Home Blog Page 77

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी करिअर मार्गदर्शन शिबिर

img 20240530 wa0005
चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी करिअर मार्गदर्शन शिबिर

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
विषय चेतना इंटरनॅशनल स्कूल व चेतना ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुरुवार दिनांक ३०/०५/२०२४ रोजी करिअर मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो योग्य त्यावेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे विद्यार्थी योग्य त्या दिशेने वाटचाल करतात. या कार्यक्रमाच्या वेळी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय उदय देशपांडे ,सचिव विलास भोसले सर, खजिनदार सोमनाथ माने सर ,चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे कॅम्पस इन्चार्ज सुधीर करगळ सर, स्कूल व कॉलेजचे इन्चार्ज प्रिन्सिपल खबाले सर ,फार्मसी इन्चार्ज प्रिन्सिपल प्रियांका पारेकर मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ माने सर व विलास भोसले सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सोमनाथ माने सर यांनी दहावीनंतर मुलांनी कोणती शाखा निवडली पाहिजे हे सांगत असताना विज्ञान (सायन्स )शाखेबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले तसेच डी .फार्म ,बी .फार्म ,बीएससी एम.बी.बी.एस अशा कित्येक कोर्सेस ला सायन्स शाखेतून जाऊ शकतो
तसेच संस्थेचे सचिव विलास भोसले सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणतात की करिअर म्हणजे काय तर आपल्या आवडीचे क्षेत्र आणि हे आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये यश प्राप्त करणे
आई- वडील सांगतात म्हणून एखादं क्षेत्र न निवडता स्वतःला कशाबद्दल आवड आहे हे जाणून घेऊन आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडणे गरजेचे आहे तसेच कॅम्पस इन्चार्ज सुधीर करगळ सर यांनी सुद्धा बहुमोल असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी कॉमर्स या शाखेतून आपलं करिअर कसं घडवावं त्यामध्ये कोणते नोकरीच्या संधी आहेत तसेच स्पर्धा परीक्षा मार्फत एमपीएससी यूपीएससी या स्पर्धा परीक्षे बद्दल सुद्धा मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करगळ सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खबाले सर यांनी केले.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळेतील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड

रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळेतील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड*

*👉🅾️🅾️👉अभ्यासूपणा, गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून उज्ज्वल करिअर करा👉👉जिल्हाधिकारी एम. देवेंदर. सिंह*

*रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 3 गुणवत्ता परीक्षेतून 23 हजार विद्यार्थ्यांमधून 20 विद्यार्थ्यांची ‘नासा’ ला जाण्यासाठी निवड करण्यात आली.आयुष्यभर हाच अभ्यासूपणा, गुणवंतपणा ठेवून, भविष्यात आयएएस,आयपीएस, एमपीएससी, डॉक्टर, इंजिनियर बनावे.पालकांनीही ती जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.*

*👉🟥🟥👉जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. ज्योती यादव, शिक्षक वैभव थरवळ, समीक्षा मुळे, अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला.ते म्हणाले, चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या. त्याचबरोबर चांगल्याप्रकारे मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावे.मी वयाच्या 25 व्या वर्षी प्रथम विमानात बसलो.*

*👉🅾️🅾️👉तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात. तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. 23 हजार विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली, हा आदर्श ठेवून भविष्यात उज्ज्वल, यशस्वी करिअर घडवा. गुगल आणि ॲपल कंपनीलाही तुम्ही भेट देणार आहात.तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव यांनी नासा अभ्यास सहलबाबत सविस्तर माहिती दिली. नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या बरोबरच इस्रोला देखील यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आले आहे.*

रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळेतील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड

रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळेतील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड*

*👉🅾️🅾️👉अभ्यासूपणा, गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून उज्ज्वल करिअर करा👉👉जिल्हाधिकारी एम. देवेंदर. सिंह*

*रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 3 गुणवत्ता परीक्षेतून 23 हजार विद्यार्थ्यांमधून 20 विद्यार्थ्यांची ‘नासा’ ला जाण्यासाठी निवड करण्यात आली.आयुष्यभर हाच अभ्यासूपणा, गुणवंतपणा ठेवून, भविष्यात आयएएस,आयपीएस, एमपीएससी, डॉक्टर, इंजिनियर बनावे.पालकांनीही ती जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.*

*👉🟥🟥👉जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. ज्योती यादव, शिक्षक वैभव थरवळ, समीक्षा मुळे, अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला.ते म्हणाले, चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या. त्याचबरोबर चांगल्याप्रकारे मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावे.मी वयाच्या 25 व्या वर्षी प्रथम विमानात बसलो.*

*👉🅾️🅾️👉तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात. तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. 23 हजार विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली, हा आदर्श ठेवून भविष्यात उज्ज्वल, यशस्वी करिअर घडवा. गुगल आणि ॲपल कंपनीलाही तुम्ही भेट देणार आहात.तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव यांनी नासा अभ्यास सहलबाबत सविस्तर माहिती दिली. नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या बरोबरच इस्रोला देखील यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आले आहे.*

अहिल्यानगर जिल्हयातील मानगाव येथील रुग्णांसाठी स्वतंत्र डेंटल क्लिनिक सुरु करण्यात आले

img 20240527 wa0001
अहिल्यानगर जिल्हयातील मानगाव येथील रुग्णांसाठी स्वतंत्र डेंटल क्लिनिक सुरु करण्यात आले.रस्त्यावरून आणलेल्या मनोरुग्ण व गंभीर आजारी माता – भगिनींना आधीच गंभीर स्वरुपाचे मानसिक आजार तर असतातच त्याचबरोबर गंभीर शारीरिक आजारही असतात.अनेक महिने कदाचित वर्षसुद्धा हे लोक दात घासलेलेच नसतात. त्यामुळे दात किडतात ,हिरड्या सडतात. कधी कधी इन्फेक्शन इतके खोलवर जाते की मेंदूपर्यंत पोचून मेनीजाइटिस होता.अनेक गंभीर आजारांची सुरुवात होते. हे थांबवण्यासाठी आणि योग्य उपचार होण्यासाठी व्यवस्थित सेटपची गरज होती.तो उभारलाय आता नगरचे प्रसिद्ध आणि महत्वाचे म्हणजे स्माइल प्लस क्लिनिकचे अत्यंत सेवाभावी दंतरोग तज्ञ डॉ. कुणाल कोल्हे आणि डॉ.किर्ती कोल्हे या दाम्पत्यांनी यांनी पुढाकार घेतला. आज त्यांनी कामाची सुरुवात केली.पहिली सुरुवात आमच्या मुलांच्या दातांच्या उपचारापासून सुरवात केली. आज मनोरुग्ण तसेच गावातील इतर सर्व मिळुन ४७५ माता भगिनी आणि ४० लेकरांची तपासणी झाली. तसेच सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसुन येत होता. दाताच्या उपचारसाठी जागा विशालजी पंचारिया आणि डॉ.राजेंद्र धामणे यांच्या सहकार्यने मानगाव येथे कायमस्वरूपी क्लिनिक उपलब्ध झाली.

इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अद्याप हल्ले करांनी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संविधान चौकात प्राणघातक हल्ला केला. चौकात तहसीलदारांची गाडी आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी राॅडने जोरदार हल्ला चढविला. यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेहमीप्रमाणे तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर प्रशासकीय भवन येथे निघाले होते. संविधान चौकात त्यांची गाडी आल्यानंतर नंबर प्लेट नसलेल्या चार चाकी गाडीतून एक हल्लेखोर खाली उतरून लोखंडी रॉड ने थेट हल्ला करून गाडीची मोडतोड केली व अंगावर मिरचीची पूड उधळली. त्यावेळी गाडीत तहसीलदार व चालक होते. अजून तीन हल्लेखोर गाडीतून उतरून त्यांनी धक्काबुक्की करून फरार झाले.

HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती

HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती
—————————————-
*मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
—————————————-
०१) *नीट* आँनलाईन फाॅर्म प्रिंट
०२) *नीटप्रवेश* पत्र
०३) *नीट मार्क* लिस्ट
०४) १० वी चा मार्क मेमो
०५) १० वी सनद
०६) १२ वी मार्क मेमो
०७) नॅशनॅलीटी सर्टीफिकेट
०८) रहिवाशी प्रमाणपत्र
०९) १२ वी टी सी
१०) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
११) आधार कार्ड
१२) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा
१३) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
१४) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
०१) जातीचे प्रमाणपत्र
०२) जात वैधता प्रमाणपत्र
०३) नाॅन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
(मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू)
—————————————-
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.
—————————————-
*इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
—————————————-
०१) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
०२) *MHT-CET* पत्र
०३) *MHT-CET* मार्कलिस्ट
०४) १० वी चा मार्क मेमो
०५) १० वी सनद
०६) १२ वी मार्क मेमो
०७) नँशनँलीटी सर्टीफिकेट
०८) रहिवाशी प्रमाणपत्र
०९) १२ वी टी सी
१०) आधार कार्ड
११) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा
१२) राष्ट्रीय बँकेतील खाते
१३) फोटो
—————————————-
*मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*
—————————————-
०१) जातीचे प्रमाणपत्र
०२) जात वैधता प्रमाणपत्र
०३) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र (मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू)

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे
—————————————-
*वैद्यकीय क्षेत्र*
—————————————-
*शिक्षण – एमबीबीएस*
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र आणि NEET प्रवेश परीक्षा
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
—————————————-
*उच्च शिक्षण – एमडी, एमएस व इतर पदविका*
—————————————-
*शिक्षण – बीएएमएस*
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
—————————————-
*पुढील उच्च शिक्षण – एमडी, एमएस व इतर पदविका*
—————————————-
*शिक्षण – बीएचएमएस*
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
—————————————-
*पुढील उच्च शिक्षण – एमडी*
—————————————-
*शिक्षण – बीयूएमएस*
कालावधी – पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
—————————————-
*पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण*
—————————————-
*शिक्षण – बीडीएस*
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? – स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
—————————————-
*पुढील उच्च शिक्षण – एमडीएस*
—————————————-
*शिक्षण – बीएससी इन नर्सिंग*
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? – रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी
—————————————-
*पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण*
—————————————-
*शिक्षण – बीव्हीएससी ऍण्ड एएच*
कालावधी – पाच वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? – प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण
—————————————-
*शिक्षण – डिफार्म*
—————————————-
कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? – औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
—————————————-
*पुढील उच्च शिक्षण – बीफार्म*
—————————————-
*शिक्षण – बीफार्म*
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? – औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमफार्म
—————————————-
*संरक्षण दलांत प्रवेशासाठी*
—————————————-
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते १९ वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात
—————————————-
*अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल*
—————————————-
*शिक्षण – इंजिनिअरिंग डिप्लोमा*
कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा – बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? – आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
*शिक्षण – बीई*
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? – स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
*शिक्षण – बीटेक*
कालावधी – चार वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? – औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण – ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी
कालावधी – चार वर्षे
पात्रता – बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण – ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी – दोन वर्षे
पात्रता – बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण
—————————————-
*कॉम्प्युटरमधील कोर्सेस*
—————————————-
डीओईएसीसी ‘ओ’ लेव्हल
कालावधी – एक वर्ष
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी
कालावधी – दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी – सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी – तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी – दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी – एक वर्ष
—————————————-
*शिक्षण – बारावी*
—————————————-
*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन*
कालावधी – एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी – दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी – एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी – दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी – एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी – एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी – एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी – एक वर्ष
—————————————-
*रोजगाराभिमुख कोर्सेस*
—————————————-
*शिक्षण – डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी*
कालावधी – तीन वर्षे
पात्रता – बारावी (७० टक्के)
संधी कोठे? – प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण – पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर
*शिक्षण – टूल ऍण्ड डाय मेकिंग*
कालावधी – चार वर्षे
पात्रता – दहावी आणि बारावी पास
संधी – टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस
कालावधी – एक वर्ष
फॅशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी – एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस
कालावधी – तीन वर्षे
—————————————-
*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*
—————————————-
*टूरिस्ट गाइड*
कालावधी – सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी – दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी – तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी – एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी – पाच महिने ते चार वर्षे
*शिक्षण – व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी*
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी – एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी – एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी – एक ते तीन वर्षे
—————————————-
*बांधकाम व्यवसाय*
—————————————-
*शिक्षण – बीआर्च*
कालावधी – पाच वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, NATA , JEE
संधी कोठे? – स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमआर्च, एमटेक
—————————————-
*पारंपरिक कोर्सेस* —————————————-
*शिक्षण – बीएससी*
कालावधी – तीन वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र, प्रवेश थेट संधी कोठे? – आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण – एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी
—————————————-
*शिक्षण – बीएससी (Agri)*
कालावधी – ४ वर्षे
पात्रता व प्रवेश – बारावी शास्त्र व CET
संधी कोठे? – कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण – एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
—————————————-
*शिक्षण – बीए*
कालावधी – तीन वर्षे
संधी कोठे? – नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण – एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
—————————————-
*शिक्षण – बीकॉम*
कालावधी – तीन वर्षे
संधी कोठे? – आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
—————————————-
*शिक्षण – बीएसएल*
कालावधी – पाच वर्षे
संधी कोठे? – विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण – एलएलएम
—————————————-
*शिक्षण – डीएड*
कालावधी – दोन वर्षे
प्रवेश – सीईटी आवश्‍यक
संधी कोठे? – प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण – बीए, बीकॉम व नंतर बीएड
—————————————-
*शिक्षण* – बीबीए, बीसीए, बीबीएम
कालावधी – तीन वर्षे
प्रवेश – सीईटी
संधी कोठे? – औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण – एमबीए, एमपीएम, एमसीए

—————————————-
*फॉरेन लॅंग्वेज*
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)
कालावधी :- बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित
—————————————-
*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.*
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.
उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.

अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.

अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.

इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.

काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.
×+×+×+×+×+×+×+×+×+×

*काही महत्त्वाची संकेतस्थळे*
०१) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in

०२) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org

०३) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in

०४) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in

०५) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in

०६) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) “एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in

०७) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)
www.upsc.gov.in

ऍड.आनंद अशोक केकान यांच्या वाढदिवसाच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

img 20240521 wa0014
शिबिराचे उदघाट्न उपजिल्हा रुग्णालय इंदापूरचे मुख्य अधीक्षक श्री सिद्धार्थ नांमपल्ले साहेब यांनी धन्वंतरी प्रतिमीचे पूजन करून तसेच इंदापूर नगरपालिकेचे मा उपनराध्यक्ष श्री भरत शेठ शहा, डॉ. विनोद राजपुरे यांनी दीपप्रज्योलण करून केले.आरोग्य शिबिरामध्ये 110 रुग्णांची नेत्र तपासणी,95 रुग्णांची रक्तदाब व शुगर तपासणी करण्यात आल्या तसेच वृक्षा रोपण वन अधिकारी अजित सूर्यवंशी साहेब,मा. नगराध्यक्ष श्री विठ्ठल ननवरे,सीमाताई कल्याणकर इंदापूर वकील संघटनेचे ऍड. कृष्णाजी यादव, ऍड.कोकरे, ऍड बागवान, ऍड. घोगरे, ऍड खाडे, ऍड. लोणकर, ऍड शिंदे, ऍड वाघमारे, ऍड. भोसले, ऍड देवकर,यांनी केले. शिबिरा मध्ये लोकसेवक गणपतराव आवटे फॉउंडेशनचे संस्थापक श्री सागर आवटे, सोमनाथ लांडगे,अंकुश बळगानुरे, विशाल गर्दी, दादा मुलाणी, महेश जाधव, अमोल कारंडे,अशोक देवकर, पांडुरंग शिंदे, श्रीकांत मखरे, पवन घनवट, संतोष गोरे, नवगिरे, रोकडे सर यांनी विशेष आभार मानले. शिबिराचे सूत्रसंचालन ऍड. श्री राकेश शुक्ल यांनी केले.

अवश्य सहभागी व्हा

img 20240518 wa0010
ऍड.आनंद अशोक केकान

यांच्या वाढदिवसा निमित्त

भव्य मोफत आरोग्य शिबीर

• मोतीबिंदू शस्त्रक्रिया • रक्तदाब तपासणी • नेत्र तपासणी • शुगर तपासणी आणि वृक्षारोपण सोहळा

मंगळवार दि. २१/०५/२०२४ रोजी | सकाळी १० ते २ ठिकाण-उपजिल्हा रुग्णालय इंदापूर ता. इंदापूर, जि. पुणे

विशेष सहकार्य

बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे

आयोजक – ऍड. आनंद अशोक केकान मित्र परिवार

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी आपसात शंभर टक्के समन्वय ठेवावा- विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

img 20240517 wa0021
पुणे, दि. १७: विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विधान भवन येथे आयोजित पुणे विभागस्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपायुक्त रामचंद्र शिंदे आदी उपस्थित होते. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावर्षी हवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याचे सांगून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, त्यामुळे सर्व विभागांनी कोण्यात्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज असले पाहिजे. आत्पकालीन परिस्थितीत विभाग प्रमुखांनी, समन्वयाची जबाबदारी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. सर्व विभागांनी आपले नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत. त्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांची देवाणघेवाण करावी.

श्री. पुलकुंडवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे अलमट्टी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाने आंतरराज्यीय समन्वय राखावा. पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन करावे, पाण्याचा विसर्ग वाढविण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना द्यावी. धरणभिंती, कालवे संरचनांची तपासणी करुन कुठे गळती असल्यास दुरुस्ती करावी.

पूरप्रवण व दरडग्रस्त क्षेत्रात स्थानिक यंत्रणांनी विशेष खबरदारी घ्यावी, धोकादायक पुलांचे संरचनात्मक अंकेक्षण करावे, जलजन्य आजार पसरु नयेत यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून काम करावे, पशुसंवर्धन विभागाने पशुंचे मान्सूनपूर्व लसीकरण करुन घ्यावे. पशुहानी झाल्यास मृत पशुंची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी यंत्रसामुग्री तसेच पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवावीत असे सांगून स्थानिक यंत्रणांनी आपत्तकालीन परिस्थितीची माहिती तातडीने वरिष्ठांना कळवावी अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

श्री. पुलकुंडवार म्हणाले, शहरातील नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत. अवैध जाहिरात फलक हटविण्यासह मान्यता असलेल्या जाहिरात फलकांची संरचनात्मक स्थीरता तपासून धोकादायक फलक हटविण्यात यावेत. धोकादायक वाड्यांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात यावे. नाले, नदीपात्राच्या कडेची अतिक्रमणे काढण्यात यावीत. तेथील नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे.

शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने करावे, पूरपरिस्थतीनंतर नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे तसेच पहिल्या पावसानंतर शहरात साठलेला राडारोडा तातडीने हटविण्याची व्यवस्था करावी अशा सूचना महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. तसेच ग्रामीण भागातील अनधिकृत जाहिरात फलकही हटविण्यात यावेत. महावितरणने विजेचे खांब, तारा यांची तपासणी करुन आवश्यक ती दुरुस्ती करावी. कृषी विभागाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव पाठवावेत, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही डॉ. पुलकुंडवार म्हणाले.

यावेळी सुनील फुलारी यांनी पोलीस विभागाच्या तयारीची माहिती दिली तसेच सर्व जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरु शकतील अशा पोहणाऱ्या व्यक्तींची यादी करण्यात आली आहे. महसूल, ग्रामविकास आणि पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

बैठकीत धरणे, नदीनिहाय संभाव्य पूरप्रवण गावे, रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची प्रमुख ठिकाणे, पूरपरिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना, नागरिकांचे तात्पुरते स्थलांतरासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था (शेल्टर्स), पशुधनाची काळजी, आरोग्य विभागामार्फत करावयाच्या उपाययोजना, रेल्वे विभाग, एनडीआरएफ, विद्युत विभाग, कृषी विभाग, सहकार विभाग, हवामान विभाग, जिल्हा परिषद तसेच पोलीस विभागाने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा संबंधितांकडून घेण्यात आला.

महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान – अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार

img 20240517 wa0020
पुणे, दि.17: आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राज्यातील फुलशेतीसाठी वरदान असून हा देशातील एक यशस्वी प्रकल्प आहे, असे राज्याचे सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार म्हणाले.

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत के. एफ. बायोप्लांट व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 16) आयोजित फुले पिक उत्पादने व सुगी पश्चात संबंधी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, राष्ट्रीय सुगी तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुभाष घुले, उपसंचालक राजेंद्र महाजन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, के. एफ. बायोप्लांटचे सरव्यवस्थापक आशिष फडके, आयसीएआर चे शास्त्रज्ञ डॉ.गणेश कदम, गणेश खिंड कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मोहन शेटे, डॉ.विष्णु गराडे, फूल उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.

फुल शेतीमध्ये मूल्य साखळी विकसित होण्याची आवश्यकता असून यामुळेच फुलांचा समावेश मॅग्नेट प्रकल्पात केल्याचे सांगून श्री अनुपकुमार म्हणाले, तरुण फुल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्टार्टअपच्या माध्यमातून या संधीचा फायदा घेतला पाहिजे. फुल शेतीमध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रेसर राज्य म्हणून पुढे आले असून नांदेड, धाराशिव आदी जिल्ह्यामध्ये फुल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था हे फुल शेतीच्या मार्गदर्शनातील महत्वाची संस्था आहे, असेही ते म्हणाले.

श्री. कोकरे यांनी मॅग्नेट प्रकल्प बाबतची विस्तृत माहिती सादर करून फुल शेतीसाठी प्रकल्पाचे महत्त्व विषद केले. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

फलोत्पादन व फुल शेतीसाठी मुदत कर्ज व खेळते भाग भांडवलासाठी मॅग्नेट प्रकल्पाच्या एफआयएल घटकांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा फायदा फुल उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. अमोल यादव यांनी केले.

संरक्षित फुल शेती बाबत के.एफ. बायोप्लांटचे श्री. फडके, फुल शेती लागवड याबाबत आयसीएआरचे शास्त्रज्ञ डॉ. कदम यांनी व फुलांची काढणी व्यवस्थापन व निर्यात याबाबत पंडित शिकारे आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रामध्ये सर्व उपस्थित उत्पादक शेतकऱ्यांना सोएक्स फ्लोरा या फुलाची निर्यात करणाऱ्या कंपनीच्या प्रक्षेत्रास भेट देऊन त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्री कुलिंग,कोल्ड स्टोरेज ,पॅक हाऊस, फुलाची काढणी व विपणन या संदर्भात कंपनीचे संचालक नरेंद्र पाटील व सरव्यवस्थापक धनंजय कदम यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘फूल पीक माहिती पुस्तिकेचे’ प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यशाळेस इंडिका फ्रेशचे पंडित शिकारे, मॅग्नेट प्रकल्पाचे कैलास कुंभार, नितीन पाटील, चेतन भक्कड, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व राज्यातील फुल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!