
– पंतप्रधान नरेंद्र मोदी जी
नवी दिल्ली:- लोकसभा निवडणूक २०२४ चा निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. उद्या निवडणुकांचा निकाल येणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावर्षी ६४ कोटी लोकांनी मतदान केल्याचं सांगितलं आहे. तसंच यावर्षी ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.*
*👉🔴🔴👉राजीव कुमार म्हणाले की, आतापर्यंत आम्ही १०० प्रेस नोट काढल्या. ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदान केलं आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं देखील राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. महिलांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाकडून चुकीचा शब्द निघायला नको, अशी आमची भूमिका होती. आम्ही त्यासाठी कडक सूचना केल्या होत्या, असं राजीव कुमार यांनी सांगितलं होतं. निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी १३५ ट्रेनचं नियोजन केलं होतं. १६९२ कर्मचारी हेलिकॉप्टरने पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली आहे. देशातील असा कुठलाही कोपरा नाही की, तिथे निवडणूक कर्मचारी पोहोचले नाहीत, असं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.*
*👉🅾️🅾️👉मतमोजणी दरम्यान काय काय काळजी घ्यायची आहे, त्याची प्रोसेस ठरल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहेत. १०.३० लाख बूथ आहेत. प्रत्येक हॉलमध्ये ४ टेबल आहेत. प्रत्येक पक्षाचा पोलिंग प्रतिनिधी असेल. ही सगळी प्रोसेस ७० ते ८० लोकांमध्ये होत आहे. सिस्टिममधे कुठलीही चूक होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी CCTV लावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधे ५८.५८ टक्के मतदान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी लवकरच मतदान घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मणिपूरमध्ये ९४ स्पेशल पोलिंग बूथ बनवले होते, ही आपल्यासाठी सक्सेस स्टोरी असल्याचं देखील राजीव कुमार म्हणाले आहेत. दोन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर कुठलाही हिंसाचार न होता निवडणुका झाल्या आहेत. यावेळी एकही मोठी घटना समोर आली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.*

यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप आयुक्त वर्षा लढ्ढा- उंटवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिले.
विभागीय आयुक्त यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, निवडणूक निरीक्षक, उमेदवार आणि उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्षात करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी केंद्रातील केलेल्या तयारीची तसेच व्यवस्थेबद्दलची सविस्तर माहिती दिली.

दिनांक 2/6/2024 वार रविवार रोजी सकाळी मा. पुणे विभाग शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी चेतना फाउंडेशन ला सदिच्छ भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मा.उदय देशपांडे सर, सचिव विलास भोसले सर ,खजिनदार सोमनाथ माने सर हे उपस्थित होते .यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. उदय देशपांडे यांच्या हस्ते मा. दत्तात्रय सावंत यांचा सत्कार व स्वागत समारंभ करण्यात आला. तसेच त्यावेळी श्री विलास कृष्णा गाढवे सर हे देखील उपस्थित होते. त्यांचाही सत्कार संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी सावंत सरांनी शैक्षणिक धोरण 2024 याबद्दल माहिती सांगितली तसेच शैक्षणिक समस्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले .शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दत्तात्रय सावंत यांनी दिले .संस्थेचे सचिव विलास भोसले सर यांनी मा. आमदार साहेबांना फाउंडेशन विषयी माहिती दिली या ठिकाणी चेतना इंटरनॅशनल स्कूल ,चेतना ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी यांना शासनाची मान्यता मिळाल्याचे सांगितले.
मा.दत्तात्रय सावंत यांनी संस्थेने शैक्षणिक रित्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रमयाबद्दल पाहणी केली. व त्यांनी राबवलेल्या उपक्रमांचे कौतुकही केले. तसेच चेतना फाउंडेशन ला भेट देऊन शिक्षकांना व विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल संस्थेचे खजिनदार सोमनाथ माने सरांनी आभार व्यक्त केले.

संपादकीय:-
ग्रामपंचायतींकडून आलेल्या टँकर मागणीच्या प्रस्तावांना 12 तासात मंजुरी द्यावी, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा सूचना बारामतीचे प्रांत अधिकारी, इंदापूरचे तहसीलदार यांना केल्या आहेत. मध्यंतरी वादळामुळे इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पिके, फळबागा यांचे नुकसान झाल्याने पंचनामे झाले आहेत. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये तसेच राज्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे केले.
इंदापूर येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी विविध विषयांवरती संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचेवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. आज सकाळीच मी त्यांची व कुटुंबीयांची भेट घेतली. तुम्ही तहसील कार्यालयात जावून नेहमीप्रमाणे कामकाज चालू ठेवा व कर्मचाऱ्यांना बेमुदत संपापासून परावृत्त करून, तालुक्यातील जनतेला अडचणी येऊ देऊ नका, अशी माझी त्यांचे बरोबर चर्चा झाली आहे. त्यानुसार ते आता तहसील कार्यालयात गेले आहेत. इंदापूर तालुक्याची संस्कृती चांगली आहे. सन 1952 पासून शंकररावजी भाऊ पासून व नंतर वीस वर्षे आंम्ही सत्तेवर असताना असे कधीही घडलेले नाही, यास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आंम्ही केली आहे.
देशभरातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन मी व कुटुंबियांनी घेतले, त्यामुळे मध्यंतरी आंम्ही तालुक्यामध्ये नव्हतो. यादरम्यान कळाशी येथे घडलेली बोट दुर्घटना ही दुर्दैवी आहे, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील धनंजय डोंगरे यांच्या कुटुंबासह इतरांची भेट मी घेणार आहे. बोट प्रवासादरम्यान प्रवाशांनी जॅकेट व इतर सुरक्षा साधने वापरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केले.
उजनी धरणामध्ये डिसेंबर महिन्यात 72 टक्के एवढा मोठा पाणीसाठा होता. उजनीतील पाणीसाठा वापराचे जर योग्य नियोजन झाले असते तर आज चांगली परिस्थिती दिसली असती. मात्र सध्या उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर उजनीतील जलसाठ्याचे उच्चस्तरावरती नियोजन होणे गरजेचे असल्याची चर्चा करणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
बारामती सह राज्यात महायुती जिंकणार – हर्षवर्धन पाटील
लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या दिवसांवर आला आहे. मतमोजणी 4 जूनला होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यामध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असा विश्वास यावेळी बोलताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
______________________
अकरा वर्षांपूर्वीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आदेश
पुणे, दि. ३१ मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (दि. 31) प्रथम वर्ग न्यायालयात हजर झाले. 2013 मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये न्यायालयाने त्यांना वॉरंट बजावले होते.
या प्रकरणात न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी जरांगे पाटील यांना ५०० रुपये दंड ठोठावला. तो भरल्यानंतर जरांगे पाटील यांचे वॉरंट रद्द करण्यात आले. एका संघटनेकडून 2013 मध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार (कलम १५६, (३)) कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जरांगे यांच्या बाजूने अॅड. हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली.

*👉🟥🟥👉श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर समितीचे सह अध्यक्ष, अभ्यासक आणि महाराज मंडळींच्या उपस्थितीत तळघरातील या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामामुळे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे लांबून दर्शन सुरू आहे. काम अंतिम टप्प्यात असून, रविवारी (दि. २) विठ्ठलाचे पदस्पर्श म्हणजेच देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन सुरू होणार आहे. हे संवर्धनाचे काम सुरू असताना मंदिरातील हनुमान दरवाजा म्हणजे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेऊन बाहेर पडताना डाव्या हाताला फरशी बदलण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणचा दगड काढला असताना खोल अंधार दिसून आला. संबंधित कामगारांनी मंदिर समितीला ही माहिती दिली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांनी तत्काळ पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. प्राथमिक पाहणीत पाच ते सहा फूट खोल एक खोली आढळली होती.*

*तामिळनाडू:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी आज संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे.45 तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या 45 तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार नाहीत. ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली.*
*👉🔴🔴👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यान साधना आज संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुरु झाली. ते 45 तास ध्यानधारणा करतील. या 45 तासात ते फक्त नारळ पानी, द्राक्षाचा रस आणि इतर तरल पदार्थ घेतील. या काळात ते ध्यान कक्षातून बाहेर येणार नाहीत. ते 45 तास मौन पाळणार आहेत.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळपासून १ जूनच्या सायंकाळपर्यंत तेथे ध्यान करतील. हे दोन दिवस पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही. गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींनाही तेथे जाण्याची परवानगी नसेल.*
*👉🛑🛑👉1 जूनला ध्यान साधना संपणार*
*पंतप्रधान मोदी आज तामिळनाडूत आले. तामिळनाडूत आल्यावर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात पूजा केली. त्यानंतर ते विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये आले. याच ठिकाणी त्यांनी ध्यान धारणा सुरू केली असून जवळपास दोन दिवस ते ध्यानमग्न अवस्थेत राहणार आहेत. 1 जूनला ते ध्यान साधनेतून बाहेर येतील. इथून निघण्यापूर्वी ते संत तिरुवल्लूवर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतील. तिरुवल्लूवर यांचं स्मारक आणि मूर्त्या या दोन्ही छोट्या बेटांवर उभारण्यात आल्या आहेत.*
*👉🟥👉दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त*
*विवेकानंद रॉक मेमोरिअल समुद्रात आहे. मोदी 45 तास या बेटावर थांबणार असल्याने या ठिकाणी मोठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी 2000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच भारतीय तट रक्षक दल आणि नौदलाचे जवानही तैनात राहणार आहेत. मोदींच्या ध्यान साधनेची माहिती यापूर्वीच भाजप नेत्यांनी दिली होती. 2019च्या निवडणुकीवेळी मोदी केदारनाथ गुहेत ध्यान साधनेला बसले होते.*
*👉🔴🔴👉1 तारखेला शेवटचा टप्पा*
*दरम्यान, देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. येत्या 1 तारखेला लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपत आहे. त्यानंतर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुन्हा देशात भाजपची सत्ता येणार की काँग्रेसला संधी मिळणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.*

*तामिळनाडू:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी आज संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे.45 तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या 45 तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार नाहीत. ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली.*
*👉🔴🔴👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यान साधना आज संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुरु झाली. ते 45 तास ध्यानधारणा करतील. या 45 तासात ते फक्त नारळ पानी, द्राक्षाचा रस आणि इतर तरल पदार्थ घेतील. या काळात ते ध्यान कक्षातून बाहेर येणार नाहीत. ते 45 तास मौन पाळणार आहेत.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळपासून १ जूनच्या सायंकाळपर्यंत तेथे ध्यान करतील. हे दोन दिवस पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही. गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींनाही तेथे जाण्याची परवानगी नसेल.*
*👉🛑🛑👉1 जूनला ध्यान साधना संपणार*
*पंतप्रधान मोदी आज तामिळनाडूत आले. तामिळनाडूत आल्यावर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात पूजा केली. त्यानंतर ते विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये आले. याच ठिकाणी त्यांनी ध्यान धारणा सुरू केली असून जवळपास दोन दिवस ते ध्यानमग्न अवस्थेत राहणार आहेत. 1 जूनला ते ध्यान साधनेतून बाहेर येतील. इथून निघण्यापूर्वी ते संत तिरुवल्लूवर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतील. तिरुवल्लूवर यांचं स्मारक आणि मूर्त्या या दोन्ही छोट्या बेटांवर उभारण्यात आल्या आहेत.*
*👉🟥👉दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त*
*विवेकानंद रॉक मेमोरिअल समुद्रात आहे. मोदी 45 तास या बेटावर थांबणार असल्याने या ठिकाणी मोठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी 2000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच भारतीय तट रक्षक दल आणि नौदलाचे जवानही तैनात राहणार आहेत. मोदींच्या ध्यान साधनेची माहिती यापूर्वीच भाजप नेत्यांनी दिली होती. 2019च्या निवडणुकीवेळी मोदी केदारनाथ गुहेत ध्यान साधनेला बसले होते.*
*👉🔴🔴👉1 तारखेला शेवटचा टप्पा*
*दरम्यान, देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. येत्या 1 तारखेला लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपत आहे. त्यानंतर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुन्हा देशात भाजपची सत्ता येणार की काँग्रेसला संधी मिळणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
विषय चेतना इंटरनॅशनल स्कूल व चेतना ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुरुवार दिनांक ३०/०५/२०२४ रोजी करिअर मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो योग्य त्यावेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे विद्यार्थी योग्य त्या दिशेने वाटचाल करतात. या कार्यक्रमाच्या वेळी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय उदय देशपांडे ,सचिव विलास भोसले सर, खजिनदार सोमनाथ माने सर ,चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे कॅम्पस इन्चार्ज सुधीर करगळ सर, स्कूल व कॉलेजचे इन्चार्ज प्रिन्सिपल खबाले सर ,फार्मसी इन्चार्ज प्रिन्सिपल प्रियांका पारेकर मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ माने सर व विलास भोसले सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सोमनाथ माने सर यांनी दहावीनंतर मुलांनी कोणती शाखा निवडली पाहिजे हे सांगत असताना विज्ञान (सायन्स )शाखेबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले तसेच डी .फार्म ,बी .फार्म ,बीएससी एम.बी.बी.एस अशा कित्येक कोर्सेस ला सायन्स शाखेतून जाऊ शकतो
तसेच संस्थेचे सचिव विलास भोसले सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणतात की करिअर म्हणजे काय तर आपल्या आवडीचे क्षेत्र आणि हे आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये यश प्राप्त करणे
आई- वडील सांगतात म्हणून एखादं क्षेत्र न निवडता स्वतःला कशाबद्दल आवड आहे हे जाणून घेऊन आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडणे गरजेचे आहे तसेच कॅम्पस इन्चार्ज सुधीर करगळ सर यांनी सुद्धा बहुमोल असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी कॉमर्स या शाखेतून आपलं करिअर कसं घडवावं त्यामध्ये कोणते नोकरीच्या संधी आहेत तसेच स्पर्धा परीक्षा मार्फत एमपीएससी यूपीएससी या स्पर्धा परीक्षे बद्दल सुद्धा मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करगळ सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खबाले सर यांनी केले.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺