Home Blog Page 28

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी माजी तहसीलदार श्रीकांत पाटील पॅटर्न राबविणे गरजेचे, अवैध वाळू उपशावर ठोस कारवाई हवी

डॉ संदेश शहा

इंदापूर

पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणात ५१ हजार कोटी रुपयांचे काळे सोने म्हणजे वाळू असल्याचा अहवाल नाशिक येथील संस्थेने दिल्यानंतर वाळू माफियांचे लक्ष उजनी धरण पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या वाळूवर केंद्रित झाले. हा व्यवसाय अल्पावधीतच सोन्याची कोंबडी देणारा ठरल्याने बेसुमार वाळू उपसा सुरु झाला. रोज संध्याकाळ नंतर या व्यवसायास सुरुवात होऊन हा व्यवसाय पहाटे पर्यंत जोरात चालतो. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल याला कसा आळा घालणार की ते देखील या भ्रष्ट यंत्रणेचा भाग होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे !

उजनी धरण हे वाळूचे आगार बनले असून उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील कालठण ते कांदलगाव, शहा, महादेवनगर हा पट्टा बेकायदा वाळू उपश्याचे केंद्रबिंदू ठरला आहे. दररोज किमान ५० फायबर बोटी, सक्शन बोटींच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी बेमालूम पणे वाळू उपसा केला जात असून यातून लाखो, हजारो रुपयांचा व्यवहार बिनबोभाट पार पडतो. इंदापूर किंवा करमाळा हद्दीत वाळू उपसा सुरू करायचा, कारवाई सुरू झाली की दुसऱ्या तालुक्यात पळून जायचे ही आतापर्यंत कार्यपद्धती होती. तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नसल्याने गावोगावची तरुणाई या व्यवसायात गुंतली आहे. सरकारी प्रशासनातील काही अधिकारी यामध्ये सहभागी असतात हे उघड गुपीत आहे, त्यांना राजकारणातील काही नेत्यांचा उघड पाठिंबा असतो हे देखील उघड गुपीत आहे. त्यामुळे अवैध वाळूवर होणाऱ्या कारवाईची माहिती अगोदरच वाळू माफिया पर्यंत पोहोचते. त्यामुळे प्रशासनातील काही दक्ष महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना मात्र बेवारशी बोटी फोडण्या शिवाय हाती काही लागत नाही. या बोटींना ना मालक असतो ना बोटीवर कुणी सापडते. त्यामुळे शासन दरबारी त्याची अवैध नोंद होते. त्याचा ना हिशोब ना नोंद ! त्यामुळे फक्त कागदोपत्री कारवाई होते. अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर सक्त कायदेशीर कारवाई का होत नाही हा खरे तर संशोधनाचा विषय आहे.

इंदापूर तालुक्याला भीमा नदी काठी ते उजनी धरण पर्यंत भिगवण ते तरटगाव असा ३९ किलोमीटर अंतराचा पाणलोट क्षेत्राचा प्रदीर्घ पट्टा लाभलेला आहे. भीमा नदीची वाळू कसदार व बांधकामासाठी उत्तम दर्जाची समजली जाते. त्यामुळे तिला चांगली मागणी आहे. ही वाळू उरुळी कांचन ते पनवेल पर्यंत चांगल्या दराने विकली जाते, हे उघड गुपीत आहे. या व्यवसायात वर्चस्व ठेवण्याच्या कारणावरुन यापूर्वी मारामारी तसेच खून देखील झाले आहेत. तरी देखील शासनास या प्रश्नाचे गांभीर्य कळले नाही असे खेदाने म्हणावे लागते. शासनाच्या अनास्थेमुळे नदी स्वच्छ होत नाही. त्यामुळे उजनी धरण व भीमेच्या पात्रात भरपूर गाळ व त्याच प्रमाणात वाळू साठा लपलेला आहे. हे काळे कसदार सोने चोरणारांच्या मोठमोठ्या टोळ्या गावोगावी निर्माण झाल्या असून ते स्वतःला वाळूसम्राट समजतात. त्यातच स्थानिक टोळ्यांना परजिल्ह्यातील टोळ्यांची देखील कुमक मिळाली आहे. त्यांच्या वर कुणाचा वरदहस्त असतो हा देखील संशोधनाचा विषय आहे.

सध्या कांदलगाव, महादेवनगर, शहा, माळवाडी, अजोती, सुगाव, गंगावळण, शिरसोडी, पडस्थळ, कालठण गावांच्या हद्दीतील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. दररोज सायंकाळी पाच वाजल्यानंतर किमान ५० फायबर व तेवढ्याच सक्शन बोटींद्वारे वाळू उपसा सुरु होतो. प्रत्येक गावामधून असंख्य ट्रक भरुन वाळू उचलली जाते. सध्या वाळू उपसा करणारांनी शहा गाव व त्या भोवतीचा परिसर यावर लक्ष केंद्रित केले आहे. वाळू चोरांना हा परिसर काढलेल्या वाळूचा साठा करुन ठेवण्यासाठी सुरक्षित व महामार्ग जवळ असल्याने वाहतूकी साठी सोपा वाटतो. वाळू असलेल्या गावा मधील कथित प्रतिष्ठितांचे हात देखील या वाळूच्या धंद्यात गुंतले आहेत. अवैध वाळू वाहतूक करताना अपघातात शाळकरी विद्यार्थी, नागरिक जखमी झाले आहेत तर काहींचा मृत्यू झाला आहे. वाळू उपशावर महसूल व पोलीस यंत्रणेची कारवाई हा एक विनोदाचा तसेच संशोधनाचा भाग झाला आहे. जेवढ्या प्रमाणात वाळू उपशासाठी बोटींचा वापर केला जातो, त्याच्या एक टक्का ही बोटी महसूल व पोलीस यंत्रणेच्या पथकास सापडत नाहीत. पाठलाग करुन पकडलेल्या बोटी नंतर बेवारस ठरतात. त्यामध्ये वाळू नसते, त्या बोटींच्या मालकांची नावे उजेडात येत नाहीत, या बोटी खराब झालेल्या असतात किंवा या बोटी मालकांचे अर्थकारण झालेले नसते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाते असे म्हणतात. अळी मिळी गुप चिळी या तत्वाने काम चालते. त्यामुळे कारवाई साठी गेलेल्या शासकीय वाहनांच्या इंधनाचा देखील खर्च निघत नाही ही वस्तुस्थिती आहे ! प्रशासनाने सुमारे दहा वेळा कारवाई करून पाण्यातील बोटींना जलसमाधी दिली मात्र अद्याप वाळू माफिया यांच्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे या कागदोपत्री कारवाईचे गौडबंगाल काय आहे हे कळत नाही. इंदापूरचे माजी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या, मात्र अवैध वाळू उपसा थांबवून सरकारी संपत्तीचे जतन केल्याबद्दल सरकारने त्यांना बक्षीस दिले नाही, याउलट त्यांच्या वर दिवसा ढवळ्या हल्ला झाला. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी कामचलाऊ, कागदोपत्री बेवारस कारवाई करताना दिसतात ! त्यामुळे वाळू उपशावर श्रीकांत पाटील पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी राबविणे ही काळाची गरज आहे.

प्रशासकीय यंत्रणेतील अनेक जणांचे वाळू चोरांशी संबध आहेत. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाळूच्या गाड्या दुसऱ्यांच्या नावाने सुरू करून मलिदा खाल्ला आहे, मात्र हे प्रशासनास कधीच लक्षात आले नाही हे देखील उघड गुपीत आहे. वाळू चोरांच्या अदृश्य साथीदारांनी अगदी तहसीलदारांच्या निवासस्थानापासून ते पोलीस वसाहतीतील ‘त्या’ विशिष्ट खोलीपर्यंत पाळत ठेवलेली असते. कर्तव्यावर अर्थपूर्ण हात फिरला की चोर चोरी करायला मोकळे असतात. चोरी झाल्या नंतर कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज होत असते, असा प्रकार इकडे घडतो. तो जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत वाळूच्या धंद्याला मरण नाही असे अवैध वाळू व्यवसायिक छातीठोकपणे सांगत असतात. नेत्यांच्या वाढदिवसाला जाहिराती द्याव्या लागतात, नोकऱ्या नसताना त्यासाठी पैसे कुठून आणायचे, त्यामुळे या व्यवसायाला रान मोकळे असल्याने सुगीचे दिवस आले आहेत. पाणलोट क्षेत्रात मासेमारी हा आणखी एक मोठा व्यवसाय आहे. कोलकाता, मुंबई, हैद्राबाद आदी विविध शहरात उजनी धरणा च्या गोड्या पाण्यातील माश्यांना मोठी मागणी आहे. मात्र हा व्यवसाय वाळू उपशामुळे संकटात सापडला आहे. मासेमारी साठी वापरात येणारी जाळी वाळू उपसा करणाऱ्या बोटी व इंजिनच्या पाठीमागे लावलेल्या पंख्यामुळे तुटतात. त्यामुळे मासे सापडणे जिकिरीचे होते. मस्तवाल वाळू चोरांना जाब विचारणे म्हणजे आपला जीव संकटात टाकणे हे मच्छिमारांना माहिती आहे. त्यांची दहशत व दादागिरीस सामोरे जाण्यापेक्षा गप्प बसणे सोयीचे अशी भूमिका मच्छिमारांना घ्यावी लागत आहे. अवैध वाळू उपशामुळे उजनी तील जैववैविध्य धोक्यात आले असून मासे तसेच काही वनस्पती च्या जाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे हा अवैध व्यवसाय कायद्याच्या कक्षेत आणून त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी बाधित गावातील नागरिकांची मागणी आहे. तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी आपला दरारा निर्माण करणे गरजेचे आहे. वाळू माफियांना योग्य कारवाई न झाल्यास इंदापूर येथे नीरा भीमा संगमावर नरसिंहपूर येथे श्री क्षेत्र लक्ष्मी नरसिंह कुलदैवत असलेले राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणण्याची वेळ येईल ! राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच क्रीडा, युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पाठपुरावा करावा अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल अवैध वाळू उपसा करून बुडविणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध खासदार सुप्रिया सुळे व धैर्यशील मोहिते पाटील संसदेत आवाज उठवून त्याचा पाठपुरावा करणार का असे प्रश्न उजनी काठचे नागरिक विचारत आहेत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांनी देखील आपली भूमिका जाहीर करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

न्यूलीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी शैक्षणिक वर्ष 2025 -26 ची सुरुवात आनंदी व उत्साही वातावरणात करण्यात आली

दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी दिनांक 16जुन 2025 रोजी सकाळी 9:00वाजता दादाश्री प्रतिष्ठान अध्यक्षा सौ पद्मताई पाटील सर्व विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले

या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य कैलास खबाले विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून करण्यात आले . त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप आणि शालेय साहित्य भेटवस्तू अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.प्राचार्य कैलास खबाले व रणनवरे मॅडम राऊत मॅडम यांनी विद्यार्थ्यांनचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनीही पहिल्या दिवशी कविता गोष्टी सांगून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रणनवरे मॅडम यांनी केले व आभार सौ. राऊत मॅडम यांनी मानले.

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी 16/06/2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 झाले आनंदात सुरू

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी आज दिनांक 16/06/2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2025 – 26 सुरू झाले यावेळी उपस्थित

चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे ,सचिव विलास भोसले ,खजिनदार सोमनाथ माने, सदस्य निकिता माने तसेच सरडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सुप्रिया शिवाजी माने याही उपस्थित होत्या. सरस्वतीच्या पूजनाने व प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.

शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहामध्ये मुले नवीन गणवेशात ,बॅग ,बूट मध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये उपस्थित होती. या छोट्याशा चिमुकल्या मुलांचे स्वागत करण्यात आले औक्षण केले गेले. तसेच सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आला व पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये अत्यंत जोमामध्ये व प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व त्यांचे स्वागत केले

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; ६ पर्यटकांचा मृत्यू? २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची भीती

पुणे:-पुण्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने २० ते २५ पर्यटकही वाहून गेल्याचे वृत्त येत आहे. आतापर्यंत सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.*

 

*👉🟥🟥👉मावळातील तळेगाव दाभाडेनजीक कुंडमळ्याजवळील पूल कोसळून २० ते २५ पर्यटक इंद्रायणी नदीत बुडाले. पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या कुंडमळ्यावर रविवार असल्यामुळे आज पर्यटकांची तोबा गर्दी होती. हा पूल जीर्ण झाला होता. मागील काही दिवसांपूर्वी धुव्वाधार पावसामुळे पूल खचलाही होता. आज दुपारच्या सुमारास पूल वाहून गेल्याने पर्यंटक वाहून गेले. आतापर्यंत ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.*

 

*👉🔴🔴👉पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हाच पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत काही नदीत काही पर्यटक बुडाले होते. त्यातील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके म्हणाले, आज दुपारच्या समयी आम्हाला दुर्घटनेसंबंधी माहिती कळाली. स्थानिक यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानुसार आत्तापर्यंत सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. सर्व यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.*

इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व माननीय प्रवीण भैया माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदानाचे आयोजन.

रक्तदान हे श्रेष्ठदान हे समजून येणारा वाढदिवस तरुणांनी रक्तदान करून साजरा करावा असं प्रवीण भैया माने मित्र मंडळाने ठरवले आहे . सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे प्रवीण भैया माने यांनी समाजामध्ये नेहमीच वेगवेगळ्या विधायक कामाने आपलं ठसा उमटवला आहे.

युद्धाचा भडका;* इराणच्या हल्ल्यात इस्रायल हादरला; १५० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली

तेहरान:-इस्रायल आणि इराणमधील तणाव चांगलाच वाढला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हल्ले केले होते. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सहा अणू शास्त्रज्ञ आणि लष्कराच्या २० कमांडरचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संतापलेल्या इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिले. इराणच्या सैन्यांनी इस्रायलवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलच्या दिशेने १५० पेक्षा जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस नावाच्या मोहिमेद्वारे इराणने इस्राइलला प्रत्युत्तर दिलं.*

 

*👉🟥🟥👉इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणी माध्यमांनी दावा केला आहे की, इस्रायलच्या विविध शहरांवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आणि जेरुसलेम आणि तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यात १५ जण जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायलमधील अनेक भागात सायरन वाजवण्यात आले, अशी माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सेसने एका निवेदनातून दिली. इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.*

 

*👉🔴🔴👉या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलचे हवाई संरक्षण दल देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. नागरिकांना बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हल्ल्यांदरम्यान इराणने दावा केला आहे की, त्यांनी एका इस्रायली पायलटला जिवंत पकडले आहे. हा पायलट अलीकडेच इराणी लक्ष्यांना लक्ष्य करणाऱ्या विमानांपैकी एकाचा सदस्य होता. इस्रायलकडून अद्याप या दाव्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे आणि युद्धासारखी परिस्थिती कायम आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.*

इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; लष्करी आणि न्यूक्लिअर ठिकाणं उद्ध्वस्त; लष्करप्रमुखासह 6 अणुशास्त्रज्ञ हल्ल्यात ठार

जेरूसलेम:-इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. इस्त्रालयाने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्बहल्ले केले आहेत. याशिवाय इस्त्रालयाने इराणच्या लष्करी आणि अणुऊर्जा ठिकाणांवरही हल्ले केले आहेत. इस्रायलने इराणच्या चार आण्विक केंद्रासह सहा लष्करी ठिकाणांवर हल्ला चढवला. यात इराणची महत्त्वाची माणसे मारले गेली आहेत. इराणच्या लष्करप्रमुखासह सहा नामवंत अणुशास्त्रज्ञ या हल्ल्यात ठार झाले आहेत.*

*👉🟥🟥👉इस्रायलने इराणमधील नतांज आण्विक केंद्र आणि इतर ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली आहे. इस्रायलने हा हल्ला करत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर मोठा प्रहार केला आहे. इस्रायलने जे हवाई हल्ले केले, त्यात इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची जबाबादारी असलेले सहा अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. अब्दुल हमीद मिनोउचहर, अहमदरजा जोल्फाघारी, सय्यद अमीरहोसेन फेक्ही, मोत्लाबीजादेह, मोहम्मद मेहदी तहरनेची आणि फेरेदून अब्बासी अशी या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या इराणच्या अणुशास्त्रज्ञांची नावे आहेत.*

*👉🔴🔴👉इस्त्रालयच्या हवाई दलाने इराणच्या लष्करी आणि अणुप्रकल्पांच्या ठिकाणांवर डझनभरापेक्षा जास्त मिसाईल्स डागले आहेत. इस्त्रायची संरक्षण यंत्रणा आयडीएफने हा संयुक्त आणि आधीपासून ठरवण्यात आलेला हल्ला असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेनेही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपला या हल्ल्यात काही सहभाग नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. इराणी मीडिया आणि सरकारी यंत्रणांनी हल्ल्याला दुजोरा देताना म्हटलं आहे की, तेहरानमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ इमाम खोमेनी बंद करण्यात आलं आहे. इस्रायलने हल्ला केल्याचे स्वतः नेतान्याहू यांनी सांगितले. दरम्यान, इराकनेही आपली हवाई सीमा पूर्णपणे सील केली आहे आणि सर्व विमानतळांवर विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणच्या अनेक लष्करी तळांना आणि वैज्ञानिक केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.*

आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली : डिजीएम रणजीतकुमार मोदी.

जगात एकीकडे भौतिक सुविधा वाढत असल्या तरी दुसरीकडे मानवी आयुर्मान घटत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन एस्टोनिया वन कंपनीचे डीजीएम रणजितकुमार मोदी यांनी केले.

इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्य संदेश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्ट सभागृहात आरोग्य जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर होते. या कार्यशाळेत शहर किंवा गाव तिथे आरोग्यदूत किंवा आरोग्यताई या उपक्रमात १५० हून जास्त स्वयंसेवकांनी भाग घेतला. ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, विश्वस्त अरविंद गारटकर, खजिनदार तुषार रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.

श्री. मोदी पुढे म्हणाले, आरोग्य हे बाजारात विकत नसल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी शिल्पकार होणे गरजेचे आहे. अमेरिका, जपान, सौदी अरेबिया सह तीस देशात भारतीय आयुर्वेद औषधांनी बाजारपेठ मिळवली आहे. कॅन्सर, दमा, संधिवात, मधुमेह, थायरॉईड, स्त्री व पुरुष वंध्यत्व, मणक्याचे विकार, सोरायसिस मूतखडे, पित्ताशयाचे खडे आदी २०० हून जास्त आजारावर ही औषधे प्रभावी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्य साक्षर होऊन आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे शिल्पकार होणे ही काळाची गरज आहे.

यावेळी विश्वस्त अरविंद गारटकर म्हणाले, आरोग्य संदेश प्रतिष्ठान ने आरोग्य सर्वांसाठी या उपक्रमात आयुर्वेद घरोघरी, गावोगावी पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रतिष्ठानला संपूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी सौ. पूनम मोदी, अकलूज येथील डॉ. संतोष काटकर, डॉ. पल्लवी काटकर, बावडा येथील डॉ. जयशंकर विभुते यांनी आयुर्वेदाचे महत्व सोदाहरण स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदेश शहा यांनी तर आभार प्रदर्शन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण यांनी केले. यावेळी पतंजली योग समितीचे मल्हारी घाडगे, देवराम मते, जनार्दन क्षीरसागर, विलास बोराटे, मुन्ना बागवान, कोपी वरची शाळा प्रमुख भारत बोराटे, वृक्ष संजीवनी परिवाराचे संस्थापक हमीद अत्तार, सुधीर करगळ, रामवर्मा आसबे, समाधान पानसरे, ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप, अमोल राऊत, रोहिणी जाधव, केदार गोसावी, भारत माने उपस्थित होते.

P.M MoDi Visited the crash site in Ahmedabad today.

Visited the crash site in Ahmedabad today. The scene of devastation is saddening. Met officials and teams working tirelessly in the aftermath. Our thoughts remain with those who lost their loved ones in this unimaginable tragedy.

इंदापूर तालुक्यातील पहिल्या कॅथलॅबच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारची हृदयरोग तपासणी.

इंदापूर तालुक्यातील पहिल्या कॅथलॅबच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारची हृदयरोग तपासणी.

अखिल भारतीय पत्रकार परिषद आणि इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लि. यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील पत्रकारांची मोफत हृदयरोग तपासणी संपन्न.

इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर यांच्यावतीने इंदापूर तालुक्यातील पहिली कॅथलॅब सेवा सुरू करत असल्याकारणाने इंदापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी मोफत हृदयरोग तपासणी सोमवारी (दि.९) जून २०२५ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत संपन्न झाली.

यावेळी तालुक्यातील सुमारे ५० च्या वरती पत्रकारांची ईसीजी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, क्रियाटीनीन आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. जे हाय रिस्क रुग्ण आहेत त्यांची टूडी इको ( हृदयाची सोनोग्राफी ) कारियाक मार्कर्स ( लिफिड प्रोफाइल ) सवलतीच्या दरात होणार आहेत.

 

कार्यक्रम प्रसंगी आपला आहार,व्यायाम, जीवनशैली कशी असावी याबद्दल कार्डिओलॉजी डॉ. रोहन हेगडे यांनी मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रेश्वर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉ. अनिल शिर्के यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत करून पत्रकार बांधवांच्या वाढत्या तणाव व त्यामुळे उद्भवणाऱ्या रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार यावर उपाययोजना करण्यासाठी व लवकरच सुरू होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील पहिल्या कॅथलॅबच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांसाठी हृदयरोग तपासणी व त्या संदर्भातील उपायोजना यांची माहिती दिली.तर उपस्थित पत्रकार बांधव व डॉक्टरांचे डॉ. मनोज वाघमोडे यांनी आभार मानले.

 

कार्यक्रमासाठी डॉ. मंगेश पाटील,डॉ. अमोल रासकर, डॉ अतुल वनवे, डॉ. बिचुकले, डॉ अमीर मुलांनी, डॉ. अर्जुन नरुटे,डॉ. शैलेश काळेल, डॉ श्रद्धा भोसले, डॉ. प्रणाली सरगर इत्यादी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाला सहकार्य डॉ एकनाथ चंदनशिवे, डॉ. किसन शेंडे, डॉ. शिवाजीराव खबाले, , डॉ. राकेश कर्डिले, डॉ. महेश रुपनवर, डॉ. रियाज पठाण,डॉ. रविराज शिंदे, डॉ. पंकज दोशी, डॉ. भाग्यवंत टिळे, डॉ. पाडूळे, डॉ. संतोष शेलार, डॉ. सचिन फडे, शितल बोरा व हॉस्पिटल मधील स्टाफ यांचे सहकार्य लाभले.

 

शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक परिषदेचे इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष आटोळे यांनी केले तर आभार सोशल मिडिया तालुकाध्यक्ष धनंजय कळमकर व ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे यांनी मानले.

 

इंदापुरात सर्वप्रथमच सुरू होत असल्याचा कॅथलॅबचा फायदा गोरगरिब रुग्णांनी घ्यावा – डॉ. अविनाश पाणबुडे*

 

इंदापूर तालुक्यात प्रथमच कार्यान्वित झालेल्या प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच सुरू होणाऱ्या कॅथलॅब चा फायदा घ्यावा. यातून गरीब रुग्णांवर खात्रीशीर इलाज चालू असून यापुढेही अधिकाधिक सुसज्ज सेवा देण्यावर भर देण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली. इंदापूर मध्ये अद्यावत कॅथलॅब नसल्यामुळे रुग्णांना अकलूज, बारामती,पुणे, सोलापूर या ठिकाणी तपासणीसाठी जावे लागत होते. परंतु आता ही सुविधा इंदापुरातच उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना सुविधा पुरवण्यास मदत होणार असल्यास यावेळी डॉ. अविनाश पाणबुडे यांनी सांगितले. या योजनेचा अधिकाधिक लोकांनी फायदा घेण्याचे आवाहन देखील यावेळी डॉ. पाणबुडे यांनी केले. इंद्रेश्वर हॉस्पिटल हे नफा कमवण्यासाठी नसून ते लोकांची सेवा करण्यासाठी आहे असे त्यांनी नमूद केले. या सुविधांमुळे करमाळा, माढा, टेंभुर्णी ,इंदापूर या तालुक्याला मोठा फायदा होणार आहे.रुग्णाची गैरसोय आणि तात्काळ उपचार होणारा असे त्यांनी म्हटले आहे.

 

इंदापूर तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी सत्कार करतांना इंद्रेश्वर हॉस्पिटलचे विश्वस्त, संचालक मंडळ व डॉक्टर व इतर

error: Content is protected !!