Home Blog Page 29

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे, दि. 11 : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

 

पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

 

पोलीस आयुक्त श्री. कुमार म्हणाले, शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी याकरीता प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करावे. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करुन घ्यावी. बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बस चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.

शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा. स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम करीत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा, असेही कुमार म्हणाले.

 

श्री. भोसले यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान १ हजार ३२१ स्कूल बस तसेच ६५० इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये ४१४ स्कूल बस व २०८ इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल ५५ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

Visited the hospital and met with the people injured in the tragic plane crash.. अमित शहा

Visited the hospital and met with the people injured in the tragic plane crash in Ahmedabad. Spoke with the affected family members and assured them of every possible support required for the swift recovery of the injured. Also discussed with the doctors about their present health conditions.

राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

मुंबई:-राज्यामधील विविध २९५ शिक्षण संस्थांची मान्यता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) रद्द केली असून, यामध्ये बहुसंख्य डीएड शिक्षण संस्थांचा समावेश आहे. या संस्थांनी कामगिरी मूल्यांकन अहवाल (परफॉर्मन्स अप्रायजल रिपोर्ट) न दिल्याने आणि त्याबाबत पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीलाही कोणतेच उत्तर न दिल्याने परिषदेने ही कारवाई केली. आता शिक्षक शिक्षण कार्यक्रमात या संस्थांना प्रवेश घेण्याची परवानगी मिळणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले आहे.*

 

*👉🔴🔴👉शैक्षणिक संस्थांकडून प्रतिवर्षी शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी मूल्यांकन अहवाल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे दाखल करावा लागतो. मात्र २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात राज्यातील २९५ शिक्षण संस्थांनी हा कामगिरी अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे एनसीटीईने अशा संस्थांना कारणे दाखवा नोटीस जारी करत त्यांना उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. परंतु एकाही शिक्षण संस्थेने कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिले नाही; त्यामुळे या संस्थांची मान्यता रद्द केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष शैलेश नारायण झाला यांनी दिली.*

 

*👉🟥🟥👉मान्यता रद्द झालेल्यांमध्ये विशेषतः बीएड, डीएड, एमएलएड अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षण संस्था आणि काही अल्पसंख्याक संस्थांचा समावेश आहे.*

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती

*👉🛑🛑👉तर ३ जून २०२५ रोजी डिजिटल मिडियासाठी महाराष्ट्र शासनाने घेतला ऐतिहासिक निर्णय!*

*👉🛑🟥🛑👉राज्यभरातील पत्रकारांच्या विविध संघटनांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्यपाल तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने केला होता पाठपुरावा*

मुंबई:-डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी राज्यभरातील पत्रकारांच्या विविध संघटना सातत्याने पाठपुरावा करत होत्या.अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने ३ जून २०२५ रोजी एक शासन निर्णय जाहीर करून डिजिटल मीडियावरील फेसबुक,युट्युब आणि इन्स्टाग्राम या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या डिजिटल पत्रकारांना हक्काचा रोजगार देण्यासाठी शासकीय जाहिराती मिळणार आहेत.*

*👉🛑🟥🛑👉राज्यभरातील विविध पत्रकारांच्या संघटनांनी मागणी लावून धरल्यामुळे अखेर सामान्य प्रशासन विभागाने मंगळवार दिनांक ३ जून रोजी शासन परिपत्रक क्रमांक मावज-२०२५/२५१/प्र.क्र. १३२/मावज १ द्वारे हा निर्णय घोषित केला.शासन परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या मार्गदर्शक सूचनांचा लाभ सर्व विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय कंपन्यांना होणार असून, ते आता डिजिटल माध्यमांना अधिकृतरित्या शासकीय जाहिराती देऊ शकतात.या निर्णयामुळे डिजिटल माध्यमांना आर्थिक स्थैर्य मिळेल,शासनाच्या योजना आणि धोरणांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होईल,माहितीचा लोकांपर्यंत जलद आणि पारदर्शक पोहोच होईल.शासनाचे हे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०२५०६०३१५१४०९८७०७ आहे.हा आदेश अवर सचिव अ. धों. भोसले यांच्या डिजीटल स्वाक्षरीसह निर्गमित करण्यात आला आहे.*

*👉🔴🔴👉राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी एकमत दाखवत डिजिटल माध्यमांना जाहिराती सुरू करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच पत्रकार संघटनांकडून स्वागत करण्यात आले आले आहे.आमच्या कोकणचा तडाखा न्यूज तर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार..*

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ यांची वार्षिक आढावा बैठक इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी दैनिक सकाळचे इंदापूर प्रतिनिधी संतोष आटोळे यांची तर सोशल मीडिया अध्यक्षपदी धनंजय कळमकर व सचिवपदी लोणी देवकर येथील सकाळचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांची निवड करण्यात आली.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ यांची वार्षिक आढावा बैठक इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.

परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा यांच्या उपस्थितीत आयोजित या आढावा बैठकीत तालुका अध्यक्षपदी संतोष आटोळे, उपाध्यक्षपदी रामदास पवार, सचिव पदी संदीप बल्लाळ, सहसचिव पदी अंगद तावरे तर सदस्यपदी नाना घळके यांची निवड करण्यात आली.तर सोशल मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी धनंजय कळमकर यांची उपाध्यक्षपदी नीलकंठ भोंग तर सदस्यपदी आदित्य बोराटे, विशाल भोंग, प्रवीण पिसे, अक्षय यादव, आसिफ शेख यांची तर माहिती व जनसंपर्क पदी रामवर्मा आसबे यांची निवड करण्यात आली.तर पुणे जिल्हा कार्यकारणीवर कार्याध्यक्ष पदी मनोहर चांदणे तर संघटक पदी राजेंद्र कवडे देशमुख, सुरेश जकाते, काकासाहेब मांढरे, कैलास पवार, जिल्हा निरीक्षक पदी शौकत तांबोळी यांनी निवड करण्यात आली.

परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा यांच्या उपस्थितीत आयोजित या आढावा बैठकीत तालुका अध्यक्षपदी संतोष आटोळे, उपाध्यक्षपदी रामदास पवार, सचिव पदी संदीप बल्लाळ, सहसचिव पदी अंगद तावरे तर सदस्यपदी नाना घळके यांची निवड करण्यात आली.तर सोशल मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी धनंजय कळमकर यांची उपाध्यक्षपदी नीलकंठ भोंग तर सदस्यपदी आदित्य बोराटे, विशाल भोंग, प्रवीण पिसे, अक्षय यादव, आसिफ शेख यांची तर माहिती व जनसंपर्क पदी राम वर्मा आसबे यांची निवड करण्यात आली.तर पुणे जिल्हा कार्यकारणीवर कार्याध्यक्ष पदी मनोहर चांदणे तर संघटक पदी राजेंद्र कवडे देशमुख, सुरेश जकाते, काकासाहेब मांढरे, कैलास पवार, जिल्हा निरीक्षक पदी शौकत तांबोळी यांनी निवड करण्यात आली.

यावेळी मागील वर्षभराचा जिल्हास्तरीय कामाचा आढावा डॉ.संदेश शहा यांनी तर तालुकास्तरीय कामाचा आढावा राजेंद्र कवडे देशमुख यांनी मांडला. यावेळी मोहम्मद तांबोळी, हमीद आतार यांचेसह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन धनंजय दुनाखे यांनी, प्रास्ताविक काकासाहेब मांढरे यांनी तर आभार नूतन अध्यक्ष संतोष आटोळे यांनी मानले.

सावधान ! देशात कोविड रुग्णांची संख्या ४ हजार पार!

मुंबई :-देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत 4,026 प्रकरणे समोर आली असून कर्नाटकात 24 तासांत 58 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये 59 आणि पश्चिम बंगालमध्ये 41 नवीन प्रकरणं समोर आली आहेत.*

*👉🅾️🅾️👉24 तासांत देशात 65 नवीन रुग्ण सापडले आहेत.*

*👉🔴🔴👉राज्यनिहाय सक्रिय रुग्णांची संख्या*

केरळ – १,४१६

महाराष्ट्र – ४९४

दिल्ली – ३९३

गुजरात – ३९७

पश्चिम बंगाल – ३७२

कर्नाटक – ३११

तमिलनाडू – २१५

उत्तर प्रदेश – १३८

राजस्थान – ७५

पुद्दुचेरी – २७

आंध्र प्रदेश – २८

हरियाणा – ४४

मध्य प्रदेश – २१

ओडिशा – १५

झारखंड – ११

गोवा – ८

जम्मू-काश्मीर – ९

छत्तीसगड – ११

पंजाब – ९

आसाम – ६

बिहार – ११

सिक्कीम – ४

अरुणाचल प्रदेश – ०

तेलंगणा – ४

उत्तराखंड – ३

मिझोराम – २

चंदीगड – २

पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांना तातडीची मदत:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुसळधार पावसामुळे शेती आणि नागरी भागात झालेल्या नुकसानासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कापणी झालेल्या पिकांवरील परिणामाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा विचार करण्यात येईल.

 

यासोबतच, खरीप 2025 आणि यानंतरच्या कालावधीतील शेतीच्या नुकसानभरपाईसाठी 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयातील दर आणि निकष लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले. मासळी सुकवण्याच्या प्रक्रियेत झालेल्या नुकसानाबाबत मच्छिमारांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

रस्ते व पूल यांवर झालेल्या परिणामांची दखल घेत ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे सुचवले गेले. विशेषतः रेड अलर्ट घोषित करण्यात आलेल्या भागात प्राथमिकतेने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांनी सादरीकरणाद्वारे राज्यभरातील नुकसानाची माहिती दिली. याअंतर्गत घरांची पडझड व दुरुस्ती यासाठी राज्यभरातील विविध विभागांना ₹49 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरने पुरवठा करण्यात येत असलेल्या गावांच्या संख्येत 200 इतकी तर टँकरच्या संख्येत 336 इतकी घट झाली असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

 

यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत पुणे येथे आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’

अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत पुणे येथे आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ येथे उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी अमृत महाआवास अभियान 2022-23 यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे राज्यातील विविध विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि गृहसंकुल यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.

🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट विभाग
✅ कोकण विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ नाशिक विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ नागपूर विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ पुणे विभाग: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक

🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हे
✅ अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ सिंधुदुर्ग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ गोंदिया: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ सातारा: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक

🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुके
✅ ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ ता. जावळी, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ ता. जामखेड, जि. अहिल्यानगर: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ ता. आरमोरी, जि. गडचिरोली: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक

🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत
✅ येळगाव, ता. कराड, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ भूडकेवाडी, ता. पाटण, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ चोंढी, ता. मानोरा, जि. वाशिम: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ बोंद्री, ता. पाटण, जि. सातारा: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ कारखेडा, ता. मानोरा, जि. वाशिम: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ कुळवंडी, ता. खेड, जि. रत्नागिरी: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक

🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत
✅ हनुमंत खेडे, ता. धरणगाव, जि. जळगाव: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ भोसा (टाकळी), ता. मोहाडी, जि. भंडारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ मोहगव्हाण, ता. मानोरा, जि. वाशिम: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ अंतापूर, ता. बागलाण, जि. नाशिक: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ डोंगरजवळा, ता. गंगाखेड, जि. परभणी: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ शिंद, ता. भोर, जि. पुणे: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक

🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुले
✅ वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ गनोरी, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ नांदगाव, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ कुशेर बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ डोंगरगाव, ता. राजुरा, जि. चंद्रपूर: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली सुरू; निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई:-राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिली आहे.*

*👉🔴🔴👉राज्यात सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे. यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसेलली ही यंत्रणा केवळ अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत, 4 महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आणला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारने स्वत:कडे घेतला होता. परिणामी, आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा राज्य सरकारवर सोपवली आहे.*

*👉🟥🟥👉सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून माहिती मिळताच, त्या आधारे प्रभागांचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार याद्या हे तीन महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकांची घोषणा होणार आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या महापालिका, नगरपालिकांसह जिल्हा परिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुका ‘मिनी विधानसभा’ निवडणुका असणार आहेत.*

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय; वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण तसेच वैद्यकीय सुविधेसह टोलमध्ये दिली जाणार सवलत

मुंबई;-आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती.*

*👉🟥🟥👉या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी. वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.*

*👉🔴🔴👉मागील वर्षीसारखे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल. पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी दिलेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.*

*👉🟥🟥👉यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल. पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल. यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.*

error: Content is protected !!