Home Blog Page 31

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला आंदोलकांनी घर दिले पेटवून पाकिस्तानात गृह युद्ध भडकणार

नवी दिल्ली:– सिंध प्रांताच्या मोरो शहरात सध्या अफरातफरी माजली आहे. पाकिस्तान सरकारच्या एका प्रकल्पाविरोधात सिंध प्रांत पेटून उठलाय. सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचा बंगलाच आंदोलकांनी पेटवून दिलाय. आंदोलकांनी रस्त्यावर जाळपोळ करत अनेक गाड्याही पेटवून दिल्या. सिंध प्रांतात गृह युद्ध भडकण्यामागे कारण ठरलायं तो पाकिस्तान सरकारचा सिंधू नदीवरील प्रकल्प.*

*👉🔴🔴👉हे आंदोलक कालवा तयार करण्यास विरोध करत होते. या प्रदर्शनादरम्यान काही प्रदर्शनकर्त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले आंदोलक संतप्त झाले. त्यांनी गृहमंत्र्यांच्या घराबाहेर जोरदार गोळीबार केला आणि नंतर घर पेटवून दिले. भारत-पाक संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिली. त्यानंतर सिंधमधील शेतकऱ्यांना कराराच्या स्थगितीचा सर्वाधिक फटका बसला. अशात पाक सरकार सिंधमधील कृषी क्षेत्राच्या मुळावरच उठलयं.त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सिध प्रांतातील नागरिकांमध्ये पाक सरकारबाबत असंतोष निर्माण होऊन गृहयुद्धाला सुरुवात झालीय. सिंधू नदीवरील सहा कालव्यांचा हा प्रकल्प पंजाब प्रांतासाठी वरदान ठरणार आहे तर सिंधमधील कृषी क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसणार. आणि हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानकडून वारंवार बंडाची घोषणा करण्यात येतेय. त्यात आता पाकचा सिंधू नदीवरील प्रकल्प गृहयुद्धाच्या आगीत तेल ओतणारा ठरणार आहे. पाकचं हे भेदभावाचं धोरणच सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तानच्या अतंर्गत यादवीला कारणीभूत ठरणार आहे आणि परिणीती त्याच्य़ा फुटीत होणार हे निश्चित.*

पालखी मार्गावरील अडथळे दूर करावेत पुणे पोलिसांकडून पालखी संस्थान पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

पुणे:-श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर सुरू असलेली रस्त्यांची कामे वारकरी, भाविकांसाठी अडथळा ठरण्याची शक्यता आहे.*

विश्रांतवाडीतील मुख्य चौकात सुरू असलेले रस्त्याचे काम आणि दिवे घाटातील कामे पालखी मार्गात अडथळा ठरू शकतात. कामांची पूर्तता पालखी प्रस्थानापूर्वी व्हावी, अशी मागणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीकडून करण्यात आली. त्यानंतर संबंधीत यंत्रणेशी समन्वय साधून पालखी सोहळ्याचे आगमन हाेण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान प्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.*

*👉🟥🟥👉पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख डाॅ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहीणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संत तुकाराम महाराज संस्थानचे पदाधिकारी जालिंदर मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे या वेळी उपस्थित होते. पालखी आगमन, प्रस्थान सोहळा, बंदोबस्त, वाहने लावण्याची व्यवस्था याबाबत बैठकीत चर्चा झाली. गेल्यावर्षी गतवर्षी पालखी आगमन झाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकामी पोहोचण्यास विलंब झाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त नेमण्यात यावा, अशी मागणी यावेळी आळंदी संस्थानच्या विश्वस्तांकडून करण्यात आली.*

*👉🔴🔴👉शहरात पालखीचे आगमन, प्रस्थान सोहळ्याला होणारी गर्दी विचारात घेऊन पालखी सोहळ्यात बंदोबस्त वाढविण्यात येईल, तसेच ठिकठिकाणी लोखंडी कठडे बांधण्यात येईल. जेणेकरुन पालखी सोहळा जलदगतीने मार्गस्थ होईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.*

*👉🟥🟥👉पालखी सोहळ्यासोबत दिंड्या असतात. दिंड्यामध्ये वाहनेही असतात. वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, तसेच पोलीस आणि पालखी सोहळ्यांच्या विश्वस्तांमध्ये समन्वय साधण्यासाठी समाजमाध्यमात एक समुह करावा. जेणेकरुन पोलीस आणि विश्वस्तांमध्ये संवाद साधणे शक्य होईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली.*

अँड आनंद अशोक केकान शिवसेना प्रमुख इंदापूर शहर यांनी वाढदिवस साजरा न करता वृक्ष रोपण करून पहलगाम हल्यात शहीद झालेल्या आपल्या देशाचे जवानांना वाहिली श्रद्धांजली

अँड आनंद अशोक केकान शिवसेना प्रमुख इंदापूर शहर यांनी वाढदिवस साजरा न करता वृक्ष रोपण करून पहलगाम हल्यात शहीद झालेल्या आपल्या देशाचे जवानांना वाहिली श्रद्धांजली.

अँड आनंद केकान यांनी इंदापूर येथील संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळ येथे आपल्या देशा मधील पहलगाम येथील हल्ल्यामध्ये देशाचे जवान जवान शहीद झाले त्यामुळे या मूळे या वर्षी अँड आनंद केकान यांनी वाढदिवसा निमित्त इंदापूर येथील जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळ येथे भविष्यात वारकरी साठी सावलीची तसेच पर्यावरनाचे संवरक्षणासाठी म्हणून झाडे लावणे गरजेचे झालेले आहे.या वृक्ष रोपणासाठी इंदापूर तालुका बार असोसिएशन चे अध्यक्ष गिरीष शहा तसेच सदस्य अँड राकेश शुक्ल, रवींद्र कोकरे, रुद्र मेणसे, सोहम घोडके, मयूर शिंदे, इंदापूर नगरपालिकेचे मा नरगअध्यक्ष श्री कृष्णजी ताटे सर, शिवसेना महिला पुणे जिल्हा महिला प्रमुख सॊ. सीमाताई कल्याणकर, वृक्ष संजीवनी परिवार, पतंजली परिवार, युवा प्रतिष्ठान, कै. विठल व्यवहारे प्रतिष्ठान, लोकसेवक गणपतराव आवटे फॉउंडेशन यांचे सहकार्य लाभले.सामाजिक नेते प्रशांत दादा शिताप यांनी सूत्रसंचालन केले तसेच हमीद अत्तार, विशाल गारदी, कुशाल कोकाटे, महेश जाधव, सोमनाथ लांडगे, सागर आवटे यांनी आभार मानले.

2007च्या बॅचचे आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयातून थेट पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई :-राज्यात प्रशासकीय खांदेपालट सुरूच असून आताही आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.नवल किशोर राम यांनी २०१४ च्या निवडणुकांच्या काळात बीडच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली होती.पुढे ते पंतप्रधान कार्यात प्रतिनियुक्तीवर गेले होते. २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले नवल किशोर राम यांची बदली पुन्हा एकदा पुण्यात करण्यात आली आहे.त्यांच्याकडे आता पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.३१ मे २०२५ रोजी पुणे महानगर पालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पदभार नवल किशोर राम हे घेतील. २१ मे रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून ३१ मे रोजी पुणे आयुक्त पदाचा पदभार घ्यावा, असं म्हटलं आहे. पुणे शहराला एक शिस्तप्रिय आणि प्रशासनाची उत्तम जाण असलेला अधिकारी मिळाला आहे.तर शितल तेली उगळे यांच्याकडे पुण्यातील क्रीडा आणि युवा आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.*

 

*👉🔴🔴👉ज्येष्ठ आयएएस अधिकारी जे एस पापळकर यांच्याकडे धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी होती. त्यांची बदली आता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे.👉🅾️🅾️👉तर धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी भाग्यश्री विसपुते यांची बदली करण्यात आली आहे. सी के डांगे यांच्याकडे आता सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव कार्यालयाच्या सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.*

 

*👉🟥🟥👉अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बदली बृहन्मुंबई जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी आशिष येरेकर यांची बदली करण्यात आली आहे.*

 

*👉🔴🔴👉कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?*

 

*१. नवल किशोर राम*:- आयुक्त, पुणे महानगरपालिका

*२. शीतल तेली-उगले*:- क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे

*३. जे.एस. पापळकर*:- विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर

*४. सी.के. डांगे*:- सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग

*५. सौरभ कटियार*:-जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा

*६. भाग्यश्री विसपुते*:-जिल्हाधिकारी, धुळे

*७. आनंद भंडारी* :-मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद

*८. आशिष येरेकर*:-जिल्हाधिकारी, अमरावती

 

*👉🅾️🅾️👉या आधी बदल्या झालेले अधिकारी कोण?*

 

*1. अभिषेक कृष्णा*:- सदस्य सचिव, महा. जीवन प्राधिकरण मुंबई यांची संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

*2. अविनाश पाठक* :- जिल्हाधिकारी, बीड यांना व्यवस्थापकीय संचालकपदी, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

*3. विवेक जॉन्सन*:- मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर यांना बीड येथे नियुक्त करण्यात आले आहे.

*4. शुभम गुप्ता*:- सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांना व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

*5. पुलकित सिंग*:- सहाय्यक जिल्हाधिकारी, अंबड उपविभाग, जालना यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

*👉🛑🛑👉गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राजेंद्र भोसले यांची पुण्याचे नवे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी पुणे महापालिका आयुक्तपदी असलेल्या विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली होती. त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती.*

 

*👉🟥🟥👉विक्रम कुमार हे त्यापूर्वी पुणे महापालिका आयुक्त होते.त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. ते २००४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या कुमार यांची जुलै २०२० मध्ये पीएमसी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आणि नंतर १५ मार्च २०२२ रोजी ते प्रशासक बनले होते.तर त्यांच्याजागी पुणे महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली होती. आता राजेंद्र भोसले हे ३१ मे २०२५ रोजी सेवेतून निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी नवल किशोर राम यांची पुणे महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*

 

*👉🛑🟥🛑कोण आहेत नवल किशोर राम?*

 

*नवल किशोर राम हे यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत.त्यांची सौरभ राव यांच्या जागी एप्रिल २०१८ मध्ये नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली होती.याआधी नवल किशोर राम यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ,बीड,औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारीपदानंतर त्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती.*

 

*👉🛑🛑👉नवल किशोर राम हे २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत. सन २००७ मध्ये ते आएएस झाले आणि त्यांची आयएएसमध्ये निवड झाली. राम यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले.*

 

*👉🔴🔴👉पुढे ते बीड आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. २०२० मध्ये नवल किशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. कोरोना संकाटाच्या काळात त्यांनी स्वतः गावोगावी जाऊन भेटी दिल्या होत्या. देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे.त्यामुळेच पुण्यातून त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर त्यांची नियुक्ती पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आलेली आहे. कोरोना काळातील त्यांचं काम पुणेकरांनी जवळून बघितल्याने एक चांगला अधिकारी लाभल्याच्या सर्वांच्या भावना आहेत.*

श्री काटेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची २८ वर्षांनी पुन्हा दहावीच्या वर्गाची भरली शाळा. १९९६-९७ मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा

इंदापूर तालुक्यातील काटी येथील श्री काटेश्वर विद्यालयाच्या २८ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते श्री काटेश्वर विद्यालय काटी(ता.इंदापुर,जि.पुणे) हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.

काटी (ता.इंदापुर) येथील श्री काटेश्वर विद्यालय काटी हायस्कूलमध्ये १९९६-९७ साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच इंदापूर तालुक्यातील लोणी- देवकर आणि पळसदेव यांच्या मध्यभागी व उजनी धरणाच्या निसर्ग रम्य वातावरणात श्री काटेश्वर विद्यालय काटी च्या १९९७ घ्या बॅचमधील विद्यार्थी, उद्योजक रणजीत बोराटे यांच्या निसर्गरम्य देवराई फार्म या ठिकाणी पार पडले. या स्नेहसंमेलनात ७० पैकी ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच घनश्याम सोमा लोंढे, पांडुरंग विठोबा खंडागळे ,अशोक बाबुराव सरताळे, पांडुरंग महादेव सपकळ, अनिल महादेव सोनटक्के हे शिक्षक उपस्थित होते.

*शिक्षकाला बोलवून त्याची आठवण विद्यार्थिनी ठेवणं याचा अभिमान वाटतो . – अनिल सोनटक्के*

श्री काटेश्वर विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना अनिल सोनटक्के सर म्हणाले की, स्नेहसंमेलनाचा आयोजन करून त्यात शिक्षकाला बोलून त्याची आठवण ठेवणे, आदर ठेवणे हे शिक्षकासाठी फार मोठा अभिमान वाटतो. शिक्षक कुठलाच मनात डुंक धरून विद्यार्थ्याला शिक्षा करत नसतो. त्याच्या भवित्यासाठी तो शिक्षा करत असतो. शिक्षकांना शिक्षकांबरोबर पालकांची सुध्दा फार मोठी जबाबदारी आहे .आपण मुलींना वेळेत घरी ये म्हणून सांगतो, तसे मुलाला सुद्धा विचारतो का? पालकांचं गरजेचं आहे. आपल्या शाळेचा अभिमान असला पाहिजे. आजकाल शिक्षण तेच आहे पण विद्यार्थ्यांचे पालक थोडी विद्यार्थ्याला शिक्षा केली तर शिक्षकाच्या अंगावर जातात ,त्यांना मारहाण करतात हे शिक्षण क्षेत्रात फार हानिकारक आहे असे सोनटक्के सर यांनी मार्गदर्शन करताना बोललेले.

*विद्यार्थ्याला चांगली शिस्त लागावी म्हणून शिक्षक प्रयत्न करत असतो- अशोक सरताळे*

श्री कटेश्वर विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असताना सरताळे सर येणार म्हणले की, विद्यार्थी वर्गामध्ये सरताळे सर यायचे म्हणाले की, चीभ चावायचा कारण की, आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असताना चांगली शिस्त लावायचा प्रयत्न करतो. कारण का तो विद्यार्थी आदर्श घेण्याजोगा विद्यार्थी यशस्वी व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. मी सध्या फार स्टेजवर नसतो पण त्याच्या पाठीमागे मात्र मोलाची कामगिरी बजावत असतो. असे आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच पुढे बोलताना म्हणले, तुम्ही पालक आहात, तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कार घडवा. कारण की आताचे मुले शिक्षकाला खेटून जातात. अशा भावना सरताळे सर यांनी व्यक्त केल्या.

*जे पेरलं ते चांगलं रुजलं आणि ते दर्जेदार उगवलं आणि त्याची फळे आता आम्ही चाकतोय याचा अभिमान आहे- पांडुरंग सपकाळ सर*

आताच्या डिजिटल युगामध्ये शेजारचा माणूस शेजारच्याची बोलण्यास वेळ नाही. सतत मोबाईल मध्ये दंग असताना आम्ही जे शिक्षण दिले, आमचे विद्यार्थ्याला घडवलं ते जे पेरलं ते चांगलं रुचलं, चांगले दर्जेदार उगवलं, त्याची फळ आज आम्हाला चाकायला मिळतात म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवून आमचा सत्कार केला, सन्मान केला, आमचा आदर केला, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.आदर्श पिता झालाय, आदर्श विद्यार्थी झाला.मोठ्या हुद्द्यावर काम करतात. तरीही आज आपण समाजाच्या साठी, आपल्या परिवारासाठी, मित्रांसाठी किंवा इतर सामाजिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रात काम करण्यास तुमची धडपड करतात, हे खूप कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणले, खूप छान वाटलं विद्यार्थ्यांनी अतिशय परखड, रोखठोक मनोगत व्यक्त केले,

*तुमचं आणि आई-वडिलांचे संबंध जपा – घनश्याम लोंढे सर*

श्री काटेश्वर विद्यालय काटी येथे विद्यार्थ्यांना घडवत असताना, शिक्षण देत असताना,अनेक विद्यार्थी आता अनेक मोठ्या हुद्द्यावर आहेत. शिक्षणसाठी बाहेरगावी गेलेले आहेत. नोकरीसाठी बाहेरगावी गेले आहे.काही जणांची शेती व्यवसाय मोठा आहे. ते भेटतात, विचारपूस करतात आनंद वाटतो. पण गेली कित्येक दिवस मी त्या विद्यार्थ्यांच्या मुलांनाही भेटलो, अनेक जणांना प्रश्न विचारले पण ते उत्तर अजून पर्यंत कोणी देऊ शकले नव्हते.

पण काटी गावातील शरद गोरे यांचा मुलाला मी जो प्रश्न विचारला त्यांनी अवघा काही क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिले मी अक्षरशः त्याच्या मुलाला मी छातीला पाच मिनिटे कवटाळून धरले. मला आनंद वाटला की, माझ्या विद्यार्थ्याच्या मुलांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. घडणे आणि बिघडणे याच्यात एका शब्दाचा फरक आहे, म्हणजे बि आयुष्याचे गणित म्हणजे थोडक्यात एक उदाहरण सांगतो. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी म्हणजे आपलं आयुष्य आहे. आयुष्यात जगत असताना माता आपल्या जन्म देते, संस्कार देते, वाढवते तर माती आपल्या उदरात घेते‌ आयुष्य मुक्तपणे आनंदात जागा असे त्यांनी मार्गदर्शन केले.

*पाया भक्कम असल्यास इमारत दर्जेदार होते – पांडुरंग खंडागळे*

इमारतीचा पाया जर भक्कम असला तर इमारत दर्जेदार होते आणि अनेक वर्ष टिकते तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाचा पाया जर भक्कम असला तर विद्यार्थी नक्कीच चांगला घडतो. काटीच्या श्री काटेश्वर विद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी पोलीस खात्यात, विविध क्षेत्रात ,परदेशात मोठ्या हुद्द्यावर काम करतात याचा आमच्या सारख्या शिक्षकाला छाती भरून येते, अभिमान वाटतो .आपल्या मुलाबाळांना चांगलं लक्ष द्या. चांगले संस्कार द्या. चांगले शिक्षण द्या. व्यसनापासून दूर राहा. आम्हाला यातच खूप मोठा आनंद आहे.याच परीक्षा शिक्षण घेतलं आणि ह्याच परिसरात नोकरी केली आणि अनेक विद्यार्थी माझ्या हातून आदर्शवत घडले याचा मला अभिमान वाटतो. सिंह संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना पांडुरंग खंडागळे सर यांनी आपले विचार व्यक्त केले .

 

 

सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आल्यानंतर प्रथम उत्कृष्ट नाष्टा ,त्यानंतर कोल्हापुरी फेटे बांधून स्वागत. देवराई फार्म मधील उत्कृष्ट अशी रेल्वे टाईप मिनी निसर्ग बसमधून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांना कार्यक्रमाच्या सभागृहाकडे घेऊन जात असताना वेगळाच आनंद सर्वांचे चेहऱ्यावर दिसत होता.

स्नेंहसंमिलाची सुरुवात विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचं गुरुवर्य उपस्थित शिक्षक यांच्या हातचे पूजन करण्यात आले. प्रथम जे शिक्षक व विद्यार्थी यांचे निधन झालं आहे, त्यांना तसेच जम्मू काश्मीर येथील पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिक व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला.

देवराई सभागृहामध्ये कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर शाळेमध्ये ज्या पद्धतीचे दुपारचे जेवण करतो, त्या पद्धतीचं अतिशय रुचकर, उत्कृष्ट, स्वादिष्ट भोजन विद्यार्थी यांनी शिक्षकांसोबत केले आणि त्यानंतर गप्पागोष्टी केल्या. कार्यक्रमाचा समारोप केला. आभार व्यक्त केले, पुढील स्नेहसंमेलन पुढील वर्षे अतिशय जोमदारपणे करू संकल्प करून कार्यक्रमाचे सांगता केली .

या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी विद्यार्थी नात्यांनी प्रज्ञा खाडे ,सारिका भोसले ,कैलास पवार, धनंजय गायकवाड रणजीत बोराटे, प्रकाश कुलकर्णी,युवराज मिसाळ, जयदीप ननवरे, प्रशांत साखरे,शरद गोरे, मेजर दत्तात्रय तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्याचं उपस्थित शिक्षकाने कौतुक केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नितीन वाघमोडे सर यांनी केले तर आभार तुकाराम मोहिते यांनी मानले .

श्री काटेश्वर विद्यालय काटी सन १९९६-९७ या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यामागे काटीकरांचे आणि काटी गावातील विद्यार्थ्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला . श्री काटेश्वर विद्यालयामध्ये रेडा, निरा भीमा कारखाना, शेटफळ हवेली, पंधारवाडी ,वरकुटे, मोहितेवस्ती, जाधववाडी,यादवस्ती अशा काटी परिसरातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. अतिशय उत्कृष्ट नियोजन आयोजन केल्याबद्दल उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी काटीकर विद्यार्थ्यांची कौतुकानी पाठ थोपटली.
_____
फोटो ओळी:-

इंदापूर: श्री काटेश्वर विद्यालय काटी(ता . इंदापूर,पुणे) मधील सन १९९६-९७ दहावीचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी उपस्थित (छायाचित्र कैलास पवार)

दृढ, समाधानी वैवाहिक आयुष्याची सुरुवात पारदर्शक संवादातून- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन

पुणे, १८: दृढ आणि समाधानी वैवाहिक आयुष्याची सुरुवात ही योग्य मार्गदर्शन आणि पारदर्शक संवादातून होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून तरुणांना या दिशा दाखविण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी केले.

तरुणांना पूर्व-विवाह सशक्त मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा पाया मजबूत व्हावा या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने गणेश क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे पूर्व-विवाह समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नामदेव समाजउन्नती परिषद, पुणे शहर यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाला १ हजार ६०० हून अधिक युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील म्हणाल्या, पूर्व-विवाह समुपदेशन उपक्रम म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची दिशा आहे. समाजातील अधिकाधिक तरुणांपर्यंत हे मार्गदर्शन पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. नामदेव समाजउन्नती परिषदेच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला, याबद्दल त्याचे श्रीमती पाटील यांनी आभार मानले.

सदरचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जनजागृती, समुपदेशकांचे नियोजन, कार्यक्रम स्थळ व्यवस्थापन, सहभागी तरुणांचे समायोजन आणि कार्यक्रमातील गुणवत्तेची खात्री आदी बाबीवर भर दिला.

*प्री-मॅरिटल कौन्सेलिंग म्हणजे काय?*

प्री-मॅरिटल कौन्सेलिंग म्हणजे विवाह-पूर्व जोडप्यांनी प्रशिक्षित समुपदेशकासोबत संवाद साधून परस्पर समज, संवाद कौशल्य, मतभेदांचे निराकरण, आर्थिक नियोजन, भावनिक समज आणि कुटुंब नियोजन या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन घेणे. या समुपदेशनातून नात्यात पारदर्शकता, विश्वास व परस्पर समज वाढवण्यास मदत होते.

*युवा पिढीसाठी का आवश्यक आहे?*

आजच्या तरुण पिढीसमोर करिअर, ताणतणाव, अपेक्षा आणि नात्यांतील गुंतागुंत यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशन त्यांना स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी, वास्तववादी अपेक्षा ठेण्यासाठी आणि यशस्वी वैवाहिक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरते.

*जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेच्या समुपदेशन केंद्रात मोफत सेवा उपलब्ध*

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या समुपदेशन केंद्रात युवक-युवतींसाठी मोफत पूर्व-विवाह समुपदेशन सेवा उपलब्ध असून, ही सेवा सर्वांसाठी खुली आहे. विशेषतः ज्यांना विवाहपूर्व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, अशा सर्वांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या केंद्रावर प्रशिक्षित समुपदेशकांच्या मार्गदर्शनाखाली संवाद, समज आणि विश्वास या गोष्टींवर भर दिला जातो.

गृह विभागाचा मोठा निर्णय, पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार; फक्त काही अटी पूर्ण कराव्या लागतील राजपत्र जारी

*मुंबई :-राज्यातील गुन्हेगारी सातत्याने वाढ होतानाचा चित्र पाहायला मिळत असून सध्या सायबर गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे. एकीकडे गुन्हेगारीत वाढ झाली असताना दुसरीकडे पोलिसांवरील ताण-तणाव आणि कामाचा अतिरिक्त भार वाढतच आहे.वाढत्या नागरिकरणावर आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा अपुरी पडत असून पोलीस खात्यात भरती करण्याची मागणीही गृहखात्याकडे केली जाते. दरम्यान, आता वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अपुऱ्या पोलीस मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलिस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, गृहविभागाने पोलिस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत. यापूर्वी, केवळ पोलीस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अधिकार होता. आता, पोलीस वरिष्ठ हवालदार यांनादेखील गुन्ह्याचा तपास करता येणार आहे. मात्र, त्यासाठी काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत.*

*👉🔴🔴👉राज्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्यात अधिकार गृह विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राजपत्र जारी करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी काही अटही घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार, पोलिस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा, त्यांनी 7 वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी. त्यासोबतच, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथील 6 आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे राहणार आहे.जर पोलीस हेड कॉन्स्टेबलने या सर्व अटी पूर्ण केल्या असतील त्यांच्याकडे गुन्ह्यांचा तपास दिला जाईल.असा पोलिस वरिष्ठ हवालदार गुन्ह्याचा तपास करणार असल्याचं राजपत्रात स्पष्ट करण्यात आलंय.तर राज्य शासनाच्या गृह विभागाने 9 मे रोजी राजपत्र जारी करत निर्देश दिले आहेत.तसेच सध्या पोलीस दलात उच्चशिक्षित तरुण भरती होत आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाची दखल घेऊन, त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल आणि गुन्हे उकलीचा आलेखही वाढेल, असा विश्वास गृह खात्याला आहे.*

*👉🟥🟥👉शहरी भागात अपुरे मनुष्यबळ जरी असले तरी अधिकाऱ्यांची संख्या ही व्यवस्थित आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास हा पोलिस उपनिरीक्षक पदापासून वरील पदाधिकाऱ्यांकडे दिला जातो. मात्र, ग्रामीण भागात अपुऱ्या मनुष्यबळाबरोबरच अधिकाऱ्यांची संख्या देखील कमी आहे. अशात एकाच अधिकाऱ्याकडे अनेक गुन्ह्यांचा तपास दिल्याने अधिकाऱ्यांवरील ताणही वाढत असून गुन्हे उकलीचे प्रमाणही कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच आता पोलिस दलातही उच्चशिक्षित तरुण भरती झाल्याने त्यांच्या अनुभवाची दखल घेऊन, त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. ज्यामुळे अधिकाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल, आणि गुन्हे उकलीचा आलेखही वाढेल, असा विश्वास गृह खात्याला आहे. त्याच अनुषंगाने गृहविभागाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.*

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती

 

*मुंबई:-राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानुसार, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग मुंबई या ठिकाणी झाली नियुक्ती देण्यात आली आहे. तर, पुणे ग्रामीणच्या पंकज देशमुख यांना पुणे शहर अपल पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. आयपीएस मोक्षदा पाटील यांना राज्य राखीव पोलीस बल गटाच्या समादेशक पदावरुन पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.*

 

*👉🔴🔴👉पोलीस उप महानिरीक्षक” श्रेणीत पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “पोलीस अधीक्षक” श्रेणीतील “निवडसूची-2025” मध्ये समाविष्ट, पुढील तक्त्यातील स्तंभ (2) मध्ये नमूद भा.पो.से. अधिकारी यांची, स्तंभ (3) मध्ये निर्दिष्ट पदावरुन, स्तंभ (4) मध्ये नमूद पदावर पदोन्नतीने, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार, याद्वारे, पदस्थापना करण्यात येत आहे, असे म्हणत आयपीएस अधिकाऱ्यंना पदोन्नती देण्यात आली आहे. शासनाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने ह्या पदोन्नती बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भातील शासन आदेश, आस्थापना मंडळ क्र.1 च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला आहे.*

 

*👉🔴🔴👉खालील 14 पोलीस अधीक्षकांना पदोन्नती*

 

1) प्रसाद अक्कानवरु

2) पंकज देशमुख

3) अमोघ गावकर

4) जी. श्रीधर

5) मोक्षदा पाटील

6) राकेस कलासागर

7) प्रियंका नारनवरे

8) अरविंद साळवे

9) सुरेश कुमार मेंगडे

10) धनंजय कुलकर्णी

11) विजय मगर

12) राजेश बनसोडे

13) विक्रम देशमाने

14) राजेंद्र दाभाडे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार तर काही ठिकाणी स्वबळावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:-आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत.त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येऊ, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.*

*👉🟥🟥👉राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १२० दिवसांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. सरकार आवश्यक ते सहकार्य करेल.*

*👉🟥🟥👉ही निवडणूक कार्यकर्त्यांची…*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ते दीर्घकाळ काम करतात, त्यांना निवडणूक लढवावी, असे वाटणे साहजिकच आहे. अपवादात्मक ठिकाणी जेथे स्वतंत्र निवडणूक लढू, तेथे एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू. मात्र, जास्तीतजास्त ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असेल.*

*👉🔴🔴👉एकनाथ शिंदे म्हणतात,आताही एकत्रच लढणार*

*आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढलो. आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.*

*👉🟥🟥👉’आधी लढाई अन् नंतर दिलजमाई’*

*सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महायुती एकत्र राहिली तर मोठे यश मिळेल असे म्हटले जाते. मात्र, सोबतच एकत्र लढल्याने महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर, ‘आधी लढाई अन् नंतर दिलजमाई’ असे सूत्र असू शकते असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आजच्या विधानाने मिळाले आहेत.*

*👉🔴🔴👉महायुतीत एकत्र लढणे कुठे-कुठे असेल अपरिहार्य?*

*महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीसे निराशेचे वातावरण आहे. तर राज्य आणि केंद्रात सत्ता असल्याने महायुतीचे मनोबल उंचावलेले आहे. राज्यात गेल्या सात ते आठ वर्षांपासून बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. महायुतीत इच्छुकांची गर्दी प्रचंड असेल. अशावेळी याही निवडणुकांना महायुती एकत्रितपणे सामोरे गेली तर ठिकठिकाणी वादाच्या ठिणग्या पडतील आणि त्याचे चटके महायुतीला बसण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ‘आधी बेकी, मग एकी’ या स्वबळाच्या फॉर्म्युल्याचे सुतोवाच केले असे म्हटले जाते. सगळीकडेच महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढतील अशी शक्यता नाही. मुंबई, पुणे, नाशिकसह काही महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये महायुती करणे अपरिहार्य असेल असेही म्हटले जाते. सगळीकडेच स्वबळावर महायुती लढली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकेल.*

चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनीअर कॉलेज 11वी 12वी ला ऍडमिशन आजच का घ्यावे यासाठी हा लेख वाचाच.

काल नुकताच दहावीचा निकाल लागला,अनेकांना ९० ते १००% गुण मिळाले,तर काहींना अपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळाले…भरभरून मार्क्स ची उधळण मार्कलिस्ट वर दिसून आली….प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याने मिळविलेल्या गुणांचा सार्थ अभिमान वाटला असेल . ‌ तो वाटला हि पाहिजे💥पालकांनो सजग व्हा …!*

*जागृत व्हा..! दहावीच्या मार्क्सनी हुरळून जाऊ नकात…!* .पण हे मिळविलेले गुणांची आता आपण सत्यता पाहू यात..

एका मुलाला ४५६ गुण मिळाले अस आपण आता गृहीत धरू यात….म्हणजे त्याच्या गुणांची टक्केवारी ४५६*१००/५००=९१.२० गुणपत्रिकेवर आलेली असेल…हे झाले त्याचे बेस्ट ऑफ फईव चे गुण… म्हणजे त्याला ६ पैकी ५ विषयातील सर्वात जास्त असलेले गुण धरलेले…या सहा विषयात त्याला न कष्ट करता मिळालेले प्रॅक्टिकल चे आयते प्रत्येक विषयाचे २० गुण म्हणजे ते १२० गुण… म्हणजे ४५६-१२०=३३६ गुणांचीच लेखी परीक्षा दिलेली आहे..

आता प्रत्येक पेपरची आपण कठिण्यपातळी विचारात घेऊ यात…सर्व पेपर्स मध्ये तेथेच उतारा,तेथेच प्रश्न ,एका वाक्यात उत्तरे,गाळलेल्या जागा भरा असे ऑब्जेक्टीव्ह टाइप प्रश्न..!त्यात दीर्घ उत्तरे वगैरे खूप कमी …

आता हेच ४५६ च्या ऐवजी त्या विद्यार्थ्यचे सर्व विषयाचे गुण घेऊ यात …५२४ गुण घेऊ यात…५२४*१००/६००=८७.३३ ते गुण होतील..

आता आपण ५२४-१२०=४०४ गुण होतील..(१२० प्रॅक्टिकल चे आयते गुण, प्रत्येक विषयाचे २० प्रमाणे गुण) आता या ४०४ ची टक्केवारी आपण पाहू यात ४०४*१००/४८०=८४.१६ ℅ होतात…

बेस्ट ऑफ फाईव्ह एवढे आत्मघातकी गुण आहेत की यावर पालक म्हणून आपण विचार केला पाहिजे, या गुणांच्या आधारे अनेकांना लातूर ,कोटा,नांदेड अशा ठिकाणी जाण्याचे वेध लागले असतील,पण या खाजगी वर्गांना पाठविण्यापुर्वी आपणच आपल्या मुलांचे गुण तपासले पाहिजेत,जरी बोर्ड म्हणत असेल की सर्व परीक्षा आम्ही कॉपी मुक्त राबविली आहे,तरी काही ठिकाणी परिस्थिती वेगळी होती…आपल्याला त्या विषयात जायचे नाही..आपल्याला उद्याचा होणार खर्च पहायचा आहे..लातुर ,कोटा येथील खाजगी क्लासेस च्या जाहिराती पाहुन आपले पल्या या गुणांच्या आधारे या ठिकाणी जाण्याचा,प्रवेश घेण्याचा नक्की विचार करतील..पण पालक म्हणून आपण या सर्व गुणांची पडताळणी स्वतः करा मग ठरवा…आज लातूरला खाजगी क्लाससाठी पल्याला तेथे ठेवायचे म्हटले तर किमान रोजचा खर्च १४०० रु आहे…आणि तो किमान ५०० दिवस होणार आहे..(त्यात ट्युशन फी,शाळेची फी,होस्टेल, पुस्तके ,वह्या,जाणेयेणे व इतर किरकोळ खर्च यांचा समावेश आहे)

आजचा पाल्य तेथे शिकविणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता काय आहे? असलं काही पहात नाही,तो पहातोय की तेथील वातावरण,बिल्डिंग एखादया चित्रपटातील कॉलेज प्रमाणे आहे का..! बस झालं..आजच्या लेकरांना जाहिरातीतील चित्रांचे एवढं अनुकरण करायची सवय झाली आहे की ही पिढी वास्तव समजून घेयला तयारच नाही..समजा एखाद्या मुलाने नीट किंवा जेजेई साठी या बेस्ट ऑफ फाईव्ह च्या गुणांवर लातूर , कोटा किंवा अशा इतर महागड्या ट्युशन क्लास साठी प्रवेश घेतला आणि दोन वर्षात साधारण ८ ते ९ लाख घालविले आणि त्याला नीट ला किंवा इतर परीक्षेमध्ये ५०० च्या आत मार्क्स पडले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही,त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या गावातच राहून उपलब्ध साहित्याचा आधार घेऊन,युट्यूब किंवा नेट च्या मदतीने प्रॉपर अभ्यास केला तर एखाद्या महागड्या क्लासला जाऊन जेवढे मार्क्स पडतात त्यापेक्षा जास्त मार्क्स तो घरच खाऊन घेऊ शकतो हे ही एक सत्य आहे…या महागड्या क्लास ची फी देण्यापेक्षा चेतना इंटरनॅशनल स्कूल ला दोन वर्षात जेवढी बचत होते त्यातून आपण जरी मार्क्स नाहीत पडले तर एखाद्या चांगल्या कॉलेज मध्ये फी भरून प्रवेश घेऊ शकतो हे देखील एक सत्य आहे,आणि पालक १२ वी झाल्यावर मग म्हणतात असे केले असते तर बरे झाले असते…

पालकांनो आजच वरील सर्व गुणांचा विचार करा…निर्णय घेताना माझा हा लेख नक्की आपल्याला मदत करेल..याची मला खात्री आहे…आपली प्रतिक्रिया वाचायला किंवा ऐकला नक्की समाधान वाटेल..थोडं वास्तवदर्शी लिहिलं आहे..त्यामुळे प्रत्येकाच्याच पचनी पडेल असे नाही…पण आज त्याची गरज होती म्हणून हे शब्द मेंदूतून पाझरले…

धन्यवाद आपलाच उदय देशपांडे विलास भोसलेसर सोमनाथ मानेसर

error: Content is protected !!