Home Blog Page 8

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २३ हजार मनुष्यबळाची नियुक्ती-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २३ हजार मनुष्यबळाची नियुक्ती-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संपादकीय

पुणे, दि.२: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या कामकाजाकरिता जिल्ह्यात १३ तालुक्यात एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

 

बारामती तालुक्यात १ हजार ९४५, मावळ १ हजार ६१२, मुळशी १ हजार ४९५, शिरुर २ हजार १९०, हवेली १ हजार ८००, दौंड २ हजार ६० , इंदापूर २ हजार ६३२ , पुरंदर १ हजार ५३८, भोर १ हजार १९०, वेल्हे ४५०, आंबेगाव १ हजार ५७५, जुन्नर २ हजार ४११ आणि खेड २ हजार २१६ तालुक्यात असे एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.

 

*जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र*

बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र आहेत.

 

*जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष*

निवडणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी ०२०-२६१२३३७१ हेल्पलाईन क्रमांक तसेच १०७७ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत’ केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत’ केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर,

संपादकीय

मुंबई दि. 01 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांपासून सुरू ठेवलेल्या नियोजनबद्ध विकासामुळे आज भारताची अर्थव्यवस्था जगासाठी एक आशेचा किरण ठरली आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो देशातील गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कामगारांचे जीवनमान उंचावणारा ठरणारा आहे, अशी भावना राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

 

कामगार मंत्री श्री फुंडकर म्हणाले, राज्यातील पायाभूत सोयी सुविधांसाठी अर्थसंकल्पात दिलेल्या भरीव निधीमुळे राज्यातील ‘ इन्फ्रास्ट्रक्चर’ जागतिक स्तराचे होण्यास मदत मिळणार आहे. देशांतर्गत उत्पादनावर दिलेला भर आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी केलेली १० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद ही देशातील औद्योगिक क्रांतीला नवी दिशा देणारी आहे. वस्त्रोद्योग क्लस्टरच्या विकासामुळे आणि खनिज कॉरिडॉरमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, ज्याचा सर्वाधिक फायदा तरुण कामगार वर्गाला होईल.

 

सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सरकारने कॅन्सर आणि मधुमेहाची औषधे स्वस्त करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दिलासादायक आहे. तसेच, बायोफार्मा उत्पादनासाठी १० हजार कोटींची तरतूद करून भारताला या क्षेत्राचे जागतिक ‘हब’ बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामुळे आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि परवडणाऱ्या होतील, असेही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी नमूद केले आहे.

 

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या खादी आणि हातमाग क्षेत्रासाठी ‘महात्मा गांधी ग्रामस्वराज’ अभियान ही क्रांती आहे. हातमाग उत्पादनात वाढ झाल्यामुळे ग्रामीण कारागिरांच्या कौशल्याला जागतिक बाजारपेठ मिळेल आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर दिलेला भर आणि ४ राज्यांमध्ये प्रस्तावित असलेले खनिज कॉरिडॉर हे भारताच्या सर्वांगीण विकासाचे निदर्शक आहेत. आर्थिक विकास दरात सातत्याने वाढ करणे हे आमचे पहिले कर्तव्य असून सरकार त्या दृष्टीने ठोस पावले उचलत आहे, असेही मंत्री ॲड फुंडकर म्हणाले.

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताचे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताचे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपादकीय

मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

 

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी ते बोलत होते. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे, पूर्वी जी केवळ 1 लाख कोटी असायची. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील विकासाचा विचार करुन शहरीकरणाच्या एकात्मिक विचार करण्यात आला आहे. यातून विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि निधी प्राप्त होणार आहे. याचा मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. पुणे-हैदराबाद कॉरिडॉरचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. ग्रोथहबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबला होणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

*महाराष्ट्रासाठी काय?*

– महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : 378.38 कोटी

– महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्प : 167.28 कोटी

– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 283.77 कोटी

– महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : 385.78 कोटी

– उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : 207.10 कोटी

– शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 646.24 कोटी

– मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : 313.65 कोटी

– जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : 240.90 कोटी

– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : 6103 कोटी

– मुंबई मेट्रो : 1702 कोटी

– एमयुटीपी 3 : 462 कोटी

– एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : 155.32 कोटी

– समृद्धी महामार्गावर आयटीएस : 680.79 कोटी

– पुणे मेट्रो : 517.74 कोटी

*(ही केवळ मुंबई, पुण्यातील प्राथमिक आकडेवारी आहे. एकूण : 12,355 कोटी)*

न्यू लीफ इंग्लिश सरडेवाडी या ठिकाणी बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात साजरा

न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी बाल आनंद बाजार चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी बाल आनंद बाजार साठी मोठ्या प्रमाणात फळे भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते त्यास पालक वर्गांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावे यासाठी शाळेकडून हा छोटासा प्रयत्न त्यास पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य खबाले सर सौ रननवरे मॅडम सौ राऊत मॅडम यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी आवर्जून स्कूल अध्यक्ष सौ पद्मश्री पाटील मॅडम सचिव श्री पी डी पाटील साहेब उपस्थित होते. कार्यक्रमा अगोदर मुलांचा व मुलींचा शेतकरी गीतावर भन्नाट असा डान्स घेण्यात आला याचा पालकांनी याचा आनंद घेतला व शिक्षकांचे कौतुक केले.

निमगाव केतकी शेळगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चुरस

निमगाव केतकी शेळगाव जिल्हा परिषद पंचायत समिती

काटी लाखेवाडी गटामध्ये जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार

मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यांचे पंचायत राज मधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये काटी लाखेवाडी या गटामध्ये होणारी निवडणूक ही रंगतदार होणारा असून त्याचे कारण असे आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विख्यात असणारे ३ पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री श्रीमंत ढोले हे आहेत तसेच भाजप पक्षाचे विलास बापू वाघमोडे तसेच शिवसेनेचे (उभाटा) श्री नितीन शिंदे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

हे तिन्ही उमेदवार त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असून राजकारणामध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणार आहेत त्यामुळेच एकमेकांसाठी हे तगडे आव्हान असणार आहे जनतेचा कौल कोणाकडे आहे हे निकला दिवशीच ठरेल.

बावडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची आग्निवीरमध्ये निवड

बावडा प्रतिनिधी
येथील श्रीमत रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष वाणिज्य विभागात शिकत असणारा विद्यार्थी सिद्धार्थ राजकुमार कांबळे याची भारतीय सशस्त्र दलातील आग्निवीर यामध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे यांनी सिद्धार्थ आणि त्याचे वडील राजकुमार कांबळे या दोघांचा सत्कार केला. सिद्धार्थ रेडणी येथील सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर त्याने यश मिळवल्याबद्दल महाविद्यालयाकडून त्याचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालय सर्व प्राध्यापक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धनजी पाटीलसाहेब, ज्येष्ठ संचालक उदयसिंह पाटील साहेब उपाध्यक्ष मनोज भाऊ पाटील साहेब सचिव किरण काका पाटील व सर्व संचालक मंडळाने सिद्धार्थचे निवडी बद्दल कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवईजी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

https://x.com/i/status/2017511654599413959

भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवईजी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 

https://x.com/i/status/2017511654599413959

भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवईजी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’ची पाहणी केली.

भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवईजी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’ची पाहणी केली.

न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाकडे एक ठोस पाऊल… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाकडे एक ठोस पाऊल…

 

भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवईजी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चे उदघाटन संपन्न झाले.

 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकॅडमीची पाहणी करताना उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांची विशेष आठवण झाल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाबाबत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा असलेला काटेकोर दृष्टिकोन आणि गुणवत्तेचा आग्रह नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’चे अभिनंदन करत सांगितले की, महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेचा अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार वापर करण्यात आला आहे. अवघ्या एका वर्षात पूर्ण झालेल्या या इमारतीतील वर्गखोल्या, ऑडिटोरिअम आणि प्रशिक्षण सुविधा या सर्व बाबी उच्च दर्जाच्या असून, या संकल्पनेमागील नियोजन आणि अंमलबजावणी उल्लेखनीय आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

कायद्याचे औपचारिक शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धती यातील अंतर कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थेची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नव्या न्याय, दंड आणि साक्ष संहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित वकिलांची निर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संशोधनाला चालना देणारे हे केंद्र न्यायव्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यास मोलाची भूमिका बजावेल. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन देशातील इतर राज्यांमध्येही अशा स्वरूपाच्या अकॅडमी उभारल्या जातील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, मेघालय उच्च न्यायालयाच्या मा. मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!