Home Blog Page 33

ग्रामपंचायत पिंपरी खुर्द-शिरसोडी ५ मे २०२५ रोजी अविश्वास ठराव पडताळणी करिता विशेष व इलेक्शन

सरपंच ग्रामपंचायत पिंपरी खुर्द-शिरसोडी ५ मे २०२५ रोजी अविश्वास ठराव पडताळणी करिता विशेष ग्रामसभेतील निवडणुकसाठी करण्यात आलेल्या ग्रामसभा व इलेक्शन व्यवस्थितपणे तालुका तहसील अधिकारी जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाने API गावडे साहेब व पोलीस बंदोबस्तामध्ये व इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सचिन खुडे व श्री महेश यादव ग्राम पंचायत अधिकारीयांच्या अध्यक्षतेखाली सीसीटीव्ही कॅमेरा व व्हिडिओ शूटिंग यांच्या निद्राने खाली व्यवस्थितपणे पार पडले नायब तहसीलदार घुगे साहेब यांच्या नियंत्रणामध्ये मतमोजणी संपन्न झाली कोणत्याही प्रकारचा वाद विवाद आपापसातील तंटे झालेले नाहीत सरपंचांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पास झाला

बारावीचा निकाल जाहीर! यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के,

जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?

संपादकीय :-बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात बारावीच्या परीक्षेत कोणत्या विभागाने बाजी मारली आहे हे जाहीर करण्यात आले आहे.यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. गेल्या वर्षीही कोकण विभागाने बाजी मारली होती.*

*👉🅾️🅾️👉नऊ विभागीय मंडळाचा निकाल*

पुणे ९१.३२

नागपूर ९०.५२

छत्रपती संभाजीनगर ९२.२४

मुंबई ९२.९३

कोल्हापूर ९३.६४

अमरावती ९१.४३

नाशिक ९१.३१

लातूर ८९.४६

कोकण ९६.७४

*👉🔴🔴👉कोकण विभाग सर्वात अधिक, तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.*

*गेल्या अनेक वर्षांपासून कोकण विभाग दहावी-बारावीच्या परीक्षेच बाजी मारत आहे. यावर्षीही कोकणाने ही परंपरा कायम ठेवली आहे. तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.मुलांपेक्षाही मुलींचा निकाल जास्त चांगला लागला आहे.*

*👉🅾️🅾️👉कोणत्या शाखेची किती टक्केवारी?*

विज्ञान- ९७.३५

कला- ८०.५२

वाणिज्य- ९२.६८

व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३

आयटीआय- ८२.०३

*👉🟥🟥👉बारावीची परीक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. बारावीची परीक्षा झाल्यानंतर आयुष्यात पुढे काय करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवू शकतो. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळवणे खूप महत्त्वाचे असते. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

इस्त्रायलच्या तेल अवीव विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द

संपादकीय

जेरूसलेम:- इस्त्रायलमधील तेल अवीव शहरातील विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भारताची एअर इंडिया, ब्रिटिश एअरवेज, लुफ्थांसा आणि डेल्टा एअरलाईन्स यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय विमान सेवांचा समावेश आहे. इस्त्रायलच्या तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळावर हा हल्ला झाला आहे. यमनमधील हुथी बंडखोरांनी हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी आठ जण जखमी झाले आहेत.*

*👉🔴🔴👉येमेनमधील हूथी बंडखोरांनी इस्त्रायलच्या दिशेने डागलेली एक क्षेपणास्त्र तेल अवीवमधील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले. हल्ल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. इस्त्रायली आपत्कालीन सेवेनुसार, आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. एअर इंडियाने आपल्या दिल्लीतून तेल अवीवकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व उड्डाणांना 6 मे 2025 पर्यंत स्थगिती दिली आहे. एअर इंडियाने एका निवेदनात सांगितले की, प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असून ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचे काम सुरू आहे.*

*👉🟥🟥👉ब्रिटिश एअरवेजनेही 7 मेपर्यंत BA-405 सहित सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. जर्मनीची लुफ्थांसा, डेल्टा, युरोविंग्स, स्विस, ऑस्ट्रियन, आणि ब्रुसेल्स एअरलाईन्स या कंपन्यांनीदेखील सेवांवर तात्पुरती बंदी घातली आहे. यमनमधील हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, बेंजुरियन विमानतळ आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सुरक्षित नाही, असा इशारा दिला आहे. इस्त्रायलच्या संरक्षणमंत्री इस्राएल कॅट्झ यांनी या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे इस्त्रायलमधील सुरक्षा यंत्रणांमध्ये तणाव निर्माण झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन सुरक्षा उपायांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.*

शिवराज करिअर अकॅडमी इंदापूर येथे आज गुणवंतांचा सत्कार

शिवराज करिअर अकॅडमी मध्ये आज गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. एक मे महाराष्ट्र दिनाचा औचित साधून पोलीस दलामध्ये भरती झालेल्यांचा आज मानसन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय सचिन गायकवाड यांनी भूषवले. महाराष्ट्र दिनाचा अवचित साधून मुंबई व पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिवानी जाधव ,माधुरी जगताप व प्रशांत साळवे यांचा मानसन्मान करण्यात आला.

धेंडे सर यांनी मुलांनी अभ्यासात सातत्य टिकवण्याचा मार्गदर्शन केले. ॲकॅडमीचे संस्थापक सुधीर करगळ सर यांनी मुलांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन केले.

न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 8वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य कैलास खबाले विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर झेंडावंदन करण्यात आले विद्यार्थ्यांना 1मे महाराष्ट्र दिना विषयी माहिती प्राचार्य कैलास खबाले व रणनवरे मॅडम यांनी सांगितले विद्यार्थ्यांनीही महाराष्ट्र दिनाविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रणनवरे मॅडम यांनी केले व आभार सौ.गायकवाड मॅडम यांनी मानले वंदे मातरम घेऊन नंतर कार्यक्रमाच सांगता करण्यात आली

इंदापूर येथील जिल्हा न्यायालय मधील उपाहारगृहाचे अक्षया तृतीया निमित्त उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायाधीश मे. मुधोळकर साहेब यांच्या हस्ते..

इंदापूर येथील जिल्हा न्यायालय मधील उपाहारगृहाचे अक्षया तृतीया निमित्त उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायाधीश मे. मुधोळकर साहेब व इंदापूर संघटनेचे अध्यक्ष गिरीश शहा व इंदापूर वकील संघटनेचे विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला उपहार गृह ची सोय इंदापूर न्यायालयात झाल्याने पक्षकार व कर्मचारी यांची गैरसोय दूर होऊन त्याचा उपभोग पक्षकरांना व वकील बंधू आणि न्यायालयीन कर्मचारी यांना निश्चित प्रकारे होणार आहे इंदापूर येथे न्यायालयाचे नवीन इमारत झालेने व जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर इंदापूर येथे सुरू झाल्याने पक्षकरांची चहापाणी व अल्पोपहारची गैरसोय होत असलेने, आज रोजी इंदापूर न्यायालयातील उपहारगृह वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष अनिल पारेकर यांचे नियोजना खाली सुरू करण्यात आले आहे यावेळी इंदापूर न्यायालयातील न्यायाधीश महोदय मेहरबान तांबे साहेब मेहरबान फारुकी साहेब मेहरबान पाटील साहेब उपस्थित होते.

भारत-पाक सीमेवर हालचाली वाढल्या; शेतकऱ्यांना दोन दिवसात शेत खाली करण्याचे आदेश भारत युद्धाच्या तयारीत?

नवी दिल्ली:-जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. BSF जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे. अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करून शेत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुद्वारातून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत कापणी न केल्यास गेट पूर्णपणे बंद केले जातील, असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ४८ तासांच्या आत आपल्या पिकांची कापणी पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. BSFच्या आदेशानंतर शेतकऱ्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे. पंजाबमधील पठाणकोट ते फाजिल्कापर्यंत ५५३ किलोमीटर लांबीच्या सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. BSF जवानांनी बॉर्डर आणि गावांमधील गस्त वाढवली आहे.*

गावांमध्ये कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास, तात्काळ पोलीस आणि BSF जवानांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. बॉर्डरवर कोणतीही हालचाल दिसल्यास, थेट गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फिरोजपूरमधील कालूवाला हे गाव सतलुज नदीने तीन बाजूंनी वेढलेलं आहे. याच्या एका बाजूला पाकिस्तान आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, भारत-पाकिस्तान तणावामुळे या गावाला नेहमी सर्वात आधी खाली केलं जातं. त्यामुळे येथील नागरिक भयभीत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन तारेच्या कुंपणाच्या पलीकडे आहे, त्यांना लवकर कापणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पंजाबमधील सीमेवरील गावे लवकरच खाली केली जाऊ शकतात.*

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा हल्ला; १० पाकिस्तानी सैनिक ठार

क्वेट्टा:-पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करुन दहा सैनिकांना ठार मारण्यात आले. बीएलएवनुसार हा हल्ला आयईडीच्या माध्यमातून केला गेला. यात पाकिस्तानी सैन्याचे वाहन पूर्ण उद्धवस्त झाले.या भागात अनेक वर्षांपासून बलूच बंडखोरांचा दबदबा आहे. या हल्ल्यासंदर्भात अद्याप पाकिस्तानी आर्मीने कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. बलूच आर्मी मागील काही वर्षांपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे. त्यासाठीच त्यांच्याकडून संघर्ष सुरू आहे. बलुचिस्तान आधी पाकिस्तानचा भागच नव्हता. पण पाकिस्तानी आर्मीने दडपशाही करून या प्रांतावर कब्जा केला.*

बलुचिस्तानच्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. तेव्हापासूनच बलुचिस्तानात असंतोष धुमसत आहे. बलूच आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होत आहेत. आताही ताजा हल्ला आम्हीच केला असे स्पष्ट करत या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने घेतली आहे. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. आमचे हल्ले कब्जाधारी सैन्याविरुद्ध सुरुच राहणार आहे. पाकिस्तानी सैन्यावर रिमोट कंट्रोल आयईडीद्वारे हल्ला केला गेला. या हल्ल्याच शत्रूचे वाहन पूर्ण उद्धवस्त झाले आहे. यात दहा सैनिकांचा मृत्यू झाला.*

राज्यांमधील पाकिस्तानी नागरिक शोधा आणि त्यांना मायदेशी पाठवा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सर्व मुख्यमंत्र्‍यांना सूचना

नवी दिल्ली:-जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानशी संबंधित सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. तसे आदेश गृह मंत्रालयानं दिलेले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांशी चर्चा केली आहे. तुमच्या तुमच्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिक शोधा आणि त्यांना मायदेशी पाठवा, अशा सूचना शहांनी सगळ्या मुख्यमंत्र्‍यांना दिल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.*

*👉🔴🔴👉२२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जण मारले गेले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल समझोता करार स्थगित करण्यात आला आहे. याबद्दलचं औपचारिक पत्र भारताकडून पाकिस्तान सरकारला पाठवण्यात आलं आहे. यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेला व्हिसा रद्द केला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीची बैठक झाली. त्यामध्ये अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. त्यात सिंधू जल समझोता स्थगित करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.*

*👉🟥🟥👉भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९६० मध्ये सिंधू जल सामंजस्य करार झाला. त्यावेळीच तो लागू करण्यात आला. सिंधू नदी पाकिस्तानसाठी लाईफ लाईन आहे. जवळपास २१ कोटींहून अधिक लोकसंख्येच्या पाण्याची गरज सिंधू नदी आणि तिच्या चार उपनद्या पूर्ण करतात. त्यामुळे सिंधू नदी पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाची आहे. भारत सरकारनं अटारी सीमा बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना याच मार्गानं परत जाण्यासाठी १ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या पाकिस्तानी सुरक्षा सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना १ आठवड्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दोन्ही उच्चायुक्तालयातील तैनात कर्मचाऱ्यांची संख्या ५० वरुन ३० आणण्यात आली आहे.*

शिवसेना इंदापूर शहर प्रमुख म्हणून अँड आनंद केकाण यांची निवड तर उपशहरप्रमुख पदी शाबूद्दीन सय्यद यांची निवड 

शिवसेना इंदापूर शहर प्रमुख म्हणून अँड आनंद केकाण यांची निवड तर उपशहरप्रमुख पदी शाबूद्दीन सय्यद यांची निवड

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्ववाचे धगधगते विचार घेऊन पुढे जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते मार्गदर्शक सचिव मा.श्री.संजयजी मोरे साहेब जिल्हाप्रमुख मा.महेशजी पासलकर यांच्या हस्ते व मा सौ सिमा प्रशांत कल्याणकर शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर शहर प्रमुख अँड श्री आनंद केकाण यांच्या सामाजिक कार्याची माहिती घेऊन त्यांची शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली त्याबरोबर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शाबूद्दीन सय्यद यांची उपशहरप्रमुख पदी नियुक्ती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे करण्यात आली यावेळी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!