वाटते बघता बघता ज्युनिअर केजी पासून ते अकरावी बारावी पर्यंत दीडशे पेक्षा अधिक मुले आपल्याकडे आहेत. डी फार्मसी व बी फार्मसी आपण सुरू केली त्यांना पण तेवढीच दीडशे 160 मुले आहेत. बघता बघता आपण ३५० मुलांचा शैक्षणिक संकुल आपण उभा केलेला आहे. माझ्या समोरच्या डाव्या बाजूला बॉईज होस्टेल आहे व उजव्या बाजूला गर्ल्स हॉस्टेल आहे मध्ये कॅन्टीन आहे. सगळ्यात चांगलं काम अजून कोणते केलं असेल आपण तर नव्या पिढीला खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून दिले. कारण ग्राउंड फार महत्त्वाचे आहे आणि म्हणून एक सुंदर कॅम्पस आपण तयार केलं.
याबद्दल मी संस्थाचालक आणि सर्वांचे अभिनंदन करतो. मित्रांनो आता इथे काही मुला मुलींचा सत्कार माझ्या हस्ते केला आणि मला खूप समाधान वाटत आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता आहे. ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये क्षमता आहे .त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आहेत ,त्यांना फक्त गती देण्याचे काम आपल्या चेतना संस्थेच्याद्वारे करणे हे आपले काम आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टीची फार अपेक्षा करू नये.आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने वडील कीच्या नात्याने मला असे वाटतं मला नव्या पिढीला एक गोष्ट सांगायची की आयुष्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांची सेवा करा, ज्या समाजामध्ये आपण वाढलो तर समाजाला विसरू नका. भविष्यामध्ये पुढे जाताना ही पुढे बसलेले लहान लहान मुले आहेत त्यांच्यातील कोणी आयएस ऑफिसर होईल कोणी डॉक्टर होईल कोणी एखाद्या राजकारणी होईल कोणी एखादा उत्तम शिक्षक तज्ञ होईल काय सांगता येत नाही. शिवाजी महाराजांच्या आयुष्य 51 वर्षाचे होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली. आणि आज फक्त बघता जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले पण आज जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यावर जर आपण गेलो तर एकच नाव आधाराने घेतलं जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि म्हणून आदर्श कोणाचा बाळगावा त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगावा. समय सुचकता ,गनिमी कावा शूर पना निर्णय घेण्याची क्षमता अन्यायावर मात करण्याचे धाडस आणि समाजाकरता म्हणून रायते व राज्य करणारा असा एक राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपल्याला मिळाला त्याचीच ही पावन भूमी आहे मालोजीराजांची घडी आपल्या परिसरामध्ये आहे. सांगण्याचा उद्देश या सर्व युवा पुरुषांनी आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपली प्रगती झाली ,आपण चंद्रावर गेलो हे सगळं जरी असलं तरी सामाजिक अवस्था ही फार चांगली आहे असे मला वाटत नाही घराघरामधले प्रश्न नवरा-बायकोतील प्रश्न ,मुला मुलातील सुसंवाद कमी होत चाललेला आहे. नवीन टेक्नॉलॉजी मुळे घरातील घरपण गेले आहे एकत्र कुटुंबाची संकल्पना संपत चालली विभक्त कुटुंबाची संकल्पना आली, विभक्त कुटुंबामध्ये पण पुन्हा विभक्त कुटुंबाची संकल्पना पुढे आली. मला वाटते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चॅलेंजर्स ला सामोरे जावे लागणार आहे म्हणून जीवन जगण्यासाठी माणसाला काय लागतं ती आवश्यकता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विचार करण्याचे आहे. मला वाटते जीवन जगण्यासाठी नीतिमत्ता महत्त्वाची आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा. प्राजक्ता झगडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले.

 

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा

महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठुरायाला साकडे*

 

*👉🟥🟥👉तर या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील शेतकरी दांपत्य बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शोभा पाटील यांना मिळाला.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा करण्यात आला सत्कार*

 

*पंढरपूर:-विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल… अशा जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात आज आषाढी एकादशीचा उत्साह राज्यभरात ओसंडून वाहत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विठू नामाचा गजर सर्वत्र पाहायला मिळत आहे. पंढरपुरात विठ्ठल नामाचा गजर पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईसह राज्यातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातून सुमारे १८ ते २० लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. त्यासोबतच प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.*

 

*👉🔴🔴👉लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज पहाटे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याची भरभराट व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलचरणी विशेष प्रार्थना केली. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास ही पारंपरिक पूजा पार पडली. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करून, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची आरतीही त्यांच्या हस्ते करण्यात आली. या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील शेतकरी दांपत्य बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शोभा पाटील यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.*

 

*👉🅾️🅾️👉विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरू ठेवण्यात आली, तर व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला. विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. ज्यामुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच खुलले होते. नामदेव पायरीलाही सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. दुसरीकडे मुंबईतील वडाळ्यात असलेल्या प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरातही रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वडाळ्यातील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पुजा केली. आषाढी एकादशीनिमित्त मंदिराला खास फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या आजूबाजूला हार-फूल आणि प्रसादाची दुकाने पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरात पंढरीचा अनुभव पाहायला मिळत आहे. मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात रात्रभर किर्तन, टाळ-मृदुंगाच्या गजराने दुमदुमले होते.*

कुदळेमळा प्राथमिक शाळेत रंगला दिंडी सोहळा

सुपे (बारामती) : कुदळेमळा (पानसरेवाडी), बारामती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारीचा अनुभव देण्यासाठी आनंदवारी विठुरायाची दिंडी करण्यात आली अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका आशालता चव्हाण यांनी दिली. या पालखीच्या वातावरणात मुलांनी गोल रिंगण फुगडी विठ्ठल नामाचा गजर करत वस्तीमधून दिंडी काढली पालखीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अनुराधा बारवकर, हर्षदा पानसरे, उषा कुदळे, सोनाली कुदळे, छाया देवमाळकर, सुरेश कुदळे, राजाराम कुदळे, अंकुश कुदळे, गोपाळ कुदळे, रणजीत शेंडगे, सचिन शेंडगे, राजश्री तांबे गोरख लव्हे, विठ्ठल कुदळे, राणी कुदळे, मनीषा कुदळे, सुदाम कुदळे, परशुराम पानसरे, पांडुरंग कुदळे, सुरेश बनकर, ह.भ.प प्रणव जगताप यांनी भजन केले. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांना लाडू चिवडा पांडुरंग कुदळे, बिस्किटे सुदाम कुदळे व काजू बदाम अंकुश कुदळे, केळी आणि पोहे परशुराम पानसरे, सोनाली कुदळे यांनी ड्रॅगन फ्रुट विद्यार्थ्यांना यांच्यावतीने देण्यात आले. शिक्षकांनी व ग्रामस्थांनी फुगड्या खेळल्या महिला आणि ग्रामस्थांनी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून मुलांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका आशालता चव्हाण मॅडम शिक्षक नवनाथ कुदळे, प्रियंका कुदळे मॅडम, शिल्पा कुदळे यांनी आयोजन केले.

चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी येथे रंगला पालखी सोहळा 

वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरामध्ये ,विठ्ठलमय वातावरणामध्ये चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी येथे रिंगण सोहळा रंगला.

विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम ,संत नामदेव, मुक्ताबाई व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षक ठरले या पालखी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य निकिता माने तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रारंगणामध्ये विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला .हा सोहळा सदस्य निकिता सोमनाथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शाळेतील सर्व मुला मुलींनी यावेळी वारकऱ्यांच्या पोशाख परिधान केले होते .सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडला यावेळी जसे काही पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगणाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा भास होत होता.

एरवी शाळेच्या गणवेशात उपस्थित असणारे विद्यार्थी आज पांढरे शुभ्र कपड्यांमध्ये व गळ्यामध्ये टाळ घेऊन या सोहळ्याचा आनंद घेताना दिसली. लहान मुली सुद्धा या ठिकाणी काष्टा साडी व डोक्यावर तुळशी घेऊन नटून-थटून कार्यक्रमाची शोभा वाढवत होत्या.

जुनियर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा यावेळी विठ्ठल नामाचा गजर करत होते यांनी सुद्धा या कार्यक्रमाची रंगत वाढवली जसे की टाळ वाजवणे पथक भिरभिरावने ज्ञानोबा व तुकाराम महाराजांच्या नावाचा उल्लेख करत फुगड्या खेळत व रिंगणाचा आनंद घेत हे वातावरण पूर्ण भक्तीमय झाले होते.

चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर पालखीचे भव्य दिव्य मिरवणूक निघाली यात प्रशालेचे नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हरिनामाचा गजर करत पालखीमध्ये सहभागी झाले होते.

शेवटी प्रशालेच्या प्रारंभळावर पालखीची आरती प्राध्यापक सुनील गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आली.

व पालखी सोहळ्याची सांगता झाली.

सदर पालखी सोहळ्याचे संयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रांजली सुतार यांनी केले तर पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व दिंडी प्रमुख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे सर यांनी केले तर आभार मोनाली मोरे मॅडम यांनी केले

प्रलंबित वाद मिटविण्यासाठी 90 दिवसांची ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम

न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अध्यक्ष,राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थी व सलोखा प्रकल्प समिती (एम.सी.पी.सी.) यांनी 90 दिवसांची ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ या विषेश मध्यस्थी मोहीमेची संकल्पना मांडली आहे. भारतातील सर्व उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये व सर्व तालुका न्यायालयांमध्ये मध्यस्थीद्वारे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ही 90 दिवसांची सखोल मोहीम राबवली जात आहे. मध्यस्थी मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मध्यस्थासाठी पात्र असलेल्या प्रकरणांच्या श्रेणीमध्ये वैवाहिक वाद प्रकरणे, अपघात दाव्यांची प्रकरणे, घरगुती हिंसाचाराची प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, व्यावसायिक वाद प्रकरणे, सेवा प्रकरणे, फौजदारी तोडगा प्रकरणे, ग्राहक वाद प्रकरणे, कर्ज वसुली प्रकरणे, विभाजन प्रकरणे, बेदखल प्रकरणे, जमीन अधिग्रहण प्रकरणे, इतर पात्र दिवाणी प्रकरणे यांचा समावेश आहे.*

*👉🟥🟥👉‘राष्ट्रासाठी मध्यस्थी‘ या विषेश मध्यस्थी मोहिमेसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मध्यस्थी व सलोखा प्रकल्प समिती (एम.सी.पी.सी.) यांनी दिलेल्या कार्यप्रणालीनूसार 1 जुलै ते 31 जुलै मध्ये प्रकरणांची ओळख पटवणे, पक्षकारांना माहिती देणे व प्रलंबित प्रकरणे मध्यस्थांकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू होईल. या मोहीमेमध्ये सर्व विद्यमान मध्यस्थ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यामध्ये अलीकडेच 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण घेतलेल्या मध्यस्थ्यांचा समावेश आहे. या मोहिमेत पक्षकारांच्या सोयीनुसार आठवड्याच्या सातही दिवस मध्यस्थीद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील, मध्यस्थी पूर्णपणे ऑफलाईन किंवा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने किंवा दोन्ही पध्दतीने केली जाऊ शकते. तालुका व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ऑनलाइन मध्यस्थीची सुविधा उपलब्ध करून देईल.*

*👉🔴🔴👉न्यायालयीन प्रक्रियेवरील ताण कमी करून प्रलंबित प्रकरणांचा जलद निकाल मिळावा आणि वाद सोडविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात मध्यस्थी पोहोचवणे हे या मध्यस्थी मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविली जात आहे. या विशेष मोहिमेचा लाभ प्रलंबित खटल्यातील पक्षकारांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा व त्यांचे न्यायालयात प्रलंबित असणारे वाद मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपुर्णा गुंडेवाडी यांनी केले आहे.*

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

*ढाका:-बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाका येथील एका विशेष कोर्टाने ६ महिन्यांची जेलची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा झाली आहे. हा निर्णय आयसीटी-१ (International Crimes Tribunal – ICT) या तीन न्यायाधीशांच्या बेंचने दिला आहे.*

*👉🟥🟥👉कोर्टाने सांगितलं की, शेख हसीनांनी अशी काही विधानं केली ज्यामुळे न्यायालयाचा अनादर झाला आणि न्यायव्यवस्थेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. बांगलादेशी मीडियानुसार, हे प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील आहे. त्यावेळी एक फोन कॉल लीक झाला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये शेख हसीना यांचाच आवाज असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात त्या म्हणत होत्या की, त्यांच्यावर २२७ केसेस दाखल आहेत, त्यामुळे त्यांना २२७ लोकांना मारण्याचा परवानाच मिळाला आहे. त्यांच्या याच वक्तव्याला कोर्टाने न्यायालयाचा अवमान मानलं. आयसीटी हे बांगलादेशच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी बनवलेलं विशेष कोर्ट आहे.*

*👉🔴🔴👉असं मानलं जातंय की, मोहम्मद युनूस हे या कोर्टाचा वापर शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाचं राजकारण कायमचं संपवण्यासाठी करत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीनांचं सरकार पडलं होतं आणि त्यानंतर मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनले आहेत. शेख हसीना आणि मोहम्मद युनूस यांच्यातील जुना वाद काही लपून राहिलेला नाही. युनूस यांना जेव्हा ‘मायक्रोफायनान्स’ मॉडेलसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि ते जगात प्रसिद्ध झाले, तेव्हा शेख हसीनांना ते आवडलं नव्हतं. त्यांनी युनूस यांच्यावर करचोरी आणि गैरव्यवहाराचे आरोप केले. इतकंच नाही, तर त्यांना ‘ग्रामीण बँक’मधून काढण्याचाही प्रयत्न केला. यावर युनूस यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवरून बांगलादेश सरकारवर टीका केली, ज्यामुळे त्यांचे संबंध आणखी खराब झाले.*

अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना

पुणे दि.3: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यासाठी रुपये 3 लाख 50 हजार मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येते. ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

 

या योजनेसाठी स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3 लाख 50 लाख हजार राहील. प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के (कमाल रुपये 3 लाख 15 हजार ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. योजनेअंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा पुणे (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीकरीता महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 3: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची स्वीकृती ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली असून या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती जिल्ह्यातील महाविद्यालयांनी विद्यार्थी, पालक, विविध संघटनांपर्यंत व्हॉटस्ॲप ग्रुप, तत्सम इतर समाज माध्यमे आदी माध्यमातून पोहचवावी. तसेच महाविद्यालयांनी सूचना फलकांवरही प्रदर्शित करावी.

मागील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिताचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात असून हे अर्ज निकाली काढण्याकरिता संबंधित विद्यार्थ्यांस अर्ज फेरसादर करण्याबाबत महाविद्यालय स्तरावरुन कळविण्यात यावे. कोणतेही विद्यार्थी शिष्यवृतीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता सर्व महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.

error: Content is protected !!