Home Blog Page 73

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार

img 20240630 wa0010(1)
भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी*

*👉🟥🟥👉महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीची मुख्यमंत्र्यांकडून ओवाळणी*

*मुंबई दि.२९ :- राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना अनोखी ओवाळणी दिली.*

*👉🔴🔴👉विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पात राज्यातील महिला- भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा शासन निर्णय देखील तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या 1 जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहुन जास्त महिलांना होणार आहे.*

*👉🅾️🅾️👉महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा, 10 हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे, राज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

img 20240628 wa0034
मुंबई, दि. २९:-राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले.*

*👉🅾️🅾️👉यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.*

*👉🟣🟣👉आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल.असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.*

*👉🅾️🅾️👉यावेळी झालेल्या चर्चेत सर्दस्य सर्वश्री राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.*

शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडाप्रबोधिनी मध्ये २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रीया सुरू

पुणे दि. २८- महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार आणि अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत असलेल्या ९ क्रीडाप्रबोधिनीत सरळप्रवेश (५० टक्के) व कौशल्य चाचणी (५० टक्के) प्रक्रियेअंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत.

राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद,गडचिरोली अशा ९ ठिकाणच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. ज्यूदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबलटेनिस, वेटलिप्टींग, ट्रायथलॉन, सायकलिंग आणि बॉक्सींग अशा १७ क्रीडाप्रकारात प्रशिक्षण देण्यात येईल.

सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले १९ वर्षाआतील खेळाडूंची तज्ज्ञ समितीसमोर संबंधित खेळाबाबतची चाचणी घेवून प्रवेश निश्चित केला जातो.

खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रक्रीयेअंतगर्त क्रीडा प्रबोधिनीत असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी १९ वर्षाआतील खेळाडूंसाठी संबंधित खेळाच्या कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. क्रीडा चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिकदृष्टया सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते.

पात्र खेळाडूंनी ५ जुलै २०२४ रोजी पूर्वी आपला प्रवेश विनंती अर्ज आवश्यक प्रमाणपत्र जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांचेकडे द्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव ₹कसगावडे यांनी केले आहे.

महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

img 20240628 wa0034
मुंबई दिनांक २८: राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हा महाराष्ट्राच्या विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२४- २५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.फेब्रुवारीत वित्तमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील महिला, बेरोजगार युवक-युवती यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलीना व्यावसायिक शिक्षण मोफत, पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प, शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण वीज माफी देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण, एकूणच दुर्बल घटकाचे दारिद्रय नाहीसे करण्यासाठी केलेला निश्चय यामुळे हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. विशेषत: महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण यामुळे राज्य शासनाने महिलांप्रती बांधिलकी व्यक्त केली आहे.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहे हेही या अर्थसंकल्पातून दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की “गाव तेथे गोदाम” या नवीन योजनेमुळे धान्य साठवणुकीचा प्रश्न निकाली निघेल. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार अर्थसहाय, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम, मागेल त्याला सौर उर्जा पंप या योजना देखील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणतील.

जागतिक वारसा नामांकनासाठी पंढरपूर वारी, कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठविण्याचा तसेच रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचा घेतलेला निर्णयही महत्वाचा आणि आपल्या संस्कृती व इतिहासाला जपण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी २० हजार रूपये, “निर्मल वारी” साठी निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू- आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार करण्याची केलेली घोषणा म्हणजे आमची वारकरी संप्रदायाप्रती भक्तिभावाचे उदाहरण आहे, त्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्राधान्य क्षेत्रात आणि हरित हायड्रोजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याने गुंतवणुकीबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना प्रशिक्षण मिळणार आहे. तंत्रशिक्षण संस्थांमध्ये “सेंटर ऑफ एक्सलन्स” स्थापन करण्यात येणार असल्याने त्याचाही युवा वर्गाला मोठा फायदा होईल.

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत अर्थसहाय्य वाढविणे, विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर घरकुले बांधण्यासाठी तरतूद करणे, दिव्यांग व्यक्तींसाठी “धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना यामुळे दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी राज्य शासनाने खंबीर पाऊले टाकली असल्याचे स्पष्ट होते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण ४४९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत २३ हजार किमी रस्त्यांची कामे, महापालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविणे, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेत ग्रामपंचायत कार्यालये बांधणे व इतरही प्रमुख पायाभूत्त सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असल्याने राज्याचा झपाट्याने विकास होईल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा;
*👉🔴🔴👉राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १ हजार ५०० रूपये मिळणार*

*मुंबई:- राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये सरकारचा २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीच्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने या अर्थसंकल्पामधून अनेक लोकानुनयी योजनांची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही घोषणा केल्या जातील, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार आज अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील २१ ते ६० वयोगटामधील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत.*

*👉🟥🟥👉अर्थसंकल्पामधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचा केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थाजन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढत आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या आणि कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध परीक्षांमधून मुलींची आघाडी दिसून येत आहे. अशा आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासह सर्वांगिण विकासासाठी या योजनेंतर्गत २१ ते ६० वयोगटामधील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये प्रदान केले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.*

*👉🔴🔴👉सरकारने २०२३-२४ पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एक लाख रुपये देण्यात येतात. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाता १ एप्रिल २०२३ आणि त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीला हे अर्थसहाय्य करण्यात येतं. याबरोबरच १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचं नाव शासकीय कागदपत्रांमध्ये प्रथम त्याचं नाव, नंतर आईचं नाव, मग वडिलांचं नाव आणि अखेर आडनाव या पद्धतीने करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांच्या स्वयंरोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १७ शहरांमध्ये १० हजार महिलांना अर्थसहाय्य करण्यात येईल, यासाठी ८० कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन

img 20240627 wa0000
अपहरण झालेल्या १३ वर्षीय मुलाची पोलीसांनी केली सुखरुप सुटका;*

*👉🅾️🅾️👉आरोपींना केले जेरबंद*

*जालना:- जालना शहरातील १३ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा ११ तासांचा थरार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोनमुळे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे. तर पोलीसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.*

*👉🔴🔴👉शहरातील १३ वर्षीय मुलाचं शाळेत जाताना काही अज्ञातांनी रस्त्यातून अपहरण केले आणि त्यानंतर २ तासांनी अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली.नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत शिकणाऱ्या श्रीहरी कृष्णा मुजमुलेचं सकाळी शाळेत जाताना अपहरण झालं. श्रीहरी जिवंत हवा असेल तर ५ कोटी तयार ठेव, पोलिसांना कळवलं तर मुलाचा जीव घेऊ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी कॉल करून मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना दिली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत कृष्णा यांनी आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना फोन करून संबंधित घटना सांगितली. त्यानंतर शेटे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोनवरून हा प्रकार सांगितला.फडणवीसांनीही तात्काळ दखल घेत जालना पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या.*

*👉🔴🔴👉फडणवीसांच्या फोनमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात पोलीस पथकांनी तपासाला सुरुवात केली. मुलाचे वडील कृष्णा यांना अपहरणकर्त्यांचा फोन येत होता. हा ट्रेस करण्यात आला. ५ कोटी इतकी मोठी रक्कम देणं शक्य नाही, २० लाख देतो असं मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि फोनद्वारे तपासाची चक्रे फिरवली. रात्रीच्या आठच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम घेऊन मुलाच्या वडिलांना बोलावले. त्याठिकाणी आधीच पोलिसांनी सापळा रचून ठेवला होता. या थरारक ऑपरेशनची भनक जर अपहरणकर्त्यांना लागली असती तर मुलाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.*

*👉🟥🟥👉रात्री ८ च्या सुमारास २० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी मुलाचे वडील पोहचले. पोलीस या भेटीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. यावेळी २ पथके तयार करण्यात आली. त्यातील एक पथक मुलाच्या सुरक्षेसाठी तर दुसरं पथक अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी होतं. दोन्ही पथकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी आरोपींची गाडी आली त्यातून २ आरोपी खाली उतरले त्यांनी मुलाच्या वडिलांकडील पैशांची बॅग घेतली तर तिसरा आरोपी गाडीत श्रीहरीला घेऊन बसला होता. पोलिसांच्या एका पथकाने पैसै घेणाऱ्या २ आरोपींना पकडले तर दुसऱ्या पथकाने गाडीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या अशाप्रकारे श्रीहरीची अपहरणातून सुखरुप सुटका करण्यात आली.*

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा संपन्न

img 20240625 wa0012
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा संपन्न

उच्चशिक्षितांनी नवोन्मेषक, उद्योजक, व्यावसायिक नेतृत्व व्हावे- राज्यपाल

पुणे, दि. २५: उच्चशिक्षित, पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नवोन्मेषक, उद्योजक, व्यावसायिक नेतृत्व आणि स्टार्टअप निर्माते बनावे. तसेच गरिबी, वंचितता, युद्ध, अस्थिरता आदी इतर कारणांमुळे समाजाच्या परीघावर जगणाऱ्यांचा विचार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पदवीप्रदान सोहळ्यात श्री. बैस बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे अध्यक्ष आणि संस्थापक तसेच सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका तथा विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष बेबुकर सेक्का आदी उपस्थित होते.

स्नातकांनी नोकरी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे बनावे असा संदेश देतानाच राज्यपाल पुढे म्हणाले, आपल्या देशातील गरिबी आणि असमानता दूर करण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या आणि आपल्या संस्थांद्वारे काय चांगले करू शकतो याचा विचार केला पाहिजे. स्नातकांनी जनसेवेच्या क्षेत्रात सामील होण्याचाही विचार करावा. सार्वजनिक सेवेच्या माध्यमातून समाजासाठी, आपल्या माणसांसाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी एक चांगले जग घडवण्यासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

सिम्बायोसिस ही देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून उदयास आली असून येथे जगभरातील अनेक देशांचे विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याने ही ‘वसुधैव कुटुंबकम’चे उत्कृष्ट उदाहरण आहे. मोठ्या संख्येने महिला पदवीधर पाहून येत्या काही वर्षात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या आणखी वाढेल अशी आशा श्री.बैस यांनी व्यक्त केली.

श्री. बैस पुढे म्हणाले, तीस वर्षांपूर्वीनंतर पुणे हे माहिती तंत्रज्ञान शहर बनल्याने आज हे हजारो नोकऱ्या निर्माण करणारे आयटी हब बनले आहे. त्यामुळे स्नातकांनी नवीन कौशल्ये आणि हस्तांतरणीय क्षमता शिकणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळे अनेक नोकऱ्या कालबाह्य होऊ शकत असल्या तरी नोकरीच्या अनेक नवीन संधीदेखील निर्माण करत आहे. आज या क्षेत्राशी परिचित असलेल्या पदवीधरांना नोकऱ्यांमध्ये नक्कीच एक अतिरिक्त फायदा होईल.

आपण केवळ कोणत्याही देशाचे नागरिक नसून जगाचे नागरिक आहात. जागतिक नागरिक या नात्याने जगासमोरील समस्यांची जाणीव असायला हवी. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल हा आता केवळ शैक्षणिक चर्चेचा विषय राहिलेला नाही. भीषण दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटा पाहत आहोत. येत्या काही दशकांमध्ये हवामान बदल आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आपल्या समाज आणि पर्यावरणासमोर आव्हाने निर्माण होऊ शकतात. पर्यावरण आणि पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी आपली भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

सिम्बायोसिससारख्या विद्यापीठामुळे जागतिक अनुभव मिळतो. येथे ज्ञान, अंतर्दृष्टी आणि कौशल्ये मिळवण्याव्यतिरिक्त, आपण सांस्कृतिक विविधतेने भरलेल्या चांगल्या वातावरणातदेखील रहाता. हे वातावरण आपला दृष्टीकोन विस्तारण्यासह उदार व्यक्ती बनवते, असेही श्री.बैस म्हणाले.

डॉ. मुजुमदार म्हणाले, स्नातकांनी पदवी प्राप्त करुन आपल्या देशात परतत असताना महात्मा गांधींच्या, गौतम बुद्धाच्या या देशाला आठवणीत ठेवावे. तसेच पुण्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलेल्या ऐतिहासिक शहराची आठवण ठेवावी. या देशातील ‘वसुधैव कुटुंबकम्’ चे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिम्बायोसिस संस्थेशी आठवणीच्या रुपाने कायम जोडले जावे. या देशाने आपल्या व्यक्तीमत्वाला आकार दिला आहे. जगाला आपल्या संस्कृतीचे मूल्य समजण्याचा काळ आला आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. येरवडेकर म्हणाल्या, या विद्यापीठात आफ्रीकन- आशियाई देशातील विद्यार्थी शिकत असल्याने त्यांच्या पदवीनंतर त्यांच्या देशात मोठा मान मिळतो. या विद्यार्थ्यांना येथील शिक्षणाबरोबरच भारतातील विद्यार्थ्यांनाही बहुविधतेचा, विविध देशातील संस्कृती समजून घेण्यात होतो. ते जागतिक नागरिक, जागतिक राजदूत बनतात. यावर्षी दुबईमध्ये सिम्बायोसिसचे कॅम्पस सुरू होत असल्याचेही त्या म्हणाल्या.

डॉ. रमण आणि श्री. बेबुकर सेक्का यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

पदवी प्रदान सोहळ्यात २६ विविध देशातील ८५ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. या सोहळ्याच्या निमित्ताने स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या देशाचे ध्वज राज्यपाल यांच्याकडे प्रदान करून एकत्रित केले.

कार्यक्रमाला सिम्बायोसिस विविध शैक्षणिक संस्थांचे अधिष्ठाता, संचालक आणि प्रमुख, विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी उपस्थित होते.

img 20240625 wa0011

आम्‍ही पहिल्‍यापेक्षा तीनपट अधिक मेहनत करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी

img 20240625 wa0001
नवी दिल्ली:- आजपासून १८ व्या लोकसभेला सुरुवात होत आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. ही निवडणूकही खूप महत्त्वाची ठरली कारण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा लोकसभेत देशाने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.*

*👉🔴🔴👉आम्‍ही यापुढेही पहिल्‍यापेक्षा तीनपट अधिक मेहनत करणार असल्‍याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नव्या संसद भवनात पहिल्‍यांदाच शपथविधी सोहळा होत असल्‍याचे सांगत त्‍यांनी नव्या खासदारांना शुभेच्छा दिल्‍या. संसदीय अधिवेशनाआधी संसद भवन परिसरातून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ व्या लोकसभेत युवा खासदारांची संख्या अधिक असल्‍याचे सांगितले. देश चालवण्यासाठी सहमती अत्‍यंत गरजेची होती.*

*👉🟥🟥👉तिसऱ्यांदा एकाच सरकारला सेवा करण्याची संधी जनतेने दिल्‍यांचे सांगत, आम्‍ही सर्वांना एकत्र घेउन पुढे जाण्यासाठी ईच्छुक असल्‍याचे ते म्‍हणाले.पुढे बोलताना त्‍यांनी उद्‍या आणीबाणीच्या काळ्या आठवणींना ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. २५ जून हा कधीच न विसरणारा दिवस आहे. देशाला एका चांगल्‍या विरोधी पक्षाची आवश्यकता असल्‍याची भावनाही त्‍यांनी यावेळी व्यक्‍त केली. विकसित भारताचं स्‍वप्न पूर्ण करणं हेच सर्वांचं कर्तव्य आहे. जनतेचा विश्वास आणखीन मजबूत करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रत्‍येक पाउल आपल्‍याला लोकहितासाठी उचलायचा असल्‍याचं त्‍यांनी सांगितले.*

ISRO ची पुन्हा चमकदार कामगिरी! आरएलव्ही पुष्पक यानाचे सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्याचे मिळवले यश!!

ISRO ची पुन्हा चमकदार कामगिरी!
आरएलव्ही पुष्पक यानाचे सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्याचे मिळवले यश!!

*चित्रदुर्ग – ISRO ने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय अंतराळ संस्थेने RLV पुष्पक यानाचे यशस्वीपणे लँडिंग करण्यात यश मिळवले आहे. ISRO ने रविवारी २३ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पुन्हा वापरता येणारे लॉन्च व्हेईकल (RLV) च्या लँडिंगच्या प्रयोगात यश मिळवले आहे. यापूर्वी २२ मार्च रोजी इस्रोने या यानचे दुसरे यशस्वी लँडिंग केले होते. रविवारी पुन्हा या बाबत यश मिळवल्यावर इस्रोने सांगितले की लँडिंगसाठी अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु आव्हानात्मक परिस्थितीत जोरदार वाऱ्याच्या दरम्यान यानाचे स्वयंचलित लँडिंग करण्यात आले.*

*👉☄️☄️👉मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूपासून सुमारे २२० किमी अंतरावर असलेल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लाकेरे येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे सकाळी ७.१० वाजता इस्रोकडून आरएलव्ही पुष्पक विमानाची चाचणी घेण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने हे विमान ४.५ किमी उंचीवर नेले आणि तेथून सोडण्यात आले. यानंतर हे यान स्वयंचलितरित्या धावपट्टीवर उतरण्यात आले.*

*👉🟣🟣👉काय आहे आरएलव्ही प्रकल्प?*

*इस्रोचा RLV प्रकल्प हा एक महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या यांनाद्वारे अंतराळात भारतीय अंतराळ वीरांना पाठवण्यास मदत मिळणार आहे. भारताच्या अंतराळ विषयक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे मिशन अत्यंत महत्त्वाचे आहे. RLV-LEX-03 चा उद्देश वाहनाची कार्यक्षमता, मार्गदर्शन आणि लँडिंग क्षमता सुधारणे आहे. आरएलव्ही विकसित करणाऱ्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक एस उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितले की, दुसऱ्या लँडिंगच्या तुलनेत आरएलव्ही-एलईएक्स ३ अधिक आव्हानात्मक राहिले कारण त्याची चाचणी यावेळी ५०० मीटर उंचीवरुन करण्यात आली.*

*👉🅾️🅾️👉लँडिंगनंतर इस्रोने सांगितले की, RLV-LEX-०३ चे स्वयंचलित लँडिंग सुरू असतांना जोरदार वारे वाहू लागले होते. यामुळे ही चाचणी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत करण्यात आली. आरएलव्ही ‘पुष्पक’ वाहन भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून ४.५ किमी उंचीवरुन सोडण्यात आले. इस्रोने सांगितले की, “लिफ्ट-टू-ड्रॅग रेशो कमी असल्यामुळे लँडिंगचा वेग ३२० किमी प्रतितास पेक्षा जास्त होता. व्यावसायिक विमानाचा लँडिंगचा वेग ताशी २६० किमी होता. यावरून याचा अंदाज लावता येतो. तर लढाऊ विमानाचा लँडिंगचा वेग ताशी २८० च्या सुमारास होता.*

ISRO ची पुन्हा चमकदार कामगिरी! आरएलव्ही पुष्पक यानाचे सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्याचे मिळवले यश!!

ISRO ची पुन्हा चमकदार कामगिरी!
आरएलव्ही पुष्पक यानाचे सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्याचे मिळवले यश!!

*चित्रदुर्ग – ISRO ने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय अंतराळ संस्थेने RLV पुष्पक यानाचे यशस्वीपणे लँडिंग करण्यात यश मिळवले आहे. ISRO ने रविवारी २३ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पुन्हा वापरता येणारे लॉन्च व्हेईकल (RLV) च्या लँडिंगच्या प्रयोगात यश मिळवले आहे. यापूर्वी २२ मार्च रोजी इस्रोने या यानचे दुसरे यशस्वी लँडिंग केले होते. रविवारी पुन्हा या बाबत यश मिळवल्यावर इस्रोने सांगितले की लँडिंगसाठी अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु आव्हानात्मक परिस्थितीत जोरदार वाऱ्याच्या दरम्यान यानाचे स्वयंचलित लँडिंग करण्यात आले.*

*👉☄️☄️👉मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूपासून सुमारे २२० किमी अंतरावर असलेल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लाकेरे येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे सकाळी ७.१० वाजता इस्रोकडून आरएलव्ही पुष्पक विमानाची चाचणी घेण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने हे विमान ४.५ किमी उंचीवर नेले आणि तेथून सोडण्यात आले. यानंतर हे यान स्वयंचलितरित्या धावपट्टीवर उतरण्यात आले.*

*👉🟣🟣👉काय आहे आरएलव्ही प्रकल्प?*

*इस्रोचा RLV प्रकल्प हा एक महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या यांनाद्वारे अंतराळात भारतीय अंतराळ वीरांना पाठवण्यास मदत मिळणार आहे. भारताच्या अंतराळ विषयक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे मिशन अत्यंत महत्त्वाचे आहे. RLV-LEX-03 चा उद्देश वाहनाची कार्यक्षमता, मार्गदर्शन आणि लँडिंग क्षमता सुधारणे आहे. आरएलव्ही विकसित करणाऱ्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक एस उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितले की, दुसऱ्या लँडिंगच्या तुलनेत आरएलव्ही-एलईएक्स ३ अधिक आव्हानात्मक राहिले कारण त्याची चाचणी यावेळी ५०० मीटर उंचीवरुन करण्यात आली.*

*👉🅾️🅾️👉लँडिंगनंतर इस्रोने सांगितले की, RLV-LEX-०३ चे स्वयंचलित लँडिंग सुरू असतांना जोरदार वारे वाहू लागले होते. यामुळे ही चाचणी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत करण्यात आली. आरएलव्ही ‘पुष्पक’ वाहन भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून ४.५ किमी उंचीवरुन सोडण्यात आले. इस्रोने सांगितले की, “लिफ्ट-टू-ड्रॅग रेशो कमी असल्यामुळे लँडिंगचा वेग ३२० किमी प्रतितास पेक्षा जास्त होता. व्यावसायिक विमानाचा लँडिंगचा वेग ताशी २६० किमी होता. यावरून याचा अंदाज लावता येतो. तर लढाऊ विमानाचा लँडिंगचा वेग ताशी २८० च्या सुमारास होता.*

error: Content is protected !!