Home Blog Page 4

कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त राजेंन्द्र भारुड यांचा जीवन

कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त राजेंन्द्र भारुड यांचा जीवन संघर्ष….!
माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.

मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही.

ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.

पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.

त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.

पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यास क्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून १५० किलोमीटर दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच.

मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.

एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.

घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.

माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.

आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?

छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता.

पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.

वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो.

आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?

जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.

लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.

(Copy pest)

इंदापूर येथील शिवराज अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर करगळ सर यांचा जन्मदिन हिंदुस्तान 24 न्यूज च्या मार्फत हॉटेल रेणुका येथे साजरा करण्यात आला

इंदापूर येथील शिवराज अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर करगळ सर यांचा जन्मदिन हिंदुस्तान 24 न्यूज च्या मार्फत हॉटेल रेणुका येथे साजरा करण्यात आला

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाद्वारे ‘अ’ श्रेणी प्राप्त

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाद्वारे ‘अ’ श्रेणी प्राप्त

संपादकीय,

चेतना फाऊंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ लोणेरे रायगढ द्वारे, ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी दिली.

विद्यापीठा द्वारे मार्फत नेमणूक केलेल्या देखरेख समितीच्या पथकाद्वारे सदर सर्वेक्षण दर वर्षी करण्यात येते. देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. त्या वेळी महाविद्यालयाची भव्य व सुसज्ज इमारत, शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, रुग्ण समुपदेशन कक्ष, पायाभूत सुविधा, संगणक कक्ष, महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या पालक सभा, औद्योगिक भेट, परीक्षेच्या निकाल, अनुभवी प्राध्यापक वृंद, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहली, ग्रीन कॅम्पस आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले उपक्रम, नोकरी साठीचे नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी कडून मार्गदर्शन, मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहातील दर्जेदार सोयी सुविधा आणि रोजगार मेळावे अशा अनेक उपक्रमांमुळे तसेच निकालातील सातत्यपूर्ण प्रगती या गोष्टींचा आढावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न. या सर्व क्षेत्रात महाविद्यालयाने साधलेली भरीव प्रगती व गुणवत्ता पाहून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी ‘अ’ श्रेणी प्रदान केली आहे.

या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे व सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, यांचे मोठे योगदान असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी सांगितले.

चेतना फाउंडेशनच्या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये द्वितीय सत्रातील शिक्षक -पालक सभा उत्साहात संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये द्वितीय सत्रातील शिक्षक -पालक सभा उत्साहात संपन्न

संपादकीय,

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय सत्रातील शिक्षक-पालक सभा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. चेतना फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने स्वागत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी पालकांना संबोधित करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर महाविद्यालय विशेष भर देत असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले. वर्गशिक्षिका प्रा. पायल निकम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत पालकांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. गीतांजली कांबळे यांनी प्रभावी शब्दांत मांडत मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला, तर आभार प्रदर्शन प्रा. प्राजक्ता झगडे यांनी मनोगतपूर्ण शब्दांत करून कार्यक्रमाची सांगता केली.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या निकाल, उपस्थिती, प्रॅक्टिकल कामगिरी तसेच सहशैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा, अनुभवी प्राध्यापक व उद्योगाभिमुख शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना सक्षम व्यावसायिक बनविण्यास मदत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पालकांनीही आपल्या सूचना व अभिप्राय मांडत महाविद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी अशा मेळाव्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. एकूणच, हा पालक मेळावा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून पालक-शिक्षक संवाद अधिक बळकट करण्यास सहाय्यभूत ठरला आहे.

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.

चेतना इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.

संपादकीय,
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे गुढीपाडवा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,
खजिनदार सोमनाथ माने, संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नर्सरी पासून ते सहावी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले
विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या गुढ्या तयार करून आणल्या यामध्ये विद्यार्थ्यांचे नंबर काढण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व नवीन वर्षाचे स्वागत विद्यार्थ्यांना फरसाणा चॉकलेट देऊन खाऊ वाटप केले
नंबर मिळालेले विद्यार्थी खालील प्रमाणे.
प्री – प्रायमरी.
१) शर्विल गुरगुडे
२) राजवी गुरगुडे
३) रुद्र सरडे
प्रायमरी
१)आध्या जमदाडे
२) आरोही निचाळ
३) विराज टिपाले
तसेच सुतार मॅडम व शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गुढीचे महत्त्व सांगितले तसेच काही पौराणिक कथा सांगितल्या.
कार्यक्रमाचे आयोजन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

पुणे, दि. १२ मार्च (जिमाका वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.

जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय फिरती व दक्षता पथके गठित करण्यात आली आहेत. कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.तसेच हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवांना तसेच विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

महत्त्वाची सूचना मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या…

महत्त्वाची सूचना मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन संपर्क तपशील रामल्लाह (पॅलेस्टाईन) फोन : +970592916418 ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in दोहा (कतार) फोन : 00974-55647502 ईमेल : cons.doha@mea.gov.in रियाध (सौदी अरेबिया) फोन : 00-966-11-4884697 WhatsApp : 00-966-542126748 टोल फ्री : 800 247 1234 ईमेल : cw.riyadh@mea.gov.in तेल अवीव (इस्रायल) फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378 ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in तेहरान (इराण) फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359 अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) टोल फ्री : 800-46342 WhatsApp : +971543090571 ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in कुवैत फोन : +96565501946 ईमेल : community.kuwait@mea.gov.in बाहरीन फोन : 00973-39418071 मस्कत टोल फ्री : 80071234 WhatsApp : +96898282270 ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in जॉर्डन फोन : 00962-770 422 276 बगदाद (इराक) फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899 वेबसाइट :eoibaghdad.gov.in ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

चेतना फाउंडेशनच्या “UDAAN – Wings of Culture” वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चेतना फाउंडेशनच्या “UDAAN – Wings of Culture” वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादकीय

सरडेवाडी (इंदापूर) : चेतना फाउंडेशन अंतर्गत चेतना इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेज तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “UDAAN – Wings of Culture” वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व बौद्धिक गुणवत्तेचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण मंगलमय झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विलास नाळे (पोलीस निरीक्षक, इंदापूर ग्रामीण) यांची विशेष उपस्थिती लाभली. संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, सदस्य श्री. बाळासाहेब बोराटे तसेच सर्व व्यवस्थापन पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाषण प्रा. प्रांजली सुतार यांनी केले. त्यांनी “UDAAN – Wings of Culture” या संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश स्पष्ट केला.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा, सांस्कृतिक व बौद्धिक क्षेत्रातही प्रगती करण्याचे महत्त्व सांगितले.

प्रमुख पाहुणे मा. श्री. विलास नाळे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत शिस्त, आत्मविश्वास व सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, समूह नृत्य, नाटिका, देशभक्तीपर सादरीकरणे व विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांचा तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्विझ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. गीतांजली कांबळे व डॉ. निलेश सोनवणे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता झगडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पायल निकम यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या भव्य सांस्कृतिक सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व बौद्धिक क्षमतेला व्यासपीठ मिळाले असून “UDAAN – Wings of Culture” या संकल्पनेला खऱ्या अर्थाने उंच भरारी मिळाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा.

 

बावडा दि. 27 भाषा हे व्यक्त होण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. मराठी भाषा ही समृद्ध व संपन्न भाषा आहे. अनेक भाषेतील शब्द मराठी भाषेमध्ये सहज सामावले आहेत आणि म्हणून मराठी भाषा संवर्धन करणे हे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्राध्यापक सिद्धार्थ चितारे यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये शुक्रवार (दि.27) रोजी आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मराठी ही अभिजात भाषा असून ती आपली मातृभाषा असल्याने मातृभाषेतून ज्या सहजतेचा अविष्कार होतो तो इतर भाषेतून दिसून येत नाही. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्राध्यापिका सौ. अर्चना हरिहर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहु वावरे उपस्थित होते. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून मराठीला राज्य भाषेचा दर्जा मिळाला आहे. आजचा हा दिवस मराठी भाषेची समृद्धी, तिची प्राचीनता आणि सांस्कृतिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो.असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. याप्रसंगी कार्तिकी गायकवाड, प्रियंका खंडागळे, इम्रान काझी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.पूजा पाटील यांनी केले, तर प्रा. सौ. शितल शेटे यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील सचिव किरणराव पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

न्यू लीप इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक सहभागी झाली होते

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच विज्ञान काय आहे हे शिकण्यासाठी छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी केले त्यामध्ये पाण्याची घनता ट्रॅफिक सिग्नल व हवेचा दाब असे छोटे छोटे प्रयोग लहान मुलांनी अगदी व्यवस्थित केले होते त्यांची मांडणी योग्य प्रकारे करून हवेचा दाब कसा निर्माण होतो हवा कशी प्रसरण पावते ज्वलनासाठी ऑक्सिजनची का गरज आहे आदि प्रयोग करून विद्यार्थ्यांनी त्याची सर्व व्यवस्थित मांडणी पालक आणि शिक्षकांसमोर केली

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष सौ पद्मजा ताई पाटील सचिव श्री पी डी पाटील साहेब प्राचार्य कैलास खबाले सौ रणनवरे मॅडम सौ राऊत मॅडम पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

 

error: Content is protected !!