जेरूसलेम:-इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. इस्त्रालयाने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्बहल्ले केले आहेत. याशिवाय इस्त्रालयाने इराणच्या लष्करी आणि अणुऊर्जा ठिकाणांवरही हल्ले केले आहेत. इस्रायलने इराणच्या चार आण्विक केंद्रासह सहा लष्करी ठिकाणांवर हल्ला चढवला. यात इराणची महत्त्वाची माणसे मारले गेली आहेत. इराणच्या लष्करप्रमुखासह सहा नामवंत अणुशास्त्रज्ञ या हल्ल्यात ठार झाले आहेत.*
*👉🟥🟥👉इस्रायलने इराणमधील नतांज आण्विक केंद्र आणि इतर ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली आहे. इस्रायलने हा हल्ला करत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर मोठा प्रहार केला आहे. इस्रायलने जे हवाई हल्ले केले, त्यात इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची जबाबादारी असलेले सहा अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. अब्दुल हमीद मिनोउचहर, अहमदरजा जोल्फाघारी, सय्यद अमीरहोसेन फेक्ही, मोत्लाबीजादेह, मोहम्मद मेहदी तहरनेची आणि फेरेदून अब्बासी अशी या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या इराणच्या अणुशास्त्रज्ञांची नावे आहेत.*
*👉🔴🔴👉इस्त्रालयच्या हवाई दलाने इराणच्या लष्करी आणि अणुप्रकल्पांच्या ठिकाणांवर डझनभरापेक्षा जास्त मिसाईल्स डागले आहेत. इस्त्रायची संरक्षण यंत्रणा आयडीएफने हा संयुक्त आणि आधीपासून ठरवण्यात आलेला हल्ला असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेनेही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपला या हल्ल्यात काही सहभाग नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. इराणी मीडिया आणि सरकारी यंत्रणांनी हल्ल्याला दुजोरा देताना म्हटलं आहे की, तेहरानमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ इमाम खोमेनी बंद करण्यात आलं आहे. इस्रायलने हल्ला केल्याचे स्वतः नेतान्याहू यांनी सांगितले. दरम्यान, इराकनेही आपली हवाई सीमा पूर्णपणे सील केली आहे आणि सर्व विमानतळांवर विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणच्या अनेक लष्करी तळांना आणि वैज्ञानिक केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.*