Home Blog Page 34

नवीन फार्मसी महाविद्यालयांसाठी ना हरकत दाखल्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

नवीन फार्मसी महाविद्यालयांसाठी ना हरकत दाखल्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सुरू होणाऱ्या नवीन फार्मसी महाविद्यालयांना राज्य शासनाकडून ‘ना हरकत दाखला’ (NOC) द्यावा लागणार असून, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत.

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी नवीन तसेच चालू असलेल्या फार्मसी महाविद्यालयांसाठी अर्ज मागवले होते. या परिपत्रकानुसार संबंधित राज्य शासन आणि विद्यापीठाचा NOC आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचे प्रस्ताव स्वीकारले नसल्यामुळे अनेक संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर, काही विनाअनुदानित संस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यामध्ये *ऍडव्होकेट ऋषिकेश अजित मोहिते* यांनी संस्थांच्या वतीने प्रभावी युक्तिवाद सादर करत न्यायालयाकडून राज्य शासनाला NOC देण्याचे आदेश मिळवून दिले.

याआधीही शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अशाच प्रकारच्या प्रकरणात *ऍडव्होकेट मोहिते* यांनी यश मिळवून दिले होते. यावर्षी पुन्हा एकदा त्यांनी हा लढा यशस्वीपणे लढवून संस्थांना न्याय मिळवून दिला आहे.

या यशाबद्दल संपूर्ण राज्यातील फार्मसी क्षेत्रातील विनाअनुदानित संस्थांकडून *ऍडव्होकेट मोहिते यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे*.

डॉ. संदेश शहा यांना डॉ. सॅम्युएल हँनिमन जीवन गौरव पुरस्कार घोषित.

डॉ. संदेश शहा यांना डॉ. सॅम्युएल हँनिमन जीवन गौरव पुरस्कार घोषित.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी च्या वतीने देण्यात येणारा,

होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हँनिमन जीवन गौरव पुरस्कार सन २०२५ – २६ हा इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील डॉ. संदेश शरद शहा यांना घोषित झाला आहे. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. संदेश शहा यांनी इंदापूर शहर तसेच पंचक्रोशीत होमिओपॅथीचा प्रचार करण्यासाठी १०० हून जास्त मोफत होमिओपॅथिक शिबिरे घेऊन ५० हजार हून जास्त रुग्णांना एक महिन्याची औषधे मोफत दिली आहेत. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना सलग तीस वर्ष त्यांनी मोफत होमिओपॅथिक औषधदान केले आहे. ग्रामीण भागात होमिओपॅथीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ११ हून जास्त चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले आहे. कोरोना महामारीत बेड न मिळालेल्या २२० रुग्णांना त्यांच्याच घरी विलगीकरण करून त्यांनी या औषधांचा वापर करून त्यांना बरे केले आहे. एड्स झाल्यानंतर मनुष्य केवळ ५ ते ७ वर्ष जगतो असा सन १९९५ च्या दशकात प्रचार सुरू असताना त्यांनी अनेक रुग्णांचे आयुष्य होमिओपॅथिक औषध देऊन वाढविले आहे. हजारो रुग्णांची त्यांनी मूतखडा या आजारातून मुक्तता केली असून हजारो रुग्णांच्या विविध आजारांच्या शस्त्रक्रिया त्यांनी टाळल्या आहेत.

होमिओपॅथी बरोबरच योग, शाकाहार, शेती, रक्तदान, पत्रकारिता तसेच व्यसनमुक्ती साठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या इंदापूर तालुक्यातील गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी येथे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करून या गावांची तीव्र पाणी टंचाई दूर करण्यास मदत केली आहे. त्यांनी १२०० शेतकऱ्यांना मोफत गट शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. २२०० युवा पिढीस त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. विठ्ठलवाडी येथील ओढा खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी आलेले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर रोटरी क्लब चे अध्यक्ष संदेश शहा यांचा सामाजिक डॉक्टर म्हणून आवर्जून उल्लेख करून त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

पुरस्कार वितरण जून महिन्यात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.

दरम्यान राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, डॉ. संदेश शहा यांना हा पुरस्कार घोषित झाल्याने इंदापूर तालुक्याचा मानसन्मान उंचावला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळणारे डॉ. संदेश शहा हे तालुक्यातील एकमेव डॉक्टर असून त्यांच्या कार्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात डॉ. संदेश शहा यांच्या अनेक मोफत होमिओपॅथिक शिबिराचा मी उद्घाटक म्हणून साक्षीदार आहे. डॉ. बाहुबली शहा तसेच इतर १० ते १५ डॉक्टरांचे शिबिरासाठी तसेच होमिओपॅथीच्या प्रचारासाठी डॉ. संदेश शहा यांना सहकार्य होत होते. संपूर्ण राज्यात मंत्री म्हणून काम करत असताना अनेक ठिकाणी डॉ. संदेश शहा यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख होत होता. त्यांना घोषित झालेल्या या पुरस्काराचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.

दरम्यान राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, मावळत्या नगराध्यक्षा अंकिता शहा, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, जेष्ठ कवयित्री, साहित्यिक प्रतिभा गारटकर, तुषार रंजनकर, वसंतराव मालुंजकर आदींनी डॉ. संदेश शहा यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा ,दीक्षाभूमी अन् संघाच्या स्मृती मंदिराला दिली भेट*

0

नागपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. सकाळपासून मोदींचा नागपूर दौरा सुरु झाला असून ते दिवसभरात विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. रविवारी मोदींचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. नागपूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी 8 वर्षांनी दीक्षाभूमीला भेट दिली. तसेच संघाच्या स्मृती मंदिरालाही त्यांनी भेट दिली.*

*👉🟥🟥👉पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमी स्थळी दाखल झाले आणि यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट दिली. दीक्षाभूमी स्मारकाच्या आतमध्ये असलेल्या गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला मोदींनी अभिवादन केले. तसेच दीक्षाभूमीच्या पवित्र स्तूपांमध्ये बुद्ध वंदना केली. यापूर्वी 2017 रोजी नरेंद्र मोदी नागपूरच्या दीक्षाभूमीला आले होते. 14 एप्रिल 2017 रोजी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती त्यानंतर आठ वर्षानंतर मोदीजी दीक्षाभूमीवर आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाले, याचा मला अभिमान वाटतो.*

*👉🔴🔴👉या पवित्र स्थळाच्या वातावरणात बाबासाहेबांचे सामाजिक समता आणि न्याय यांचे सिद्धांत प्रकर्षाने जाणवतात. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि शोषितांसाठी सन्मान, हक्क आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते, असा संदेश मोदी यांनी दीक्षाभूमीबाबत लिहिला. पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देऊन येथील स्मृति मंदिराला नमन केलं आहे.परम आदरणीय डॉ. हेडगेवार जी आणि आदरणीय गुरुजींना विनम्र अभिवादन. त्यांच्या आठवणी जपत या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनात्मक शक्ती या मूल्यांना समर्पित असलेले हे स्थान आपल्याला राष्ट्रसेवेत पुढे जाण्याची प्रेरणा देते. संघाच्या या दोन भक्कम स्तंभांचे हे स्थान देशसेवेसाठी समर्पित असलेल्या लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जास्रोत आहे. आपल्या प्रयत्नांनी भारतमातेचा अभिमान सदैव वाढू दे, असे मोदीजी यांनी म्हटले.*

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पाठवण्यात आलेल्या 288 महा कुंभ पैकी एक कुंभ इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे पूजनासाठी दाखल

अनुलोमच्या माध्यमातून, प्रयागराज मधून आलेल्या महाकुंभ ची आरती व पूजन, दर्शन इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथील राखुंडे मळा येथे मारुती मंदिरामध्ये पूजन करण्यात आले, यामध्ये वस्तीवरील सर्व ग्रामस्थ गावातील गावकरी इंदापूर मधील युवा उद्योजक किरणजी गानबोठे (बीजेपी शहराध्यक्ष), लखनजी जगताप, (बीजेपी युवा मोर्चा इंदापूर शहराध्यक्ष) नाना घळके सर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंदापूर तालुका कार्यवाहक) अनुलोमचे भाग जनसेवक गोररव जी माने हे उपस्थित होते यांच्या हस्ते महा कुंभचे पूजन करून ब्राह्मण विधी करण्यात आला यामध्ये अनुलोमच्या अंतर्गत करण्यात आले कुंभ चा विधी श्रीराम महाजन (ब्राह्मणकाका )यांच्या हस्ते पूजन व आरती करून दर्शनासाठी ठेवण्यात आलेला होता यामध्ये आरती झाल्यानंतर वस्तीवरील सर्व ग्रामस्थांना महाप्रसाद देण्यात आला यामध्ये महाप्रसादासाठी माजी सरपंच विलास चव्हाण युवा उद्योजक विशाल चव्हाण सामाजिक कार्यकर्ते दत्ता कदम, महामित्र रामवर्मा आसबे, युवा उद्योजक राजू भोसले, हर्षद जवादे, ओम भोसले यांनी सहकार्य केले प्रयागराज मधून आलेल्या कुंभ चे महत्व बीजेपी शहराध्यक्ष किरणजी गानबोटे यांनी सर्व ग्रामस्थांना सांगितले अनुलोम च्या संदर्भातील माहिती गोरखजी माने यांनी ग्रामस्थांना सांगितले

एकेला चलोरे म्हणून बी.एम.सी निवडणूक लढवण्याची तयारी अॅड. श्रीहरी बागल. राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष)

मुंबई, दिनांक रोजी सकाळी अकरा वाजता कोर कमीटी व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या समोर पत्रकार परिषद घेऊन येऊ घातलेल्या महाराष्ट्रील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रमुख पुणे मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक राष्ट्रीय स्वराज्य सेना लढवणार आहे. ना कोणती महायुती व नाही कोणती आघाडी असे म्हणुन एकेला चलोरे म्हणून BMC निवडणूक लढवण्याची तयारी हि आज पासून पदाधिकारी यानी चालु केली आहे. बृहन्मुंबई विभागात राष्ट्रीय स्वराज्य सेनेने १६ ठिकाणी विधानसभा निवडणुक – २०२४ स्वबळावर लढविली होती व नगरसेवक ची निवडणूक रा स्व से ने लढवावी अशी अता लोकामधुन मागणी होत असल्याने राष्ट्रीय स्वराज्य सेना हि इचउ निवडणूक स्वबळावर लढवणार आहे असे अता जाहीर करण्यात येत आहे. Election commission of India नी विधानसभा निवडणुकीत बासरी हे निवडणूक चिन्ह दिले होते. व इचउ निवडणूकीत हि आम्हाला हेच बासरी चिन्ह भेटावे अशी लेखी मागणी हि राज्य निवडणूक आयोगाला व एउख ला करणार असे हि जाहीर करण्यात आले आहे.

अॅड. श्रीहरी बागल. राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष) निवडणूक चिन्ह – बासरी.

चांगली संगत मिळाल्यास यशाचे शिखर गाठता येईल : पी.आय.  मा. सूर्यकांत कोकणे

चांगली संगत मिळाल्यास यशाचे शिखर गाठता येईल : पी.आय.

मा. सूर्यकांत कोकणे

चुकीची संगत संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह शालेय व महाविद्यालयीन जीवनात योग्य लोकांची संगत मिळाल्यास जीवनात निश्चितच यशाचे शिखर गाठता येईल, असे प्रतिपादन पोलीस इन्स्पेक्टर इंदापूर पोलीस स्टेशन माननीय श्री सूर्यकांत कोकणे यांनी केले.

सरडेवाडी इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस इन्स्पेक्टर कोकणे बोलत होते. यावेळी कोकणे यांनी सांगितले की, आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग देशसेवा च समाजसेवेच्या दृष्टीकोनातून केल्यास निश्चित यश मिळेल, यावेळी संस्थेचे सचिव श्री विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्याध्यर्थ्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्रे, विशेष पुरस्कर मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने कितना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ निकिता माने मॅडमआदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी केले सूत्रसंचालन वैष्णवी डोईफोडे आणि गीतांजली कांबळे यांनी केले तर आभार नम्रता मोरे यांनी मानले.

चेतना फार्मसी इंदापूर येथे ट्रॅडिशनल डे निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन

चेतना फार्मसी इंदापूर येथे ट्रॅडिशनल डे निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन

सरडेवाडी इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशातील विविध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी या डेमधून घडवले. बंगाली, घागरा, शेरवानी, नऊवारी साडी, कोळी वेशभूषा, पंजाबी यांसारख्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी या डेचा आनंद लुटला तसेच विद्यार्थ्यांनी विविध थीमद्वारे दुपारच्या सत्रामध्ये मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी गणेश जयंती पंढरपूर वारकरी दिंडी सोहळा तसेच शिवजन्मोत्सव असे विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले. सदर कार्यक्रमाचे संयोजन कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक नम्रता मोरे यांनी पाहिले तर प्राचार्य डॉ सुजित देसाई चेतना फाउंडेशन इंदापूरचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत १४ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि.१३: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० या केंद्र पुरस्कृत योजनेची पुणे विभागात प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भू-शास्त्र विभागाचे सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे गृहनिर्माण विभागामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची नोंदणी करुन त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे तसेच योजनेबाबत जनजागृती आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे, असे गृहनिर्माण विभागाने पत्रकान्वये कळविले आहे.

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई:-दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.*

*👉🅾️🅾️👉मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते.*

*👉🔴🔴👉इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून १८ मार्चपर्यंत ३,३७३ परीक्षा केंद्रावर होणार आहे.तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.*

*👉🔴🔴👉कॉपीमुक्त परीक्षेची अंमलबजावणी*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी , भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे,अशा सूचना दिल्या.*

*👉🅾️🅾️👉विशेष बैठ्या पथकांची नियुक्ती होणार*

*सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठया पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे,संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठया पथकात नेमणूक करावी. असेही त्यांनी सांगितले.*

*👉🔴🔴👉संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर*

*संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराव्दारे आणि व्हिडीओ कॅमेराव्दारे पूर्णवेळ निगराणी करावी,सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग-प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या.*

*👉🔴🔴👉कॉपीमुक्त परीक्षेची जबाबदारी*

*परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील. शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील, त्यानुसार कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षेच्या दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.*

error: Content is protected !!