Home Blog Page 6

उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समिती कडून कांदलगाव येथे बैठकीचे आयोजन

उजनी  धरणग्रस्त  बचाव संघर्ष समिती यांचेकडून शेतकरी मच्छीमार बांधवांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये खालील मुद्द्यांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्व धरणग्रस्त व मच्छीमार बांधव यांना उपस्थित राहण्याचे आवाहन उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे

यामध्ये प्रामुख्याने 1)शासन निर्णय 17 जून 2019 व शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2025 रद्द झाला पाहिजे 2) शेतकरी उजनी संपादित जमीन पूर्वपरंपरा गत वहिवाट करीत असून त्यावर आपली उपजीविका करत आहे ती जमीन वाचली पाहिजे 3) उजनी धरणातील जलसाठ्यामुळे मच्छिमार करणारे लोक मच्छीमारी करून आपली उपजीविका करीत आहेत त्यांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे 4) संपादित जमिनी शेतकऱ्यांकडून काढून घेऊन ती खाजगी कंपन्यांना किंवा उद्योगपतींना देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे 5) महाराष्ट्र शासनाने धरणासाठी  संपादित केलेली परंतु अध्यापन वापरलेली जमीन मूळ शेतकऱ्यांना परत किंवा करारावर द्यावी अशी आणि विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सात वाजता कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी संघर्ष समितीच्या वतीने सर्व शेतकरी बांधव मच्छीमार बांधव यांना उपस्थित राहण्याचे नम्र विनंती

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपादकीय

मुंबई, दि. ९ : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० हजार पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.

राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात.मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या.

पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न.

प्रतिनिधी : रोहन घोगरे

बावडा दि. 9 स्वप्नांना सीमा नसते. ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे संयम असला पाहिजे. नेतृत्व म्हणजे स्वतःसाठी मार्ग तयार करणे नाही तर इतरांसाठी पूल बांधणे आहे. त्यासाठी विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन दशेतूनच तयारी केली पाहिजे. असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्वाती चौगुले यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये सोमवार (दि. 9) रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. शिक्षण विशेषतः मुलींचे कोणत्याही कारणामुळे थांबता कामा नये असेही त्या म्हणाल्या. त्यासाठी असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधींची माहिती त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रवीण घोगरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लहु वावरे उपस्थित होते. स्त्रिया आता कोणत्या क्षेत्रात मागे नाहीत. मोठमोठ्या कंपनीच्या सीईओ पदी सुद्धा स्त्रिया विराजमान झालेल्या आहेत. तर अंतराळात राहण्याचा विक्रम सुद्धा स्त्रिया करू शकतात. मात्र आजही समाजात स्त्री आत्मनिर्भरपणे समाजात वावरू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी निर्भय आणि निडर बनून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यार्थिनींनी स्वयं सिद्ध असले पाहिजे. स्वतःवर होणाऱ्या अन्यायाला उत्तर देता आले पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.पूजा पाटील यांनी केले, तर प्रा. सौ. अर्चना हरीहर यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील सचिव किरणराव पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

शौर्य बलिदान आणि त्याग म्हणजे वंदे मातरम- बलराज स्वामी कैरमकोंडा

 

बावडा दि.7. वंदे मातरम ही एक भावना आहे. की ज्यामुळे शौर्य बलिदान आणि त्याग डोळ्यासमोर उभे राहतात. असे प्रतिपादन एडवोकेट बलराज स्वामी कैरमकोंडा यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये गुरूवार (दि. 5) रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सिद्धार्थ चितारे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे आयक्युएसी प्रमुख डॉ. तायाजी लोंढे होते. प्रत्येक गोष्टीला काही कार्यकारण भाव असतो. वंदे मातरम् पाठीमागे असाच राष्ट्रभक्तीचा भाव होता. इंगजांनी वंदे मातरम् वरती बंदी घातली त्यामुळे देशप्रेम उफाळून आले. आजही अशी देशप्रेमाची भावना तरूणांच्या मनात असली पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लहू वावरे सर यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन इम्रान शेख आणि प्रियांका खंडागळे यांनी केले, तर प्रा. सौ. अर्चना हरीहर यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील आणि संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

 

पुणे, दि.८: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात जिल्हापरिषदा व पंचायतीसमितीकरिता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानप्रक्रिया पार पडली; या निवडणुकीकरिता ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे, याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

या मतमोजणीच्या कामकाजाकरिता पुरेशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आले आहेत.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

संपादकीय

पुणे , दि ८ : पुणे जिल्ह्यातील २०१–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये २०१–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित असेल. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. *तरी मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.*

प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या ६ मार्च २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचना-आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती (इंदापूर) सार्वत्रिक निवडणूक 2026 दिनांक 07/02/2026 रोजी झालेल्या मतदानाची आकडेवारी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दिनांक 07/02/2026 रोजी झालेल्या मतदानाची आकडेवारी
*एकूण (321002)-210788(65.67%)*

*66-भिगवण*
131 भिगवण (21083)-13567(64.35%)
132 शेटफ़ळगढे (20907)-14723(70.42%)
एकूण (41990)-28290(67.37%)

*67-पळसदेव*
133 पळसदेव (18508)-12313(66.53%)
134 बिजवडी (22674)-15886(70.06%)
एकूण (41182)-28199(68.47%)

*68-वडापूरी*
135 माळवाडी (18718)-13632(72.83%)
136 वडापूरी (17928)-13395(74.72%)
एकूण (36646)-27027(73.75%)

*69-निमगांव केतकी*
137 निमगांव केतकी (19018)-13125(69.01%)
138 शेळगांव (20880)-13237(63.4%)
एकूण (39898)-26362(66.07%)

*70-वालचंदनगर*
139 बोरी (20506)-12480(60.86%)
140 वालचंदनगर (21469)-11051(51.47%)
एकूण (41975)-23531(56.06%)

*71-लासुर्णे*
141 लासुर्णे (21726)-11803(54.33%)
142 सणसर (22284)-11099(49.81%)
एकूण (44010)-22902(52.04%)

*72-काटी*
143 काटी (19355)-14967(77.33%)
144 लाखेवाडी (19187)-14282(74.44%)
एकूण (38542)-29249(75.89%)

*73-बावडा*
145 बावडा (19566)-13105(66.98%)
146 लुमेवाडी (17193)-12123(70.51%)
एकूण (36759)-25228(68.63%)

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संपादकीय

 

पुणे, दि. ६: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीत सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील बारामती, मावळ, मुळशी, शिरुर, हवेली, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तालुक्यात तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता मतदान होणार आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या ३० जानेवारी २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी.) मधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तेथे दोन ते तीन तासांची सवलत देण्याबाबत सूचित केले आहे.

 

कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने मालकांनी, व्यवस्थापनाने परिपत्रकातील निर्देशाचे तंतोतंत पालन करण्याची खबरदारी घ्यावी. आपल्या आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्याकडून मतदानाकरीता भरपगारी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याची तक्रार कामगार कार्यालयास प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द मा. निवडणूक आयोग व शासनाने निर्देशित केल्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 

जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास कामगार उप आयुक्त कार्यालयाच्या dycl2021@gmail.com या ई-मेल पत्त्यावर आस्थापनेचे नाव, जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करुन तक्रार दाखल करावी.

 

यासंदर्भात अधिक माहिती व तक्रारीकरिता सहाय्यक कामगार आयुक्त प्रविण बा. जाधव-९५२९६११८०७, ग. स. शिंदे-९७३०१२११५२, द. दा. पवार- ९८२२७३३३७०, सु. तु. शिर्के- ७७७५९६६६०६, के. ल. मुजमुले ९८२३९९७७२२ आणि सरकारी कामगार अधिकारी मकरंद पाटील ९५७९२५१३३०, श्री.ह.चोभे ८९७२६८५५२१, शंकर माळी ९८२०५०४५२७, संपत गुजांळ ९४२०६२९२१७ आणि एस.के.आव्हाड ९८२२४३३२५८ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

 

निवडणुकांची रणधुमाळी एकीकडे तर मारुतीरायांच्या संकेत एकीकडे

निवडणुकांची रणधुमाळी एकीकडे तर मारुतीरायांच्या संकेत एकीकडे

संपादकीय

दिनांक ४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत असताना सर्वच पक्षांचे सर्वच उमेदवार गावोगाव फिरून विकासाचे, भावनिक सामाजिक मुद्दे मांडत मतदार बंधू-भगिनींकडे मतदान करण्याची मागणी करत आहेत. लोकशाहीची खरी ताकद याच दिवसात समजते.

 

अगदी याच प्रमाणे परंपरागत सुरू असलेल्या काही सामाजिक रूढी आणि परंपरा यांचे मान्यतेनुसार गावचा राजा हा त्या गावचा ग्रामदैवत असतो. मौजे लाखेवाडी येथे दिनांक चार ४ फेब्रुवारी सुमारे दोन अडीच वाजता या गावचे ग्रामदैवत बजरंग बली मारुती राया यांच्याकडून काही संकेत देण्यात आले. ते नेमके कशाच्या संकेत होते लगेच तर कोणी सांगू शकत नाही. रोजच्याप्रमाणे पोस्ट ऑफिस मध्ये लोकांची गर्दी सुरू होती पोस्ट मास्तर सर्वांची कामे करून देत व्यस्त होते. रस्त्याने वाहने वाहत होती लोकांची पाणी ने आण सुरू होती. अचानक वारा पाऊस गडगडात असे काही नसतं ना ग्रामदैवत मारुतीरायांच्या कळसाच्या पडण्याचा जोरदार आवाज आला. प्रत्यक्षदर्शी आठ दहा माणसे असतील. गावचे सेवेकरी म्हणा नेमलेली मंडळी म्हणा यांच्याकडून ते गोळा करून व्यवस्थित ठेवण्यात आले. त्यानंतर एक स्थिर शांतता आणि भकास वातावरण अशी जाणीव झाली अशी तिथल्या लोकांचे म्हणणे आहे.

 

गावचे ग्रामस्थ, जानकर मंडळी, वारकरी संप्रदाय, वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी जो तो आपल्या आपल्या सोयीने याचे तर्क वितर्क लावून अनुमान लावण्यात व्यस्त आहे. अध्यात्माची आवड असणारे तसेच निस्वार्थी भावनेने सेवा करणारे अशा काही लोकांच्या भावना आहात झाले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे एक सावध होण्याचे संकेत असावे.

 

बाकी हे संकेत कशाचे हे सध्या तर कोणी सांगू शकत नाही येणारा काळ आणि वेळ हे दाखवून देईल.

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यास मान्यता क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेन प्रणालीवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी- जिल्हा क्रीडा अधिकारी

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यास मान्यता

क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेन प्रणालीवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी- जिल्हा क्रीडा अधिकारी

पुणे, दि. ३: गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक व जलद आणी त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा ब्लॉकचेन व कृत्रीम बुद्धीमत्ता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ८ जानेवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे.

ब्लॉकचेन व कृत्रीम बुद्धीमत्ता या प्रणालीचा लाभ तळागाळातील खेळाडूपर्यंत पोहोचण्यासाठी शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यादृष्टीन पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

*क्रीडा संघटनेने करावयची कार्यवाही:* राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी अभिलेख जतनाकरिता स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणी गुणपत्रिका विहित नमुन्यात “xlsx “ फाईल “क्रीडा ई प्रमाण” प्रणालीवर (https://sports.maharashtra.gov.in/) वर अपलोड करण्यासाठी संचालनालयास सादर करणे क्रीडा संघटनावर बंधनकारक आहे. ही माहिती संबधीत संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांने डीजीटल स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत माहिती ‘ब्लॉक चेन’वर अपलोड न करणाऱ्या संघटना स्मार्ट कॉन्टॅक्टद्वारे स्वंयचलीतरित्या डिफॉल्टर यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या संघटनेची राहील.

*खेळाडूच्या नोंदणी प्रक्रियेकरिता विशेष मोहीम:* खेळाडूंनी आपल्या ‘क्रीडा ई प्रमाण’” प्रणालीवर (https://sports.maharashtra.gov.in/) आपल्या आधार संलग्न आयडीद्वारे लॉगीन करुन नोंदणी करणे अनिवार्य आहे. खेळाडूंनी सादर केलेली माहिती आणी संघटनेने ब्लॉकचेनवर अपलोड केलेला, हॅश यांची प्रणालीद्वारे स्वंयचलीत पडताळणी होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना यापुढे पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

*अपिलीय तरतूद:* तांत्रिक कारणास्तव एखाद्या खेळाडूचे प्रमाणपत्र नांमजूर झाल्यास तक्रार करण्याची व तक्रारी नंतरही खेळाडूस प्रमाणपत्र न मिळाल्यास ३० दिवसांच्या आत ऑनलाईनपद्धतीने अपील करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शासन निर्णयान्वये जुनी कागदपत्रावर आधारीत पडताळणी प्रक्रिया बंद करुन पुर्णत: डिजीटल क्रीडा ई प्रमाणपत्र प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाच्या लाभ मिळण्याच्यादृष्टीने क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेनवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!