Home Blog Page 75

मराठा समाजाचा मोठा विजय!”सगेसोयरे” अधिसूचना काढणार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

img 20240613 wa0030
मुंबई:-‘सगेसोयरे’ अधिसूचनेबाबत राज्य सरकार संवेदनशीलपणे कार्यवाही करत आहे. सरकारने काढलेली अधिसूचना ही ओबीसी समाजाच्या विरोधातील नाही. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना आजही सर्टिफिकेट देता येते. रक्ताच्या नात्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसारच ही अधिसूचना आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन ‘सगेसोयरे’ अधिसूचना काढण्याची अंतिम कार्यवाही पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.*

*👉🛑🛑👉सरकार सकारात्मक कार्यवाही करत असल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करावे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात “सगेसोगरे”बाबतची अंतिम अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे यांची “सगेसोयरे”संदर्भात जी मागणी आहे त्यावर सरकारने पहिली अधिसूचना जारी केलेली आहे. त्यावर सूचना – हरकती मागविल्या आहेत. त्यानुसार तिथे कार्यवाही चालू आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही.*

*👉🔴🔴👉ओबीसी नेत्यांशी चर्चा*

*मी स्वतः ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे. विशेषतः, छगन भुजबळ यांच्यासह अन्य ओबीसी नेत्यांसोबत यापुढेही चर्चा केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने रक्ताच्या नात्यांसंदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत, त्या निकषांत बसणारीच ही अधिसूचना आहे. त्यामुळे याबाबतची अंतिम अधिसूचना निघाली, तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. तशाप्रकारची चर्चा ओबीसी समाजाशीदेखील आम्ही करणार आहोत. त्यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात सर्व ओबीसी नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांना आम्ही पटवून देऊ आणि जेवढ्या लवकरात लवकर हे पूर्ण करता येईल तेवढ्या लवकर ही कार्यवाही पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.*

*👉🅾️🅾️👉मागण्यांबाबत सरकार गंभीर*

*मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत राज्य सरकार गंभीर आहे. सरकार त्यांच्या मागण्यांवर कार्यवाहीदेखील करत आहे, असेही फडणवीस म्हणाले. त्यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातील जाळपोळीव्यतिरिक्तचे दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ते गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही अत्यंत वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार इतक्या वेगाने हे सर्व प्रयत्न करत आहे. त्यामुळे जरांगे यांनीही उपोषण स्थगित केले पाहिजे. मराठा समाजाच्या इतर मागण्यांबाबतही राज्य सरकारने सकारात्मक भूमिकाच घेतली आहे. संवेदनशीलपणे निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.*

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका; पोषण आहारातील आता १५ पाककृती कोणत्या?

राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या १५ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात तीन संरचित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणी सत्व, अंडा पुलाव, तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्याच त्या खिचडीला स्वादिष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे.*

*👉🅾️🅾️👉शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. सद्यस्थितीत तांदूळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहार दिला जात आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी वृध्दिंगत करणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती. राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागांतून उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.*

*👉🟥🟥👉या पार्श्वभूमीवर आहारात वैविध्यता आणून तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्व यांचा समावेश असलेला तीन संरचित आहार (थ्री कोर्स मील) देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, मटार पुलाव, गोड खिचडी मुगडाळ खिचडी चवळी खिचडी, मुग शेवगा वरण भात, तांदळाची खीर, चणा पुलाव, नाचणीचे सत्व, सोयाबीन पुलाव, मोड आलेले कडधान्य या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत.*

*👉🔴🔴👉अंमलबजावणी कशी?*

*निश्चित केलेल्या पाककृती दरदिवशी एक या प्रमाणे बारा दिवस द्यायच्या आहेत. तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्हातील स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरुप पाककृती निश्चित करताना तांदूळ, कडधान्य डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदूळाच्या प्रमाणानुसार कडधान्य, डाळ, तेल, मीठ, मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा. व तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणेच पोषण आहार देणे अनिवार्य आहे. पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदूळापासून तांदळाची खीर, शिल्लक राहणारा भाजीपाला आणि मोड आलेली कडधान्यांची कोशिंबीर हे पदार्थ दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना दररोड आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊट्स) द्यावीत. आठवड्यातील चार दिवस दररोज तांदळाची खीर, एक दिवस नाचणी सत्व नियमित पाककृतीसोबत द्यावी. अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव द्यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ द्यावे. त्या दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व, मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे.*

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ११: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत २५ टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि १ लाख थेट कर्ज योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना या राष्ट्रीयकृत बँका, राज्यस्तरीय बँकर्स समिती सदस्य असलेल्या बँकांसह इतर सहकारी बँका, नागरी बँका, सर्व शेड्युल व मल्टीशेड्युल बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येतात.

राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून २५ टक्के बीज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. बँकांचा सहभाग ७५ टक्के असून व्याजदर बँकाच्या नियमाप्रमाणे लागू राहील. महामंडळाचा सहभाग २५ टक्के रकमेवर व्याजदर ४ टक्के आहे. या योजनेत महत्तम प्रकल्प मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंतची आहे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रमांसाठी, लघू, मध्यम उद्योगांचे उत्पादन व विक्रीसाठी व सेवा क्षेत्रांसाठी कर्ज वितरित करण्यात येते. महत्तम कर्ज मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे कर्ज खात्याची आधार जोडणी असणे अनिवार्य आहे. महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता कर्जाची मर्यादा १० लाख ते ५० लाख रुपयापर्यंत असून या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता नोंदणीकृत गट असावा. गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत. गटातील सदस्याचे वय १८ ते ४५ वर्ष पर्यंत असावे. गटातील लाभार्थीचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील प्रमुख सदस्याने महामंडळाच्या महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. गटातील सर्व लाभार्त्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन क्रिमिलेअरकरिता असलेल्या कौटुंबिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत असावे.

१ लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज योजनेमध्ये महामंडळाकडून १ लाख रूपयाचे थेट कर्ज दिले जाते. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे. लाभार्थ्यांना कोणताही हिस्सा भरावा लागणार नाही. नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल २ हजार ८५ रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यांवर दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ‘बी’ विंग, तळमजला, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, येरवडा पुणे, दूरध्वनी क्र. ०२०-२९७०३०४९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी केले आहे.
0000

वाहनचालकांकडून पैसे घ्याल, तर खंडणीचा गुन्हा होणार दाखल पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय…

img 20240611 wa0020(1)
पुणे:- पोलिसांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. आता पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. कारण नागिकांकडून लाच किंवा चिरीमिरी घेताना आढळल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे पाऊल उचललं आहे.*

*👉🛑🛑👉पुण्यात गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी फक्त गुन्हेगारच नाही, तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर पोलिसांनी आता नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले, तर आता पोलिसांवरच पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. नागरिकांकडून जर विनाकारण पैसे घेताना आढळून आल्यास पोलिसांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.*

*👉🟥🟥👉वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले, तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. या कारवाईकरिता काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. कारण यापूर्वी वाहतूक पोलीस नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते. त्यानंतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु आता थेट अशा कर्मचाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.*

*👉🔴🔴👉हे पोलीस कर्मचारी साध्या नागरी वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का? याची या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. एखादा पोलीस कर्मचारी असा गैर प्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.*

*👉🛑🛑👉पुणे शहरामधील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलेली आहे. वाहतूक पोलिसांवर अनेकदा टीका देखील केली जाते. वाहतूक कोंडी होत असताना अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचारी गाड्या उचलण्यामध्ये किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यामध्ये मग्न असल्याचे दिसतात. अनेकदा चौकात आणि रस्त्यांवर उभे राहण्याऐवजी वाहतूक पोलीस आडबाजूला छुप्या पद्धतीने उभे राहतात. चार-पाच जणांच्या गठ्ठयाने एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते.त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशांची मागणी केली जाते. चिरीमिरी घेऊन वाहन चालकांना सोडून दिले जाते. अनेकदा असेही प्रसंग घडतात की चालककडून पैसे घेतलेत आणि त्याच्यावर दंड ही आकारण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे चिरीमिरी घेण्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत. या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.*

देशभर के अपने किसान भाई-बहनों का जीवन आसान बनाने के लिए हमारी सरकार प्रतिबद्ध है:- नरेन्द्र मोदी

img 20240611 wa0005
देशभर के अपने किसान भाई-बहनों का जीवन आसान बनाने के लिए हमारी सरकार प्रतिबद्ध है। यह मेरे लिए सौभाग्य की बात है कि लगातार तीसरी बार प्रधानमंत्री के रूप में कार्यभार संभालने के बाद पहला काम उनके लिए ही करने का अवसर मिला है। इसके तहत पीएम किसान सम्मान निधि की 17वीं किस्त से जुड़ी फाइल पर हस्ताक्षर किया, जिसका लाभ देश के मेरे 9 करोड़ से ज्यादा अन्नदाताओं को होगा। आने वाले समय में हम किसानों के कल्याण और कृषि क्षेत्र के उत्थान के लिए निरंतर काम करते रहेंगे।

नरेंद्र मोदी 9 जूनला घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, एनडीएच्या बैठकीआधी भाजप नेत्याची माहिती

img 20240605 wa0019
नवी दिल्ली:-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एनडीएतील घटक पक्षांची आज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी नरेंद्र मोदी 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती दिली. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होतील.*

*👉🔴🔴👉संसदेमध्ये एनडीएच्या घटकपक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीला एनडीएचे खासदार उपस्थित आहेत. याच बैठकीत संसदील दलाचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्तावर राजनाथ सिंह यांनी ठेवला. या प्रस्तावाला अमित शहा यांनी अनुमोदन दिले.*

*👉🟥🟥👉नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी एनडीएतील प्रमुख नेत्यांनी मोदी यांच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आंध्र प्रदेशचे नेते तथा टीडीएस पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीदेखील मोदी यांच्या नावाला पाठिंबा दिला.*

देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार; नरेंद्र मोदींकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे संकेत

img 20240605 wa0019
नवी दिल्ली – आमचे विरोधक एकत्र येत इतक्या जागा जिंकू शकल्या नाहीत ज्या भाजपाने एकट्याने जिंकल्या आहेत. मी देशातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना सांगतो, नागरिकांना सांगतो, तुमची मेहनत ही मोदींना निरंतर काम करण्याची प्रेरणा देते. आपण सगळे मिळून पुढे जाऊ, देशाला पुढे घेऊन जाऊ. तिसऱ्या कार्यकाळात देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार आहे. ही मोदींची गॅरंटी आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.*

*👉🟥🟥👉भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मोदी मंगळवारी रात्री उशिरा भाजपाच्या मुख्य कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, मी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे अभिनंदन करतो. प्रत्येकाच्या सक्रीय सहभागाशिवाय ही निवडणूक प्रक्रिया शक्य नाही. या जनादेशाचे अनेक पैलू आहेत. १९६२ नंतर पहिल्यांदाच एखादं सरकार त्यांचा २ कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा पुन्हा आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी विधानसभेचे निकाल लागले तिथे एनडीएला स्पष्ट विजय मिळाला. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम या राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. डिपॉझिट वाचवणंही त्यांना कठीण झालं असा टोला मोदींनी लगावला. तसेच तुमच्या या प्रेमासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. आज पुन्हा एनडीएची सलग तिसऱ्यांदा सरकार बनणं निश्चित आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत. देशवासियांनी भाजपावर,एनडीएवर पूर्ण विश्वास दाखवला. आजचा विजय देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. सबका साथ, सबका विश्वास या मंत्राचा विजय आहे. १४० कोटी जनतेचा विश्वासाचा विजय आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.तसेच ओडिशात लोकसभा निवडणुकीत भाजपानं चांगली कामगिरी केली. तिथे भाजपाचं सरकार बनणार आहे. तिथे पहिल्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री बनणार आहे. भाजपानं केरळातही जागा मिळवली. केरळच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलंय. अनेक पिढ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. अनेक पिढी ज्या क्षणाची वाट पाहिली आज ते यश मिळालं आहे. तेलंगणात आपली संख्या दुप्पट झाली. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाने क्लीन स्वीप मिळवलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.*

*👉🅾️🅾️👉दरम्यान, आंध्र प्रदेशात चंदाबाबू नायडू आणि बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली. १० वर्षापूर्वी देशात बदल हवा होता म्हणून जनतेनं आपल्याला कौल दिला. त्यावेळी देशात नैराश्य होतं. अशावेळी देशानं आपल्याला जबाबदारी दिली होती. आपण पूर्ण प्रामाणिकपणे काम केले, २०१९ ला याच प्रयत्नांवर विश्वास ठेवत देशाने पुन्हा दुसऱ्यांदा बहुमत दिले. २०२४ ला पुन्हा जो आशीर्वाद एनडीएला मिळाला आहे. त्याबद्दल जनतेसमोर मी विनम्रतेने नतमस्तक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.*

*👉🟥🟥👉आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक*

*आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक करणारा आहे. माझी आई गेल्यानंतर ही माझी पहिलीच निवडणूक होती. परंतु देशातील कोट्यवधी माता भगिनींनी आईची कमी मला भासवून दिले नाही. या आपलेपणाला मी शब्दात मांडू शकत नाही. देशातील माता भगिनींनी मला नवीन प्रेरणा दिली. मागील १० वर्षात देशाने खूप मोठे निर्णय घेतले. राष्ट्र प्रथमची भावना आम्हाला असामान्य काम करण्याची प्रेरणा देते. जगातील सर्वात मोठ्या जनकल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. १२ कोटी जनतेला नल से जल दिलं. ४ कोटी गरिबांना पक्की घरे दिली. ८० कोटी जनतेला मोफत रेशन दिले. याच भावनेतून जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवलं. आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. कोरोनाचं संकट आलं तेव्हा देशहित आणि जनहिताचे निर्णय आम्ही घेतले. आज भारत जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. राष्ट्र प्रथमची भावना भारताला आत्मनिर्भर बनवणार आहे. विकसित भारताचा संकल्प आमचा आहे. १० वर्षानंतर सलग तिसऱ्यांदा जनतेचा आशीर्वाद आपल्याला ताकद देतोय. संकल्पाला नवीन ऊर्जा देते असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.*

*👉🔴🔴👉निवडणूक आयोगाचे मानले आभार*

*मी देशाच्या निवडणूक आयोगाचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी निवडणूक कुशलतेने संपन्न केली. ११ लाख मतदान केंद्र, १.५ कोटी निवडणूक कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम मशिन, इतक्या उन्हाळ्यातही निवडणूक आयोगाने त्यांची जबाबदारी सांभाळली. भारताची निवडणूक प्रक्रिया, पूर्ण सिस्टम आणि निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कामावर भारतीयांना गर्व आहे असं म्हणत मोदींनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.*

error: Content is protected !!