Home Blog Page 32

विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. १४: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तसेच विभागातील सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हास्तरावर महसूल, पोलीस, जलसंपदा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग आदींनी समन्वयासाठी बैठक घ्यावी. औषधे आणि रास्तभाव दुकानातील अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जलसंपदा विभागाने सीडॅक प्रतिमान उपयोगात आणून पूरस्थितीची माहिती देण्याचे नियोजन करावे. आवश्यक उपाययोजनांसाठी हवामान विभागाशी संपर्क ठेवावा. जलसंपदा विभागाने पुणे विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे. आवश्यक तेथे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने आंतरराज्य बैठका तातडीने घ्याव्यात. जलसंपदा विभागाने पूर परिस्थितीचा नेहमी सामना करणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मागील वर्षीच्या कामगिरीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफला धन्यवाद देऊन डॉ. पुलकुंडवार म्हणाले, एनडीआरएफने पुण्यासाठी २ पथके कायमस्वरूपी ठेवावीत आणि एक पथक राखीव असावे. तर कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यात प्रत्येकी एक पथक असावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर परिस्थितीत वाहतूक वळविण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी विभागातील नियोजनाविषयी माहिती दिली. पूरस्थितीची पूर्व कल्पना देण्यासाठी जलसंपदा विभागाने सीडॅक आणि हवामान विभागाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.

बैठकीला आरोग्य, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, एनडीआरएफ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या,

राज्यातील आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या,

*👉🔴🔴👉रविंद्र शिसवे गुप्तवार्ता विभागात तर शारदा निकमांची बदली नार्कोटिस्क कंट्रोल ब्युरोमध्ये*

 

*मुंबई:-राज्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे.तर शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.*

 

*👉🔴🔴👉राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचा धडाका सुरू झाल्याचं दिसतंय. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही आदेश देण्यात आले आहेत. सध्या राज्यातील आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.*

 

*👉🟥🟥👉रविंद्र शिसवे हे या आधी मुंबईतील लोहमार्ग पोलिस आयुक्तपदी कार्यरत होते. त्यांची बदली आता राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नागपूर शहराचे पोलिस सहआयुक्त निसार तांबोळी यांची बदली ही राज्य राखीव पोलिस दलाच्या महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलिस आयुक्त एन डी रेड्डी यांची बदली नागपूर शहराच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे.*

 

*👉🔴🔴👉कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?*

 

*⭕⭕रविंद्र शिसवे – सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग*

*⭕⭕शारदा वसंत निकम -विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स*

*⭕⭕निसार तांबोळी – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल*

*⭕⭕एन डी रेड्डी – पोलिस सहआयुक्त, नागपूर*

*⭕⭕सुप्रिया पाटील-यादव – विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना*

*⭕⭕राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा*

*⭕⭕अभिषेक त्रिमुखे – विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन*

 

*👉🔴🔴👉वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांची बदली करण्यात आली असली तरी ठिकाणी अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. त्यांच्या बदलीचे ठिकाण नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.*

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताच्या अनेक शहरांवर केले ड्रोन हल्ले; जैसेलमेरमध्ये पाकिस्तानचे दोन ड्रोन भारताने पाडले

नवी दिल्ली;-पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं असून भारताच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले झाल्याची माहिती आहे. पण हे सर्व ड्रोन हल्ले भारताने निकामी केले असून पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडण्याची कामगिरी केली. जैसेलमेरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत. अवंतीपुरामध्येही भारताने तशीच कारवाई केली.*

*👉🟥🟥👉उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाला झाला आहे. त्याला भारताकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची स्थिती आहे. पाकिस्तानने पूंछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही सीमेपलीकडून गोळीबार केला. सीमेपलीकडून ड्रोन डागण्यात आले आहेत. नौगाम हंदवाडा सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने अवंतीपुरा हवाई दल तळावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ते हवेतच नष्ट केले. पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले तेव्हा 15-20 स्फोटांचे आवाज ऐकू आले. कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.*

*👉🔴🔴👉सध्या देशभरातील सातहून अधिक संवेदनशील ठिकाणी लष्करी हालचाली तीव्र झाल्या आहेत. सांबा, जम्मू आणि पठाणकोटमध्ये ड्रोन हालचालींसह गोळीबार आणि ब्लॅकआउटचे वृत्त आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा, उरी, नौगाम-हंदवाडा सेक्टर आणि पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दल पूर्ण दक्षतेने प्रत्येक आघाडीवर प्रत्युत्तरात्मक कारवाईत गुंतले आहेत. जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्येही ड्रोन दिसल्याची पुष्टी झाली आहे. सुरक्षा दलांनी या ड्रोन हालचालींवर तात्काळ कारवाई केली आणि त्यांना निष्क्रिय केले. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.*

*👉🟥🟥👉पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. सुरक्षा दलांनी लगेच प्रत्युत्तर दिले आणि हवेत इंटरसेप्टर क्षेपणास्त्र सोडले. स्फोटाचा हलका आणि सौम्य आवाज दूरवरून स्पष्टपणे ऐकू येतो, ज्यामुळे ड्रोन निष्क्रिय होतो. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू आणि राजस्थानमधील पोखरणमध्ये संशयास्पद ड्रोन घुसखोरी यशस्वीरित्या उधळून लावली. हाय अलर्ट दरम्यान, ड्रोनला अडवण्यात आले आणि निष्क्रिय करण्यात आले, ज्यामुळे संभाव्य धोका टळला. पंजाबमधील तरणतारण परिसरात स्फोटांचे मोठे आवाज येत आहेत. तरण तारण परिसरातही पाकिस्तानने तोफगोळे डागल्याची शक्यता आहे. गुजरातमधील कच्छमध्ये संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.*

जिल्ह्यातील ५३८ पाणंद, शिव रस्ते वापरास खुले-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले करुन घेण्याकरीता ३१ मे पर्यंत अर्ज करावे- जिल्हाधिकारी

पुणे, दि. ५: जिल्ह्यात अतिक्रमित व बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून मोहीम हाती घेण्यात असून माहे एप्रिल २०२५ अखेर एकूण ७०४ कि.मी. लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील गाव नकाशेप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले करुन घेण्याकरीता नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे 31 मे पर्यंत अर्ज करावे, अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.डुडी यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २५ एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणंद, शिव रस्ते लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त व बंद असल्यास ते वापरास खुले करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तहसिलदारांकडे यापूर्वी रस्ते खुले करण्याबाबत प्राप्त अर्जानुसार रस्ते खुले करण्याची कार्यवाही करावी.

भुमीअभिलेख विभागाकडून ग्राम महसूल अधिकारी यांनी ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग याबाबत गाव नकाशे ८ मे अखेर प्राप्त करून घ्यावेत. ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या गाव नकाशात दर्शविल्याप्रमाणे गाडी मार्ग, पायमार्गाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमित व बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करुन त्याप्रमाणे संबंधित भोगवटाधारकांची यादी ९ ते १५ मे या कालावधीत तयार करावी. संबंधित भोगवटाधारक, सहधारक व सरपंच यांची एकत्रित बैठक घेऊन रस्ता खुला करण्याबाबत १३ ते २३ मे या कालावधीत प्रयत्न करावे.

यापद्धतीने कार्यवाही करुनही रस्ता खुला झाला नसल्यास तहसिलदारांनी प्राधान्यक्रमाने रस्ता खुला करण्याबाबतची यादी दिनांक २२ ते ३० मे या कालवधीत तयार करावी. या यादीनुसार भुमीअभिलेख विभागामार्फत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी प्राधान्यक्रमाने मोजणी करुन घ्यावी. शेवटी रस्ता खुला करण्याबाबत भुमीअभिलेख व पोलीस विभागाच्यामदतीने रस्ता खुला करावा.

तहसीलदारांकडून प्राप्त होणाऱ्या यादीप्रमाणे रस्त्यांची मोजणी ही संबंधित उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोफत करावी. याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते खुले करतांना कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त आवश्यक पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षकामार्फत मोफत पोलीस बंदोबस्त पुरवावा. रस्ते वापरास खुले केल्यानंतर त्यांच्या मजबुतीकरणासाठी गट विकास अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या आहेत.

अपात्रते प्रकरणा विरोधात ॲड. पंकज सूर्यकांत कोकणे यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल सचिन शिंदे यांच्या बाजूने

मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 राजपत्रित वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ या पदाकरिता परीक्षा आयोजित केली होती. सदरील परीक्षेमध्ये परीक्षार्थी सचिन अनंत शिंदे या विद्यार्थ्याला पूर्व परीक्षेमध्ये खेळाडू प्रवर्गातून आरक्षण असताना सुद्धा त्या प्रवर्गाचा विचार न करता चुकीच्या कॅटेगिरी मध्ये टाकून अपात्र केले होते.

 

या अपात्रते प्रकरणा विरोधात नाराजी व्यक्त करत सचिन शिंदे यांनी ॲड. पंकज सूर्यकांत कोकणे मार्फत माननीय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT), छत्रपती संभाजी नगर येथे याचिका दाखल केली होती.

 

आज रोजी 09/05/2025 माननीय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT), छत्रपती संभाजीनगर यांनी ॲड पंकज सूर्यकांत कोकणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित खेळाडू प्रवर्गाचा विचार करून पूर्व परीक्षेसाठी पात्र करून मुख्य परीक्षेसाठी बसण्यास परवानगी दिली.

 

सदरील प्रकरणाबद्दल परीक्षार्थी सचिन अनंत शिंदे यांनी माहिती दिली

चेतना ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी – विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के

चेतना फाउंडेशन संचलित, इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखेतील विद्यार्थींच्या बारावीचा निकाल 100% लागला. चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेज मधील ही विद्यार्थ्यांची पहिलीच बॅच व त्यामध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेचे पहिले तीन मानकरी (शेकडा गुणांसह) : प्रथम क्रमांक खान मुनाज्जा मोहम्मदशकील (82.00) , द्वितीय क्रमांक पूजा हनुमंत काळंगे(81.83), तृतीय क्रमांक साक्षी संपत जावळे (81.63), वरील मानकरऱ्यासह उत्तीर्ण झालेल्या 96 विद्यार्थ्यांपैकी सोळा विद्यार्थीना 75% पेक्षा अधिक गुण मिळवुन प्रथम प्राविण्य मिळवले आहे. व इतर सर्व विद्यार्थ्यांनी 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत असे यश संपादन केले आहे. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे व प्राचार्यचे चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे ,सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने यांनी अभिनंदन केले आणि यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

घरात घुसून मारलं!* पाकिस्तानमधील 9 ठिकाणं उद्धवस्त

घरात घुसून मारलं!* पाकिस्तानमधील 9 ठिकाणं उद्धवस्त;

भारतानं मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का दिले?*

 

*👉🟥🟥👉मध्यरात्री 1.28 वाजता पाकिस्तानात घुसले,*

 

*👉🔴🔴👉1.51 वाजता मिशन पूर्ण केले; 23 मिनिटांत खेळ खल्लास*

 

*👉🅾️🅾️👉ज्या क्षणांची प्रतीक्षा तमाम भारतीय करत होते अखेर तो क्षण आलाच. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेनं बदला घेतला आहे.पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं होतं. मात्र हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून या नावामागे अनेक अर्थ दडल्याचे सांगितले जातंय. नाव देण्यामागे नेमकं कारण काय? हे आता आपण जाणून घेऊ.*

 

*👉🔴🟥🔴👉भारतानं मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का दिले?*

 

*जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. या दहशवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं. सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली आहे.या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर ही हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं. दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जिवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता. त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या सांस्कृतिक आणि भावनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ही मोहीम सुरू केली आणि त्यात यश ही मिळवले आहे.*

 

*👉🛑🛑👉भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?*

 

*⭕⭕1). बहावलपूर:-जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर*

 

*⭕⭕2). मुरीदके:- लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय सीमेपासून 30 किमी अंतरावर*

 

*3). सवाई:-लश्कर-ए-तोयबाचा अड्डा सीमेपासून 30 कि.मी.दूर*

 

*⭕⭕4). गुलपूर:-दशतवाद्यांचा अड्डा ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर हल्ल्यावेळी 80 दहशतवादी*

 

*⭕⭕5). बिलाल:- जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ सीमेपासून 35 कि.मी.दूर*

 

*⭕⭕6). कोटली:- नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर 50 दहशतवादी उपस्थित होते.*

 

*7). बरनाला :-दहशतवाद्यांचा अड्डा सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर*

 

*⭕⭕8). सरजाल:- जैश-ए-मोहम्मद चा अड्डा सीमेपासून 8 कि.मी.दूर*

 

*⭕⭕9). महमूना:- हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र सीमेपासून 15 कि.मी.दूर*

 

*👉🛑🛑👉’ऑपरेशन सिंदूर’ची वैशिष्ट्ये -*

 

*⭕⭕1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला*

*⭕⭕2. भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली*

*⭕⭕3. पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त*

*⭕⭕4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध*

*⭕⭕5. ९ तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा*

*⭕⭕6. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही*

*⭕⭕7. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले*

 

*👉🔴🔴👉राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र*

 

*⭕⭕1. पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर*

 

*⭕⭕2. राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र*

 

*⭕⭕3. अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्र*

 

*⭕⭕4. 500 किमी अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची स्काल्पची क्षमता*

 

*⭕⭕5. 1 हजार किमी प्रतितास वेगाने स्काल्प मिसाईल करतं मारा*

 

*⭕⭕6. शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्याने हल्ला यशस्वी*

 

*👉🛑🛑👉ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्रालयानं काय म्हटलं?*

 

*संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्धवस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय 25 आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईळ. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं.*

 

*👉🛑🛑👉पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते ‘ऑपरेशन सिंदूर’-*

 

*पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तथापि, हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे 100 किमी आत करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॉनिटर करत होते. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत.*

 

*⭕⭕सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ केले बेचिराख -*

 

*⭕⭕बहावलपूरमध्ये 250 हून अधिक दहशतवादी*

 

*⭕⭕मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी*

 

*⭕⭕मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी*

 

*⭕⭕कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी*

 

*⭕⭕सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी*

 

*⭕⭕गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी*

 

*⭕⭕भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी*

 

*⭕⭕चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी*

 

*👉🟥🟥👉ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं?*

 

*जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भरतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. या दहशवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं. सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली आहे. या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर ही हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं. दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जिवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता. त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे.*

 

*⭕⭕’ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानकडून बदला घेण्याच्या वल्गना -*

 

*⭕⭕पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेला प्रतिसाद ‘तात्पुरता आनंद’ असल्याची प्रतिक्रिया लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे. त्यात ते पुढे म्हणाले की ‘याचा बदला कायमस्वरूपाच्या दुःखाने घेतला जाईल.’ISPR च्या अधिकृत निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, ‘पाकिस्तान स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल’ आणि भारताच्या हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, या हल्ल्याला ‘अनुत्तरीत सोडले जाणार नाही’.’भारताने तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद… पाकिस्तानी हवाई दलाची सर्व विमाने हवाई हल्ले करत आहेत. सर्व हल्ले भारताने स्वतःच्या हवाई हद्दीतून केले आहेत,’ असे आयएसपीआरच्या निवेदनात पुढे म्हटले आहे. ‘पाकिस्तान स्वतःच्या निवडीच्या वेळी आणि ठिकाणी त्याचे उत्तर देईल. ते अनुत्तरीत राहणार नाही. भारताच्या तात्पुरत्या आनंदाची जागा सततच्या दुःखाने घेतली जाईल,’ असे त्यात म्हटले आहे.*

 

*⭕⭕ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार -*

 

*⭕⭕भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर काही तासांतच सीमेपलीकडून गोळीबार झाला. या गोळीबारमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला.*

 

*👉🔴🔴👉ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईपूर्वी 15 दिवसांत काय घडले?*

 

*⭕⭕22 एप्रिल 2025:- पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला – जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि अनेकांचा जीव घेतला. हल्लेखोरांनी पर्यटकांना धार्मिक ओळख विचारून गोळीबार केला, ज्यामध्ये 26 जण ठार झाले तर 17 जखमी झाले. भारताने या हल्ल्यासाठी ताबडतोब पाकिस्तानला जबाबदार धरले आणि पाकिस्तानी दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा आरोप केला.*

 

*⭕⭕23 एप्रिल 2025:- भारताचा जलद प्रतिसाद – राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) तपास सुरू केला आणि गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, NIA ने पहलगाम हल्ल्याचा तपास हाती घेतला. हल्ल्याचा कट उलगडण्यासाठी एनआयए पथके बैसरन खोऱ्यात तैनात करण्यात आली आणि त्यांनी तपास सुरू केला.*

 

*⭕⭕सिंधू पाणी करार निलंबित – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (CCS) बैठकीत 1960 चा सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील. भारताने पहिल्यांदाच हा करार रद्द केला, ज्याला पाकिस्तानने ‘Act of War’ म्हणून वर्णन केले.*

 

*⭕⭕अटारी – वाघा सीमा बंद- भारताने पंजाबमधील अटारी-वाघा सीमा तपासणी नाका बंद केला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि हालचाल पूर्णपणे ठप्प झाली.*

 

*⭕⭕पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई – भारताने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा (सार्क, वैद्यकीय, इ.) तात्काळ प्रभावाने रद्द केले आणि पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले गेले, ज्याला पुढील आदेशापर्यंत वाढीव मुदत दिली गेली.*

 

*⭕⭕राजनैतिक पाऊल – भारताने इस्लामाबादमधील भारतीय मिशन आणि नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी केली. पाकिस्तान उच्चायोगातील संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करण्यात आले आणि एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश दिले गेले.*

 

*⭕⭕24-27 एप्रिल 2025:-वाढता तणाव आणि राजनैतिक हालचाली- सिंधू जल संधी कराराला स्थगिती दिल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. पाकिस्तानी सैन्याने बारामुल्ला, कुपवाडा, पूंछ आणि अखनूर सारख्या भागात नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार सुरू केला, ज्याला भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हटले. भारतीय लष्कराने याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.*

 

*⭕⭕पर्यटन स्थळांवरील निर्बंध – जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली तर, बैसरण खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली.*

 

*⭕⭕28-30 एप्रिल 2025:- भारताची कडक भूमिका – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा आढावा बैठकीत सशस्त्र दलांना ‘पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य’ दिले आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची वेळ, लक्ष्य आणि पद्धत ठरवण्याचे अधिकार सैन्यावर सोपवले.*

 

*⭕⭕FATF मध्ये कारवाई – भारताने पाकिस्तानला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) मध्ये पुन्हा ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. तांत्रिक गुप्तचर सूत्रांच्या माध्यमातून भारताने पहलगाम हल्ल्यात टीआरएफ आणि लष्कर-ए-तैयबाची भूमिका दर्शविणारे पुरावे सादर केले. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या 20 हून अधिक FATF सदस्य देशांनी भारताला पाठिंबा दिला.*

 

*⭕⭕1 मे 2025:-भारतीय हवाई क्षेत्र बंद – भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले. यासोबतच पाकिस्तानहून येणाऱ्या सर्व टपाल आणि पार्सल सेवा (हवाई आणि जमीन) तात्काळ बंद करण्यात आल्या*

 

*⭕⭕2-6 मे 2025:-जागतिक मध्यस्थी आणि तणाव – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत-पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधला आणि दोन्ही बाजूंना तणाव कमी करण्याचे आवाहन केले.*

 

*⭕⭕7 मे 2025:- ऑपरेशन सिंदूर-‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने PoK मधील मुरीदके, कोटली, मुझफ्फराबाद आणि बहावलपूर अशा नऊ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक लष्करी हल्ले केले. यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि TRF च्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले.*

भारतात ‘मॉक ड्रिल’चा आदेश; पाकिस्तानची झोप उडाली; पाक संरक्षणमंत्र्यांना भारताच्या हल्ल्याची भरली धडकी

नवी दिल्ली:-पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला करुन २६ पर्यंटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करण्याचे काम सुरु केले आहे. तसेच भारत लष्कारी कारवाई पाकिस्तानवर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्ट शब्दांत संदेश दिले होते. त्यातच पाकिस्तानविरोधात भारताची संरक्षण सज्जतेसाठी देशभरात ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले. या नंतर पाकिस्तान आणखी घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत कधीही एलओसीवर मिलिट्री स्ट्राइक करणार असल्याचे म्हटले आहे.*

 

इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, भारत एलओसीवरील कोणत्याही प्वाइंटवर कधीही हल्ला करु शकतो. परंतु पाकिस्तान भारताच्या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देणार आहे. पाकिस्तानने यापूर्वीच पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु भारत त्याला तयार नाही. कारण त्यामुळे नवी दिल्लीच्या निराधार आरोपांमागील सत्य बाहेर येईल. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यापूर्वी पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ता तरार यांनीही, भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या धोका व्यक्त केला होता. पुढील २४-३६ तास महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.*

 

दरम्यान, भारताने ७ मे रोजी नागरी सुरक्षेसाठी हवाई हल्ला, ब्लॅकआउट, नागरिक प्रशिक्षणासह रंगीत तालीम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची भीती पाकिस्तानने घेतली आहे. देशात ५४ वर्षानंतर मॉक ड्रिल होत आहे. यापूर्वी १९७१ मध्ये मॉक ड्रिल झाले होते. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान दरम्यान दोन आघाडींवर युद्ध झाले होते. त्या युद्धाच्या ५४ वर्षानंतर आता मॉक ड्रिल होत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सलग अकराव्या दिवशी शस्त्रसंधीची उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने आठ सेक्टरमध्ये गोळीबार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात दहशतवादविरोधी चर्चा झाली. या चर्चेत रशियाने भारताला ठाम पाठिंबा दिला.*

येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणुक आयोगाला आदेश

नवी दिल्ली:-येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद; पंचायत समिती; नगर पालिका; नगर पंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात पाच वर्षापेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक कार्यरत आहे.*

*👉🛑🛑👉हे संविधानाच्या गाभ्याला विरोध करणारे*

*ओबीसी आरक्षणाबाबत २०२२ मध्ये सादर झालेल्या बांठीया आयोगाच्या अहवालाआधी जे प्रमाण होते, त्यानुसारच आरक्षण देण्यात यावे, असेही स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. “ग्रामस्तरावरील लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही. येथे काही संस्थांमध्ये मागील ५ वर्षांपासून निवडणुका झालेल्याच नाहीत!” असे ताशेरे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ओढले. सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केलं की, राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासंबंधी वादामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. हे संविधानाच्या गाभ्याला विरोध करणारे आहे.*

सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं?

*⭕⭕1) स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत चार आठवड्या नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणूक घ्या*

*⭕⭕२) 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती, त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या*

*⭕⭕३) राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी*

*⭕⭕४) ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता, त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले.*

*⭕⭕५)सप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश.*

*⭕⭕६) पुढील ४ आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा.*

*⭕⭕७) 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार घेण्यात येतील.*

*⭕⭕८) निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती.*

*⭕⭕९) राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा.*

*👉🛑🛑👉कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रशासकाद्वारे या सर्व महापालिकांचा कारभार चाललेला. याविरोधात डिसेंबर २०२१ मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल चार वर्षांनंतर न्या. सूर्य कांत आणि न्या. नाँगमेईकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.*

*👉🟥🟥👉पवारांच्या पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत*

*महापालिका निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत: गेली ४.५ वर्ष महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरुवातीला कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या अडकल्या होत्या. आज सर्वोच्च न्यायालयाने येत्या ४ महिन्यात या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा निर्णय दीला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरद पवार ) या निर्णयाचे स्वागत करीत आहे. आता राज्य सरकारने तातडीने या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाल करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोक प्रतिनिधींच्या हातात द्यावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) राज्य प्रवक्ता अंकुश काकडे यांनी दिली आहे.*

येत्या बुधवारी देशात मॉक ड्रिल; सगळीकडे सायरन वाजणार, नागरिकांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देण्याचे केंद्राचे आदेश

नवी दिल्ली:-पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध ताणले गेलेले आहेत. पाकिस्तान हा देश दहशतवादाला खतपाणी घालतो, अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेली आहे.त्याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.*

सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती येत आहे. येत्या ७ तारखेला, बुधवारी संपूर्ण देशात मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये याच दिवशी सायरन वाजला जाणार आहे. हवाई हल्ल्याचा अलर्ट देणारा सायरन असेल, असा त्याचा अर्थ आहे.*

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर नागरिकांना धोका होऊ नये, यासाठी सर्वसामान्य लोकांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे.*

विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य लोकांना स्वसंरक्षण आणि आपल्या परिसराचं संरक्षण करता यावं, यासाठी केंद्र सरकार प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने सोमवारी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती असून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.*

error: Content is protected !!