Home Blog Page 90

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 02 फरवरी 2024 दिन – शुक्रवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 02 फरवरी 2024
दिन – शुक्रवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – शिशिर*
*⛅मास – माघ*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – सप्तमी दोपहर 04:02 तक तत्पश्चात सप्तमी*
*⛅नक्षत्र – स्वाती 03 फरवरी सुबह 05:57 तक तत्पश्चात विशाखा*
*⛅योग – शूल दोपहर 12:55 तक तत्पश्चात गण्ड*
*⛅राहु काल – सुबह 11:30 से 12:53 तक*
*⛅सूर्योदय – 07:19*
*⛅सूर्यास्त – 06:28*
*⛅दिशा शूल – पश्चिम*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:36 से 06:28 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:28 से 01:19 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -स्वामी विवेकानंद जयंती (ति. अ), सामी रामानंदाचार्य जयंती*
*⛅विशेष – सप्तमी को ताड़ का फल खाया जाय तो वह रोग बढ़ानेवाला तथा शरीर का नाशक होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹मातृ-पितृ पूजन दिवस की आवश्यकता व उद्देश्य🔹*

*🔹१४ फरवरी को ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ महापर्व है । इस लोक-मांगल्यकारी, विश्वव्यापी, सभी धर्मों के लोगों द्वारा मनाये जानेवाले पर्व के प्रणेता व मार्गदर्शक हैं ब्रह्मवेत्ता संत पूज्य बापूजी । इस पर्व को सर्जित करने की आवश्यकता क्यों पड़ी तथा इसको मनाने से क्या लाभ होते हैं यह जानते हैं पूज्यश्री के ही श्रीमुख से :*

*🔸प्रेमी-प्रेमिका ‘आई लव यू, आई लव यू…’ करके काम-विकार में गिरते हैं, थोड़ी देर के बाद अभागे ठुस्स हो जाते हैं । मैंने इससे लाखों- लाखों बच्चों की जिंदगी तबाह होते हुए सुनी है ।*

*🔸२८ विकसित देशों में ‘आई लव यू व वेलेंटाइन डे’ के चक्कर में हर वर्ष १३ से १९ साल की १२ लाख ५० हजार कन्याएँ स्कूल जाते-जाते गर्भवती हो जाती हैं । जिनमें से ५ लाख कन्याएँ तो चुपचाप गर्भपात करा लेती हैं और जो नहीं करा पाती हैं ऐसी ७ लाख ५० हजार कन्याएँ कुँवारी माँ बनकर नर्सिंग होम, सरकार व माँ बाप के लिए बोझा बन जाती हैं अथवा वेश्यावृत्ति धारण कर लेती हैं ।*

*🔸अमेरिका और अन्य विकसित देशों के करोड़ों रुपये वेलेंटाइन डे में तबाह हुए ऐसे छोरे-छोरियों की जिंदगी बचाने में खर्च होते हैं । ऐसा काहे को करना !*

*🔹लेकिन विदेशियों ने फैशन चला दिया: ‘आई लव यू, आई लव यू…’ बड़ी बेशर्माई है । बच्चे माँ-बाप को पूछें ही नहीं, लोफर-लोफरियाँ बन जायें । वे खुद बरबाद हो जायें तो माँ-बाप की क्या सेवा करेंगे ?*

*🔸इसमें सबका भला है🔸*

*🔸कुछ मनुष्य तो अक्लवाले होते हैं और कुछ अक्ल खो के प्रेमिकाओं के पीछे, प्रेमियों के दिवस : १४ फरवरी पीछे तबाह होते हैं, उनकी बुद्धि नष्ट हो जाती है ।*

*सुंदरी सुंदरे जितने कामी होते हैं उतनी ही उनकी बुद्धि नष्ट हो जाती है । ऐसे कामी सँभल जायें तो अच्छा है, नहीं तो फिर ऐसे लोग मरने के बाद पतंगे होते हैं । पतंगे दीये में जलते हैं। एक जल रहा है यह दूसरों को दिख रहा है फिर भी दे धड़ाधड़… और जल मरते हैं ।*

*🔸वेलेंटाइन डे’ वाले तो अपनी ईसाइयत का प्रचार करते हैं परंतु लोगों की जिंदगी तबाह होती है । फिर मैं भगवान का ध्यान करके भगवान में डूब गया, एकाकार हो गया और उपाय खोजा । उपाय मिल गया – गणपति और कार्तिकेय स्वामी की चर्चा का प्रसंग । उसे मैंने अच्छी तरह समझ लिया । मैंने सत्संग में बोला कि ‘माँ की प्रदक्षिणा करने से सारे तीर्थों का फल होता है और पिता का आदर व प्रदक्षिणा करने से सब देवों की पूजा का फल मिलता है ।*

*सर्वतीर्थमयी माता, सर्वदेवमयः पिता ।*

*🔸इसका प्रचार करेंगे तो बच्चे-बच्चियों का, माँ-बाप का सबका भला हो जायेगा ।’ मैं भी आशाओं का राम हूँ, आशाओं का गुलाम नहीं हूँ । मैं जब चाहूँ मेरा प्यारा मेरे लिए ज्ञान के दरवाजे खोल देता है ।*

*🔸मैंने इस विषय पर सत्संग चालू किये फिर घोषणा कर दी: ‘वेलेंटाइन डे के बदले मातृ-पितृ पूजन दिवस मनाओ ।’*

*🔸फिर मैंने यह भी बता दिया कि ‘हम ईसाई, मुसलमान, हिन्दू, सिख तथा और भी जो जाति-धर्म-पंथ हैं सभीका भला चाहते हैं । हम किसीका बुरा नहीं चाहते हैं । बच्चे-बच्चियाँ तबाह न हों इसलिए १४ फरवरी को वेलेंटाइन डे के बदले मातृ-पितृ पूजन दिवस चालू किया है।’ अब तो यह विश्वव्यापी हो गया है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून
मा. बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे OSD, आमचे गुरुवर्य मंगेशजी चिवटे सर कक्ष प्रमुख मा. रामहरी राऊत व सह कक्ष प्रमुख माउली घुळगंडे, पुणे जिल्हा ग्रामीण कक्ष प्रमुख शिवश्री भूषण सुर्वे, पुणे जिल्हा ग्रामीण महिला कक्ष प्रमुख सीमाताई कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली………..ऍड आनंद अशोक केकान यांची इंदापूर तालुका कक्ष प्रमुख पदी नियक्ती करण्यात आली. वकील साहेबांची इंदापूर तालुक्यामध्ये विविध समाजकार्य सतत चालू असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 01 फरवरी 2024 दिन – गुरूवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 01 फरवरी 2024
दिन – गुरूवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – शिशिर*
*⛅मास – माघ*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – षष्ठी दोपहर 02:03 तक तत्पश्चात सप्तमी*
*⛅नक्षत्र – चित्रा 02 फरवरी प्रातः 03:49 तक तत्पश्चात स्वाती*
*⛅योग – धृति दोपहर 12:28 तक तत्पश्चात शूल*
*⛅राहु काल – दोपहर 02:17 से 03:40 तक*
*⛅सूर्योदय – 07:20*
*⛅सूर्यास्त – 06:27*
*⛅दिशा शूल – दक्षिण*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:37 से 06:28 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:27 से 01:19 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – नीम का फल या दातुन मुँह में डालने से नीच योनियों की प्राप्ति होती है । सप्तमी को ताड़ का फल खाया जाय तो वह रोग बढ़ानेवाला तथा शरीर का नाशक होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹फरवरी मास की योगों व तिथियाँ🔹*

*👉 २ फरवरी : स्वामी विवेकानंद जयंती (ति. अ), स्वामी रामानंदाचार्य जयंती*

*👉 ६ फरवरी : ष‌ट्तिला एकादशी (इस दिन स्नान, उबटन, जलपान, भोजन, दान व होम में तिल का उपयोग पापों का नाश करता है ।)*

*👉 ७ फरवरी : प्रदोष व्रत*

*👉 ८ फरवरी : मासिक शिवरात्रि, व्यतीपात योग (रात्रि ११:१० से ९ फरवरी रात्रि ७:०७ तक)*

*👉 ९ फरवरी : माघ अमावस्या, मौनी-त्रिवेणी अमावस्या*

*👉 १० फरवरी : पंचक आरम्भ ( सुबह १०:०२)*

*👉 ११ फरवरी : चन्द्र दर्शन (शाम ६::२० से ०७:५५ तक)*

*👉 १२ फरवरी : तीलकुन्द चतुर्थी*

*👉 १३ फरवरी : मंगलवारी चतुर्थी (सूर्योदय से दोपहर २-४१ तक), विष्णुपदी संक्रांति (पुण्यकाल : सुबह ९-५१ से दोपहर ३-५४ तक) (इस दिन किये गये ध्यान, जप व पुण्यकर्म का फल लाख गुना होता है । – पद्म पुराण)*

*👉 १४ फरवरी : मातृपितृ पूजन दिवस, वसंत पंचमी (इस दिन सारस्वत्य मंत्र का अधिक-से-अधिक जप करना चाहिए ।)*

*👉 १६ फरवरी : माघ शुक्ल सप्तमी (इस दिन प्रातः पुण्यस्नान, व्रत करके गुरु का पूजन करनेवाला सम्पूर्ण माघ मास के स्नान का फल व वर्षभर के रविवार व्रत का पुण्य पा लेता है । यह सम्पूर्ण पापों को हरनेवाली व सुख-सौभाग्य की वृद्धि करनेवाली है ।)*

*👉 १९ फरवरी : छत्रपति शिवाजी महाराज जयन्ती (दि. अ), भक्त पुंडलिक उत्सव (पंढरपुर), वसंत ऋतु प्रारम्भ*

*👉 २० फरवरी : जया एकादशी*

*👉 २१ फरवरी : श्री वराह द्वादशी, श्री भीष्म द्वादशी, प्रदोष व्रत*

*👉 २२ फरवरी : माघ शुक्ल त्रयोदशी (इस दिन से माघी पूर्णिमा (२४ फरवरी) तक प्रातः पुण्यस्नान तथा दान, व्रतादि पुण्यकर्म करने से सम्पूर्ण माघ- स्नान का फल मिलता है । – पद्म पुराण), गुरुपुष्यामृत योग (सूर्योदय से शाम ४-४३ तक)*

*👉 २४ फरवरी : माघी पूर्णिमा, माघ स्नान समाप्त, संत रविदास जयंती*

*👉 २८ फरवरी : संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय : रात्रि ९-४२), राष्ट्रीय विज्ञान दिवस*

*🔹गुरुवार विशेष 🔹*

*🔸हर गुरुवार को तुलसी के पौधे में शुद्ध कच्चा दूध गाय का थोड़ा-सा ही डाले तो, उस घर में लक्ष्मी स्थायी होती है और गुरूवार को व्रत उपवास करके गुरु की पूजा करने वाले के दिल में गुरु की भक्ति स्थायी हो जाती है ।*

*🔸गुरुवार के दिन देवगुरु बृहस्पति के प्रतीक आम के पेड़ की निम्न प्रकार से पूजा करें :*

*🔸एक लोटा जल लेकर उसमें चने की दाल, गुड़, कुमकुम, हल्दी व चावल डालकर निम्नलिखित मंत्र बोलते हुए आम के पेड़ की जड़ में चढ़ाएं ।*

*ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः ।*

*🌹 फिर उपरोक्त मंत्र बोलते हुए आम के वृक्ष की पांच परिक्रमा करें और गुरुभक्ति, गुरुप्रीति बढ़े ऐसी प्रार्थना करें । थोड़ा सा गुड़ या बेसन की मिठाई चींटियों को डाल दें ।

*🔸गुरुवार को बाल कटवाने से लक्ष्मी और मान की हानि होती है ।*

*🔸गुरुवार के दिन तेल मालिश हानि करती है । यदि निषिद्ध दिनों में मालिश करनी ही है तो ऋषियों ने उसकी भी व्यवस्था दी है । तेल में दूर्वा डाल के मालिश करें तो वह दोष चला जायेगा ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

मोदींनी स्वतःबद्दल लिहिले…

मोदींनी स्वतःबद्दल लिहिले

माझे ८ जणांचे कुटुंब राहत होते – ती खोली लहान होती, पण आमच्यासाठी ती पुरेशी होती.

आमचा दिवस लवकर पहाटे ५ वाजता सुरू होत असे जेव्हा माझी आई नवजात आणि लहान मुलांना, पारंपारिक पणे अंगाला लावायला ( massage) आणि उपचार करायला जात असे.

रात्रभर मी आणि माझा भाऊ तिच्यासाठी ‘चुल’ गरम ठेवण्यासाठी आळीपाळीने जागत असू.

तिच्याकडे कसलच औपचारीक शिक्षण नव्हतं आणि ते घेण्याचे भाग्य नव्हते, परंतु देव दयाळू होता आणि आजार बरे करण्याचा एक विशेष हातखंडा तिच्याकडे होता.

इतर आया दररोज सकाळी आमच्या घराबाहेर रांगा लावत असत कारण ती तिच्या उपचारांसाठी ओळखली जात असे.

मग, मी रेल्वे स्टेशनवर माझ्या वडिलांचे चहाचे दुकान उघडे, स्वच्छ करे आणि मग शाळेत जात असे.

शाळा संपताच मी धावत त्यांच्या मदतीला जात असे, परंतु ज्याची मी खरोखर वाट बघत असे ती देशभरातील लोकांना भेटायची. मी त्यांना चहा देत असे आणि त्यांच्या कथा ऐकत असे – अश्या प्रकारे मी हिंदी बोलायला शिकलो.

मी काही व्यापारी लोकांना ‘बंबई’ बद्दल बोलताना ऐकायचो आणि विचार करायचो की, “मला कधी हे स्वप्नांचे शहर पाहायला मिळेल का?”

मला नेहमीच कुतूहल असायचे – मी वाचनालयात जात असे आणि हाती मिळेळ ते सर्व वाचून काढत असे.

मी आरएसएसच्या पहिल्या बैठकीला गेलो होतो तेव्हा मी ८ वर्षांचा होतो आणि ९ वर्षाचा असताना इतरांच्या जीवनासाठी चांगल्या प्रयत्नांचा एक भाग बनायचे ठरवले. तेव्हा मी गुजरातमधील काही भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी माझ्या मित्रांसह एक खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. मला आणखी खूप काही करायचे होते, परंतु मला माहित होते की आमच्याकडे त्यासाठी लागणारे पैसे आणि इतर सोयी नाहीत.

तरीही, त्या वयातही, माझा असा ठाम विश्वास होता की देवाने आपल्या सर्वांना एकसारखे बनवले आहे.

मी कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो ह्याने काही फरक पडत नाही, मी आणखी काहीतरी नक्की करू शकतो. म्हणून जेव्हा जेव्हा आपण मला विचारता, माझे संघर्ष काय होते, तेव्हा मी सांगेन की काहीच नव्हते. मी खूप श्रीमंती नाही पाहिली, मला ऐशो आराम माहित नव्हता आणि ‘चांगले’ दिवस दिसले नाहीत, तरीही माझ्या छोट्याश्या जगामध्ये… मी आनंदी होतो.

जर मार्ग कधी कठीण असेल तर मी माझा मार्ग तयार केला. मला तल्लख आणि निटनेटकं दिसण्याची खूप गरज होती.

म्हणून, जरी आम्हाला इस्त्री परवडत नसली, तरी मी थोडा कोळसा गरम करत असे, जुन्या लोट्या मधे ते भरत असे, त्याभोवती कापड गुंडाळत असे आणि माझे कपडे इस्त्री करत असे – परिणाम एकच होणार, मग तक्रार कशासाठी?

मी आज जो काही आहे त्या प्रत्येक गोष्टीची ही सुरुवात होती आणि मला त्यावेळी ह्याची कत्पना नव्हती.

जर आपण आठ वर्षांच्या नरेंद्र मोदीला, चाय विकत फिरत असताना आणि आपल्या वडिलांचा चहा स्टॉल साफ करीत असताना विचारले असते की तू पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्याची हिम्मत करतोस का, त्याचे उत्तर नाही असेच होते. कदापी नाही. याबद्दल विचार करणे सुध्दा खूप दूरची गोष्ट होती.

मोठा होत असताना मला खूप कुतूहल होते पण विचारांमधे स्पष्टता फारच कमी होती. मी सैन्याच्या माणसांना त्यांच्या गणवेशात पहात असे आणि मला वाटायचे की देशसेवेचा हा एकमेव मार्ग आहे.

पण जेव्हा रेल्वे स्थानकावरील, माझी संत आणि साधू यांच्याशी झालेली संभाषणे जसजशी अधिक वाढत गेली, तेव्हा मला समजले की हे जग (अध्यात्म ) सुध्दा शोधण्यासारखे आहे.

मी अनिर्णीत, दिशाहीन आणि अस्पष्ट असं आयुष्य जगत होतो – मला माहित नव्हते मला कुठे जायचे आहे, मला काय करायचे आहे आणि मला ते का करायचे आहे. पण मला एवढेच माहित होते की, मला काहीतरी करण्याची इच्छा आहे.

म्हणून मी स्वत: परमेश्वरासमोर शरण गेलो आणि वयाच्या १७ व्या वर्षी हिमालयात रवाना झालो.

मी निघण्यापूर्वी आईने मला एक गोड शिदोरी दिली आणि माझ्या प्रवासाला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या कपाळावर टिळक लावले आणि मी माझ्या पालकांचा निरोप घेतला.

नशीबाने देवाने जिथे मला नेले तेथे मी गेलो – हा माझ्या आयुष्यातील अनिश्चीत काळ होता परंतु तरीही, मला बरीच उत्तरे ह्या काळात सापडली, मिळाली.
मी जग समजून घेण्याचा, व स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मी दूर-दूर प्रवास केला, रामकृष्ण मिशन मधे वेळ घालवला, साधू-संतांना भेटलो, त्यांच्याबरोबर राहिलो आणि पुढे स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला.

मी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरलो – माझ्या डोक्यावर छप्पर नव्हतं, परंतु तरीही घर नाही असं कधी वाटले नाही.

मी सकाळी ब्रम्हमुहुर्तावर ३ ते ३.४५., दरम्यान उठून हिमालयाच्या अतिथंड पाण्याने आंघोळ करीत असे, परंतु तरीही मला आतून उब जाणवत असे. धबधब्याच्या साध्या आवाजातही शांतता, ऐक्य आणि ध्यान मिळू शकते हे मला तेव्हा कळले.

मी ज्या साधुं बरोबर राहत असे त्यांनी मला स्वतःला विश्वाच्या तालाशी जुळवून कसे घ्यायचे ते शिकवले.

मग मी ते केले – मी स्वतःला संरेखित केले आणि त्याने झालेले साक्षात्कार आजपर्यंत मला मदत करणारे अनुभव देत आहेत. मला समजले की आपण सर्वजण आपल्या विचारांनी आणि मर्यादेने अडकलो आहोत. जेव्हा आपण शरण जाल आणि विशालतेसमोर उभे रहाल – तेव्हा आपणाला समजेल की आपण मोठ्या विश्वाचा एक छोटासा भाग आहात. जेव्हा आपण हे समजता, तेव्हा आपल्यात असलेले काही गर्विष्ठपणाचे अवशेष वितळतात आणि मग खरोखरच आयुष्य सुरू होते.

जेव्हा हे सर्व बदलले. दोन वर्षानंतर, मी मार्गदर्शनाची स्पष्टता आणि मार्गदर्शक बल घेऊन घरी परतलो.

हिमालयातून परत आल्यानंतर मला माहित होते की माझे आयुष्य असेच इतरांच्या सेवेत घालवावे. परत येण्याच्या थोड्या अवधीतच मी अहमदाबादला रवाना झालो. मोठ्या शहरात राहण्याचा माझा पहिला अनुभव होता – जीवनाची गती इथे खूप वेगळी होती. मी माझ्या काकांना त्याच्या कॅन्टीन मधे, मधूनमधून मदत करुन वेळ घालवत असे.

अखेरीस, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ प्रचारक बनलो.

तेथे मला विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्याची आणि विस्तृत काम करण्याची संधी मिळाली. आम्ही सर्वजण आरएसएस कार्यालय स्वच्छ करण्याचे, सहकार्यांसाठी चहा आणि खाद्यपदार्थ बनवण्याचे आणि भांडी घासायचे काम आळीपाळीने करत असू.

आयुष्य कठोर आणि व्यस्त होते. परंतु माझ्या सर्व कर्तव्यांमधे मी हिमालयातून घेतले ते माझे शिक्षणाचे धडे विसरायचे नाहीत असा दृढनिश्चय केला होता.

जीवनाच्या या नवीन टप्प्या मधे मी तेथे मिळवलेल्या शांती जराही ढळू द्यायची नाही हे सुनिश्चित करण्यासाठी, मी दरवर्षी थोडा वेळ काढून आत्मनिरीक्षण करण्याचे ठरविले. संतुलित जीवन जगण्याचा हा माझा मार्ग होता.

हे बर्‍याच लोकांना माहित नाही, पण मी दिवाळीच्या ५ दिवसां साठी दूर जात असे. जंगलात कुठेतरी – फक्त स्वच्छ पाणी आणि लोक नाही अशा जागी. मी त्या ५ दिवसांकरिता पुरेसे अन्न घेऊन जात असे.

तेव्हा कोणतेही रेडिओ किंवा वर्तमानपत्र नव्हते आणि त्या काळात, टीव्ही किंवा इंटरनेट तर नव्हतेच. मी आत्मपरीक्षण करे- आणि ह्या एकट्या घालवलेल्या वेळाने मला दिलेली शक्ती अद्याप मला जीवन आणि त्याचे विविध अनुभव हाताळण्यास मदत करते.

*लोक मला नेहमी विचारत असत की, ‘तू कोणाला भेटायला जात आहेस?’ आणि मी म्हणे, ‘ मै मुझसे मिलने जा रहा हुँ.’* *(मी स्वतःला भेटायला जातो आहे!)*

म्हणूनच, मी नेहमीच प्रत्येकाला, विशेषत: माझ्या तरुण मित्रांना उद्युक्त करतो की, तुमच्या वेगवान आयुष्यात आणि व्यस्त वेळापत्रकात तुम्ही थोडा वेळ काढा… विचार करा आणि आत्मपरीक्षण करा. हे आपली आयुष्या बद्यलची समज बदलेल – आपण आपल्या अंतःकरणाला अधिक चांगले समजून घ्याल.

आपण खर्‍या अर्थाने जगणे सुरू कराल. हे आपला आत्मविश्वास वाढवेल आणि इतर लोकं जे म्हणतात त्याद्वारे आपण विचलीत न होता यशस्वी व्हाल. या सर्व गोष्टी भविष्यात आपल्याला मदत करतील.

म्हणून मी फक्त प्रत्येकाला हे सांगतो की, आपण लक्षात ठेवले पाहिजे, की आपण विशेष आहात आणि आपल्याला प्रकाशासाठी बाहेर पाहण्याची गरज नाही… तो तुमच्यात आधीच आहे..

खरच,वाचाल तर वाचाल.
त्रिवार वंदन.
Forwarded

11th January 2023

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी ‘सिडको’ तर्फे ‘नवी अभय’ योजना

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी ‘सिडको’ तर्फे ‘नवी अभय’ योजना

*मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मावेजा रकमेच्या वसुली स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय*

मुंबई

– नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार सिडकोतर्फे अश्या इमारतींसाठी नवी अभय योजना जाहिर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

यापूर्वी नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गत येणाऱ्या मावेजा रकमेच्या वसुलीशिवाय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र/भाडेपट्टा खत/अभिहस्तांतरण देण्यात आलेले नव्हते.
सिडकोच्या नवीन अभय योजनेनुसार मावेजा रकमेच्या वसुलीशिवाय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्यात येणार आहे. ही अभय योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे. तसेच अभय योजनेनुसार यापुढे मावेजा रकमेची वसुली ही भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरणाशी जोडली जाणार नसून या रकमेची वसुली स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा न लागता त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक सर्वसामान्य सदनिकाधारकांना याचा थेट लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे भूखंड विकासाच्या अधिमूल्यामध्ये सवलत दिल्याने रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यासही मदत होणार आहे.

तसेच या अभय योजनेंतर्गत जे विकासक विहीत कालावधीत भूखंडाचा विकास करण्यास असमर्थ ठरले आहेत, अशा विकासकांना ३१ मार्च २०२४ पर्यंत देय होणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्काच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. या व्यतिरिक्त मावेजा किंमत कमी करण्याबाबतही शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. लहान बंगले व रो-हाउस भूखंडांवर एकापेक्षा जास्त सदनिका बांधण्यात आलेल्या सर्व इमारती नियमित करण्याचे धोरणही शासनातर्फे आखण्यात आले आहे.

हे सर्वसामान्याचे शासन असून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचे आमचे धोरण आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई क्षेत्रातील नागरिकांना आणि विकासकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या निर्णयानंतर सांगितले.

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी ‘सिडको’ तर्फे ‘नवी अभय’ योजना

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी ‘सिडको’ तर्फे ‘नवी अभय’ योजना

*मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मावेजा रकमेच्या वसुली स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय*

मुंबई

– नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार सिडकोतर्फे अश्या इमारतींसाठी नवी अभय योजना जाहिर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

यापूर्वी नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गत येणाऱ्या मावेजा रकमेच्या वसुलीशिवाय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र/भाडेपट्टा खत/अभिहस्तांतरण देण्यात आलेले नव्हते.
सिडकोच्या नवीन अभय योजनेनुसार मावेजा रकमेच्या वसुलीशिवाय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्यात येणार आहे. ही अभय योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे. तसेच अभय योजनेनुसार यापुढे मावेजा रकमेची वसुली ही भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरणाशी जोडली जाणार नसून या रकमेची वसुली स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा न लागता त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक सर्वसामान्य सदनिकाधारकांना याचा थेट लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे भूखंड विकासाच्या अधिमूल्यामध्ये सवलत दिल्याने रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यासही मदत होणार आहे.

तसेच या अभय योजनेंतर्गत जे विकासक विहीत कालावधीत भूखंडाचा विकास करण्यास असमर्थ ठरले आहेत, अशा विकासकांना ३१ मार्च २०२४ पर्यंत देय होणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्काच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. या व्यतिरिक्त मावेजा किंमत कमी करण्याबाबतही शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. लहान बंगले व रो-हाउस भूखंडांवर एकापेक्षा जास्त सदनिका बांधण्यात आलेल्या सर्व इमारती नियमित करण्याचे धोरणही शासनातर्फे आखण्यात आले आहे.

हे सर्वसामान्याचे शासन असून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचे आमचे धोरण आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई क्षेत्रातील नागरिकांना आणि विकासकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या निर्णयानंतर सांगितले.

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमंलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहीला पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमंलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहीला पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, महानेटचा आढावा*

मुंबई, दि.३०:- केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसरच असला पाहिजे यासाठी नियोजन करा. प्रधानमंत्री आवास योजनेतून जास्तीत जास्त घरे महाराष्ट्रात झाली पाहिजेत. यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर राहीला पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, तसेच भारत नेट – महानेट प्रकल्प यांचा आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बैठकीत आढावा घेतला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचाही आढावा घेतला. मुंबई महापालिकेच्या टीबी हॉस्पिटलचा कायापालट करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, तसेच असीमकूमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक जयश्री भोज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव एन. रामास्वामी आदी उपस्थित होते.

*महाराष्ट्र घरकुल संख्येत देशात अव्वल रहावा*
घरकूल योजनांच्या नागरी क्षेत्रातील संख्या वाढावी. लाभार्थ्यांनी या योजनांमध्ये सहभागी व्हावे यासाठी घरकुल प्रकल्प स्थळे सर्व नागरी सुविधांनी परिपूर्ण असायला हवेत, याकडे लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
प्रकल्प स्थळ निश्चित करताना, त्या भागात रस्ते, वीज, पाणी या सुविधा देण्याची पुर्वतयारी करा. तसेच प्रकल्प स्थळ निवडताना त्यामध्ये अन्य कुठलेही अडसर असता कामा नयेत, याची खात्री करा. राज्याचे आर्थिक दुर्बल घटक घरांच्या बांधकामांचे उद्दीष्ट पूर्ण व्हावे यासाठी या प्रकल्पांना गती द्या. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या केंद्र पुरस्कृत योजनांचा सातत्याने आढावा घेत असतात. गृहनिर्माण आणि नगरविकास विभाग यांनी विविध विभागांशी, स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून अमंलबजावणी गती द्यावी. भविष्यात नवी योजना येणार असेल, तर त्यासाठी आतापासूनच प्रकल्प स्थळ निश्चितकडे लक्ष देण्याची गरज आहे, हे सर्व यंत्रणांना अवगत करा. यात कुठलीही हयगय चालणार नाही, याबाबत त्यांना अवगत करा. विशेषतः गिरणी कामकामगारांच्या घरकुलांच्या प्रकल्पांनाही गती देण्यात यावी. यातून या वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या अमंलबजावणीवरही लक्ष देण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी गृहनिर्माण विभागाच्या वतीने राज्यात जुलै २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यास गती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात ३६ टक्क्यांनी वाढ होऊन उद्दीष्टपुर्ती ४ लाख ५ हजार ११७ घरे म्हणजेच ७२.५१ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती देण्यात आली.

*आरोग्य विभागाने ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा पुरवाव्यात*
आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी योजना सुरु करावी. त्यांना उपचारासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिष्ठत राहावे लागू नये अशी व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. सीमावर्ती भागातील ८६२ गावात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्याबाबतही ठोस पावले उचलण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाता यावे यासाठी आपण मोफत एस.टी.बस सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुन्हा शासकीय रुग्णालयांमध्ये रांगेत उभे राहावे लागू नये अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. ज्येष्ठांसाठीच्या विविध योजना ज्यामध्ये कर्ण-श्रवण यंत्रे, चष्मे, आधाराची काठी यांबाबतही सुरळीत अमंलबजावणी व्हावी. मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दीष्टही वाढवण्यात यावे. कुष्ठरोगांचे उच्चाटन व्हावे, तसेच लवकर निदान झाल्यास, चांगले उपचार करता येतात म्हणून सर्वेक्षण सुरुच ठेवावे.

*मुंबई महापालिकेच्या क्षय रोग (टिबी) रुग्णालयाचा कायापालट करा..*
बैठकीतूनच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आरोग्या विभागाला टीबी हॉस्पिटलच्या सेवेत सुधारणा आणि तेथील सुविधांचे अद्ययावतीकरण याबाबत दूरध्वनीवरून निर्देश दिले.
या रुग्लायातील खाटांची संख्या वाढवण्यात यावी. वॉर्ड वाढवण्यात यावेत. तेथील सेवा-सुविधा दर्जेदार असाव्यात याकडे लक्ष पुरवण्यात यावे. रुग्णालयातील डागडुजी, रंगरंगोटी अशा अनुषांगिक बाबीही वेळेवर पूर्ण व्हाव्यात. त्यासाठी आवश्यकता भासल्यास नवीन डीपीआर देखील तयार करण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

राज्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आतापर्यंत ३५ लाख ३५ हजार ९१२ रुग्णांना लाभ देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासाठीच्या विमा सुरक्षा योजनेतून शंभर टक्क्यांहून अधिक दाव्यांच्या रक्कमेची प्रतिपुर्ती मिळवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर्षी ८३९ कोटी ८१ लाख रुपयांची विमा प्रतिपुर्ती झाली आहे.

आगामी काळातील युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज या योजनेतून राज्यातील २ कोटी ७२ लाख कुटुंबांना म्हणजेच सर्वच लोकसंख्येला प्रति कुटुंब पाच लाख रुपयांची वैद्यकीय विमा सुरक्षा मिळणार आहे. यातून उपचारांच्या प्रकारांची संख्याही वाढणार आहे. तर याअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची संख्याही हजार वरून १ हजार ९०० वर पोहचणार असल्याची माहिती देण्यात आली.

*भारत नेट -२ (महानेट -१) प्रकल्पाचे ९६ टक्के काम पूर्ण*
भारत नेट -२ अंतर्गत महानेट – १चे ९६ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्याचे काम ९६ टक्क्यांपर्यंत झाले आहे. यातून १४० तालुक्यांना तसेच राज्यातील ९ हजार १४६ ग्रामपंचायती महानेटशी जोडल्या गेल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करुन याचा राजपत्र आणि जीआर काढला यासाठी त्यांचे धन्यवाद – मनोज जरांगे

img 20240127 wa0020
*👉🛑🛑👉वाशीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे एकत्र*

*👉🟥🟥👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन अभिवादन केले*

*👉🟥🟥👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस घेत मनोज जरांगेंनी यांनी सोडले उपोषण..*

*👉🅾️🅾️👉गुलाल लावला, पेढा भरवला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मनोज जरांगेंना विजयाच्या शुभेच्छा*

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! अखेर जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश

मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दीर्घकाळापासून सुरु असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला यश आलेय. रात्री अकराच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ अधिकारी जरांगेच्या शिष्टाईसाठी आलं होतं. तब्बल अडीच ते तीन तास चर्चा करत सरकारने दिलेला अध्यादेश जरांगे पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते. त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच आझाद मैदानात जाणार नसल्याच त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असं मोठं मैदान बघून एक तारीख जाहीर करून आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

यानंतर संपूर्ण महाराष्ट्रराज्यात या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत होत आहे. जवळपास साठ वर्षाहून अधिक काळ सुरु असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सत्त्यात उतरला असल्याने मराठा समाज बांधव फटाके फोडून याचे स्वागत करीत आहेत.एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन

..महाराष्ट्राला सार्थ अभिमान!

मुंबई, दि. २६:  – देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्यांतील सहा मान्यवरांना पद्मभूषण आणि सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये होरमुसजी एन. कामा (साहित्य-शिक्षण-पत्रकारिता), आश्वीन मेहता (वैद्यकीय), राम नाईक (सार्वजनिक क्षेत्र), राजदत्त तथा दत्तात्रय मायाळू (कला), प्यारेलाल शर्मा (कला), कुंदन व्यास (साहित्य-शिक्षण) तसेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये उदय देशपांडे (क्रीडा मल्लखांब प्रशिक्षण), मनोहर डोळे व चंद्रशेखर मेश्राम (वैद्यकीय सेवा), जहीर काझी (साहित्य व शिक्षण),  श्रीमती कल्पना मोरपारिया (उद्योग व व्यापार), शंकर बाबा पापळकर (सामाजिक कार्य) यांचा समावेश आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

या मान्यवर पुरस्कारार्थींचे सार्वजनिक कार्य, सामाजिक आणि वैद्यकीय, कला, क्रीडा, साहित्य- शिक्षण, उद्योग व व्यापार, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या सर्वांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यात योगदान दिले आहे. या सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.

error: Content is protected !!