Home शैक्षणिक चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध

संपादकीय

मंगळवार दि. ०६ जानेवारी 2026 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे एन. ई. एस हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, निमसाखर येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना फार्मसी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात करिअर निवड ही विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान असून या व्यासपीठातून विद्यार्थ्यांना फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, माहिती-तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा, तसेच उद्योजकता अशा विविध क्षेत्रांबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळाले.

तज्ज्ञांनी आपल्या भाषणात आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्यविकास, संवादकौशल्य, नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच योग्य करिअर निवड आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमात प्रश्नोत्तर सत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या व्यासपीठामुळे आपल्या आवडी-क्षमता ओळखून करिअर घडवण्यासाठी दिशा मिळाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले असून, दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली.
महाविद्यालयाचे प्राचार्य रणवरे सर, विभागप्रमुख विलास भोसले सर तसेच चेतना फार्मसीचे प्रा. अनिकेत सुर्वे, विकास उबाळे यांचे सहकार्य मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!