Home Blog Page 13

श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर :: एक प्राचीन तीर्थक्षेत्र

श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर :: एक प्राचीन तीर्थक्षेत्र

रोहन घोगरे

इंदापूर तालुका प्रतिनिधी
निरानरसिंहपूर हे स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्याचे ते शेवटचे टोक आहे. या ठिकाणी भगवान विष्णूचे तिसऱ्या अवतार श्री नरसिंह भगवान यांचे खूप प्राचीन असे मंदिर आहे. या क्षेत्राच्या एका बाजूने निरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नाखासारखा आहे.
येथील श्री नरसिंह हा महाराष्ट्र ,कर्नाटक आणि मध्य-प्रदेश यातील अनेक नरसिंह भक्तांचा कुलस्वामी आहे.या सर्व भक्तांचे श्री नरसिंह हे अधिष्ठान आहे.ते या क्षेत्रास मानतात.इतकेच काय तर ज्यांचा कुलस्वामी नाही अशा हि अनेकांना क्षेत्राचे महात्म्य व रमणीयता जाणवली व ती त्यांनी मान्य केली.अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात व नरसिंहाचा आशीर्वाद घेतात.
तसेच या क्षेत्राला शास्त्रीय महत्व देखील आहे.असे म्हणजे शास्त्रज्ञानी या क्षेत्राचा अभ्यास केला होता. त्यात असे दिसून आले कि निरा- नरसिंहपूर हे पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे. तसे शास्त्रीय पुरावे देखील आहेत.हे एक भू वैज्ञानिक सत्य आहे.जे अनेक लोकांना निरा-नरसिंहपुरला भेट देण्यास आकर्षित करतात.
तसे खूप पुरावे आहेत कि या पवित्र स्थानाला खूप मोठा इतिहास आहे.पूर्वी पासूनच हे स्थान प्रसिद्ध आणि धार्मिक आहे.आपल्याकडे असा पुरावा आहे कि पूर्वी प्रभू रामचंद्र यांनी आपली पवित्र यात्रा रावणाचा वाढ केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून पूर्ण केली. त्यांनी हि यात्रा निरा-नरसिंहपूर येथूनच सुरु केली होती.हे स्थान खूप सुंदर आणि धार्मिक आहे. अनेक मुनी आणि भक्त येथे पूजेसाठी येतात. असे म्हटले जाते कि महर्षी व्यास सुद्धा येथे काही कालावधीसाठी राहिले होते.समर्थ रामदास यांनी दोन वेळा निरानरसिंहपूर येथे भेट दिली याची प्रचीती येते.शके १५५३ च्या एकादशीस समर्थ पंढरपुरास आले होते.चंपाषष्ठी साठी त्यांना पालीच्या खंडोबाला जायचे होते.ते येथे आले होते आणि त्यांनी संगमावर स्नान ,संध्या आटपून त्यांनी एक सुंदर कीर्तन सादर केले होते. असे येथील श्रद्धाळू चे आणि पुजाऱ्यांचे मत आहे.
निरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला अंडाकृती प्रचंड असा घाट शके १५२७ मध्ये बांधून पूर्ण झाला.हे बांधकाम कोणी त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी केले.सदरील बांधकाम सतत ३ वर्षे चालू होते. पुढे शके १७८७ साली रघुनाथ राव विन्चुरकर यांनी देवालयाचा एकदरीत जीर्णोद्धार केला त्यासंबंदीचा शिलालेख देवालयात उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील मोठ्या नद्यांपैकी निरा नदी आणि भीमा नदी यांचा या ठिकाणी पवित्र संगम आहे. संगमाच्या ठिकाणी श्रींचे प्राचीन मंदिर निसर्गरम्य वातावरणामध्ये भक्तांच्या कल्याणाकरता अनेक शतकांपासून संरक्षित आहे. नीरा भीमा या नद्याच्या संगमावरील घाटामध्ये शिल्प सौंदर्य लक्षणीय आहे. घाटाच्या पायऱ्यात बसविलेल्या मोठ्या दगडातून हत्तीचे शिल्प घडविले आहेत.संगमात स्नान करून संगम घाट चडत असताना आपली सोंड वर करून भक्ताला अभिवादन करून स्वागत करतात. हत्ती व सिंह यांची जोडी लक्ष वेधते शिवाय मगरीचे पाच शिल्प आहेत. जे सर्व भाविकांचे मन उल्हासित करतात.

सध्याचे श्रींचे देवालय हे उतुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुशिलाचा एक उत्तम नमुना आहे.देवालयाच चारही बाजूंनी रुंद व भक्कम असा भक्कम तट आहे.श्री मूर्तीचा प्रमुख गाभारा त्या पुढील गर्भागार,रंग शिलेचा सभामंडप हे संपूर्ण दगडी बांधकाम असून दगडी छतावरील नक्षी व विविध देवाच्या मूर्ती लक्षणीय आहेत. घडीव दगडी खांब कुशलतापूर्वक आहे.पितळी दरवाज्यापुढे लाकडी मंडप असून त्यापुढे भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. रंग शिळेच्या मंडपाचे दोन्ही बाजूस तीन दरवाजे आहेत.ह्या सर्व दगडी दरवाज्यावर जय विजय घडविलेले असून, पितळी दरवाज्यावरील जय-विजयाची सुबकता व मुद्रा विलोभनीय आहेत.वेगवेगळया प्रकारच्या नक्षी, घाटदार खांब ,कंगोरे प्रमाणबद्ध व अतीव देखणा असा पितळी दरवाजा येथे आहे.
देवालयाच्या आतील बाजूस असणाऱ्या परिवार देवता खालील प्रमाणे

१) शेजघर : हे रंगशिळेच्या गाभाऱ्यात असून शेजघरात दोन पलंग आहेत.एक श्री नरसिंहाचा व दुसरा शामराजाचा .पलंगावर गाद्या ,गिर्द्या ,उश्या व श्रींची प्रतिमा आहे.

२) स्तंभ-नरसिंह : रंग शिळेच्या सभा मंडपातील एका स्तंभावर हिरण्यकश्यपूच्या वधाचा प्रसंग कोरलेला आहे.

३) लक्ष्मी मंदिर : श्री नरसिंहाचे डावे बाजूस श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. श्री महालक्ष्मीची रेखीव व सुंदर मूर्ती गंडकी शिळेची आहे.मूर्ती उभी आहे.पूजा बांधल्यावर बसल्यासारखी दिसते.या मंदिराचे शिखर हे दगडी आहे.हे शिखर निरा नदीच्या पात्रापासून सुमारे १५० फुट उंच आहे.शिखराच्या दोन दगडामध्ये एक लहानशी पहात आहे.त्यातून दिवस रात्र पाणी जीरपते.उगमस्थान अज्ञात असलेला हा लहानसा पाझर येथे गुप्त गंगा म्हणून ओळखला जातो.हा एक चमत्कारच आहे.तर्क शास्त्राने याचा उलगडा करता येत नाही.

४) भक्त प्रल्हाद मंदिर : श्री नरसिंहाच्या समोर लाकडी सभामंडपात भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. हात जोडून उभी राहिलेली ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे.प्रल्हाद कृत नरसिंह मूर्ती व प्रल्हाद मूर्ती एकमेकांच्या समोर असून नरसिंह मूर्तीच्या पायांच्या समपातलीस या मूर्तीचे मस्तक येते हे एक विशेष आहे.

५) श्री दत्तात्रय मंदिर : दत्तासाठी एक छोटेसे देवालय बांधलेले आहे.हे बांधकाम संपूर्ण लाकडी असून दत्तमूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाची आहे.हि मनोहर मूर्ती सिंहासनावर स्थापित आहे.

६) भीमा शंकर : देवाच्या उजव्या बाजूस भीमा शंकराचे छोटेसे देऊळ आहे. शाळूकिंच्या मानाने पिंडी उंच आहे.

७) विठ्ठल-रुक्मिणी : भीमा शंकराच्या उजव्या बाजूस छोट्या देवळात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत.दोन्ही मूर्ती पाहिल्यास पंढरपूरची आठवण येते.

८) राघवेंद्र स्वामी वृंदावन : मद्व संप्रदायाचे श्रद्धास्थान मंत्रालय स्थित श्री राघवेंद्र स्वामी हे भक्त प्रल्हादाचा अवतार होत.वृंदावन प्रवेशानंतर त्यांचा प्रत्यक्ष वास मंत्रालय क्षेत्री आहे.मंत्रालय सवे निरा नरसिंहपूर क्षेत्री मी विशिष्ट काळी निवास करेल अशी त्यांची भविष्यवाणी असल्याने शके १८५० साली श्री राघवेंद्र स्वामींचे वृंदावन श्री नरसिंह देवालयात बांधले गेले.दरवर्षी श्रावण महिन्यात आराधना महोत्सव साजरा केला जातो.

९) शालीग्राम : शाकंबरीच्या मंदिराजवळ शालीग्रामाच्या आकाराचा एक मोठा पाषाण आहे.

१०) तरटी नरसिंह : मोठा ओटा त्याच्या केंद्र स्थानी तरटी वृक्ष त्याच्या खाली श्रींच्या चार पादुका असून मंदिरा शेजारच्या दुसऱ्या तरटी वृक्षास पार बांधलेला आहे.

११) शाकंबरी : अठरा भूजांनी युक्त अशी देवीची मूर्ती या मंदिरात आहे.

१२) काशी विश्वेश्वर : खोल गाभारा असलेले शिकार युक्त व महादेवाच्या पिंडी प्रमाणे दिसणारे एक ओबडधोबड मध्यम देऊळ ,समोर बसविलेला एक मोठा दगडी नंदी व गाभाऱ्यातील पिंडी शाळुंका हा काशी विश्वेश्वर येथे आहे.पिंड काढली असता खोलगट भाग दिसतो त्यात तीन लिंग आहेत ते ब्रह्मा ,विष्णू आणि महेश

१३) काळा दत्त : काशी विश्वेश्वराच्या उजव्या बाजूस एका देवळात पाषाणाची दत्ताची मूर्ती आहे.त्यास काळा दत्त असे म्हणतात.

१४) मुहूर्त गणपती : एका स्तंभावरील कमानीत गजाननाची मूर्ती आहे.मुख्य देवालय बांधण्याअगोदर ही मूर्ती स्थापन केली.

१५) काळभैरव : पूर्व दरवाज्याकडे भैरव नाथाचे देऊळ ओवरीत आहे.हे स्थान सोनारी येथील भैरव नाथाच्या दोन मूर्ती आहेत.

१६) रामेश्वर : लक्ष्मी मंदिर लगत एक रामेश्वराचे हे देऊळ आहे.

अशाप्रकारे हार्मनीय वातावरणामध्ये उभे असलेले इंदापूर तालुक्यातील हे तीर्थक्षेत्र नक्कीच पाहण्यासाठी आहे आणि विष्णूचे तिसऱ्या अवतार नरसिंह भगवान यांच्या दर्शनाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी नक्की यावे..

-रोहन घोगरे
इंदापूर तालुका प्रतिनिधी

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

इंदापूर – ( दि. 28)  चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले .तसेच या कार्यक्रमाच्या औचित्य साधून चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता सोमनाथ माने उपस्थित राहिल्या .सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवली.
यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बहुमोल कार्याचे वर्णन त्यांच्या भाषणातून केले.
शिक्षिका प्रांजली सुतार यानींही मुलांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या ज्योतिराव फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा 1848 रोजी भिडे वाड्यात सुरू केली . व पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना केले.
शिक्षणासाठीच नव्हे तर ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांसाठी व दलित समाजासाठी संघर्ष केला.
शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी हे ग्रंथ लिहिले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती पोवाडा सुद्धा लिहिला.
तसेच युवराज शिंदे सर यांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार व्यक्त केले.
अशाप्रकारे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमा पूजन करून श्रद्धांजली अर्पण केली

चेतना फार्मसी महाविदयालय आयोजित कुर्डुवाडी मधील विविध कनिष्ठ महाविद्यालय मध्ये बारावी नंतरची कारकीर्द या विषयावर मार्गदर्शन.

चेतना फार्मसी महाविदयालय आयोजित कुर्डुवाडी मधील विविध कनिष्ठ महाविद्यालय मध्ये बारावी नंतरची कारकीर्द या विषयावर मार्गदर्शन.

संपादकीय

इंदापूर- सरडेवाडी येथील चेतना फाऊंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविदयालय आयोजित कुर्डुवाडी मधील विविध कनिष्ठ महाविद्यालय मध्ये बारावी नंतरची कारकीर्द या विषयावर मार्गदर्शन चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के विज्ञान शाखेसाठी पर्याय अभियांत्रिकी (Engineering): अभियांत्रिकीमध्ये अनेक शाखा आहेत, जसे की संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी.वैद्यकीय (Medicine): वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस किंवा बीडीएस यांसारख्या अभ्यासक्रमांना मोठी मागणी आहे.सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology): या क्षेत्रात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, संशोधन सहाय्यक यांसारख्या नोकऱ्या उपलब्ध आहेत बायोटेक्नोलॉजी/बायोकेमिस्ट्री (Biotechnology/Biochemistry): हे अभ्यासक्रम विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील नवीन संधी देतात. बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्याच्या कारकिर्दीचा पाया रचतात. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांकडे अन्य विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पर्याय आहेत. नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेशद्वार मानले जाते. NEET ची काठीण्य पातळी खूप उंच असते

आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुईवाडीचे प्राचार्य श्रीमती शकिलाबी सय्यद, वर्गशिक्षिका श्रीमती दीपज्योती भांगे,अध्यक्ष श्री अमोल सुरवसे सर, व्यवस्थापकीय संचालक श्रीमती पूजा सुरवसे मॅडम, महात्मा ज्योतिबा फुले कला व विज्ञान महाविद्यालय कुईवाडीचे प्राचार्य सोनवणे सर, वर्गशिक्षिक मगर सर आणि डॉ. नेताजी कराळे कनिष्ठ महाविद्यालय चिंचगावचे प्राचार्य मोहन देवकाते सर, उपप्राचार्य श्रीमती प्रियंका शिंदे मॅडम यांचे मदत झाली.

 

तसेच चेतना फार्मसी चे प्रा.अनिकेत सुर्वे आणि दत्ता कडवळे यांचे मदत मिळाली.

 

चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

BSF जवानो के बीच घुसपैठ के खिलाफ दहाड़े अमित शाह…

BSF जवानो के बीच घुसपैठ के खिलाफ दहाड़े अमित शाह…

 

मैं आज यह स्पष्ट करना चाहता हूं कि हम इस देश में से एक-एक घुसपैठिए को चुन-चुन कर बाहर निकालेंगे। ये हमारा प्रण है। SIR की प्रक्रिया देश और लोकतंत्र की सुरक्षा के लिए है।

 

– अमित शाह गृह मंत्री

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यातील 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी

मुंबई:-राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यातील 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आज 18 नोव्हेंबर रोजी प्राप्त बदली आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्ण हे सध्या पुण्यातील (Pune) सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था असलेल्या यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. तसेच, राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या चार IAS अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.

IAS अधिकाऱ्यांचे सध्याचे ठिकाणी आणि बदली झालेला पदभार

1. राहुल रंजन महिवाल (IAS:RR:२००५) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

2. प्रकाश खपले (IAS: SCS: २०१३) आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

3. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS: SCS: २०१६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

4. त्रिगुण कुलकर्णी (IAS: SCS: २०१६) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची अध्यक्ष, SSC आणि HSC बोर्ड, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

5. अंजली रमेश (IAS: RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वास देवकर यांना तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विरासत पुरस्कार देवून सन्मान.

विश्वास देवकर यांना तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विरासत पुरस्कार देवून सन्मान.

संपादकीय

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील भूमिपुत्र, ज्येष्ठ संपादक डाॅ. विश्वास देवकर यांना नुकतेच मुंबई येथे विरासत पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मराठी–हिंदी संपादक पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि काशी- वाराणसी विरासत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी साहित्य व मीडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात देशभरातील १७ राज्यांतील संपादक, लेखक, अभ्यासक आणि पत्रकार सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच उत्तर प्रदेश शासनाचे विशेष सहकार्य या महोत्सवाला लाभले.

हिंदीतील पहिले वृत्तपत्र ‘उदन्त मार्तण्ड’ याच्या प्रकाशनाला यंदा २०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्त हिंदी पत्रकारितेच्या इतिहासातील मोलाच्या योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कमलेश सुतार, रेखा देशपांडे, डाॅ. विश्वास देवकर, शरद वैद्य ( मरणोत्तर ) यांना विरासत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हिंदी पत्रकारितेतील भीष्माचार्य आणि कोकणचे सुपुत्र पत्रकार महर्षी कै. बाबूराव पराडकर यांचे स्मारक त्यांच्या मुळगावी म्हणजे सिंधुदुर्गात पराड येथे व्हावे अशी विनंती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी मंत्री आशिष शेलार यांना केली.

या महोत्सवाचे उद्घाटन आसामचे महामहिम राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केले.

या दोन दिवसीय सोहळ्यात ‘भारत : साहित्य आणि मीडिया महोत्सव’ या चर्चासत्रात प्राध्यापक सोमा बन्द्योपाध्याय ( कुलपति, शिक्षक प्रशिक्षण राज्य विश्वविद्यालय कोलकाता ), इस्कॉनचे मुख्य ट्रस्टी प्रभु सूरदासजी, काशी विरासत फाउंडशनचे कार्याध्यक्ष राम मोहन पाठक, केन्द्रीय हिंदी निदेशालयाचे निदेशक हितेंद्र मिश्र, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, डॉ. अमिता दुबे आणि के. एन. श्रीवास्तव हे मान्यवर उपस्थित होते.

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे “भविष्याचा रोडमॅप: करिअर मार्गदर्शन आता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत”

चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे “भविष्याचा रोडमॅप: करिअर मार्गदर्शन आता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत”

संपादकीय

आज बुधवार दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे श्रीवर्धमान विद्यालय व जुनिअर कॉलेज, वालचंदनगर येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात करिअर निवड ही विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान असून, या पार्श्वभूमीवर करियर कसे निवडावे, स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करणार, जीवनात कष्ट, आत्मविश्वास, चिकाटी कशी महत्त्वाची असते, उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत असे विविध विचार व्यक्त केले. तसेच आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, शासकीय सेवा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांविषयी उपयुक्त माहिती दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, योग्य दिशेने पाऊल टाकण्यासाठी या व्याख्यानाचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत प्रा. हनुमंत कुंभार सरांनी व्यक्त केले.

 

या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली. श्रीवर्धमान विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य हनुमंत कुंभार सर, तसेच चेतना फार्मसीचे प्रा. चिंतामणी रणवरे, चिन्मय देशपांडे आणि दत्ता कडवळे यांचे सहकार्य मिळाले.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्याची पोर झाली सेल टॅक्स ऑफिसर.

शेतकऱ्याची पोर झाली सेल टॅक्स ऑफिसर.

 

सर्जेराव मोरे यांची कन्या वैष्णवी हिने ग्रामीण भागातील परिस्थितीवर मात करून STI पदी तिचे सिलेक्शन झाले. वैष्णवी हिचे प्राथमिक शिक्षण कन्या प्रशाला नातेपुते या ठिकाणी झाले. भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व्याहळी या ठिकाणी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतले. उच्च माध्यमिक शिक्षण श्री नारायणदास रामदास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इंदापूर या ठिकाणी झाले. बारावीनंतर पुढे वैष्णवी ने इंदापूर या ठिकाणी आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले या ठिकाणी तिने गणित या विषयात पदवी मिळवली. आपल्या यशाचा आलेख वाढवत असतानाच वैष्णवी ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी एम एस सी मॅथ मधून पदवी मिळाली व पुढे MPSC मधून अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील मुलगी अधिकारी होऊन शकते हे वैष्णवी हिने करून दाखवले. वैष्णवी सर्जेराव मोरे यांची अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तानाजी भगवानराव पवार,लक्ष्मण महादेव गोळे, सुनीता तानाजीराव पवार, नानासाहेब तानाजी पवार, अरुण साहेबराव शिंदे, चंद्रकांत रमेश पवार,पंढरीनाथ रमेश पवार सागर बाप्पा पवार यांच्याकडून तिचा सत्कार करण्यात आला.

जिद्द,चिकाटी, स्वतःशी प्रामानीक राहून जर अभ्यास केला तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते असे सत्कार प्रसंगी वैष्णवी हिने सांगितले.

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेजमध्ये १४ नोव्हेंबर बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेजमध्ये १४ नोव्हेंबर बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

संपादकीय,

चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज सरडेवाडी येथे 14 नोव्हेंबर बालदिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,

खजिनदार सोमनाथ माने, संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

आपल्या विद्यालयामध्ये बाल दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली

 

नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले

युवराज शिंदे सर यांनी पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथाचे लेखन करून सर्व जगासमोर आदर्श मांडला. स्कूलच्या प्राचार्या यांनी बालदिनानिमित्त मुलांना विज्ञान-तंत्रज्ञान व शिक्षण यांचे महत्त्व पटवून दिले व तसेच तुम्ही स्वतः मध्ये बदल घडवा असे सांगितले

कार्यक्रमाचे आयोजन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी याठिकाणी बाल दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 

न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी याठिकाणी बाल दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी बाल दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब

न्यू लीप इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, सौ सुनिता रणनवरे मॅडम, सौ चित्रा राऊत मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ( चाचा )यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सौ रणनवरे मॅडम यांनी आपण हा बालदिन 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा करतो याची सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली मुलांना खाऊ वाटप केले. शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राऊत मॅडम यांनी केले आभार सौ रणनवरे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

error: Content is protected !!