चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड जुनियर कॉलेज सरडेवाडी येथे जागतिक योगा दिन उत्साहात साजरा
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आज चेतना इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज सरडेवाडी ,तालुका इंदापूर जिल्हा पुणे या शाळेवरती आज दिनांक 21/6/ 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पतंजली योग समिती इंदापूर तहसील प्रभारी मल्हारी घाडगे सर व पतंजली योग समिती युवा प्रभारी विलास चोपडे त्याचप्रमाणे चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय उदय देशपांडे, सर सचिव विलास भोसले, सर खजिनदार सोमनाथ माने सर ,स्कूल प्रिन्सिपल निकिता माने मॅडम ,कॅम्पस इन्चार्ज सुधीर करगळ सर उपस्थित होते.
पतंजली योग समितीच्या शिक्षकांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली
पतंजली योग समिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग प्राणायामाचे प्रात्यक्षिते दाखवून संगीताच्या तालावर योग प्राणायाम करून घेतला. त्याच प्रकारे मल्हारी घाडगे सर यांनी लहान मुलांची वैचारिक व शारीरिक तसेच मानसिक क्षमता वाढ होण्यासाठी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी योग किती महत्त्वपूर्ण आहे व ही समाजाची व देशाची गरज आहे हे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्राचार्य निकिता माने मॅडम यांनी उपस्थितांचा येथोचित सन्मान केला. व सुधीर करगळ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये चेतना फाउंडेशन मध्ये अंतर राष्ट्रीय योगा दिन अति उत्सवात साजरा करण्यात आला दीप प्रज्वलन व धन्वंतरी प्रतिमा पूजन करण्यात आले धन्वंतरी मातेच्या फोटोचे पूजन पतंजली योग समिती इंदापूर तहसील प्रभारी मल्हारी घाडगे व पतंजली योग समिती युवा प्रभरी विलास चोपडे यांनी केले यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष मा.उदय देशपांडे सर, सचिव विलास भोसले सर, खजिनदार सोमनाथ माने सर उपस्थित होते, लहान लहान मुलांची वैचारिक व शारीरिक वाढ होण्यासाठी योगाची किती गरज आहे ही गरज देशासाठी व समाजासाठी किती महत्त्वाचे आहे असे विचार योगशिक्षक घाडगे सर यांनी मांडले,कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पालकांची उपस्थिती राहिली त्याच प्रकारे चेतना फाउंडेशन मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्कूलचे कॅम्पस इन्चार्ज सुधीर करगळ सर,पाटील मॅडम, मोरे मॅडम ,चव्हाण मॅडम ,पुनम सरडे ,स्नेहल सरडे प्रांजली सुतार, देवकर सर या सर्वांनी शाळेच्या राष्ट्रीय योग दिनाचा आनंद द्विगुणीत केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅम्पस इन्चार्ज करगळ सर यांनी केले.

पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये चेतना फाउंडेशन मध्ये आज शाळेचा पहिला
दिवसाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आला. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष मा.उदय देशपांडे सर, सचिव विलास भोसले सर, खजिनदार सोमनाथ माने सर उपस्थित होते .पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्टूनच्या वेशभूषेत असणाऱ्या कलाकारांनी लहान मुलांची मने आकर्षित केली. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पालकांची उपस्थिती राहिली त्याच प्रकारे चेतना इंटरनॅशनल स्कूलचे कॅम्पस इन्चार्ज सुधीर करगळ सर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणीत केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करगळ सर यांनी केले.सर्व मुलांना बिस्किट व चॉकलेट वाटप करण्यात आले.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
पुणे दि. १४: आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे,संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा.
इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे. पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावरील कायमस्वरुपी सुविधेच्यादृष्टेने विभागीय आयुक्तांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन- प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. शासनाचे सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सुरक्षा आणि अन्य व्यवस्था देण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना देण्यात येतील. वारी दरम्यान दुर्घटना घडल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल, असेही श्री.पवार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने ठेवण्यात आले आहेत. रस्त्याची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आषाढी वारीसाठी ॲप आणि प्रशासनातर्फे संपर्क पुस्तिका तयार करण्यात येईल. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली.
यावेळी लोकप्रतिनिधींनी पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना केल्या. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते पालखी सोहळ्यादरम्यान करण्यात येणाऱ्या शौचालय सुविधांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
*पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात*
जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतायरीची माहिती दिली. पालखी सोहळ्यासाठी ३ हजारपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ८००, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार २०० आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २५० शौचालयांची सुविधा करण्यात येणार आहे.
आषाढी वारीसाठी २०० पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली असून ४५ ठिकाणी पाणी भरण्याची सुविधा असणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. ११५ आरोग्य पथके, ५७ फिरते वैद्यकीय पथक आणि १७९ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे. १२ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येईल.
अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. मोबाईल टॉवरची नेटवर्क फ्रिक्वेंसी वाढविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
*सातारा जिल्ह्यातील नियोजन*
अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सातारा जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. दत्त घाटाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल. पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. लोणंद पालखी तळावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. येथे २५ फिरते आरोग्यदूत आणि ८ आरोग्य पथके असतील.
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि वाहतूक नियोजनाबाबत व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
*सोलापूर जिल्ह्यातील नियोजन*
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा, नियुक्त करण्यात आलेले आरोग्यदूत, घटना प्रतिसाद प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार दर्शन बारीमधील प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली व लिंबू पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मल वारीच्यादृष्टीने सर्व नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा, श्री संत निळोबाराय संस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते
पुणे, दि. १४ : अग्निवीर जनरल ड्युटी (अग्निवीर जीडी), अग्निवीर ट्रेड्समन आणि अग्निवीर लिपिक (अग्निवीर कार्यालय सहाय्यक) या पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन १ ते ४ जुलै या कालावधीत सिग्नल प्रशिक्षण केंद्र जबलपूर येथे युनिट हेडक्वार्टर कोटा (यूएचक्यू ) अंतर्गत आयोजन करण्यात आले आहे.
या भरती मेळाव्यात सर्व श्रेणीतील युद्ध विधवांची मुले, सेवेतील सैनिक, माजी सैनिकांचा मुलगा आणि लढाईतील जखमी तसेच क्रमांक १ सिग्नल प्रशिक्षण केंद्राचे माजी सैनिक, सेवेतील सैनिक, कर्मचाऱ्यांचे कायदेशीर दत्तक पुत्र, सख्खे भाऊ, मुलगा, वास्तविक भाऊ, युद्धातील अपघातग्रस्त, इतर रजिमेंटच्या आजी, माजी सैनिकांचे कायदेशीर दत्तकपुत्र आणि उत्कृष्ट खेळाडू यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेप्टनंट हंगे स. दै. (नि.) यांनी दिली आहे.

पुणे, दि. १३: जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे.
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्या नियम ९६ मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी वा व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांची वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे.
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०, प्राण्यांच्या वाहतूकीचे नियम १९७८ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी कळवले आहे.