Home Blog Page 5

कोलंबिया निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांची निवड  

कोलंबिया निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांची निवड

 

सोलापूरचे जिल्हाधिकारी कोलंबियात आंतरराष्ट्रीय निरीक्षक

सोलापूर, दिनांक 27:- सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जबाबदारीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम सेथुरामन यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ 6 ते 10 मार्च 2026 दरम्यान कोलंबिया प्रजासत्ताकात अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे.

या शिष्टमंडळाला कोलंबियाच्या Consejo Nacional Electoral चे प्रमुख यांच्याकडून 8 मार्च रोजी होणाऱ्या काँग्रेस निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या Global Engagement for Electoral Excellence (GEEE) या उपक्रमांतर्गत ही नियुक्ती झाली असून, महाराष्ट्र राज्याला कोलंबियाशी विशेष संवाद व अनुभवविनिमयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिष्टमंडळातील सदस्यांमध्ये श्री. आशीर्वाद कुमार यांच्यासह श्री. मनोहर रामचंद्र पारकर (संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी), श्री. प्रीयेश महाजन (निवडणूक नोंदणी अधिकारी, रामटेक), श्री. सागर शिर्के (बूथ लेव्हल अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.

या दौऱ्यात भारतीय निवडणूक व्यवस्थेचा अनुभव जागतिक स्तरावर पोहोचविणे, तसेच कोलंबियातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करून सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची या आंतरराष्ट्रीय निरीक्षण मोहिमेसाठी निवड झाली असून, यामुळे भारतीय निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता व विश्वासार्हतेला जागतिक मान्यता मिळत आहे.

जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

२७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. मराठी साहित्यात मानाचे स्थान असणारे वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस.मराठी भाषादिन मोठया उत्साहाने महाराष्ट्रात साजरा होतो. ज्ञानेश्वरांनी उभारलेल्या भक्कम पायावरच मराठीची परंपरा उभी आहे. संत तुकाराम महाराजांनी तर मराठीला वैभवाच्या शिखरावर बसवलं वि.स.खांडेकर, पू .ल.देशपांडे, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज अशी अनेक थोर रत्नांची खाण मराठी भाषेत आढळते.

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.📖📖📚📚 💐💐

श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मूल्यशिक्षण कार्यशाळा संपन्न

 

बावडा दि. 26 फेब्रुवारी येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन मूल्य शिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी चार सत्रात ही कार्यशाळा संपन्न झाली.

पहिल्या सत्रात कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. श्री उदयसिंह पाटीलसाहेब यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या सत्रात प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लहू वावरे यांनी केले. आपलं प्रस्ताविकात त्यांनी मानवी विकासात बरोबरच पर्यावरणाचा समतोल सुद्धा साधने आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यावरण मूल्यशिक्षण कार्यशाळा आयोजित केली असल्याचे सांगितले. कार्यशाळेचे उद्घाटक माननीय उदयसिंह पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये विकासाबरोबर पर्यावरण समतोल साधने अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून अशी कार्यशाळा महाविद्यालयात आयोजित केल्याबद्दल सदर उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्राध्यापिका सौ. दीप्ती पाटील यांनी पहिल्या सत्रातील आभार प्रदर्शन केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथील डॉक्टर संदीप शिंदे यांनी पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयावर आपले विचार व्यक्त केले. शाश्वत विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाचा इतका नाश केलेला आहे की आपण पुढच्या पिढीला काही देऊ शकू की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. हरितक्रांतीच्या नावाखाली संस्कृत बियाणे रासायनिक खते कीटकनाशके यांच्या अतिरेकी वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. असे प्रतिपादन डॉ. संदीप शिंदे यांनी केले. दुसऱ्या सत्राचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सिद्धार्थ चितारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन यांनी केले.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. मोहम्मद मुलानी यांनी पर्यावरण आणि मानव या विषयावर मार्गदर्शन केले. मानवाच्या विकासाच्या हव्यासापोटी पर्यावरणातील जैवविविधता नष्ट होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या सत्राचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक प्रवीण घोगरे यांनी केले तर आभार यांनी मानले.

कार्यशाळेच्या चौथ्या सत्राचे प्रस्ताविक धामण नावाच्या प्राध्यापक ताजी लोंढे यांनी केले. आणि विज्ञान महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्राध्यापक उत्तम माने यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येऊन समारोप समारंभाने कार्य शाळेची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक असो पूजा पाटील यांनी केले. या कार्यशाळेसाठी एक चमचा मधला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय इंदापूर, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय इंदापूर, कला महाविद्यालय, भिगवण विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, छत्रपती महाविद्यालय भवानीनगर आणि जिजामाता महाविद्यालय सराटी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडीया ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होतात

या कार्यक्रमा वेळी विद्यार्थ्यांसाठी शिवगर्जना राजमुद्रा भाषण पोवाडे आदींचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यांना मार्गदर्शन सौ रननवरे मॅडम सौ राऊत मॅडम यांनी तयारी करून घेतली होती

या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ पद्मजाताई पाटील सचिव पी डी पाटील साहेब प्राचार्य कैलास खबाले सर उपस्थित होते .सुरुवातीला राजांच्या प्रतिमेचे पूजन झाले त्यानंतर पोवाडे व भाषण झाले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रननवरे मॅडम यांनी केले आभार सौ राऊत मॅडम यांनी केले व खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्पर्धा परीक्षा GPAT मार्गदर्शन सत्र प्रेरणादायी वातावरणात संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्पर्धा परीक्षा GPAT मार्गदर्शन सत्र प्रेरणादायी वातावरणात संपन्न

संपादकीय

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे आज बुधवार दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता विद्यार्थ्यांसाठी GPAT परीक्षेच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुणे येथील ‘अकॅडमी ऑफ फार्मास्युटिकल एक्सलन्स’चे संस्थापक श्री. मोहन राव अड्डी हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या सत्रात श्री. अड्डी यांनी GPAT परीक्षेची रचना, अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण, महत्त्वाचे विषय, गुणांकन पद्धती, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या रणनीती याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना कोणत्या विषयांवर अधिक भर द्यावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि वेळेचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले.

तसेच, नियमित अभ्यास, पुनरावलोकन (Revision), मॉक टेस्ट्स, नोट्स तयार करणे, आत्ममूल्यांकन आणि मानसिक तयारी यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि वैयक्तिक अभ्यासयोजनेचे महत्त्व स्पष्ट केले. या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

 

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे , सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने सर , सदस्य श्री.बाळासाहेब बोराटे , तसेच प्राचार्य डॉ.गणेश म्हस्के सर यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यवस्थापन मंडळ, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी केले .

कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव

कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या चित्ररथाने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, याचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मिळालेला हा बहुमान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री यांना प्रदान करण्यात आला.

या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची अष्टविनायक परंपरा आणि गणेशोत्सवातील सार्वजनिक सहभागाचे दर्शन घडवण्यात आले होते. तसेच या उत्सवामुळे मूर्तीकाम, सजावट आणि वाद्य निर्मिती क्षेत्रात लाखो हातांना मिळणाऱ्या रोजगाराचे प्रभावी सादरीकरण यात करण्यात आले होते. मुख्यमंत्री यांनी चित्ररथाच्या या यशाचे आणि चमूचे भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्री मंडळ निर्णय 2026

मंत्री मंडळ निर्णय 2026

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू, अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होणार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू, अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होणार

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.

राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, 23 फेब्रुवारी ते बुधवार, 25 मार्च 2026 पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. तसेच 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठक, विधानपरिषद आणि विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये शोक प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिवेशन काळात शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज होणार आहे आणि सोमवार, 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. 19 मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच 20 मार्च रोजी देखील विधिमंडळ कामकाज होणार नाही.

अधिवेशनामध्ये येणारे महत्त्वाचे विषय!

 

● संयुक्त राष्ट्र संघाने सन 2026 हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा केली जाणार.

● जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी दोन्ही सभागृहात चर्चा होणार.

● मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार.

● सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रनिर्मितीचा वसा जोपासणारा अनुलोम परिवार…

राष्ट्रनिर्मितीचा वसा जोपासणारा अनुलोम परिवार…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येवला, नाशिक येथे अनुगामी लोकराज्य अभियानांतर्गत कापसे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘अनुलोम संगम-2026’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी समर्पणाची भावना अत्यंत महत्त्वाची असून, अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून कार्य करत आहेत, ही बाब प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांनुसार समाजातील अडचणी दूर करण्याचे कार्य अनुलोमच्या माध्यमातून प्रभावीपणे होताना दिसत आहे. चांगली समाजनिर्मिती हीच या कार्यामागील प्रेरणा आहे.

अनुलोमने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व घडवण्याचे कार्य हाती घेतले असून, प्रगतिशील आणि समरस समाज उभारण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून भेदभावरहित, एकजूट समाजनिर्मितीचे कार्य सुरू असून संवादिनी उपक्रमाद्वारे यामध्ये 500 महिला स्वयंसेवक सहभागी झाल्या आहेत, हे समरसतेचेच उदाहरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

समाजात अनुलोमच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे योगदान महत्त्वाचे आहे. हा परिवार अधिक व्यापक व्हावा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अनुलोमचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमादरम्यान पद्मश्री श्रीरंग लाड, कापसे पैठणी उद्योग समूहाचे संस्थापक बाळकृष्ण कापसे तसेच अनुलोमच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जनसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.

निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालये संवर्गाचा निकाल आज जाहीर होत आहे.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे, सांगली, ठाणे, नागपूर व नाशिक जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले!

सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.

error: Content is protected !!