Home Blog Page 27

ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई:- राज्यात होत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील ड्रग्सची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललण्याने ड्रग्स तस्करांचे धाबे चांगलेच दणाणार आहेत.*

 

*👉🔴🔴👉बुधवारी विधान परिषदेत राज्यात होणाऱ्या एमडी ड्रग्सच्या तस्करीवरून चर्चा झाली.या चर्चांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.*

 

*👉🟥🟥👉भाजपचे आमदार परिणय फुके यांनी याबाबत सभागृहात सवाल केला. राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. ड्रग्सचा विळखा पडतो आहे. आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे. तस्करीचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे या सर्वांवर मकोका लावून कारवाई करणार का? ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का? असा सवाल परिणय फुके यांनी केला होता. राज्यात ठिकठिकाणी ड्रग आणि अमली पदार्थांची तस्करी होतेय. यावर शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. ड्रग्सची तस्करी रोखण्यसााठी टास्क फोर्स केली होती त्याच काय झालं? असा सवाल फुके यांनी केला होता.त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. ड्रग तस्करी संदर्भात मकोका लावत येईल का? यावर आपण या अधिवेशनात नियमावली आणत आहोत. कायद्यात आपण बदल करून ड्रग तस्करी करणाऱ्यावर मकोका लावण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.*

 

*👉🔴🔴👉शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही यावर सवाल केला. इतर राज्यातून देखील अंमली पदार्थांची तस्करी होतेय. मध्यप्रदेश, गुजरातमधून जळगाव मुक्ताई नगर येथे आणि मध्य प्रदेशच्या आणि गुजरातच्या बॉर्डरवर अफू आणि गांजाची तस्करी होतेय, याकडे खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. बॉर्डवर काही राज्यात भांगला परवानगी आहे. आपल्याकडे अफूला कुठेच परवानगी नाही. मुक्ताईनगर आणि इतर ठिकाणी असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.*

इंदापूरमध्ये 340 वारकऱ्यांनी घेतला चरणसेवा उपक्रमाचा लाभ

इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या इंदापूर मुक्कामात ३४० वारकऱ्यांनी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या वारकरी चरण सेवा उपक्रमाचा लाभ घेतला.

वारी दरम्यान परिसरात स्वच्छता गेल्या अनेक वर्षांपासून संघ परिवाराच्या माध्यमातून निर्मल वारी हा उपक्रम राबवला जात आहे. वर्षापासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून वारकरी चरण सेवा हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालखीच्या इंदापूर मुक्कामात मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मानर्सिंग के साबळे, त्यांचे सहकारी अमित झगडे, अनुलोम संस्थेचे विभाग प्रमुख शिरीष भालेकर, उपविभाग प्रमुख बापू खेत्रे यांच्या उपस्थितीत अनुलोमचे प्रमुख गोरख माने, अनुलोम मित्र रामवर्मा आसबे, चैतन्य पाठक, अक्षय बांडे, यश खेडकर, रोहन घोगरे, सुनीता घोगरे, नाना घळके, अनुज ह हरणे, सचिन पवार, नंदकुमार गुटाळ, अवधूत बाचल, अजय झोळ, महेश वेदपाठक यांनी ३४० वारकऱ्यांना चरण सेवा दिली.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा

आज मंगळवार, दिनांक 1जुलै 2025, चेतना फाउंडेशन संचली चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच सूचना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सरडे वाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे नॅशनल डॉक्टर्स डे उत्साहित पणे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर श्री संजय शहा व डॉक्टर श्री अनिल शिर्के हे लाभले तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉक्टर गणेश मस्के सर व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य समितीता मॅडम उपस्थित होत्या

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय शहा व डॉक्टर अनिल शिर्के यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले

समाजामध्ये डॉक्टरांचे महत्त्व जबाबदाऱ्या भूमिका आणि भविष्यातील सामाजिक प्रश्न यावरती मार्गदर्शन केले फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांचे समाजामधील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले

नॅशनल डॉक्टर फ्री च्या निमित्त सूचना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले आणि डिप्लोमा प्रथम वर्ष फार्मसीचे टॉपर यांचे अभिनंदन करण्यात आले

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे  सोमनाथ माने सर , सचिव भोसले  सर यांचे मार्गदर्शन लाभले प्राध्यापक कांबळे मॅडम यांनी योग्य नियोजन केले तसेच कॉलनीमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली आणि कार्यक्रम उत्साहात पार पडला

पोलीस दलात मोठी खांदेपालट; ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई:-राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.*

*👉🔴🔴👉यात पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षकपदी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर, महेंद्र पंडित यांची स्तंभ 2 मधून स्तंभ 3 मध्ये नमूद पदावर बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, महेंद्र पंडित यांना बृह्न्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तब्बल 81 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून 51 IPS अधिकार्‍यांना काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशन करुन बदली करण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉पुण्यातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे बदली करण्यात आली असून वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची देखील बदली करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या बदली आदेशान्वये पुण्यामध्ये तीन नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची बदली पुण्यातील यशदाचे उपसंचालकपदी करण्यात आली. त्यानंतर, आता 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.*

अभियांत्रिकी पदवी, एमबीए, एमसीए प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर. जाणून घ्या तपशील!

पुणे :* राज्यातील चार वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष, तसेच पाच वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकात्मिक पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार २८ जून ते ८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असून, १७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

 

सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर केली. त्यानुसार २८ जून ते ८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर २९ जून ते ९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना ई स्क्रुटिनीसह सुविधा केंद्र, छाननी केंद्रांचा पर्याय उपलब्ध असणार आहे. मात्र, सुविधा केंद्र, छाननी केंद्रासाठी ऑनलाइन वेळ निश्चित करून घेऊन त्या वेळेत पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे.

छाननी केंद्रांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. ८ जुलैनंतर नोंदणी केलेले, तसेच छाननी केंद्र, सुविधा केंद्र येथे ९ जुलैनंतर अंतिम केलेले अर्ज केवळ ‘नॉन-कॅप’ जागांसाठीच ग्राह्य धरण्यात येतील. त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी १२ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. या यादीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास ते १३ ते १५ जुलै या कालावधीत नोंदवता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहिती https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

“एमबीए, एमसीएच्या प्रवेशांचेही वेळापत्रक जाहीर*

व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए), संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (एमसीए) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २८ जून ते ८ जुलै या कालावधीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार असून, अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली. सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३० जून ते ९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यात उमेदवारांना छाननी केंद्र, सुविधा केंद्रांसह ई स्क्रुटिनीचाही पर्याय देण्यात आला आहे. १२ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर १३ ते १५ जुलै दरम्यान तात्पुरत्या यादीवरील हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.

चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड चेतना जुनिअर कॉलेज, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे योगा दिन साजरा करण्यात आला

दिनांक 21/07/2025 वार शनिवार रोजी सकाळी 8वाजता जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला यावेळी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे , सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य निकिता सोमनाथ माने, व लिविंग आर्ट चे योगाभ्यासक प्रवीण बोराटे सर ,अनंत देशमाने सर तसेच पतंजलीचे योगाभ्यासक दशरथ मोठे ,विलास गायकवाड ,जवाहरलाल लोंढे, राम आसबे, चेतना फाउंडेशन मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि फार्मसी च्या एक्स्टर्नल एक्झामिनर ऐश्वर्या भांगे याही उपस्थित होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांनापद्मासन, वज्रासन, पश्चिमोत्तानासन, अर्धमच्छंद्रासन, हलासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, धनुरासन, ताडासन, वृक्षासन आणि इतर. गोष्टी शिकवण्यात आल्या योगाभ्यासानंतर वृक्षारोपणाचा ही कार्यक्रम प्रमुखांच्या हस्ते घेण्यात आला कारण शरीरासाठी जेवढा योगाभ्यास महत्त्वाचा आहे तेवढाच निसर्गासाठी वृक्ष महत्त्वाचा आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष व सचिव यांनी सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम स्कूलमध्ये राबवण्याचे आश्वासन दिले.

न्यूलीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी दिनांक 21 जून 2025 जागतिक योगा दिवस मोठ्याउत्साहात साजरा करण्यात आली

या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, शिक्षिका सौ एस आर रणनवरे, शिक्षिका सौ राऊत वरील मान्यवर त्याचप्रमाणे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ रणनवरे मॅडम व राऊत मॅडम यांनी मुलांना जागतिक योगा दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच मुलांकडून योगा करून घेतला व मुलांना योगा व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रणवरे मॅडम यांनी केले व आभार राऊत मॅडम यांनी मानले वंदे मातरम घेऊन नंतर कार्यक्रमाच सांगता करण्यात आली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम
स्थळ – सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे.

राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

महिला आयोगाने महिला वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत घेतलेला पुढाकार स्तुत्य- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

पुणे, दि. १९: राज्य शासनाने आषाढी वारीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात येत असून राज्य महिला आयोगानेही वारीदरम्यान महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीतील अडचणीला लक्षात घेऊन सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग यंत्रे, नष्टीकरणासाठी इन्सीनरेशन यंत्रे आदी उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन निवडुंगा विठोबा मंदिर येथे करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, सुनील बल्लाळ, माजी नगरसेवक विशाल धनवडे आदी उपस्थित होते.

 

वारीसाठी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान दिले आहे. पंढरपूर येथे दर्शनबारी उभी करण्यासाठी ७३ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. या बारीत एकाच वेळेस ६ हजार लोक या दर्शनबारीत असतील तसेच या इमारतीमध्ये बारीमध्ये असताना बाकडे, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची आदी सुविधा उपलब्ध असतील. पूर्वी पालखीच्या मार्गावर शौचालयांची सुविधा खूप कमी असल्याने अस्वच्छता होत असे. मात्र मोठ्या प्रमाणात फिरत्या स्वच्छतागृहांची मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था केली आहे.

 

*शहरात सॅनिटरी नॅपकीन विक्रीसाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या महिलांनी पुढाकार घ्यावा*

आयोगाने सॅनिटरी नॅपकीन पुरवण्यासाठी चांगला पुढाकार घेतला आहे. एक रुपयाला एक सॅनिटरी पॅड याप्रमाणे १० उत्कृष्ट गुणवत्तेच्या पॅडचे पाकीट १० रुपयाला देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. पुणे शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या महिलांनी ५ रुपयांना एक पाकीट आपल्या भागातील महिलांना विकल्यास त्यांना अडीच रुपयांना हे पॅक देऊ. त्यासाठी पुढाकार घेईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. त्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन न वापरणाऱ्या मोठ्या प्रमाणातील महिलांपर्यंत ते पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिलांनी संघटित होण्यासाठी महिला आयोगाने सुरू केलेला हा आरोग्य वारीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. राज्य शासनाने वारीसोबत मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये अजून बदल करता येऊ शकतील. वारकरी महिलांनी स्वत:च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टारगटपणा करणाऱ्यांचे छोटे १ मिनिटांचे व्हिडिओ काढून पाठवावेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाही करावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

 

स्त्रिया आणि पुरुष अशा सर्वांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून महिलांची विशेष गरज ओळखून लाडकी बहीण योजना राबविली आहे. त्यामुळे या योजनेविषयी गैरसमज पसरवले जाऊ नयेत. पीएमपीएमएल बसमध्ये टारगट लोक महिलांची, मुलींची नावे टोकदार वस्तुने कोरतात. ती तत्काळ मिटविण्यासाठी व्यवस्था केली जावी. तसेच अशा लोकांचे व्हिडिओ काढून लोकांकडून प्रशासनाकडे पाठविले जातील यासाठी प्रयत्न करा, असेही त्या म्हणाल्या.

 

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या वतीने गेली ४ वर्षे हा उपक्रम राबविला जातो. देहू आळंदीची वारी २२ दिवस तर मुक्ताईनगर येथून ३० दिवस चालते. त्यामुळे महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न निर्माण होत असतो. हे लक्षात घेऊन आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत.

 

३ हजार ५०० न्हाणीघरे पालखी मार्गावर सुविधा केली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बीट मार्शल सोबत ठेवले आहेत. टोल फ्री क्रमांक चे फलक लावले आहेत. टारगट लोकांकडून त्रास झाल्यास महिलांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. भक्तिमय वारी आरोग्याची वारी व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. महिलांना कोणाकडूनही त्रासाला, गुन्हेगारीला सामोरे झाल्यास पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार करता येईल. कौटुंबिक हिंसाचार च्या अनुषंगाने भरोसा सेल काम करते. समस्या न सुटल्यास आयोगाकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

महिलांना सुरक्षिततेचा, प्रगतीचा विश्वास देण्यासाठी आयोग प्रयत्न करत आहे. मुलींचा बालविवाह करू नका. त्यासाठी आई म्हणून महिलांनी भूमिका बजावावी, स्त्रीभ्रूणहत्या होऊ देऊ नये, अनिष्ट रूढी परंपरांविरोधात उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

आमदार श्री. तुपे म्हणाले, महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षित आणि स्वच्छ सोहळ्याची जोड या पालखी सोहळ्याला आयोगाने दिली आहे. अनेक महिला वडकी नाका आणि काही महिला दिवे घाटापर्यंत पालखीला पोहोचविण्यासाठी जातात. त्यामुळे या महिलांना परत आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्याचा पीएमपीएमएलने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.

 

श्रीमती दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या, मागच्या चार पाच दिवसापासून आळंदी आणि देहूला जाण्या- येण्यासाठी जादा बसेसची सुविधा केली आहे. सासवड येथून ११ नियमित बसेस शिवाय ६० जादा बसेस सुरू केल्या आहेत. गर्दीच्या कालावधीत महिलांसाठी विशेष बस सोडण्यात येत आहेत.

 

प्रास्ताविकात श्रीमती आवडे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून महिला वारकरी देखील आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतात. राज्य महिला आयोग महिला भगिनीसाठी विविध उपक्रम राबवित असते. आरोग्य वारी या उपक्रमाच्या माध्यमातून वारी मार्गावर, विसाव्याचे ठिकाण, मुक्कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुविधांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सामाजिक समतेचा, समाजाला एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील बल्लाळ म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्यावतीने महानगरपालिका हद्दीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी २२ ठिकाणी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी १८ ठिकाणी वैद्यकीय पथकांची सुविधा करण्यात आली आहे. हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. पंढरपूरपर्यंत एक अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

यावेळी राज्य महिला आयोगाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी; ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार; अ‍ॅपचा वापर होणार

नवी दिल्ली:-

देशात गेल्या काही महिन्यांपासून जात जनगणना आणि जनगणनेची चर्चा सुरू आहे. यासाठी राजपत्रित अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोकसंख्येची जनगणना २०२७ या वर्षात केली जाणार आहे. तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, महापंजीयन आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.*

 

*👉🔴🔴👉सरकारी निवेदनानुसार, ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यासाठी मोबाईल अ‍ॅप्स तयार केले जातील आणि त्यामध्ये जनगणनेशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाईल. हे अ‍ॅप्स १६ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांनी सोश मिडिया पोस्ट शेअर केली. यामध्ये म्हटले की, ‘१६ व्या जनगणनेत पहिल्यांदाच जातगणनेचा समावेश असेल. ३४ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षक, १.३ लाख जनगणना अधिकारी आधुनिक मोबाईल आणि डिजिटल उपकरणांसह हे काम करतील. जम्मू-काश्मीर आणि लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या केंद्रशासित प्रदेशांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून आणि देशातील उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून जातीगणना आणि जनगणनेचे काम सुरू होईल.*

 

*👉🟥🟥👉जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच घरांची यादी आणि गृहनिर्माण गणना प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात (लोकसंख्या गणना), प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर माहिती गोळा केली जाणार आहे. ही जनगणना भारताची १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असेल. यावेळी जनगणना मोबाईल अँप्लिकेशनद्वारे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. नागरिकांसाठी स्व-गणना सुविधा देखील उपलब्ध असेल. डेटा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संकलन, प्रसारण आणि साठवणूक करताना कडक सुरक्षा उपाययोजना केल्या जातील. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती आणि ही जनगणना १६ वर्षांच्या अंतरानंतर केली जाणार आहे.*

error: Content is protected !!