Home Blog Page 71

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शाळांजवळ 500 मीटरच्या परिघात ‘कॅफिनयुक्त’ एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर घालण्यात येणार बंदी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!
शाळांजवळ 500 मीटरच्या परिघात ‘कॅफिनयुक्त’ एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर घालण्यात येणार बंदी

*मुंबई – महाराष्ट्र सरकार कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्स संदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. राज्यातील शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफिन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करणार आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.*

*👉🅾️🅾️👉राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मरावबाबा आत्राम यांनी हे आश्वासन दिले.*

*👉🔴🔴👉MFDA लवकरच राज्यातील शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफीन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करेल. सध्याच्या नियमांनुसार, एक लिटर कार्बोनेटेड किंवा नॉन-कार्बोनेटेड पेयांमध्ये 145 मिली आणि 300 मिली दरम्यान कॅफिनचे प्रमाण अनुमत आहे, असं आत्राम यांनी सांगितलं.*

*👉🅾️🅾️👉कौन्सिलच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी आत्राम यांना बंदी घालण्यात येणाऱ्या पेयांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरातील MFDA अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.*

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई करणार

– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १२ : शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात राज्यातील विद्यार्थिंनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, मुंबई विद्यापीठाचे निबंधक श्री. गायकवाड, एसएनडीटी विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यापैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क घेण्यात येऊ नयेत.

जर विद्यापीठ, महाविद्यालय यांनी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क घेतले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना बैठकीमध्ये दिल्या.

परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

पुणे, दि. १२ : पंधरा वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याची घोषणा शासनाने दिली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.

विलंब शुल्क माफ करणे / विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन धारकांच्या संघटना यांच्याकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. शासनाने या निवेदनांचा व मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली व त्यास अनुसरुन विधानसभा सभागृहात निवेदनाद्वारे १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५० एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.

सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण करुन घ्यावे, असेही श्रीमती गायकवाड यांनी कळविले आहे.
००००

आता फक्त वर्षातून २ इंजेक्शनने बरा होणार एड्स? दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये एचआयव्ही संसर्ग बरा करणारी चाचणी यशस्वी; शास्त्रज्ञांचा दावा

आता फक्त वर्षातून २ इंजेक्शनने बरा होणार एड्स?
दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये एचआयव्ही संसर्ग बरा करणारी चाचणी यशस्वी; शास्त्रज्ञांचा दावा

*केपटाऊन:-एचआयव्हीची लागण होणे म्हणजे आयुष्याचा शेवट झाल्यासारखे अनेक रुग्णांना वाटते. मात्र आता एका चाचणीनंतर नवी आशा निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये नवीन अँटिव्हायरल औषधाचे वर्षातून दोन वेळा इंजेक्शन घेतल्याने महिलांमधील एचआयव्ही पूर्णपणे बरा झाल्याचे समोर आले आहे. ‘लेनकापावीर’ असे या औषधाचे नाव असून, ते लवकरच कमी दरात बाजारात येणार आहे. दररोज घेतलेल्या इतर दोन औषधी गोळ्यांपेक्षा ते अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.*

*👉🟥🟥👉जगभरातील एचआयव्ही आणि एड्स ग्रस्तांसाठी ही सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आहे. एचआयव्ही संसर्ग बरा करणाऱ्या इंजेक्शनची यशस्वी चाचणी झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या इंजेक्शनचे दोन डोस वर्षभरात घ्यावे लागतील. यानंतर एड्सचेही उच्चाटन होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये मोठ्या प्रमाणावर केलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे दिसून आले आहे की वर्षातून दोनदा नवीन प्रतिबंधात्मक औषधाचे इंजेक्शन तरुण महिलांना एचआयव्ही संसर्गापासून पूर्ण संरक्षण देते. दर सहा महिन्यांनी ‘लेन्कापाविर’चे इंजेक्शन इतर दोन औषधांपेक्षा (दररोज घेतल्या जाणाऱ्या गोळ्या) एचआयव्ही संसर्गापासून चांगले संरक्षण देते का? हे शोधण्याचा प्रयत्न या चाचणीत करण्यात आला. तिन्ही औषधे ‘प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस’ औषधे आहेत.युगांडामधील तीन ठिकाणी आणि दक्षिण आफ्रिकेतील 25 ठिकाणी 5,000 सहभागींसह ‘उद्देश 1’ चाचणीमध्ये लेन्कापावीर आणि इतर दोन औषधांच्या परिणामकारकतेची चाचणी घेण्यात आली.*

*👉🔴🔴👉लेन्कापावीर (लेन एलए) इंजेक्शनची 5 हजार लोकांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. लेन्कापावीर एचआयव्ही कॅप्सिडमध्ये प्रवेश करते. कॅप्सिड हे प्रथिन कवच आहे जे एचआयव्हीच्या अनुवांशिक सामग्रीचे आणि प्रतिकृतीसाठी आवश्यक एन्झाईम्सचे संरक्षण करते. हे दर सहा महिन्यांनी एकदा त्वचेवर लागू केले जाते. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत, तरुण स्त्रियांना एचआयव्ही संसर्गाचा सर्वाधिक त्रास होतो. अनेक सामाजिक आणि संरचनात्मक कारणांमुळे, त्यांना दैनंदिन प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस पथ्ये पाळणे आव्हानात्मक वाटते. चाचणीच्या यादृच्छिक टप्प्यात लेन्कापावीर प्राप्त झालेल्या 2,134 महिलांपैकी एकही एचआयव्ही बाधित झाला नाही. हे इंजेक्शन 100 टक्के कार्यक्षमता असल्याचे सिद्ध झाले. या चाचणीला यश आल्याने आता एचआयव्ही नष्ट होण्याची आशा निर्माण झाली आहे.*

झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ;
मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

*रांची:-झारखंडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे.*

*👉🔴🔴👉हेमंत सोरेन यांना काही महिन्यांपूर्वी मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, नुकताच कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली आहे. हेमंत सोरेन हे तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आसल्याचे समजते. तसे झाले तर ते झारखंडचे तेरावे मुख्यमंत्री असतील. १५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारचे विभाजन करून झारखंड या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली होती.*

*👉🅾️🅾️👉दरम्यान, आज मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हेमंत सोरेन यांची विधानसभेतील आमदारांच्या दलाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. हेमंत सोरेन यांनी ३१ मे रोजी अटकेची कारवाई होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. झारखंडच्या राजभवनाकडून हेमंत सोरेन यांना भेटीसाठी ७.३० ही वेळ देण्यात आली होती. त्यानुसार हेमंत सोरेन आणि चंपई सोरेन हे राजभवनात दाखल झाले आहेत. तिथे हेमंत सोरेन नवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचे समजते.*

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक,दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक,दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

*👉🟥🟥👉योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी*

*👉🛑🛑👉जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे*

*👉🔴🔴👉दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत*

*मुंबई, दि. 3 जुलै :-‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.*

*👉🅾️🅾️👉त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.*

*👉🟥🟥👉योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.*

*👉🔴🔴👉माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.*

पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

पुणे, दि. ३: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाच्या अनुषंगाने ३० एप्रिल ते १० मे २०२४ या कालावधीत संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीचे अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही तयार करण्यात आली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ५ वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या ५ लाख १० हजार ६७२ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ९२ हजार ३७३ उपस्थित राहिले. त्यापैकी १ लाख २२ हजार ६३६ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या ३ लाख ८१ हजार ५८८ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६८ हजार ५४३ उपस्थित राहिले. त्यापैकी ५६ हजार १०९ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ५ वी) पात्र विद्यार्थ्यांपैकी मंजूर संचाच्या आधारे १६ हजार ६९१ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी) पात्र विद्यार्थ्यांपैकी मंजूर संचाच्या आधारे १४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळांवर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येणार आहे. तसेच शाळांना त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येणार आहे. तथापि, शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येणार आहे. छापील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शाळांना पाठविण्यात येणार आहे.

संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या लिंक ‘अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)’, ‘गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय)’ ‘शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय, तालुकानिहाय)’ अशा आहेत. विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लिंकवर क्लिक करून माहिती डाऊनलोड करता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त १०० रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण हा आनंदाचा सोहळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

img 20240703 wa0001
मुंबई दि. २ : स्वातंत्र्य सेनानी, मुत्सद्दी राजकारणी आणि पत्रकार असा त्रिवेणी संगम असलेले दिवंगत जवाहरलाल दर्डा हे खऱ्या अर्थाने रत्न म्हणजे जवाहर होते. राज्यातील विविध विभागाचे मंत्रीपद भूषविताना त्यांनी आपल्या कामाने राज्याची देशात नवीन ओळख करून दिली. त्यांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त १०० रूपयांचे नाणे लोकर्पण करणे हा राज्यासाठी आनंद सोहळा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री, पत्रकार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त १०० रुपयांच्या नाण्याचे आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव सुजाता सौनिक, काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक विजय दर्डा, मुख्य संपादक राजेंद्र दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात प्रशासक, लोकप्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १०० रुपयांचे नाणे लोकार्पित करण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असताना जवाहरलाल दर्डा यांनी कारावासही भोगला आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे त्यांनी राज्याच्या विविध विभागात मंत्री म्हणून काम करत असताना वेगळा ठसा उमटविला. जवाहरलाल दर्डा हे बहुआयामी व्यक्त‍िमत्व, सत्याग्रहाचे तेजस्वी पर्व, न्यायासाठी सर्वसामान्यांचा आवाज बनलेले पत्रकार होते. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात लावलेले रोपटे आज समूहाच्या माध्यमातून वटवृक्ष झाले आहे. सर्वसामान्यांच्या हिताच्या शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम लोकमत समूह करेल, अशी आशाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

*सामाजिक, राजकीय क्षेत्रातील जवाहर दर्डा हे खणखणीत नाणे*
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील जवाहरलाल दर्डा हे खणखणीत नाणे आहे. त्यांची राजकीय क्षेत्रातील भूमिका आणि पत्रकार म्हणून भूमिका वेगळी होती. त्यांनी १७ वर्षे विविध विभागात मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या व्यक्त‍िमत्वाने कामाचा वेगळा ठसा उमटविला. इतिहासात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाईल, असे म्हणून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.

*स्वतंत्र विचारांचे स्वातंत्र्य सेनानी*
माजी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जवाहर दर्डा हे स्वतंत्र विचारांचे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्याबरोबर काम केले होते. मराठी पत्रकारितेत विदर्भातील परंपरा आजही कायम असल्याचे सांगून, त्यांनी मंत्री म्हणून काम करताना आणि अधिवेशनातील जवाहरलाल दर्डा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

विजय दर्डा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी १०० रुपयांचे नाणे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. चांगल्या कामाला न्याय मिळावा त्यांची परंपरा सुरू रहावी यासाठी शासन कार्यरत असून, ही परंपरा कायम रहावी असे त्यांनी यावेळी सांगत सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!