Home Blog Page 10

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय युवा दिन व स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय युवा दिन व स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

संपादकीय

चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, येथे आज सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय युवा दिन व स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जयंती विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रउभारणीस पोषक विचारांवर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारशील, दूरदृष्टीपूर्ण व राष्ट्रनिष्ठ जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, सदस्य श्री. बाळासाहेब बोराटे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी दिशादर्शक असून आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती, आत्मशिस्त व राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या आधारे युवकांनी आपले जीवन घडवावे. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमधूनच छत्रपती शिवाजी महाराज यांसारखा आदर्श राजा घडला असून त्यांच्या जीवनातील मूल्ये आजच्या युवकांसाठी मार्गदर्शक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्वातील संस्कार, शिस्त, त्याग व राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी जिजाऊ मातांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.
तसेच प्रा. किरण सातपुते यांनी स्वामी विवेकानंद यांच्या युवकांसाठी दिलेल्या प्रेरणादायी संदेशांचा संदर्भ देत, युवकांनी स्वतःच्या क्षमतांवर दृढ विश्वास ठेवून निश्चित ध्येय समोर ठेवत सातत्यपूर्ण परिश्रम करावेत. विवेकानंदांचे विचार आत्मसात केल्यास सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मनोगते, विचारप्रदर्शन व प्रेरणादायी संदेशांच्या माध्यमातून राष्ट्रसेवा, सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये व युवकांची राष्ट्रउभारणीतील भूमिका यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, नियोजन व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रा. प्राजक्ता झगडे यांनी केले. बी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थी संग्राम गायकवाड यांनी प्रभावी व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले, तर डी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थिनी अपेक्षा कांबळे यांनी समर्पक शब्दांत आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

संपादकीय,

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज सरडेवाडी येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,

खजिनदार सोमनाथ माने, संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

आपल्या शाळेतील शिंदे सर यांनी स्वामी विवेकानंद हे शिकागोला गेले असताना त्यांनी अजरामर असे भाषण केले. त्यांनी हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे जगाला पाठवून दिले

तसेच गोळे मॅडम यांनी माँसाहेब जिजाऊ याविषयी माहिती दिली

भगवान मोरे सर यांनी स्वराज्य स्थापनेस जिजाऊंचा किती मोठा वाटा आहे याविषयी माहिती दिली. घरोघरी शिवबा जन्मायचा असेल तर अगोदर जिजाऊ प्रत्येक घरात जन्मली पाहिजे असे सुंदर उदाहरण सरांनी दिले

नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले

 

कार्यक्रमाचे आयोजन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

एन .ई .एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

एन .ई .एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

संपादकीय
आज दिनांक -10 जानेवारी 2026 रोजी श्री
हेमचंद शिंदे सर यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर करताना ध्येय निश्चित केले पाहिजे. आत्मविश्वास, जिद्द ,चिकाटी आणि विद्यार्थ्याकडे सकारात्मक विचार असणे खूप महत्त्वाचा आहे .तसेच इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे बेसिक नॉलेज असणे खूप महत्त्वाचे आहे. करिअर निवड कशासाठी करायची ,कोणासाठी करायची हे विद्यार्थ्यांना सांगितले . करियर निवडताना विद्यार्थ्यांनी आवडी निवडी तसेच क्षमता ओळखून करिअर निवडणे तसेच डॉक्टर हर्षदा शिंदे यांनी दहावीनंतर कला ,विज्ञान ,वाणिज्य, बुद्धिमत्ता, क्षमता आवड करिअरमध्ये संधी , शैक्षणिक पात्रता देश पातळीवरील परीक्षा व राज्य पातळी परीक्षा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच मेडिकल मधील विविध कोर्सची माहिती सांगितली .इंजीनियरिंग मधील शाखा विषयी माहिती सांगितली. टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली कार्यक्रमांसाठी संस्थेचे सचिव श्री धनंजय रणवरे , प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर , पर्यवेक्षक खरात सर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून श्री विलास भोसले सर यांनी काम पाहिले. तसेच तोरणे सर, नगरे मॅडम, शेंडे मॅडम, पाटील मॅडम, चौधर सर ,सचिन कारंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजिनाथ मलगुंडे सर यांनी केले ,तर आभार श्री प्रवीण बोराटे सर यांनी केले.

एन.ई.एस. हायस्कूल व जुनिअर कॉलेज तर्फे नंदकिशोर प्रगती विद्यालय सराफवाडी करिअर मार्गदर्शन

एन.ई.एस. हायस्कूल व जुनिअर कॉलेज तर्फे नंदकिशोर प्रगती विद्यालय सराफवाडी
करिअर मार्गदर्शन
दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी एन.ई.एस. हायस्कूल व जुनिअर कॉलेज निमसाकर तर्फे नंदकिशोर प्रगती विद्यालय सराफवाडी येथे दहावीनंतर पुढे काय? या विषयावर करियर मार्गदर्शन प्राध्यापक विलास भोसले यांनी केले. दहावीनंतर कला विज्ञान वाणिज्य शाखा विषयी मार्गदर्शन केले तसेच तंत्रशिक्षण आय.आय.टी. पॅरामेडिकल कोर्स याबद्दलही माहिती सांगितली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आपली ध्येय निश्चित करण्यासाठी सांगितले ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे असे सांगितले. तसेच प्राध्यापक प्रवीण बोराटे सरांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरची ऍडमिशन प्रक्रिया कशी असते त्यासाठी कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतात याचे मार्गदर्शन केले.
या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा दिली त्यावेळेस विद्यालयाचे प्राचार्य कदम सर,श्री फडतरे सर यांचे सहकार्य मिळाले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची पाणी शुद्धीकरण संयंत्र व प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथे शैक्षणिक भेट

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची पाणी शुद्धीकरण संयंत्र व प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथे शैक्षणिक भेट

संपादकीय

शहरातील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मधील पदविका अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आज बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी पाणी शुद्धीकरण संयंत्र व प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर शैक्षणिक भेट आयोजित केली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना जलशुद्धीकरण महत्त्व समजून देणे हा होता. जल प्राधिकरणाने त्या प्रकल्पाविषयी एका वर्गाचे आयोजन केले होते. जलशुद्धीकरण प्रकल्पाची रचना आणि कार्यप्रणालीबद्दल सर्व माहिती उत्तम प्रकारे समजावून सांगितले आणि संबंधित भागांना भेट देण्याची संधी दिली. इंदापूर येथील १० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सर्वात मोठ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन आणि शुद्धीकरण पद्धतींबद्दल जाणून घेऊन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट फायदा झाला. नगरपरिषद आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करण्याचा उद्देश प्रदूषक काढून टाकणे, विषारी पदार्थ वेगळे करणे, मोठे कण निष्प्रभ करणे, रोगजंतूंना नष्ट करणे हा आहे, जेणेकरून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारून ती जलस्रोतांमध्ये किंवा शेतजमिनीवर सोडण्यासाठीच्या पाण्याच्या स्वीकारार्ह पातळीपर्यंत पोहोचेल. पाण्याच्या शुद्धीकरणाविषयी व्यावहारिक ज्ञान देणे हा या भेटीचा उद्देश आहे.स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. पाणी पिण्यायोग्य (पिण्यासाठी सुरक्षित) आणि रुचकर (चवीला आनंददायक) बनवणे याची माहिती देण्यात आली . जलशुद्धीकरण म्हणजे वापरलेले पाणी किंवा नदीतील कच्चे पाणी एका प्रक्रियेद्वारे शुद्ध करणे, जेणेकरून ते पाणी इच्छित अंतिम वापरासाठी अधिक योग्य होईल. जलशुद्धीकरणाचे उद्दिष्ट पाण्यातील विद्यमान दूषित घटक काढून टाकणे, किंवा अशा दूषित घटकांची घनता कमी करणे हे आहे, जेणेकरून पाणी त्याच्या इच्छित अंतिम वापरासाठी योग्य ठरेल.

प्राथमिक आरोग्य केंद्र ही एका निश्चित भौगोलिक क्षेत्रातील लोकांना प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक अशा सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करणारी एक संस्था आहे. देशाच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला महत्त्वाचे स्थान आहे. ते ग्रामीण लोकसंख्येला प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक पैलूंवर भर देऊन एकात्मिक उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रदान करते.इंदापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटीमुळे, आमच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यांबद्दल माहिती मिळाली. तसेच आम्हाला कर्मचारी रचना, कार्यप्रणाली, नोंदी आणि महत्त्वाच्या घटनांच्या अहवालाविषयी माहिती मिळाली. ही भेट अत्यंत माहितीपूर्ण होती.वैद्यकीय सेवांची तरतूद महत्त्वाच्या आकडेवारीचे संकलन आणि अहवाल सादर करणे स्थानिक साथीच्या रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवणे याची माहिती देण्यात आली. या भेटीदरम्यान, विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे निरीक्षण करतील, आरोग्य व्यावसायिकांशी चर्चांमध्ये सहभागी होतील, फार्मसी अभ्यासक्रमाची सांगड आणि स्थानिक समुदायाशी संवाद साधतील. ते सध्या सुरू असलेल्या आरोग्य मोहिमांमध्येही सहभागी होऊ शकतात, आरोग्य शिक्षण उपक्रमांमध्ये मदत करू शकतात आणि निरीक्षणात्मक अभ्यासांसाठी माहिती गोळा करू शकतात.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेल्या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या आरोग्य सुविधांच्या कार्यप्रणालीची, समाजामधील त्यांच्या औषध निर्माता भूमिकेची आणि त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांची प्रत्यक्ष माहिती आणि अनुभव मिळतो.

चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.या शैक्षणिक भेटीचे नियोजन प्रा. अनिकेथ सुर्वे, प्रा. दाजी हुलगे, प्रा. प्राजक्ता झगडे यांनी केले.

पैसा मिळवण्याबरोबरच पैशाचे नियोजन करणे ही काळाची गरज- संदीप चव्हाण 

पैसा मिळवण्याबरोबरच पैशाचे नियोजन करणे ही काळाची गरज- संदीप चव्हाण

 

बावडा दि.7. विद्यार्थ्यांनी उत्तुंग स्वप्न पाहिले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आतमध्ये लपलेल्या निखार्यावर फुंकर घालण्याची गरज आहे. असे प्रतिपादन संदीप चव्हाण यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये बुधवार (दि. 7) रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन विभाग आणि वाणिज्य विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आणि उद्योजकता कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जनता सहकारी बँक इंदापूरचे शाखा व्यवस्थापक संदीप चव्हाण बोलत होते. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवू नका तर पैसा कमावताना योग्य नियोजन आपल्याला करता यायला पाहिजे कमाई करणे,बचत करणे , खर्च करणे पैशाचे संरक्षण करणे आणि मिळवलेल्या पैशाला कामाला लावणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. पुजा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लहू वावरे हे उपस्थित होते. शिक्षण रोजगार आणि उद्योजकता हे अर्थव्यवस्थेचे दोन स्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावेच लागेल. आर्थिक साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षाही महत्वाची आहे. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रविण घोगरे यांनी केले, तर प्रा. सिद्धार्थ चितारे यांनी आभार मानले.

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध

संपादकीय

मंगळवार दि. ०६ जानेवारी 2026 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे एन. ई. एस हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, निमसाखर येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना फार्मसी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात करिअर निवड ही विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान असून या व्यासपीठातून विद्यार्थ्यांना फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, माहिती-तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा, तसेच उद्योजकता अशा विविध क्षेत्रांबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळाले.

तज्ज्ञांनी आपल्या भाषणात आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्यविकास, संवादकौशल्य, नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच योग्य करिअर निवड आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमात प्रश्नोत्तर सत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या व्यासपीठामुळे आपल्या आवडी-क्षमता ओळखून करिअर घडवण्यासाठी दिशा मिळाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले असून, दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली.
महाविद्यालयाचे प्राचार्य रणवरे सर, विभागप्रमुख विलास भोसले सर तसेच चेतना फार्मसीचे प्रा. अनिकेत सुर्वे, विकास उबाळे यांचे सहकार्य मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

अग्रलेख : सत्य अजून जिवंत आहे…*

*अग्रलेख : सत्य अजून जिवंत आहे…*

जेव्हा सत्य बोलणे धोक्याचे ठरते,

जेव्हा प्रश्न विचारणे गुन्हा बनते,

जेव्हा मौनाला सुरक्षितता मानले जाते—

तेव्हा समाजाला जागं ठेवणारी एकच गोष्ट उरते,

ती म्हणजे पत्रकाराची लेखणी.

 

आज पत्रकार दिन. अभिनंदनाचा नाही, तर आत्मचिंतनाचा दिवस. कारण पत्रकारिता ही केवळ बातम्यांची माळ नसून, ती समाजाच्या अंतरात्म्याशी चाललेली अखंड लढाई आहे.

पत्रकार हा कोणत्याही पक्षाचा नसतो, कोणत्याही सत्तेचा नसतो—

तो फक्त सत्याच्या बाजूचा असतो.

आणि म्हणूनच तो नेहमी अस्वस्थ करणारा ठरतो.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे ओझे खांद्यावर पेलणारा पत्रकार, अनेकदा एकटाच उभा असतो—दबावांच्या वावटळीत, धमक्यांच्या सावल्यांत, उपेक्षेच्या अंधारात. तरीही तो माघार घेत नाही. कारण त्याला माहीत असते, आपण गप्प बसलो तर अन्याय बोलेल.

 

इतिहास साक्ष देतो—

स्वातंत्र्यलढ्यात पत्रकारितेने बंदुकीपेक्षा धारदार काम केले. लोकमान्य टिळकांची लेखणी, गांधीजींचे शब्द, आंबेडकरांचे निर्भीड विचार—या साऱ्यांनी समाजाचा कणा सरळ केला. तेव्हा पत्रकारिता व्यवसाय नव्हती; ती चळवळ होती.

आज काळ बदलला आहे. माध्यमे बदलली आहेत. वेग वाढला आहे. पण प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. खोटी बातमी, सनसनाटीपणा, सोशल मीडियाचा गोंगाट—या साऱ्यांतून वाट काढत सत्य जपणे हे आजच्या पत्रकारासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

 

ग्रामीण भागातील पत्रकार तर या संघर्षाचे खरे शिलेदार आहेत. कमी साधनांत, कमी मानधनात, अनेकदा ओळखही न मिळता ते समाजाचे प्रश्न पुढे आणतात. शेतकऱ्यांचे अश्रू, कष्टकऱ्यांची वेदना, उपेक्षितांचा आवाज—हे सारे त्यांच्या लेखणीतून जिवंत राहते.

 

पत्रकार दिन म्हणजे फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही.

हा दिवस आठवण करून देतो की— पत्रकार सुरक्षित नसेल, तर समाज असुरक्षित होतो.

पत्रकार गप्प बसला, तर लोकशाही कमकुवत होते.

म्हणूनच आज गरज आहे—पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची, पत्रकारांच्या सुरक्षेची आणि मूल्याधिष्ठित लेखणीची.

आजही, सर्व अडचणींवर मात करत, अनेक पत्रकार निर्भीडपणे सत्य लिहित आहेत. म्हणूनच म्हणावेसे वाटते—

होय, सत्य अजून जिवंत आहे.

कारण कुठेतरी एखादा पत्रकार अजूनही प्रश्न विचारतो आहे.

 

पत्रकार दिनानिमित्त

सत्यासाठी उभे राहणाऱ्या,

दबावांपुढे न झुकणाऱ्या,

आणि समाजाच्या आरशासारखी भूमिका निभावणाऱ्या

सर्व पत्रकार बंधूंना मनःपूर्वक सलाम!

 

*प्रा. श्री. अमोल बाळासाहेब बंडगर* *

एम. एस.सी. बी. एड. (जीवशास्त्र)सेट (लाइफ सायन्सेस)*

श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर 413101

सत्याची मशाल हाती घेणारे शब्दयोद्धे

सत्याची मशाल हाती घेणारे शब्दयोद्धे

 

काळोख दाटलेला असतो…

मौन भयभीत असते…

आणि अशा वेळी जो माणूस सत्याचा दिवा पेटवतो,

तो म्हणजे पत्रकार.

 

दरवर्षी ६ जानेवारी – पत्रकार दिन हा केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नसून, तो समाजाच्या आत्म्याला जागे करण्याचा दिवस आहे. भारतीय पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा होणारा हा दिवस, लेखणीला वंदन करण्याचा, शब्दांच्या सामर्थ्याला सलाम करण्याचा दिवस आहे.

 

पत्रकारिता : शब्दांची साधना

पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नाही; ती एक तपश्चर्या आहे. समाजातील वेदना शब्दांत उतरवण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि निःशब्दांच्या भावना बोलक्या करण्याची ही कला आहे. पत्रकार हा शब्दांचा शिल्पकार असतो. तो बातमी लिहीत नाही; तो काळ लिहितो, तो इतिहास घडवतो.

सत्य मांडणे सोपे नसते. अनेकदा ते कटू असते, धोकादायक असते, अस्वस्थ करणारे असते. पण तरीही सत्याच्या बाजूने उभे राहण्याचे धैर्य पत्रकार दाखवतो. म्हणूनच पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते.

संघर्षांची शाई, वेदनांचे कागद

पत्रकाराच्या लेखणीतील शाई अनेकदा वेदनांनी ओलसर असते. बातमीच्या मागे न दिसणारा संघर्ष दडलेला असतो. ऊन-पाऊस, उपासमार, आर्थिक अनिश्चितता, सामाजिक दबाव, धमक्या, उपेक्षा—या सर्वांतून मार्ग काढत पत्रकार आपले कार्य करत असतो.

कधी रात्री अपरात्री घटनास्थळी पोहोचावे लागते,

कधी स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा बातमी महत्त्वाची ठरते,

कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून समाजाची जबाबदारी पेलावी लागते.

हा संघर्ष बाहेरून दिसत नाही, पण तो प्रत्येक बातमीतून झिरपत असतो.

 

इतिहासाच्या पानांवर कोरलेले शब्द

स्वातंत्र्यलढ्यात पत्रकारितेने दिलेले योगदान अमूल्य आहे. लोकमान्य टिळकांची लेखणी, महात्मा गांधींची साधी पण प्रभावी भाषा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निर्भीड विचार—या सर्वांनी समाजाला दिशा दिली.

केसरी, मराठा, यंग इंडिया, हरिजन ही केवळ वृत्तपत्रे नव्हती, ती परिवर्तनाची मशाल होती. त्या काळातील पत्रकारांनी कारावास, दंड, छळ सहन केला; पण सत्याशी तडजोड केली नाही.

 

ग्रामीण पत्रकार : मातीशी नाते जोडणारे

ग्रामीण भागातील पत्रकार म्हणजे समाजाच्या मुळाशी जोडलेले योद्धे. शहराच्या झगमगाटापासून दूर, गावकुसाबाहेरच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हे पत्रकार खऱ्या अर्थाने समाजाचे प्रतिनिधी आहेत.

शेतकऱ्यांचे अश्रू, कष्टकऱ्यांची वेदना, उपेक्षितांचे प्रश्न—हे सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ग्रामीण पत्रकार करतात. मानधन कमी असते, साधने अपुरी असतात, पण तरीही लेखणी थांबत नाही. कारण ती लेखणी केवळ रोजगारासाठी नव्हे, तर जबाबदारीने चालवली जाते.

डिजिटल युग आणि लेखणीची परीक्षा

आजच्या सोशल मीडियाच्या युगात माहिती क्षणात पसरते; पण सत्य हरवण्याचा धोका अधिक वाढला आहे. अफवा, खोटी बातमी, सनसनाटी मथळे यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात येत आहे.

अशा काळात जबाबदार, मूल्याधिष्ठित आणि संवेदनशील पत्रकारिता अधिक आवश्यक झाली आहे. सत्य तपासणे, सर्व बाजू मांडणे, समाजात तेढ न माजवता विवेक जागा ठेवणे—ही आजच्या पत्रकाराची खरी कसोटी आहे.

 

पत्रकार आणि समाज : नातं विश्वासाचं

पत्रकार आणि समाज यांचं नातं विश्वासावर उभं असतं. समाज पत्रकाराकडून प्रामाणिकपणा अपेक्षित ठेवतो, तर पत्रकार समाजाकडून पाठिंबा. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, त्यांच्या अधिकारांचा सन्मान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही समाजाची जबाबदारी आहे.

कारण जेव्हा पत्रकार गप्प बसतो,

तेव्हा अन्याय बोलू लागतो.

 

पत्रकार दिन : आत्मचिंतनाचा क्षण

पत्रकार दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून, आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. आपण सत्याच्या किती जवळ आहोत? आपल्या लेखणीचा उपयोग समाजघडणीसाठी किती होतो? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधण्याची ही वेळ आहे.

 

उपसंहार

पत्रकार म्हणजे काळाचा साक्षीदार, समाजाचा जागता प्रहरी आणि लोकशाहीचा आधारस्तंभ. अंधार कितीही गडद असो, पत्रकाराच्या लेखणीतील प्रकाश तो भेदून जातो.

शब्द जखम करू शकतात, पण शब्दच जखमा भरूनही काढू शकतात.

आणि हा चमत्कार घडवण्याची ताकद पत्रकारितेत आहे

.

पत्रकार दिनानिमित्त

सत्यासाठी झटणाऱ्या,

निःशब्दांना आवाज देणाऱ्या,

आणि समाजासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या

सर्व पत्रकार बंधूंना मानाचा मुजरा!

तुमची लेखणी सदैव निर्भीड राहो,

तुमचे शब्द समाजाला दिशा देत राहो,

आणि सत्याची मशाल कधीही विझू नये हीच मनापासून इच्छा

 

*प्रा. श्री. अमोल बाळासाहेब बंडगर*

एम. एस.सी. बी. एड. (जीवशास्त्र) सेट (लाइफ सायन्सेस)

श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर 413101

उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अभिजीत तांबिले यांचे कृषीमंत्र्यांना निवेदन

उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अभिजीत तांबिले यांचे कृषीमंत्र्यांना निवेदन

संपादकीय

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव , कांदलगाव, तरडगाव या गावातील उजनी धरण प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मूळ मालक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फुटावी, या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजीत राजेंद्र तांबिले यांनी

राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांची भेट घेऊन सविस्तर लेखी निवेदन सादर केले.

 

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १९७० च्या दशकात उजनी धरण प्रकल्पासाठी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव , कांदलगाव, तरडगाव अशा गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी माती-मुरूम उचलण्यासाठी शासनाने संपादित केल्या. त्या वेळी शेतकऱ्यांनी मोठ्या त्यागातून शेती दिली. मात्र नंतरच्या काळात विविध धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीतील त्रुटींमुळे मूळ जमीनमालक शेतकऱ्यांचे हक्क बाधित झाले आहेत.

 

अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने पाणीपट्टी भरून शेती विकसित केली असूनही आज त्यांना जमिनीच्या मालकी व वहिवाटीबाबत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली असून हा प्रश्न केवळ कायदेशीर नसून सामाजिक आणि मानवी दृष्टीनेही अत्यंत गंभीर असल्याचे तांबिले यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.

 

निवेदनात अभिजीत तांबिले यांनी स्पष्ट केले की, “तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक विचार करून वहिवाटीचे आदेश दिले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून ठोस मार्ग काढणे आवश्यक आहे.”

 

 

या संदर्भात शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, उजनी प्रकल्पग्रस्त ३ गावांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पुनर्विचार करून २००० एकर जमिनीच्या मूळ जमीनमालकांचे हक्क सुरक्षित करावेत, अशी ठाम मागणी तांबिले यांनी केली आहे. या निवेदनासोबत संबंधित शेतकऱ्यांच्या सह्यांची यादीही जोडण्यात आली आहे.

 

कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन शासनस्तरावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे तांबिले यांनी सांगितले. उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न लावून धरणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

error: Content is protected !!