उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पाठवण्यात आलेल्या 288 महा कुंभ पैकी एक कुंभ इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे पूजनासाठी दाखल
अनुलोमच्या माध्यमातून, प्रयागराज मधून आलेल्या महाकुंभ ची आरती व पूजन, दर्शन इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथील राखुंडे मळा येथे मारुती मंदिरामध्ये पूजन करण्यात आले, यामध्ये वस्तीवरील सर्व ग्रामस्थ गावातील गावकरी इंदापूर मधील युवा उद्योजक किरणजी गानबोठे (बीजेपी शहराध्यक्ष), लखनजी जगताप, (बीजेपी युवा मोर्चा इंदापूर शहराध्यक्ष) नाना घळके सर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंदापूर तालुका कार्यवाहक) अनुलोमचे भाग जनसेवक गोररव जी माने हे उपस्थित होते यांच्या हस्ते महा कुंभचे पूजन करून ब्राह्मण विधी करण्यात आला यामध्ये अनुलोमच्या अंतर्गत करण्यात आले कुंभ चा विधी श्रीराम महाजन (ब्राह्मणकाका )यांच्या हस्ते पूजन व आरती करून दर्शनासाठी ठेवण्यात आलेला होता यामध्ये आरती झाल्यानंतर वस्तीवरील सर्व ग्रामस्थांना महाप्रसाद देण्यात आला यामध्ये महाप्रसादासाठी माजी सरपंच विलास चव्हाण युवा उद्योजक विशाल चव्हाण सामाजिक कार्यकर्ते दत्ता कदम, महामित्र रामवर्मा आसबे, युवा उद्योजक राजू भोसले, हर्षद जवादे, ओम भोसले यांनी सहकार्य केले प्रयागराज मधून आलेल्या कुंभ चे महत्व बीजेपी शहराध्यक्ष किरणजी गानबोटे यांनी सर्व ग्रामस्थांना सांगितले अनुलोम च्या संदर्भातील माहिती गोरखजी माने यांनी ग्रामस्थांना सांगितले