राज्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे होणार आधुनिकीकरण.. ITI च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी रोजगारनिर्मिती.
राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवाराची भेट घेऊन केले सांत्वन
राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवाराची भेट घेऊन केले सांत्वन
संपादकीय
बारामती दि. २८: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य इमारत येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण पाटील,
शिक्षणमंत्री दादाजी भुसे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री कु. अदिती तटकरे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी खासदार श्री. पवार यांची भेट घेवून सांत्वन केले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंतिम दर्शन
संपादकीय
बारामती.दि.२९: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले. यावेळी त्या अत्यंत भावुक झाल्या असून, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
डॉ. गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
“वेळेवर येणारे दादा वेळेआधीच गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये त्यांचे उत्तम जमले होते. असे अर्ध्यावर डाव सोडून गेल्याने खूप वाईट वाटत आहे,” अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
——
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
https://youtu.be/4eXFXBPWF-g?si=gvPCtVtG3etB5Fo0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश आगरवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी याठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी याठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
संपादकीय
दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब
न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, सौ सुनिता रणनवरे मॅडम, सौ चित्रा राऊत मॅडम मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडा फडकवण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले सौ. रणनवरे मॅडम यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती दिली सौ पाटील मॅडम यांनी देश पारतंत्र्यातून स्वातंत्र झाला आणि गुलामगिरीतून मुक्त कसा मुक्त झाला याविषयी मार्गदर्शन केले मुलांना खाऊ वाटप केले. शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राऊत मॅडम यांनी केले आभार सौ रणनवरे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
चेतना कॉलेज ऑफ फार्मसीच्या शिक्षक मेळाव्यात शिक्षण व करिअर संधींचा आढावा
चेतना कॉलेज ऑफ फार्मसीच्या शिक्षक मेळाव्यात शिक्षण व करिअर संधींचा आढावा
संपादकीय
दि. २५ जानेवारी २०२६ :
येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित शिक्षक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. चिंतामणी रणवरे सर यांनी केली. आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षकांचे समाजातील योगदान व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता झगडे यांनी अत्यंत प्रभावी व नेटकेपणाने केले. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व समतोल सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
या शिक्षक मेळाव्याचे आयोजन प्रा. अनिकेत सुर्वे, प्रा. विकास उबाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी प्रेझेंटेशनद्वारे फार्मसी क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच व्यावसायिक कोर्स करताना मुलांना कोणकोणत्या सरकारी व खाजगी शिष्वृती उपलब्ध आहेत याची माहिती दिली. फार्मसी शिक्षण, संशोधन, औषध उद्योग, क्लिनिकल रिसर्च, मेडिकल डिव्हाइस, रेग्युलेटरी अफेअर्स तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातील संधी त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केल्या. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक कौशल्ये आत्मसात करून स्पर्धात्मक परीक्षांसाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यात उपस्थित शिक्षकांनी आपले अनुभव, विचार व सूचना एकमेकांशी शेअर केल्या. अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे शिक्षकांमधील सहकार्य, स्नेह आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन व आपुलकीच्या संवादातून मेळाव्याचा समारोप झाला. या मेळाव्यामुळे शिक्षकांमधील स्नेहबंध अधिक दृढ होऊन आगामी शैक्षणिक उपक्रमांसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात पार पडला
संपादकीय
मराठी भाषासंवर्धन पंधरवडा उत्साहात इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये उत्साहात पार पडला. या सप्ताहामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येऊन व विविध स्पर्धा घेण्यात आले. यामध्ये घोषवाक्य, शब्द अंताक्षरी, हस्ताक्षर स्पर्धा, कथाकथन व कविता सादरीकरण तसेच फलक लेखन कार्यशाळा या उपक्रमांचा समावेश होता. सदरच्या स्पर्धा व उपक्रमांचे कामकाज प्राचार्य डॉ. लहू वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख प्रा. सिद्धार्थ चितारे व प्रा. अर्चना हरिहर यांनी पाहिले, तर परीक्षक म्हणून डॉ. तयाजी लोंढे, प्रा. दीप्ती पाटील यांनी कामकाज केले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील, खजिनदार उमेश सूर्यवंशी व संचालक मंडळाने कौतुक केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती लोकसभा युवक अध्यक्ष प्रशांत गलांडे पाटील यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज कोण रोकेगा हमे म्हणत केला दाखल
राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती लोकसभा युवक अध्यक्ष प्रशांत गलांडे पाटील यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज कोण रोकेगा हमे म्हणत केला दाखल
संपादकीय
प्रशांत गलांडे पाटील हे पहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे जुने विचारक आहेत त्यांनी मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता ते बिजावडी गण 134 मध्ये समाज हितासाठी खुप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात ते गंगावळण ग्रामपंचायत सरपंच यांचे पती म्हणून पण त्यांना ओळखले जाते
चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न
चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न
संपादकीय
चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी (ता. इंदापूर) येथे मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी ‘रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय महामार्गालगत महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी बारामती येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मा. श्री. तेजस मखरे हे मुख्य पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत आर.टी.ओ. विभागाचे श्री. नितीन कुंभार व श्री. विठ्ठल गावडे हे त्यांचे सारथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्य पाहुणे मा. श्री. तेजस मखरे यांचा सत्कार संस्थेचे खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला, तर त्यांचे सारथी श्री. नितीन कुंभार व श्री. विठ्ठल गावडे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी केला.
मार्गदर्शनपर व्याख्यानाची सुरुवात करताना मखरे सरांनी भारतीय संविधानातील कलम १९ याचा संदर्भ देत महत्त्वाचे विचार मांडले. त्यांनी सांगितले की, कलम १९ नुसार प्रत्येक नागरिकाला देशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार आहे. पायी चालण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते; मात्र दुचाकी किंवा चारचाकी मोटार वाहन चालवण्यासाठी वैध वाहनचालक परवाना आवश्यक असतो.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, ड्रायव्हिंग लायसन्स हा अधिकार नसून एक विशेषाधिकार (Privilege) आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाची जबाबदारी अधिक वाढते आणि प्रत्येक चालकाचे वर्तन संयमी, शिस्तबद्ध व जबाबदार असणे अत्यंत आवश्यक आहे.
पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “वाहतुकीचे नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी आहेत.” विशेषतः तरुण चालकांनी रस्त्यावरील चिन्हे, वेगमर्यादा आणि वाहतूक कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान ‘मेंटी रिस्पॉन्स’ या डिजिटल माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी घेण्यात आली. रस्ते चिन्हे व ट्रॅफिक सिग्नल स्क्रीनवर दाखवून विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनद्वारे उत्तरे दिली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक व रंजक ठरला.
यानंतर वाहनमालकाच्या जबाबदारीबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करताना, मखरे सरांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहनचालनाबाबत इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, जर विद्यार्थ्यांकडून चालवले जाणारे दुचाकी वाहन वडील किंवा कुटुंबातील अन्य प्रमुख व्यक्ती यांच्या नावे नोंदणीकृत असेल आणि त्या वाहनाकडून वाहतूक नियमांचा भंग झाल्यास, मोटार वाहन कायद्यानुसार दंड व कायदेशीर कारवाई ही मूळ वाहनमालकावरच केली जाते. त्यामुळे पालकांना कायदेशीर अडचणीत न आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मखरे सरांनी ‘गोल्डन अवर’ आणि ‘गुड समेरिटन’ या संकल्पनांबाबत अत्यंत मोलाची माहिती दिली. ते म्हणाले की, “अपघातानंतरचा पहिला एक तास हा ‘गोल्डन अवर’ असतो. या काळात जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.”
तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘गुड समेरिटन’ (देवदूत) व्यक्तींना पोलीस चौकशी किंवा न्यायालयीन कटकटीला सामोरे जावे लागत नाही. उलट, अशा मदतकार्य करणाऱ्या नागरिकांचा केंद्र व राज्य शासनाकडून २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिक देऊन सन्मान केला जातो. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता प्रत्येकाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच उपस्थित मान्यवरांनी रस्ते सुरक्षेचे सर्व नियम पाळण्याची, सुरक्षित व जबाबदार वाहनचालना करण्याची सामूहिक शपथ घेतली. या शपथविधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबतची जाणीव अधिक दृढ झाली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळासाहेब बोराटे, तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण सातपुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यू लिफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी ता.इंदापूर जि.पुणेराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
न्यू लिफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी ता.इंदापूर जि.पुणेराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब
न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, सौ सुनिता रणनवरे मॅडम, सौ चित्रा राऊत मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सौ रणनवरे मॅडम यांनी राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना कसे घडवले याविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे विषयी माहिती दिली. शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राऊत मॅडम यांनी केले आभार सौ रणनवरे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली