Home इंदापूर तालुका निवडणुकांची रणधुमाळी एकीकडे तर मारुतीरायांच्या संकेत एकीकडे

निवडणुकांची रणधुमाळी एकीकडे तर मारुतीरायांच्या संकेत एकीकडे

निवडणुकांची रणधुमाळी एकीकडे तर मारुतीरायांच्या संकेत एकीकडे

संपादकीय

दिनांक ४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत असताना सर्वच पक्षांचे सर्वच उमेदवार गावोगाव फिरून विकासाचे, भावनिक सामाजिक मुद्दे मांडत मतदार बंधू-भगिनींकडे मतदान करण्याची मागणी करत आहेत. लोकशाहीची खरी ताकद याच दिवसात समजते.

 

अगदी याच प्रमाणे परंपरागत सुरू असलेल्या काही सामाजिक रूढी आणि परंपरा यांचे मान्यतेनुसार गावचा राजा हा त्या गावचा ग्रामदैवत असतो. मौजे लाखेवाडी येथे दिनांक चार ४ फेब्रुवारी सुमारे दोन अडीच वाजता या गावचे ग्रामदैवत बजरंग बली मारुती राया यांच्याकडून काही संकेत देण्यात आले. ते नेमके कशाच्या संकेत होते लगेच तर कोणी सांगू शकत नाही. रोजच्याप्रमाणे पोस्ट ऑफिस मध्ये लोकांची गर्दी सुरू होती पोस्ट मास्तर सर्वांची कामे करून देत व्यस्त होते. रस्त्याने वाहने वाहत होती लोकांची पाणी ने आण सुरू होती. अचानक वारा पाऊस गडगडात असे काही नसतं ना ग्रामदैवत मारुतीरायांच्या कळसाच्या पडण्याचा जोरदार आवाज आला. प्रत्यक्षदर्शी आठ दहा माणसे असतील. गावचे सेवेकरी म्हणा नेमलेली मंडळी म्हणा यांच्याकडून ते गोळा करून व्यवस्थित ठेवण्यात आले. त्यानंतर एक स्थिर शांतता आणि भकास वातावरण अशी जाणीव झाली अशी तिथल्या लोकांचे म्हणणे आहे.

 

गावचे ग्रामस्थ, जानकर मंडळी, वारकरी संप्रदाय, वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी जो तो आपल्या आपल्या सोयीने याचे तर्क वितर्क लावून अनुमान लावण्यात व्यस्त आहे. अध्यात्माची आवड असणारे तसेच निस्वार्थी भावनेने सेवा करणारे अशा काही लोकांच्या भावना आहात झाले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे एक सावध होण्याचे संकेत असावे.

 

बाकी हे संकेत कशाचे हे सध्या तर कोणी सांगू शकत नाही येणारा काळ आणि वेळ हे दाखवून देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!