Home Blog Page 11

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

संपादकीय

इंदापूर: चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी (ता. इंदापूर) येथे आज शनिवार दि. ३ जानेवारी रोजी थोर समाजसुधारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, कोषाध्यक्ष मा. श्री. सोमनाथ माने तसेच सदस्य मा. श्री. बाळासाहेब बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. गणेश म्हस्के उपस्थित होते.

कार्यक्रमात वक्त्या आरती करांडे व आरती लोंढे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या कार्यावर मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक रूढी, अज्ञान व अन्यायाविरुद्ध उभा केलेला सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आणि शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे कार्य प्रभावीपणे मांडले.

तसेच प्रा. प्राजक्ता झगडे व प्रा. गीतांजली कांबळे यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आजच्या शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीत असलेली उपयुक्तता स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी समता, समानता व शिक्षण या मूल्यांचा अंगीकार करून समाजघडणीत योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अवलंब करून समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करावे.”

या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्राजक्ता झगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थी पृथ्वीराज गर्गडे व ऋतुजा देशमुख यांनी प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन आरती लोंढे यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

दादाश्री प्रतिष्ठान संचलित
न्यू लिफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी ता.इंदापूर जि.पुणे
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

न्यू  लीफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब
न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, सौ सुनिता रणनवरे मॅडम, सौ चित्रा राऊत मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सौ रणनवरे मॅडम यांनी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन का साजरा करतो या विषयी माहिती दिली सावित्रीबाई फुले यांना समाजाकडून होणारा त्रास त्या त्रासातूनही त्यांनी स्वतः शिक्षण घेऊन मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये काढली इत्यादी माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली मुलांना खाऊ वाटप केले. शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राऊत मॅडम यांनी केले आभार सौ रणनवरे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषधी वनस्पती उद्यान व जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया संयंत्र येथे शैक्षणिक भेट

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषधी वनस्पती उद्यान व जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया संयंत्र येथे शैक्षणिक भेट

संपादकीय

शहरातील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मधील पदविका अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आज शुक्रवार दि. २ जानेवारी २०२६ रोजी औषधी वनस्पती उद्यान आणि जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया संयंत्र इंदापूर शैक्षणिक भेटआयोजित केली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध औषधी वनस्पतींचे महत्त्व समजून देणे हा होता. उद्यानामध्ये २७ राशी आणि २७ नक्षत्रांशी संबंधित वृक्ष आहेत. एकंदरीत, फील्ड व्हिजिट विद्यार्थ्यांसाठी खूप माहितीपूर्ण होती. औषधी उद्यानाला भेट देताना विद्यार्थ्यांना सर्व औषधी वनस्पतींबद्दल बरीच माहिती मिळते. सुप्रशिक्षित मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांना सर्व औषधी वनस्पतींचे अनेक पैलू सादर केले. विविध प्रकारच्या वनस्पती आपण पाहतो: आवळा. बेहेडा, अधातोडा, अलियम, कोरफड, आसगंध, भांग, वेलची, लवंग, कॉमन लॅव्हेंडर, कोथिंबीर,दारुहळदी, दातुरा औषधी वनस्पती, एका जातीची बडीशेप, हिरवा चहा, पेरीविंकल, रक्तचंदन, रौवोल्फिया, सर्पगंधा, इंदापूर नगर परिषद वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा प्रकल्प मिळवला आहे. नगर परिषदने रुग्णालयांमधील वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे काम सुरू केले आहे.

जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया संयंत्र भेट देताना सर्व विद्यार्थ्यांना असलेल्या कचरा प्रक्रिया बद्दल बरीच माहिती मिळाली. जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया संयंत्र या प्रकल्पामुळे शहरातील वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात मदत होत आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात मदत होईल. बायोमेडिकल कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या भेटीच्या अहवालात धोकादायक वैद्यकीय कचरा हाताळणाऱ्या सुविधेचे निरीक्षण, मूल्यांकन आणि निष्कर्ष यांचा तपशील समजून सांगण्यात आला. यामध्ये नियमांचे पालन (BMWM नियम, २०१६), वर्गीकरण, संकलन, वाहतूक आणि प्रक्रियेची (भस्मीकरण, ऑटोक्लेव्हिंग, श्रेडिंग) परिणामकारकता यावर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच, कचऱ्याचे अयोग्य विलगीकरण, अपुरे पीपीई, खराब नोंदी ठेवणे आणि संभाव्य पर्यावरणीय प्रदूषणाचे धोके यांसारख्या त्रुटी ओळखल्या जातात, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी चांगल्या पद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वांचे कठोर पालन करण्याच्या शिफारसी केल्या जातात याची सविस्तर माहिती देण्यात आली.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की, आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक घटकांपासून तयार केली जातात. औषधी वनस्पती, मुळे, पाने, फुले, फळे, खनिजे आणि प्राणीजन्य घटक वापरून चूर्ण, काढे, आसव, अरिष्ट, लेह्य, तेल आणि घृत यांसारखी उत्पादने बनवली जातात.

चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

या शैक्षणिक भेटीचे नियोजन प्रा. अनिकेथ सुर्वे, प्रा. दाजी हुलगे, प्रा. प्राजक्ता झगडे यांनी केले.

स्पर्धेच्या युगात करिअर कसे घडवावे? चेतना फार्मसी तर्फे मार्गदर्शनपर व्याख्यान”

स्पर्धेच्या युगात करिअर कसे घडवावे? चेतना फार्मसी तर्फे मार्गदर्शनपर व्याख्यान”

संपादकीय

आज मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे पळसनाथ जुनिअर कॉलेज, पळसदेव येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या आधुनिक स्पर्धात्मक वातावरणात योग्य करिअरची निवड करणे हे विद्यार्थी तसेच पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक ठरत आहे. करिअरची दिशा ठरवताना विद्यार्थ्यांनी केवळ गुणांकडे न पाहता स्वतःची आवड, क्षमता, कौशल्ये आणि भविष्यातील संधी यांचा समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
स्पर्धा परीक्षांची शास्त्रशुद्ध तयारी, अभ्यासातील सातत्य, प्रभावी अध्ययन पद्धती, वेळेचे योग्य नियोजन तसेच यशासाठी आवश्यक असलेली मेहनत, आत्मविश्वास आणि चिकाटी यांचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. यासोबतच उच्च शिक्षणासाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे वेळेवर पूर्ण ठेवण्याचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, शासकीय सेवा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांतील संधींबाबत आपल्या २४ वर्षाच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, आत्मविश्वास वाढला असल्याचे मत तसेच भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यास हे व्याख्यान नक्कीच उपयुक्त ठरेल, असे मत पळसनाथ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पाठक सर यांनी व्यक्त केले.
या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली.
पळसनाथ जुनिअर कॉलेज, पळसदेव विद्यालयचे प्राचार्य श्री.पाठक सर, तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. चिंतामणी रणवरे यांचे सहकार्य मिळाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

भाटनिमगाव येथे नवीन पोस्ट ऑफिस चे उद्घाटन

भाटनिमगाव येथे नवीन पोस्ट ऑफिस चे उद्घाटन

आज दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी भाटनिमगाव ग्रामपंचायत मध्ये नवीन पोस्ट ऑफिस चे उद्घाटन करण्यात आले. शहरापासून दूर अंतरावर असणारे हे गाव ज्या ठिकाणी बँकेसारख्या सोयी सुविधा देखील मिळवण्यासाठी ग्रामस्थांना पाच ते सात किलोमीटर अंतरावर जावे लागते अशा गावात पोस्ट ऑफिस सारख्या केंद्रीय खात्याच्या सर्व योजना सोयी सुविधा आजपासून लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना उपलब्ध होतील.

हे ऑफिस सुरू होण्यासाठी बारामती विभागाचे *श्री सुदामजी साबळे साहेब* यांनी विशेष प्रयत्न केले आणि मंजुरी मिळवली हे करण्यासाठी बारामती विभागाचे *श्री विजयजी कदम साहेब* यांनी विशेष सहकार्य आणि कागदपत्रांची पूर्तता करत गावकऱ्यांचे मुक्काम आणि पोस्ट दोन्ही भाटनिमगाव असे स्वप्न साकार करत पूर्णत्वास नेले आणि आज रोजी उद्घाटन समारंभ मध्ये उपस्थित राहतात कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून स्थान भूषविले आणि ग्रामस्थांना विविध स्कीम बद्दल माहिती देत पोस्ट ऑफिस बद्दल विश्वास निर्माण केले.

या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी सरपंच मनोहर भोसले यांनी प्रास्ताविक केले, भाटनिमगाव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच अजित बापू खबाले यांनी गावकऱ्यांना आव्हान करत गावात विविध योजनांचे पोस्टामध्ये खाते काढण्यासाठी स्वतः 50 हजारांची टाईम डिपॉझिट खाते काढून पहिल्याच दिवशी लोकांना प्रेरणा दिली, ग्रामसेवक निलेश यादव यांनीही मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता केली, तसेच माजी सरपंच पंजाबराव गायकवाड आणि विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच बावडा उप डाकघर अंतर्गत पंचक्रोशी मध्ये काम करणारे पोस्ट ऑफिस चे कर्मचारी श्री. कृष्णा गीते साहेब, रोहन घोगरे, अनुजा लिगडे, ऋतुजा गुंड, पूजा घोगरे, मानसी कोलते, ऋषिकेश पोतदार, सागर धोत्रे, रुबीना तांबोळी, समीर तांबोळी, गणेश गुरव आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अतिशय उत्साहामध्ये हा उद्घाटन समारंभ पार पडला..

दुसरा जागतिक ध्यान दिन आर्ट ऑफ लिव्हिंग इंदापूर ध्यान केंद्र इथे उत्साहात संपन्न*

*दुसरा जागतिक ध्यान दिन आर्ट ऑफ लिव्हिंग इंदापूर ध्यान केंद्र इथे उत्साहात संपन्न*

इंदापूर:
दुसऱ्या जागतिक ध्यान दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग इंदापूर नवीन ध्यान केंद्राच्या वतीने दिवसभर १४ ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात मुले, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरीवर्ग, गृहि आणि आयोजकांनी सांगितले,
“नवीन केंद्राच्या सुरुवातीलाच नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग इंदापूर नवीन ध्यान केंद्र इंदापूर शहर व संपूर्ण तालुक्याच्या सकारात्मक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आर्ट ऑफ लिव्हिंग इंदापूर नवीन ध्यान केंद्रात १ जानेवारी २०२६ पासून नियमित कार्यक्रमांना सुरुवात होणार असून,
“योगा, हॅपिनेस प्रोग्राम, चिल्ड्रन्स इंट्यूशन प्रोसेस व ध्यान कार्यक्रमांद्वारे समाजातील सर्व घटकांना मानसिक व शारीरिक आरोग्याचा लाभ मिळेल,” असेही त्यांनी नमूद केले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थ्यांची आयुर्वेदीय अर्कशाळा लि.सातारा औद्योगिक भेट

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थ्यांची आयुर्वेदीय अर्कशाळा लि.सातारा औद्योगिक भेट

संपादकीय

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रथम वर्ष डी.फार्मसी आणि द्वितीय वर्ष बी.फार्मसीचे विद्यार्थ्यांनी एका प्रसिद्ध आयुर्वेदीय अर्कशाळा लि.सातारा मध्ये औद्योगिक भेटीचा अनुभव घेतला, जिथे तंत्रज्ञान, संशोधन आणि औषध उद्योगातील आधुनिक उपकरणांचा परिचय मिळाला. वास्तविक औद्योगिक वातावरण पाहण्याची संधी , शैक्षणिक सिद्धांतांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकलसह उदाहरण, आणि पुढील करिअर / उद्योगातील संधी याबद्दल अधिक स्पष्टता देतात. ज्यात विद्यार्थ्यांनी कच्चा माल प्रक्रिया आणि सूत्रीकरण विकास अनुभवले. औषधांची गुणवत्ता कशी तपासली जाते(गुणवत्ता नियंत्रण ,गुणवत्ता हमी,रसायन प्रयोगशाळा, परीक्षण उपकरणे इ. हे प्रत्यक्ष पाहता येते. उत्पादन पद्धती) चे महत्त्व समजते. आधुनिक मशीन, स्वयंचलित प्रक्रिया, हेरार्की सिस्टम ही सर्व प्रत्यक्ष पाहून तांत्रिक ज्ञान विकसित होते. उदाहरणार्थ: अर्क काढण्याची यंत्रे, पॅकिंग लाईन, बॉटलिंग मशीन, इ पाठ्यपुस्तकातील सिद्धांत आणि औद्योगिक व्यावहारिक अनुभव यांचा समन्वय होतो. औषध रचना, सूत्रीकरण घटकांची निवड, निकष पद्धती इ. प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे लक्षात राहते.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की, औद्योगिक भेटीत उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधता येतो. मानसशास्त्रीय, तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून ते उपयुक्त ठरते. औद्योगिक भेटीत उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधता येतो. मानसशास्त्रीय, तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून ते उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक उद्योगातील विविध नोकरी/क्षेत्रे समजतात उत्पादन नियंत्रक ,गुणवत्ता विशेषज्ञ नियमन व अनुपालन अधिकारी, संशोधन व विकास यामुळे भविष्यातील करिअर निर्णय सोपे होतात. प्राचीन काळात आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक घटकांपासून तयार केली जात. औषधी वनस्पती, मुळे, पाने, फुले, फळे, खनिजे आणि प्राणीजन्य घटक वापरून चूर्ण, काढे, आसव, अरिष्ट, लेह्य, तेल आणि घृत यांसारखी उत्पादने बनवली जात होती. मध्ययुगीन काळात आयुर्वेदाचा प्रसार भारतभर झाला. राजाश्रयामुळे वैद्य आणि गुरुकुल पद्धतीद्वारे ज्ञानाचे संवर्धन झाले. अनेक आयुर्वेदिक औषधनिर्मिती केंद्रे (औषधालये) स्थापन झाली आणि स्थानिक पातळीवर औषधे तयार होऊ लागली. आधुनिक काळ स्वातंत्र्यानंतर आयुर्वेदाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले. आयुर्वेदिक उत्पादनांचे औद्योगिक स्तरावर उत्पादन सुरू झाले. च्यवनप्राश, त्रिफळा, अश्वगंधा, ब्राह्मी, नीम, आयुर्वेदिक तेल, सौंदर्यप्रसाधने आणि आरोग्यपूरक उत्पादने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. आजचा काळ आयुर्वेदिक उत्पादने केवळ भारतातच नव्हे तर जगभर लोकप्रिय झाली आहेत. नैसर्गिक, दुष्परिणाम कमी असलेली आणि जीवनशैलीशी सुसंगत अशी ही उत्पादने आरोग्य, सौंदर्य आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. या औद्योगिक भेटीचे नियोजन प्रा. अनिकेथ सुर्वे, प्रा. दाजी हुलगे, प्रा. रूतुजा धायगुडे, प्रा. गीतांजली कांबळे यानी केले.

रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2025-26 पिंपरी बुद्रुक येथे संपन्न

रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2025-26 पिंपरी बुद्रुक येथे संपन्न

इंदापूर तालुका

रोहन घोगरे

पिंपरी बुद्रुक : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या कृषी मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

 

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी प्रात्यक्षिके, शेतकरी संवाद, शेतभेटी, पीक व्यवस्थापन, कीड-रोग निरीक्षण, माती व पाणी संवर्धन यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे ग्रामीण भागात कृषीविषयक जागरूकता निर्माण करत आहेत.

 

गावातील ज्येष्ठ नागरिक व प्रगतशील बागायतदार मा. श्री. बबन शंकर बोडके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमास सहकार महर्षी शंकरराव मोहिते–पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री. श्रीकांत बोडके हे प्रमुख पाहुणे लाभले.यावेळी गावातील सरपंच मा. सौ. भाग्यश्री बोडके, उपसरपंच संतोष सुतार , माजी उपसरपंच मा.श्री. पांडुरंग बोडके, पोलिस पाटील वर्धमान बोडके, ग्रामविकास अधिकारी मा. श्री. गणेश लंबाते, सहाय्यक कृषी अधिकारी मा.श्री. संदीप घुले, ग्राम महसूल अधिकारी मा. सौ. दीपिका चौधरी तसेच समस्त सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कार्यक्रमादरम्यान स.म.शं.मो.पा.स.सा.का.चे संचालक मा.श्री.श्रीकांत बोडके व सहाय्यक कृषी अधिकारी मा.श्री.संदीप घुले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

 

स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी कृषीदूत किरण बिडवे, प्रज्वल सुतार, सुजल शहाणे, किरण कदम, श्रीयश कोरडे, अभिषेक काळे, जयदत्त तांबिले, रत्नदीप कचरे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर.जी. नलावडे, प्रा.एस.एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.

इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी

इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी

संपादकीय

इंदापूर तालुक्यातील चेतना कॉलेज ऑफ फार्मसीची गुणवान विद्यार्थिनी कुमारी आरती आबा कारंडे हिने आपल्या जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता यांच्या जोरावर एक नव्हे, तर दोन प्रतिष्ठित शैक्षणिक शिष्यवृत्त्या मिळवून उल्लेखनीय असा मानाचा टप्पा गाठला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने साधलेल्या या यशामुळे इंदापूर तसेच कॉलेजचा मान आणखी वाढला आहे.

अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे आयोजित “शिष्यवृत्ती वाटप २०२५” या राज्यस्तरीय कार्यक्रमात आरती कारंडे हिचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी आयोजित या भव्य सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बीव्हीजी ग्रुपचे डायरेक्टर माननीय श्री. हणमंतराव गायकवाड, तसेच तंत्रशिक्षण विभागाचे उपसंचालक श्री. रवी घाटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या संदेशांनी व प्रेरणादायी वातावरणात झालेल्या या वितरण समारंभात आरतीस शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

याचबरोबर, शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक परिस्थिती आणि मुलाखतीतील कामगिरी या तीनही निकषांवर आरती करांडे हिची SOCIAL 100 FOUNDATION या पुण्यातील प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठीही निवड झाली आहे. “समाजाकडून समाजासाठी” या ब्रीदवाक्यास अनुसरून कार्य करणाऱ्या या संस्थेच्या निवड प्रक्रियेत आरतीने उत्तम कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले. तिला मुलाखत आणि दस्तऐवज सादरीकरणासाठी धनकवडी येथील K.K. मार्केटमध्ये बोलावण्यात आले होते. सर्व कागदपत्रांची तपासणी आणि प्रत्यक्ष संवादातून आरतीने आपल्या शैक्षणिक प्रवासातील प्रामाणिकता आणि ध्येयदृष्टी स्पष्टपणे मांडत परीक्षकांचा विश्वास जिंकला.

गेल्या काही वर्षांत राज्यात मुलींच्या उच्च शिक्षणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) अंतर्गत व्यावसायिक शिक्षणात मुलींच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण व निम्न आर्थिक स्तरातील गुणी विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती हा आधार ठरत असून त्यांच्या भविष्याच्या मार्गक्रमणाला बळकटी देणारा महत्त्वाचा घटक ठरतो. आरती या यशामुळे अशा शिष्यवृत्ती उपक्रमांचे महत्व अधोरेखित होते.

आरतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की,

“आरतीसारख्या विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिक्षकांनी दिलेले योग्य मार्गदर्शन यांचा संगम म्हणजेच हे यश तसेच तिच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा.”

चेतना फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी आरतीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कॉलेजच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.

आरती कारंडेच्या कुटुंबियांनीही तिच्या या दुहेरी यशाबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त करत, “शिष्यवृत्तीमुळे शिक्षणाची आर्थिक जबाबदारी हलकी झाली असून पुढे आणखी उत्तम शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळाली आहे,” असे सांगितले.

आरतीचे हे यश केवळ तिच्या वैयक्तिक प्रगतीचे प्रतीक नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनी किती मोठ्या संधींचा लाभ घेऊ शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. तिच्या आगामी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचा ‘वेल्नेस फॉरएव्हर’ आणि ‘मुक्ताई ब्लड बँक’ सोबत सामंजस्य करार व क्षेत्र भेट

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचा ‘वेल्नेस फॉरएव्हर’ आणि ‘मुक्ताई ब्लड बँक’ सोबत सामंजस्य करार व क्षेत्र भेट

संपादकीय 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी (Pharmacy) क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाची माहिती मिळावी, औद्योगिक संबंध वाढावेत आणि व्यावहारिक ज्ञान मिळावे या उदात्त हेतूने इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कॉलेजने नुकताच ‘वेल्नेस फॉरएव्हर’ (Wellness Forever) या नामांकित केमिस्ट आणि जीवनशैली दुकानासोबत (Chemists & Lifestyle Store) आणि ‘मुक्ताई ब्लड बँक’ (Muktai Blood Bank) सोबत सामंजस्य करार (MOU – Memorandum of Understanding) केला असून, या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दोन्ही ठिकाणी क्षेत्र भेट (Field Visit) दिली.
या क्षेत्र भेटीमध्ये आणि सामंजस्य करारामुळे (MOU) विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या शाखांचा – सामुदायिक फार्मसी (Community Pharmacy) आणि रक्तपेढीचे कामकाज (Blood Bank Operations) – थेट अनुभव मिळाला.
‘वेल्नेस फॉरएव्हर’ ला भेट: सामुदायिक फार्मसीचे ज्ञान
चेतना कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ‘वेल्नेस फॉरएव्हर’ या औषध दुकानाला भेट दिली. ही भेट सामुदायिक फार्मसीच्या (Community Pharmacy) दैनंदिन कामकाजाची प्रक्रिया जवळून समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली.
औषधांचे व्यवस्थापन: विद्यार्थ्यांनी औषधांची खरेदी, साठवणूक, मागणीनुसार पुरवठा आणि योग्य तापमान राखण्याचे महत्त्व याबद्दल माहिती घेतली.
ग्राहकांशी संवाद: फार्मसिस्ट (Pharmacist) ग्राहकांना औषधांबद्दल आणि त्यांच्या वापराच्या पद्धतीबद्दल (Dosage and usage instructions) कशा प्रकारे समजावून सांगतात, याचा अनुभव घेतला.
नवीन तंत्रज्ञान: आधुनिक रिटेल फार्मसीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बिलिंग आणि इन्व्हेंटरी (Billing and Inventory) व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली.
कायदेशीर बाबी: शेड्यूल ‘एच’ (Schedule H) आणि इतर नियंत्रित औषधांची विक्री करताना पाळले जाणारे नियम व कायदेशीर प्रक्रिया (Legal Procedures) समजावून सांगण्यात आल्या.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना डी. फार्मसी (D. Pharm.) आणि बी. फार्मसी (B. Pharm.) अभ्यासक्रमानंतर फार्मसी स्टोअरमध्ये काम करण्याची संधी, जबाबदारी आणि आवश्यक कौशल्ये याबद्दल स्पष्ट कल्पना मिळाली.
‘मुक्ताई ब्लड बँक’ ला भेट: रक्तपेढीचे महत्त्व
याच भेटीचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांनी ‘मुक्ताई ब्लड बँक’ला भेट दिली. ब्लड बँक (Blood Bank) हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने (Public Health) अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
रक्त संकलनाची प्रक्रिया: रक्तदात्यांकडून (Donors) रक्त गोळा करण्याची वैज्ञानिक पद्धत (Scientific Method) विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.
रक्त चाचणी आणि वर्गीकरण: संकलित रक्ताची एचआयव्ही (HIV), हिपॅटायटीस (Hepatitis) यांसारख्या संसर्गासाठी चाचणी कशी करतात आणि रक्तगट (Blood Group) कसा निश्चित करतात, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
रक्तघटक वेगळे करणे: रक्तामधून लाल पेशी (RBCs), प्लाझ्मा (Plasma), प्लेटलेट्स (Platelets) आणि क्रायोप्रिसिपिटेट (Cryoprecipitate) असे विविध घटक कसे वेगळे केले जातात आणि ते विशिष्ट तापमानात कसे साठवले जातात, हे पाहण्यास मिळाले.
सुरक्षित साठवणूक: वेगवेगळ्या रक्त घटकांसाठी आवश्यक असणारे तापमान आणि साठवणुकीचे नियम (Storage Protocols) विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

या महत्त्वपूर्ण टप्प्यावर बोलताना कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी विद्यार्थ्यांना एक अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी संदेश दिला.”प्रिय विद्यार्थी मित्रांनो, केवळ वर्गातील शिक्षण पुरेसे नाही. औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) हे एक असे क्षेत्र आहे, जे थेट मानवी जीवनाशी जोडलेले आहे. ‘वेलनेस फॉरएव्हर’ आणि ‘मुक्ताई ब्लड बँक’ येथील प्रत्यक्ष भेटीमुळे तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की, प्रत्येक औषध विक्रेता (Pharmacist) हा समाजातील एक महत्त्वाचा आणि जबाबदार घटक आहे. हा सामंजस्य करार तुमच्यासाठी ज्ञानाची आणि संधींची नवी दारे उघडत आहे. या संधींचा वापर करून स्वतःला अधिक सक्षम बनवा. फार्मसीचा विद्यार्थी म्हणून, तुमचे ध्येय केवळ नोकरी मिळवणे नसावे, तर उत्कृष्ट आरोग्य सेवा (Quality Healthcare) देण्यामध्ये आपले योगदान देणे हे असावे. करुणा आणि जबाबदारी (Responsibility) या दोन मूल्यांना कधीही विसरू नका. जिथे ज्ञान आहे, तिथे सेवा आहे.”
प्राचार्य सरांच्या या संदेशाने विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार व्यावसायिक (Responsible Professional) म्हणून काम करण्याची भावना अधिक दृढ केली. चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचा हा उपक्रम शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मैलाचा टप्पा (Milestone)ठरणार आहे.
या क्षेत्र भेटीदरम्यानच, चेतना कॉलेज ऑफ फार्मसीने ‘वेलनेस फॉरएव्हर’ आणि ‘मुक्ताई ब्लड बँक’ या दोन्ही संस्थांशी सामंजस्य करार (MOU) केला. या करारावर कॉलेजच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी (Training and Placement Officer), प्राध्यापिका शिवानी भापकर यांनी स्वाक्षरी केली.या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दीष्ट विद्यार्थ्यांना इंटर्नशिप (Internship), प्रशिक्षण (Training) आणि प्लेसमेंट (Placement) संधी उपलब्ध करणे तसेच शिक्षण आणि उद्योगामध्ये (Academia-Industry) प्रभावी समन्वय साधणे आहे. प्रा. भापकर यांनी यावेळी सांगितले की, “अशा प्रकारच्या सहकार्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर थेट व्यावसायिक कौशल्ये (Professional Skills) आणि नोकरीच्या संधी (Job Opportunities) मिळतील.”
या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन प्राध्यापिका प्राजक्ता झगडे मॅडम यांनी केले, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आणि संस्थांशी समन्वय साधण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

error: Content is protected !!