Home Blog Page 35

कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी राज्य शिक्षण मंडळामार्फत विविध उपाययोजना

मुबई  दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांची बैठक घेऊन कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील या अनुषंगाने बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गांची प्रकरणे आढळून आली आहेत, अशा परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा / उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येत आहे.

फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ बैठे पथक कार्यरत राहील अशी कार्यवाही करण्याबाबत सर्व विभागीय मंडळे व सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे.

*जनजागृती उपक्रम*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला. यामध्ये लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन, नागरिक, शिक्षक, मुख्याध्यापक यांची संयुक्त सभा घेऊन अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत माहिती देणे, सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये कॉपीमुक्तीची शपथ, शिक्षासूचीचे वाचन, गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव, तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, जनजागृती फेरी, ग्रामसभा बैठकीमध्ये जनजागृती आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन आदी उपक्रम राबविण्यात आले.

*बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या*

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15 लाख 05 हजार 037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये 8 लाख 68 हजार 967 मुले, 6 लाख 94 हजार 652 मुली व 37 ट्रान्सजेंडर आहेत. तर, विज्ञान शाखेमध्ये 7 लाख 68 हजार 967, कला शाखेमध्ये 3 लाख 80 हजार 410, वाणिज्य शाखेमध्ये 3 लाख 19 हजार 439, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमामध्ये 31 हजार 735 तर टेक्निकल सायन्स शाखेमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 486 इतकी आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्यात आलेली आहेत.

*विभागनिहाय परीक्षा केंद्रांची संख्या*

इयत्ता बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 3,373 परीक्षा केंद्रावर होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत 5,130 परीक्षा केंद्रावर होणार आहे. यामध्ये पुणे विभागीय मंडळात इयत्ता बारावीसाठी 432 तर दहावीसाठी 659 केंद्र, नागपूर विभागात बारावीसाठी 504 तर दहावीसाठी 679 केंद्र, छत्रपती संभाजीनगर विभागात बारावीसाठी 460 तर दहावीसाठी 646 केंद्र, मुंबई विभागात बारावीसाठी 670 तर दहावीसाठी 1 हजार 055 केंद्र, कोल्हापूर विभागात बारावीसाठी 176 तर दहावीसाठी 357 केंद्र, अमरावती विभागात बारावीसाठी 541 तर दहावीसाठी 721 केंद्र, नाशिक विभागात बारावीसाठी 280 तर दहावीसाठी 486 केंद्र, लातूर विभागात बारावीसाठी 249 तर दहावीसाठी 413 केंद्र आणि कोकण विभागात बारावीसाठी 61 तर दहावीसाठी एकूण 114 केंद्र असणार आहेत.

बारामती येथून जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

बारामती, दि.९: महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तसेच कर्करोग मोबाईल वाहन व डिजिटल हेंडहेड एक्सरे यंत्राचे खासदार सूनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचीन देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापू भोई, डॉ.महेश जगताप, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या वाहनात कोल्पोस्कोप,पॅप सिमीयर, डेंटल चेयर, सर्वायकल बायोस्पी, ओरल मुकोसा बायोस्पी अशी अत्याधुनिक उपकरणे आहेत. याद्वारे जिल्ह्यातील कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचे स्तन, मुख आणि गर्भाशय कर्करोगाची चाचणी ११ मार्च २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे. महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे डॉ. यमपल्ले यांनी केले आहे.

यावेळी महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोई यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांत बदल नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण!

राज्य सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कायम ठेवणार असून, कोणाचेही पैसे परत घेणार नाही. तसेच योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.*

*👉🟣🟣👉मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘हिंदू गर्जना’ कुस्ती स्पर्धेला भेट दिली. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘आम्ही जनतेच्या पैशाचे रक्षक आहोत. पण आम्हालाही महालेखापालांनी विचारल्यावर उत्तर द्यावे लागते. त्यामुळे जर कुणी नियमाबाहेर जाऊन फायदा घेत असेल, तर ते निश्चितच रोखले जाईल आणि आम्ही तशा पडताळणीस सुरुवात केली आहे. ‘लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही नवा निकष लावला जाणार नाही. योजना जाहीर करण्यात आली, तेव्हा जे निकष होते तेच कायम राहणार आहेत. निकषांपेक्षा वेगळे अर्ज ज्या महिलांनी केले त्यांच्यावरच कारवाई होत आहे. काही बहिणींनी निकषाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर स्वतःहून योजनेचा लाभ घेणे सोडले. आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही. जे निकषाबाहेर जाऊन फायदा घेत आहेत, त्यांचा फायदा निश्चितपणे बंद केला जाईल.’ असे फडणवीस म्हणाले.*

*👉🅾️🅾️👉’इतिहासाविषयी बोलतान जनभावना महत्त्वाची’*

*अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासावर बोलताना जनभावनेचा विचार करूनच बोलायला हवे. इतिहासाविषयी बोलताना लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करू नये. अभिनेते सोलापूरकर यांनी या संदर्भात माफीदेखील मागितली आहे. पूर्ण चौकशी करून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.’*

दिल्लीतील आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली:-भारतमाता की जय आणि यमुना मय्या की जय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. आज दिल्लीच्या लोकांमध्ये समाधान आणि उत्साह आहे. उत्साह विजयाचा आहे आणि समाधान दिल्ली ‘आपदे’तून मुक्त झाल्यामुळे आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पत्र लिहिलं होतं आणि विनंती केली होती की २१ व्या शतकात भाजपाला सेवेची संधी द्या. दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्यासाठी ही संधी मी मागितली होती असं मोदी म्हणाले.*

*👉🟥🟥👉मी दिल्लीकरांना वंदन करतो, कारण त्यांनी मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला. मी दिल्लीकरांचे मनापासून आभार मानतो, दिल्लीने मनापासून आमच्यावर फ्रेम केलं. दिल्लीकरांना मी हा विश्वास देऊ इच्छितो की तुमचं प्रेम विकासाच्या रुपाने तुम्हाला परत देऊ. दिल्लीकरांनी आम्हाला प्रेम दिलं, विश्वास दाखवला. हे कर्ज दिल्लीचं डबल इंजिन सरकार चुकवणार. आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे. दिल्लीकरांनी ‘आपदा’ घालवली. यापासून दिल्ली मुक्त झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.*

*👉🔴🔴👉दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे, आज दिल्लीने विकास, दृष्टीकोन आणि विश्वास यांचा विजय झाला आहे. आज अराजकता, अहंकार आणि दिल्लीवरच्या आपदा यांचा पराभव झाला आहे. या निकालाने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेली मेहनत काय आहे ते दाखवून दिलं. तुम्ही सगळे कार्यकर्तेही या विजयाचे वाटेकरी आहात. मी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या विजयाच्या शुभेच्छा देतो. दिल्लीच्या जनतेने हे स्पष्ट केलं आहे की, दिल्लीची मालकी ही फक्त आणि फक्त जनतेकडे आहे. ज्या लोकांना दिल्लीचे मालक असण्याचा अहंकार होता त्यांना वास्तवाची जाणीव दिल्लीकरांनी करुन दिली.*

*👉🟥🟥👉दिल्लीच्या जनादेशाने हे स्पष्ट केलं की राजकारणात शॉर्टकटसाठी, भ्रष्टाचारासाठी, खोट्या गोष्टींसाठी काहीही जागा नाही. जनतेने शॉर्टकर्टच्या राजकारणाचं शॉर्ट सर्किट केलं. दिल्लीच्या लोकांनी, लोकसभेच्या निवडणुकीत मला निराश केलं नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी भाजपाच्या सातच्या सातही जागा दिल्या. तीनवेळा लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिल्लीने शतप्रतिशत विजय मिळवून दिला. मात्र मी पाहात होतो की देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आणि दिल्ली भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात एक खंत होती. ती खंत दिल्लीची पूर्णपणे सेवा करता येत नाही हीच होती. आज दिल्लीने आमचा तो आग्रहही मानला.*

*👉🔴🔴👉दिल्लीच्या तरुणांनी आम्हाला साथ दिली आहे. दिल्लीत आज लागलेला निकाल हे दाखवून देतो आहे की भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाचा किती विश्वास आहे. लोकसभेतल्या विजयानंतर आम्ही सर्वात आधी हरियाणात अभूतपूर्व विजय मिळवला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा रेकॉर्ड केला, आता दिल्लीत नवा इतिहास रचला गेला आहे असंही मोदी म्हणाले आहेत. आपलं दिल्ली हे काही फक्त शहर नाही तर मिनी हिंदुस्थान आहे. दिल्ली हा लघुभारत आहे. दिल्ली एक भारत, श्रेष्ठ भारत हा विचार घेऊन जगणारं शहर आहे असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.*

अंत एका पर्वाचा तळपत्या सुर्याचा 🙏🚩

🚩🙏अंत एका पर्वाचा तळपत्या सुर्याचा 🙏🚩

माझे आजोबा आणि आपले तालुका संघचालक…….!

कै. आदरणीय. श्रीनिवास हणमंत देशपांडे ऊर्फ दादासाहेब देशपांडे, तर त्यांच्या मित्रपरिवारसाठी आणि बहिणींचा लाडका ” मोरेश्वर ”

बालपणापासूनच हुशार, अभ्यासू विद्यार्थी तर १९५० च्या दशकातील इंदापूर तालुक्यातील संघाचे पहिले बाल-तरूण स्वयंसेवक…..!

१९६० च्या उत्तरार्धात बारामती कोर्टातून वकीलीला सुरूवात करत अनेकानेक गोरगरीबांना आणि इंदापूरकर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा तरूण, ” दादासाहेब ” म्हणून नावारूपाला आले.

पुढे इंदापूर कोर्टाच्या पायाभरणी ते आजच्या नव्या वास्तुचे साक्षीदार असा दैदिप्यमान प्रवास दादांनी केला. इंदापूर बारामती-पुणे कोर्टात ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले वकील म्हणजे #दादासाहेब_देशपांडे अशी ख्याती पंचक्रोशीत आहे.

त्याचबरोबरीने धर्मकार्यात अग्रणी असणारे #दादासाहेब श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानची सेवा करण्याची संधी भगवंतांनी विश्वस्त-मुख्य विश्वस्त आणि मंडळ सदस्य म्हणून दिल. ह्या सेवेचे दान उभा जन्म म्हणजे तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी पाहिला. तसेच निरा-नरसिंहपुर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य तथा कार्याध्यक्ष म्हणून ते शैक्षणिक क्षेत्रात ही हिरीरीने कार्यरत राहिले.

तसेच १९७० च्या काळात श्रीमंत शिवराज गणेशोत्सव मंडळ, अखिल मंडई चे संस्थापक अध्यक्ष होते. आज डौलाने आणि अभिमानाने उभे असलेल्या गणेशोत्सव मंडळाची सुरूवात दादांसाहेबांनी देशपांडे वाड्यातुन केली. तर गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात अनेक धार्मिक-सामाजिक उपक्रम राबवत नवयुवकांना एक चांगली दिशा देण्याचे काम केले.

देश-समाज उत्तमरित्या चालवायचा असेल तर त्याचा कणा हा सहकार तथा अर्थकारणावर उभा असतो.

ह्या उक्तीप्रमाणे इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी १९८० च्या दशकात जनता सहकारी बँक पुणे च्या इंदापूर शाखेच्या पायाभरणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्या माध्यमातून अनेक तरुणांना नोकर्या मिळवून दिल्या, विविध कर्जप्रकरणात महत्त्वपुर्ण कायदेशीर सल्ले दिले. तसेच बँकेच्या इंदापूर सल्लागार मंडळ सदस्य म्हणून ३५ वर्षांहून अधिककाळ सेवा दिली.

इंदापूर-बारामती लोकसभा क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कडवट स्वयंसेवक तथा माननीय संघचालक म्हणून ४० वर्षां पासून अधिक काळ कार्य केले.

बारामती पंचक्रोशीतील रा.स्व.संघ, विहिंप, जनसंघ आणि आजच्या भारतीय जनता पार्टीच्या उभारणीतील योगदान अविस्मरणीय आहे 🙏

ज्यामध्ये १९७५ च्या आणीबाणीतील सत्याग्रही, श्री रामजन्मभूमी आंदोलनाचे कारसेवक, स्वामी विवेकानंद शिलान्यास निर्मिती आंदोलन, रामसेतू बचाव कार्य, तळजाई पठारावरील शिबीर, विश्व मंगल गोग्राम यात्रा, रा स्व संघ संपर्क अभियान, स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह इ. विषय त्यांनी तडीस नेले आणि अनेक अभियान-आंदोलनाचे नेतृत्व करत इंदापूर तालुक्यातील हिंदूत्ववादी चळवळीचा पाया रचला. आजच्या संघ-भाजप आणि संघ परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांना दादासाहेब घडवलेच नाही तर सक्षमपणे संघकार्यास उभे केले.

अशा धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाजू समजून घेताना ह्या दादासाहेबांच्या नातवाला एक प्रेमळ आजोबा लाभले तर तेवढेच कडक शिस्तीचे गुरू, कणखर नेतृत्व, विविध विषयांवरील उत्तम वाचक तथा वक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व मिळाले. माझ्या शालेय जीवनातील प्रत्येक वकृत्व स्पर्धेचे मार्गदर्शक, प्रत्येक परिक्षेतील दिशादर्शक आणि *मला बोटं धरून संघाच्या शाखेत नेणारे माझे लाडके दादा यांना कोटी कोटी प्रणाम!*

असे आपले इंदापूर भुषण, अभ्यासू वकील, श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानचे पुर्व मुख्यविश्वस्त, जनता सहकारी बँक पुणे शाखा इंदापूर चे कायदेशीर सल्लागार, इंदापूर तालुक्याचे पुर्व संघचालक तथा माझे आजोबा श्री. श्रीनिवास हनुमंत देशपांडे (दादा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली…..!

प्रभु श्रीरामचंद्र व श्री लक्ष्मी नरसिंह यांच्या आत्म्यास सुख शांती देवो ही प्रार्थना🙏🙏

(देवाज्ञा – ०७/०२/२०२५)

#दादासाहेब_देशपांडे #RSS #Niranasinghpur #श्रीलक्ष्मीनृसिंहदेवस्थान #इंदापुर

चेतना फार्मसी इंदापूर मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी भूषविले.तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे चेतना फाउंडेशन इंदापूरच्या संचालिका सौ निकिता माने मॅडम उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सोहळा महाविद्यालयाच्या मुख्य प्रांगणात पार पडला.

क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांनी लाल फित कापून,तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नारळ फोडून मशाल पेटवून केले.

क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी व्हॉलीबॉल,

थ्रो बॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो गोळा फेक, 100 मीटर रनिंग, रस्सीखेच इत्यादी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा तितकेच महत्त्व दिले पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किमान एक तास तरी मैदानावरती घालवला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा खेळाची आवड निर्माण होईल. डॉ. देसाई पुढे म्हणाले कोणत्याही खेळामध्ये जिंकणे आणि हरणे हा एक त्या खेळाचा भाग आहे पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्या खेळामध्ये सहभाग नोंदवने व त्या खेळाचा आनंद घेणे. शेवटी प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या व क्रीडा महोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले.

यावर्षीच्या क्रीडा महोत्सवाचे मुख्य समन्वयक म्हणून प्राध्यापक सुरज माने सर व श्री प्रवीण सुर्वे सर यांनी काम पाहिले.

क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी चेतना फाउंडेशन इंदापूरचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव श्री विलास भोसले आणि खजिनदार श्री सोमनाथ माने यांचे विशेष सहकार्य लाभले.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे  दि. ७: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २१ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

error: Content is protected !!