Home Blog Page 78

यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १५ : कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे यशदा येथे १६ मे रोजी सकाळी ९.३० ते संध्या. ६ या वेळेत आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांनी दिली आहे.

कार्यशाळेला भारत सरकारच्या कृषी विभागातील सह सचिव (आयएनएम), देशाच्या पश्चिम भागातील राज्यांचे कृषी सचिव, आयुक्त, संचालक, आयसीएआरचे शास्त्रज्ञ, चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रिय कृषी मंत्रालयातील अधिकारी, निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत नैसर्गिक शेतीबाबतचे धोरण आणि त्याअनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत चर्चा होणार असून यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दिव आणि लक्षद्वीप या ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील २५० शास्त्रज्ञ, अधिकारी व शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई, दि. 14 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपचे मतदार नाराज झाले; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई – शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणे केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभाग नोंदवला. परंतु अजित पवार यांचे महायुतीत सहभागी होणे भाजपच्या पारंपारिक मतदारसंघाला आवडले नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले आहे. “अजित पवार यांच्या महायुती देण्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाला होता” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.*

*👉🟥🟥👉नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मराठी आणि मुस्लीम मतांचा मुंबईच्या जागांवर किती प्रभाव होऊ शकतो, याबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “अजित पवार महायुतीत आले तेव्हा आमचा मतदार नाराज झाला होता. परंतु अजित पवारांच्या वर्तनाने महायुतीचा अवमान होणार नाही याची त्यांना खात्री पटली. याचा तुम्हाला बारामतीच्या निकालात प्रत्यय येईल आणि खडकवासला येथील भाजप मतदार कोणाला मतदान करतात यावरुन समजेल”*

*👉🔴🔴👉शरद पवारांवर टीका*

*त्याचबरोबर, “शरद पवारांनी पक्ष आणि घरं फोडली आहेत. आपला वारसा आपल्या मुलांकडे देण्याची इच्छा असल्यामुळे त्यांचे पक्ष फुटले. शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंकडे वारसा सोपवायचा असल्यामुळे अजित पवारांना व्हिलन करण्यात आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षवाढीसाठी काम केलेलं असतानाही त्यांचे पंख छाटून आदित्य ठाकरेंना पुढे आणलं जात होते. आता मराठी मतदार हा शिवसेनेबरोबर आहे ही फक्त अफवा आहे” असे वक्तव्यं देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.*

*👉🟥🟥👉दरम्यान, या मुलाखती देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “आम्हाला 30 जागांची अपेक्षा होती, परंतु 28 मिळाल्या. आम्ही ठाणे मिळण्यासाठी आग्रही होतो. पण मुख्यमंत्री म्हणाले की, ही जागा तुमची असली तरी आम्ही ती सातवेळा जिंकली आहे. जर मी आनंद दिघेंचा मतदारसंघ जाऊ दिला तर माझ्या समर्थकांचं खच्चीकरण होईल. आम्ही ठाण्यासाठी आग्रह करु नये अशी त्यांनी विनंती केली”*

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर..

मुंबई:-भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.*

*👉🔴🔴👉विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.*

*👉🅾️🅾️👉या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.*

बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी साहित्याचे वितरण

बारामती, दि.६: बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज मतदारसंघनिहाय पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहचले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत. ५ व ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात ६, इंदापूर ५, बारामती ६, पुरंदर १७, भोर ९ व खडकवासला ४४ असे एकूण ८७ मतदान केंद्रे आहेत.

दौंड विधानसभा मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल २१ ची मांडणी करुन ९२७ बॅलेट युनिट, ३०९ कंट्रोल युनिट, ३०९ व्हीव्हीपॅटचे शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ४८ एसटी बसेस, १० जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १५५ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण २ हजार ५९७ मनुष्यबळ कार्यरत आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३३० मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल ३५ ची मांडणी करुन १ हजार १८८ बॅलेट युनिट, ३३० कंट्रोल युनिट, ३३० व्हीव्हीपॅट यंत्राचे शासकीय धान्य गोदाम कालठण रोड येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ५५ एसटी बसेस, ४ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १६५ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण २ हजार ५१८ मनुष्यबळ कार्यरत आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३८० मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल ३७ ची मांडणी करुन १ हजार १४० बॅलेट युनिट, ३८० कंट्रोल युनिट, ३८० व्हीव्हीपॅट यंत्राचे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ४७ एसटी बसेस, १५ मिनीबस, ७ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १९० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ३ हजार ५०० मनुष्यबळ कार्यरत आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण ४२१ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ३० ची मांडणी करुन १ हजार २६३ बॅलेट युनिट, ४२१ कंट्रोल युनिट, ४२१ व्हीव्हीपॅट यंत्राचे श्री कातोबा हायस्कूल दिवे येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ६९ एसटी बसेस, ८ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २११ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ३ हजार ३७७ मनुष्यबळ कार्यरत आहे.

भोर विधानसभा मतदारसंघात एकूण ५६१ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ७० ची मांडणी करुन १ हजार ६८३ बॅलेट युनिट, ५६१ कंट्रोल युनिट, ५६१ व्हीव्हीपॅट यंत्राचे भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ९० एसटी बसेस, ८ मिनीबस व ६५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २८१ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ४ हजार ६२ मनुष्यबळ कार्यरत आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण ४६५ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ५३ ची मांडणी करुन १ हजार ३९५ बॅलेट युनिट, ४६५ कंट्रोल युनिट, ४६५ व्हीव्हीपॅट यंत्राचे स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ११३ एसटी बसेस, ५३ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २७६ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ४ हजार ४९ मनुष्यबळ कार्यरत आहे.

*कविता द्विवेदी, निवडणुक निर्णय अधिकारी*- बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आलेले असून बसेस, जीपद्वारे आज सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील. पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदीच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या ७ मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती

img 20240506 wa0005
पुणे,दि.५: येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवानिवृत्त पोलीस वेल्फेअर असोसिएशन आणि मित्र संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती करण्यात आली.

पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सेवानिवृत्त पोलीस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भानुप्रताप बर्गे, उपायुक्त राजीव नंदकर आदी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. भोसले यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी मतदानाची शपथ घेण्यात आली. मतदानाच्या दिवशी सुट्टी साजरी न करता प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन
डॉ. भोसले यांनी यावेळी केले.

सीमेवरील सैनिक २४ तास ३६५ दिवस आपल्या व देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत उच्च तापमानामध्ये तसेच थंडी, पावसामध्ये तैनात असतो व आपले कर्तव्य बजावत असतो त्याचप्रमाणे आपणदेखील मतदानासाठी थोडा वेळ काढून मतदानाचे कर्तव्य आणि हक्क बजवावा असे आवाहन श्री.बर्गे यांनी यावेळी केले.

रॅलीमध्ये सुमारे ५०० दुचाकी स्वार सहभागी झाले. घोषणा देत आणि मतदारांना आवाहन करत शनिवार वाडा, लक्ष्मी रोड, अलका टॉकीज, सेनादत्त पोलीस चौकी, नळ स्टॉप, एस एन डी टी कॉलेज, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, कृषी महाविद्यालय, संचेती हॉस्पिटल, आरटीओमार्गे आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप झाला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी सज्ज- कविता द्विवेदी

img 20240505 wa0030
बारामती, दि.5: बारामती लोकसभा मतदासंघाअंतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण (युनिक) आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून आवश्यक सुविधांनी युक्त ही मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी आणि मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशी वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस असे सर्वच महिला कर्मचारी आहेत. दिव्यांग संचलित मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी दिव्यांग आहेत. युवा संचलित मतदान केंद्रावर सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी युवा वयोगटातील आहेत. आदर्श मतदान केंद्रावर सर्व सेवासुविधा तसेच आवश्यक त्या अतिरिक्त सुविधा देण्यात येतात. युनिक मतदान केंद्रे ही वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीम) सजविण्यात येणार आहेत.

दौंड विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून स्व. लाजवंती गॅरेला हायस्कूल खोली क्र.२, दौंड, दिव्यांग मतदान केंद्र- सरस्वती शाळा रावळगाव, खोली क्र.२, युवा संचलित मतदान केंद्र- सेठ ज्योतीप्रसाद प्राथमिक शाळा, दौंड,खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानोटा, खोली क्र.३ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून सेंट सेबॅस्टियन हायस्कूल, दौंड, खोली क्र.१ याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय, इंदापूर खोली क्र.१०, दिव्यांग संचलित मतदान केंद्र- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदापूर, खोली क्र.३, युवा संचलित मतदान केंद्र- नारायणदास रामदास विद्यालय, इंदापूर, खोली क्र.३, युनिक मतदान केंद्र- श्री. एन. आर. विद्यालय, इंदापूर, खोली क्र.१ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून एन. आर. विद्यालय, इंदापूर, खोली क्र. १० याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून राधेश्याम एन अग्रवाल तांत्रिक विद्यालय, बारामती, खोली क्र.१, दिव्यांग संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळेगाव बु, खोली क्र.३, युवा संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळद, खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळेवस्ती, खोली क्र.१ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून नवराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे, खोली क्र.१ याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून एमईएस वाघिरे विद्यालय, सासवड, खोली क्र.३, दिव्यांग संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येवलेवाडी, खोली क्र.१, युवा संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनी जेजुरी, खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळदरी, खोली क्र.२ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून ऑर्किड इंटरनॅशनल शाळा, खोली क्र.३ याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

भोर विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून शिवाजी विद्यालय, भोर, खोली क्र.७, दिव्यांग संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोलावडे, खोली क्र.१, युवा संचलित मतदान केंद्र- ब्लूरीज पब्लिक स्कूल, हिंजवडी, ता. मुळशी, खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रायरेश्वर, ता. भोर खोली क्र.१ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून ब्लूरीज पब्लिक शाळा, खोली क्र.४ याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून ज्ञानदीप इंग्रजी माध्यम शाळा, जुन्या टोलनाक्याजवळ, वडगाव बु., दिव्यांग संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सणसनगर, खोली क्र.१, युवा संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहुली, खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोणजे, खोली क्र.१ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून स.क्र.१०, सन सिटी वडगाव बु. कम्युनिटी सभागृहासमोरील बाजूस टेनिस सभागृह याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

img 20240505 wa0029
मतदारांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. येत्या ७ मे रोजी अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती द्विवेदी यांनी केले आहे.

मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा मतदान केंद्रांना मेडिकल कीटचे कृषी महाविद्यालय येथे वितरण

img 20240505 wa0019
पुणे, दि. ५: बारामती लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूक येत्या ७ मे रोजी होणार असून उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी १ हजार ७२४ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले.

मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड विधानसभा मतदार संघासाठी २३२, इंदापूर २५२, बारामती २८०, पुरंदर २४४, भोर ५२५ व खडकवासला १९१ याप्रमाणे १ हजार ७२४ कीटचे वितरण करण्यात आले. तर २ हजार ५१६ मतदान केंद्राना २५१६० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.

प्रथमोपचार पेटीमध्ये बँडेज, कापूस, बीटाडाईन ट्यूब, अँटीसेप्टीक सोल्युशन, हातमोजे, पॅरासिटामॉल, रँनटीडीन टॅबलेट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. किटचे वितरण सुलभतेने होण्यासाठी सर्व साहित्य असलेल्या प्रथमोपचार पेट्या पिशव्यांमध्ये भरुन पाठविण्यात आल्या. प्रत्येक पिशवीवर मतदारसंघाचे नाव लिहिण्यात आल्याने ती कीट मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे सोईचे होणार आहे. प्रथमोपचार साहित्य नेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वाहन व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

साहित्य व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक अधिकारी रेश्मा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक समन्वयक अधिकारी सूर्यकांत पठाडे यांच्या उपस्थितीत मेडिकल कीटचे वितरण करण्यात आले.

error: Content is protected !!