Home कोविड वार्ता काळजी घ्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १००० च्या वर! केरळमध्ये ४३० तर महाराष्ट्रात २०९!!

काळजी घ्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १००० च्या वर! केरळमध्ये ४३० तर महाराष्ट्रात २०९!!

काळजी घ्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १००० च्या वर!  केरळमध्ये ४३० तर महाराष्ट्रात २०९!!

नवी दिल्ली:-दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सध्या कोरोनाचे १०४ एक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या एका आठवड्यात ९९ नवीन रुग्ण आढळले आहेत जे आरोग्य प्रशासन आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत.तसेच संपूर्ण देशात कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.*

*👉🔴🔴👉आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक ४३० रुग्ण आहेत, त्यानंतर महाराष्ट्र २०९ आणि दिल्ली १०४ एक्टिव्ह रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कर्नाटकात ३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. गुजरातमध्ये ७६ नवीन रुग्ण आढळले आहेत, आता राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ८३ झाली आहे.*

*👉🟥🟥👉हरियाणामध्ये ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह प्रकरणांची संख्या ९ झाली आहे. तर राजस्थानमध्ये ११ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत, एक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये ११ नवीन रुग्ण आढळली आहेत. उत्तर प्रदेशात १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावा असा सल्ला देखील देण्यात आला आहे.*

*👉🔴🔴👉मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे.मुंबईसह देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिल (IMA) ने कोरोनाला घाबरू नका, पण सतर्क राहा असं म्हटलं आहे. “कोरोना व्हायरस पुन्हा परत येत आहे, परंतु त्याचा प्रभाव २०२० किंवा २०२१ सारखा नाही. कोरोना आता येत राहील, म्हणजेच दर काही महिन्यांनी त्याचं नवीन रुप दिसू शकतं” असं आयएमए कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव विजयदेवन यांनी म्हटलं आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!