Home Blog Page 30

अमेरिकेत कोरोनाचे थैमान; एका आठवड्यात 350 नागरिकांचा मृत्यू; जगाची चिंता वाढली

न्यूयाँर्क:-अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे एका आठवड्यात 350 जणांचा मृ्त्यू झाला आहे. यातील बहुतांश लोक उच्च-जोखीम गटातील होते, असे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या अमेरिकेच्या आरोग्य एजन्सीने म्हटले आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसचा नवा सब व्हेरिएंट NB.1.8.1 धुमाकूळ घालत आहे जो चीनमधून आला आहे.*

*👉🔴🔴👉महत्वाचे म्हणजे, चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड सारख्या आशिया खंडातील देशांतही हा नवा सब व्हेरिअंट वेगाने पसरताना दिसत आहे. अमेरिकेतील एका विमानतळावर परदेशी नागरिकाची तपासणी सुरू असतानाच हा नवा सब व्हेरिअंट आढळून आला होता. आता न्यूयॉर्क, कॅलीफोर्निया, वॉशिंग्टन, व्हर्जीनियासह अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरात हा व्हिरिअंट वेगाने पसरत आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्येही हा व्हायरस पोहोचला आहे. कोरोना व्हॅक्सीनची कमी होणारी क्षमता, हे देखील कोरोना पसरण्यामागचे एक मुख्य कारण मानले जात आहे.*

*👉🟥🟥👉सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार 18 तेहून अधिक वय असलेल्या 23 टक्के लोकांना 24 एप्रिलपर्यंत कोरोनाची नवी लस देण्यात आली आहे. एट्रिया रिसर्च इंस्टीट्यूटच्या व्हॅक्सीन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवी व्हॅक्सीन घेणाऱ्यांची संख्या कमी, हे देखील एक कारण आहे. तसेच, व्हॅक्सीनचा डोस घेतल्यानंतरही, कदाचित आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नव्या विषाणूचा प्रतिकार निर्माण करू शकणार नाही, असेही होऊ शकते. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. वय आणि गंभीर आजार हे देखील मृत्यूचा धोका वाढवणारे एक कारण आहे. तज्ज्ञांनी ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सहा महिन्यांच्या अंतराने कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, या संसर्गामुळे, अमेरिकेत अँटी व्हायरल पिल molnupiravir, Paxlovid आणि रेमेडिसिविरची विक्री वाढली आहे.*

सरकारवर टीका केल्यास थेट तुरुंगात रवानगी होणार! महायुतीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सूचना जारी केल्या

मुंबई:-सोशल मीडियावर सरकारविरुद्ध पोस्ट करणे सरकारी कर्मचाऱ्यांना महागात पडू शकते.आता सरकारवर टीका केल्याने थेट तुरुंगवास होऊ शकतो.मिळालेल्या माहितनुसार राज्याच्या महायुती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे, त्यानुसार, सरकारी कर्मचारी सरकारी धोरणांवर, वरिष्ठांवर टीका करू शकणार नाहीत किंवा सोशल मीडियावर त्यांचे मत व्यक्त करू शकणार नाहीत.महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ चे उल्लंघन लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.*

*👉🔴🔴👉१५ मे २०२५ रोजी सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, काही कर्मचारी आणि अधिकारी फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि लिंक्डइन सारख्या सोशल मीडियावर सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणात्मक निर्णयांवर टीका करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कृती सरकारी कामकाजाची सचोटी आणि अखंडता कमी करतात, असे परिपत्रकात म्हटले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगून, परिपत्रकात कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर अशी कोणतीही सामग्री पोस्ट करू नये असे कडक निर्देश देण्यात आले आहे. जर सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी सरकारी धोरणांविरुद्ध किंवा वरिष्ठांविरुद्ध कोणतेही मत, टीका किंवा आक्षेप व्यक्त केले तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.*

अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करावेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी

पुणे दि.27:- अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरु करावेत असे आदेश महसूल, कृषि, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन इत्यादी विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती इंदापूर तालुक्यात 25 मे रोजी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची 26 मे रोजी पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

जिल्हयात सुरु असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परीस्थितीचा आढावा घ्यावा व घडलेल्या घटनांबाबत तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून त्याचा हेल्पलाईन क्र.020-26123371,26133522 व टोल फ्री क्रमांक 1077 असा असून या नियंत्रण कक्षाशी तालुका व गावपातळीवरील नागरिकांनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन श्री. डुड्डी यांनी केले आहे.

पालखी सोहळ्यासाठी उत्कृष्ट नियोजन करावे; पालखी सोहळा पदाधिकाऱ्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात- अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी

पुणे, दि. २६: आगामी आषाढी एकादशी यात्रा पालखी यात्रा सोहळ्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पाणी, स्वच्छता, शौचालये, वारकऱ्यांसाठी आरोग्यव्यवस्था, औषधसाठा आदींची उत्कृष्ट व्यवस्था करावी; तसेच पालखी सोहळा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कामे तातडीने करावीत, अशा सूचना पुणे महसूल विभागाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित आषाढी एकादशी यात्रा पालखी यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पुणे पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील उपस्तित होते. तर दूरदृष्य प्रणालीद्वारे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी तसेच विविध पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यंदा पावसाचे प्रमाण पाहता पालखीला जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याचे सांगून श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, एकत्रित नियंत्रण कक्ष समन्वयाने सुरू राहील, सर्व अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील असे नियोजन करावे. पालखी सोहळ्याला होणारी अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. साखळी चोरीच्या (चेन स्नॅचिंग) घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे.

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्य मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच पालखी मार्गाला जोडले जाणारे कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांची कामे सुरू आहेत असलेल्या ठिकाणचा रस्त्यावरील राडारोडा काढणे, मुरुमीकरण करणे आदी उपाययोजना कराव्यात.

वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी टँकर भरण्यात येणाऱ्या स्रोतांची तपासणी करावी आणि निर्जंतुकीकरणासाठी टीसीएलची व्यवस्था करावी. ते वापरासाठी वैध कालावधीतील असल्याची खात्री करावी. पालखी मार्गावरील दुकानातील खाद्यपदार्थांचे, पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी. वारकऱ्यांच्या जेवणानंतर उरणारे अन्नाचे व्यवस्थित विल्हेवाट लागेल जेणेकरून रोगराई पसरणार नाही हे पहावे.

यंदा मोबाईल स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात आली असून त्यांच्या स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारी नेमावेत. त्यांची जेट स्प्रे द्वारे नियमित स्वच्छता व्हावी. त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सतत उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे टँकर, नियंत्रणकक्ष, भोजनव्यवस्था आदी सोयी- सुविधांची माहिती वारकऱ्यांना व्हावी यासाठी दिशादर्शक फलक (सायनेजेस) लावण्यात यावेत. पालखी काळात वाहतुकीसाठी रस्ते बंद केल्यास पर्यायी रस्त्यांची माहिती जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाईल असे नियोजन करावे, आदी सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली.

सोलापूर जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद म्हणाले, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व सीसीटिव्ही कॅमेरांचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी काही ॲपही विकसित करण्यात येणार आहेत. एकात्मिक नियंत्रण कक्ष उभा करण्यात येणार असून कक्षातील सर्व विभागांच्या प्रमुखांना वॉकी टॉकी देऊन संवाद व्यवस्था बळकट करण्यात येणार आहे. अपघात मुक्त वारी करण्यासाठी नियोजन केले आहे. पावसाचे प्रमाण पाहता दिंड्यांना वॉटरप्रुफ तंबू देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सातारा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले. खासगी कुटुंबांनी वारकऱ्यांसाठी आपली शौचालये वापरास देण्याची इच्छा दर्शवली आहे अशा घरांवर पांढरे झेंडे लाऊन पालखी सोहळ्यात माहिती देण्यात येणार आहे. रस्ते दुरुस्ती, फिरत्या शौचालयांची दुरुस्ती, पाण्याचे टँकरची व्यवस्था आदी माहितीही त्यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले, पुणे जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर पालखीसाठी १ हजार ८०० टँकर, संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार २०० तर संत सोपानदेव महाराज पालखीसाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी मुक्कामी आरोग्य पथक, नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात येणार असून रुग्णवाहिका सोबत असणार आहेत. सार्वजनिक उद्घोषणा कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी ३ हजार पालखी मेडिसीन किट पालखी सोहळा प्रमुखांकडे देण्यात येणार आहे. पोलीस विभागाला गर्दी वा वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ड्रोन कॅमेरे देण्याबाबतचे नियोजन होईल, असेही ते म्हणाले.

पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था, गर्दी नियंत्रण, पर्यायी वाहतूक मार्ग, वाहतूक कोंडीवरील उपाययोजना आदींविषयी माहिती दिली.

यावेळी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिचंवड महानगरपालिका, महावितरण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांनी आपल्या तयारीची माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान ट्रस्ट, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड, श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, श्री संत चांगावटेश्वर महाराज संस्थान सासवड आदींचे प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.

उदय देशपांडे (काका)आणि त्यांचा पाहुणचार……

उदय देशपांडे (काका)आणि त्यांचा पाहुणचार……

इंदापूर येथील देशपांडे व्हेज चे मालक उदय काका देशपांडे यांच्या हॉटेलमध्ये किंवा भेटीसाठी एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला बिगर चहा पाण्याची किंवा बिगर नाश्त्याचे कधीच जाऊ दिले जात नाही ही एक उदय काकांची हैशीयेत आहे

त्यांच्या संपर्कातील एखादी व्यक्ती भारतातून कुठूनही पुणे सोलापूर हायवे वरून जात असताना त्यांना भेटण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी जरी हॉटेलमध्ये आले तरी उदय काका देशपांडे त्या व्यक्तीचा किंवा त्यांच्या पाहुण्यांचा नाश्त्याबरोबर सत्कार करूनच लावतात ही त्यांची एक हैसियेत आहे त्यांच्याकडे आलेला कोणताही पाहुना किंवा मित्र कंपनी सत्कार व फोटो सेल्फी घेतल्याशिवाय जातच नाहीत, हाच एक उदय काका देशपांडे यांचा मित्रांसंगे एक पाहुणचार असतो

 

तसेच या दोन तीन वर्षांमध्ये चेतना फाउंडेशनच्या अंतर्गत चेतना इंटरनॅशनल स्कूल व चेतना फार्मसी कॉलेज स्थापन करून इंदापूर तालुक्यामधील एकमेव संस्था म्हणून त्यांनी या संस्थेचे नाव केले ही संस्था तीन वर्षाच्या आत मध्येच आयएसओ सर्टिफाय करून घेतली, संस्थे मध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांना समंजसपणाने व शोधक बुद्धीने सर्व परिस्थितीची विचारपूस करून गरज असणाऱ्यांना गरजेची मदत करून विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिले जातात सध्या या संस्थेला इयत्ता बारावी मध्ये शंभर टक्के निकाल लागून ही संस्था इंदापूर तालुक्यात या 2024-25 शैक्षणिक वर्षांमध्ये नावाजलेली संस्था म्हणून ओळख निर्माण करून घेतली … अजून काही ….उदय देशपांडे यांनी कोरोना काळामध्ये देशपांडे व्हेज यांच्यामार्फत इंदापूर तालुक्यातील भरपूर कोविड सेंटर येथे कोविड पेशंटला व पेशंटला सुविधा देणाऱ्या स्टाफला मोफत स्वरूपामध्ये डबे दिले गेले होते,

आळंदी मधून पंढरपूर कडे पाई वारी करणाऱ्या पालखीतील भरपूर वारकरी संप्रदायांना हॉटेल देशपांडे च्या अंतर्गत चहा पाणी नाश्ता व जेवणाची सोय केली जाते हा उपक्रम उदय देशपांडे व त्यांचे पार्टनर किरण गानबोटे यांच्यामार्फत सालो साल चालूच असतो

लिखाण

रामराजे आसबे

संपादक:- नमोन्यूजनेशन

हिंदुस्तान 24 न्यूज

काळजी घ्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १००० च्या वर! केरळमध्ये ४३० तर महाराष्ट्रात २०९!!

नवी दिल्ली:-दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सध्या कोरोनाचे १०४ एक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या एका आठवड्यात ९९ नवीन रुग्ण आढळले आहेत जे आरोग्य प्रशासन आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत.तसेच संपूर्ण देशात कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.*

*👉🔴🔴👉आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक ४३० रुग्ण आहेत, त्यानंतर महाराष्ट्र २०९ आणि दिल्ली १०४ एक्टिव्ह रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कर्नाटकात ३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. गुजरातमध्ये ७६ नवीन रुग्ण आढळले आहेत, आता राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ८३ झाली आहे.*

*👉🟥🟥👉हरियाणामध्ये ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह प्रकरणांची संख्या ९ झाली आहे. तर राजस्थानमध्ये ११ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत, एक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये ११ नवीन रुग्ण आढळली आहेत. उत्तर प्रदेशात १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावा असा सल्ला देखील देण्यात आला आहे.*

*👉🔴🔴👉मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे.मुंबईसह देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिल (IMA) ने कोरोनाला घाबरू नका, पण सतर्क राहा असं म्हटलं आहे. “कोरोना व्हायरस पुन्हा परत येत आहे, परंतु त्याचा प्रभाव २०२० किंवा २०२१ सारखा नाही. कोरोना आता येत राहील, म्हणजेच दर काही महिन्यांनी त्याचं नवीन रुप दिसू शकतं” असं आयएमए कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव विजयदेवन यांनी म्हटलं आहे.*

शिक्षक भरती परीक्षेचे प्रवेशपत्र वेबलिंकद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे, दि. २६: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मंगळवार दिनांक २७ मे पासून आयोजित करण्यात आली असून आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.

शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (टीएआयटी) – २०२५ परीक्षा
२७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याचेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे

कोरोनाचा धोका वाढतोय; मुंबईत २४ तासांत कोरोनाचे ३५ नवे रुग्ण 

मुंबई:-सध्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. २३ मे रोजी राज्यात ४५ नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी ३५ नवीन रुग्ण एकट्या मुंबईत आढळले. सध्या मुंबईत एकूण संक्रमितांची संख्या १८५ वर पोहोचली आहे आणि आज देखील त्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) लोकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.*

*👉🟥🟥👉गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. म्हणून, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच, जर कोणाला कोरोनाची लक्षणे आढळली तर ताबडतोब चाचणी करून घ्या आणि वेळेवर उपचार घ्या. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.*

*👉🔴🔴👉महापालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १९ कोविड रुग्ण आहेत, त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर रुग्णांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत, त्यामुळे त्या सर्वांना होम क्वारंटाइनमध्ये राहून उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांच्या अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत. यासोबतच, महापालिकेच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांनाही रुग्णांच्या अँटीजेन चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.*

11 वी प्रवेशाची वेबसाईट ४ दिवस बंदच राहणार; २६ मे पासून ऑनलाइन प्रवेश सुरू होणार; ३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार

मुंबई:-राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपता संपेना झालाय. शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश २६ मे पासून सुरू होणार असून पहिली फेरी प्रत्यक्षात तेव्हाच सुरू होईल. त्यामुळे, गेल्या २ दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी ४ दिवस थांबावे लागणार आहे. २१ मे रोजी बुधवारी प्रत्यक्षात सुरू होणारी ऑनलाइन अकरावी प्रवेशाची प्रक्रिया वेबसाईट मधील तांत्रिक अडचणीमुळे सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर, आता महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून २६ मे ही नवी तारीख देण्यात आली असून २६ मे ते ३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येईल.*

*👉🔴🔴👉राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत म्हणजे 9 दिवस 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर, 5 जून रोजी पहिली जनरल मेरीट लिस्ट लागणार आहे. 6 ते 7 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या हरकती नोंदवून तक्रार करता येईल. त्यानंतर, 8 जून रोजी अंतिम जनरल मेरीट लिस्ट जाहीर होईल. राज्यात शासनाची वेबसाईट सुरू होताच अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे, आता ही प्रवेश प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच दिनांक 26 मे पासून सुरू होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जून दरम्यान आपल्या पसंतीचे कॉलेज क्रमांक निवडता येतील.*

*👉🟥🟥👉त्यासोबतच संपूर्ण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरता येणार आहे. तर, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी 10 जूनला जाहीर होईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यापू्र्वी 21 मे रोजी सुरू करण्यात आलेली विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी 28 मे 2025 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, ती प्रक्रिया रद्द झाली असून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये.*

*👉🔴🔴👉साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटलं आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय. त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय. मात्र, पहिल्याच दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये. यावर शिक्षण संचालनालयकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे.*

इंदापूर विधानसभेतील नूतन मंडल अध्यक्ष यांचा जिल्हा संयोजक माउली काका चवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

इंदापूर विधानसभेतील नूतन मंडल अध्यक्ष यांचा जिल्हा संयोजक माउली काका चवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महामंत्री आकाश कांबळे, ज्येष्ठ नेते सदानंद शिरदाले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासहेब पानसरे, जिल्हा सचिव प्रेमकुमार जगताप व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पश्चिम मंडळाध्यक्ष तेजस देवकाते मध्यमंडल अध्यक्ष राजकुमार जठार पूर्व मंडल अध्यक्ष राम आसाबे इंदापूर शहराध्यक्ष किरण गानबोटे

जिल्हा संयोजक माऊली काका चौरे यांनी इंदापूर मधील सर्व नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना कार्यकारणीतील सर्व सदस्यांना कार्य कसे करायचे कार्य प्रणाली कशी वापरायची शासकीय आलेले योजना सरकारने दिलेले काही अधिकार समाजामधील काय असणारे दोष याविषयी सविस्तर माहिती दिली राज्यामध्ये भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या निवडणुका विषयी कार्य कसे करायचे नियोजन काय असावे याविषयी पण सविस्तर अशी माहिती माऊली काका चौरे यांनी दिली

error: Content is protected !!