Home Blog Page 70

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२३-२४ च्या खर्चास मान्यता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद-उपमुख्यमंत्री अजित पवार

img 20240721 wa0005
पुणे दि.२०- राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले.

विधानभवन येथे आयोजित या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

योजनेविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लाख २९ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी येत्या २७ जुलै रोजी पुण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असल्याने भविष्यातही चांगला रोजगार मिळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. अनेक उद्योगांनी या योजनेसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून प्रशिक्षणार्थीची चांगली कामगिरी असल्यास त्याला कायमस्वरूपी रोजगार देऊ असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ही योजना युवकांसाठी रोजगारासाठी चांगली संधी आहे, असे श्री.पवार म्हणाले.

बैठकीत जिल्ह्यातील नद्या व धरणातील प्रदूषणाबाबत चर्चा करण्यात येईल. एमआयडीसी क्षेत्रातील प्रदूषणाबाबत उद्योगमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. पवना धरण क्षेत्रातील रिसॉर्टमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. साखर कारखान्याद्वारे अशुद्ध पाणी नदीत सोडले जाऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, त्यासाठी कारखान्यांच्या प्रतिनिधींसमवेतही चर्चा करण्यात येईल. लोकप्रतिनिधींनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी दिले.

शहरी आणि ग्रामीण भागात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, पोलिसांनी ड्रोन विरोधक उपाययोजनांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनांसाठी प्रस्ताव सादर करावा. खडकवासला धरण परिसरात सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनासाठी पीएमआरडीएने उपाययोजना कराव्यात. क्रीडा साहित्य घेतांना ते दर्जेदार असेल याची दक्षता घ्यावी. कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट घ्याव्यात, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून ज्या विकासकामांना निधी मिळत नाही अशी कामे लोकप्रतिनिधी आणि सदस्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून सुचवावी, असे आवाहनही श्री.पवार यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत माहिती दिली. एकूण ६४२ अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. एकूण १ हजार ८०० कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे. शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम महाविद्यालयाने योजनेसाठी सुरू केलेल्या स्वतंत्र बँक खात्यात सप्टेंबर महिन्यात जमा करण्यात येतील. या योजनेच्या समन्वयासाठी स्वतंत्र प्राध्यापक नियुक्त करणे आणि योजनेची माहिती विद्यार्थिनींना देण्याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या २५ जुलै रोजी राज्यातील ६ हजार महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते पाटील, ॲड. अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील कांबळे, सुनील शेळके, संग्राम थोपटे, माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, संजय जगताप, सिद्धार्थ शिरोळे, अतुल बेनके, रवींद्र धंगेकर, अश्विनी जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त शेखर सिंह, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जिल्ह्यातील नद्यांमधील प्रदूषण, गड-किल्ले संवर्धन, पुरंदर आणि जनाई शिरसाई योजना, देहू आणि आळंदी येथे पोलिसांचे निवासस्थान, बिबट प्रवण क्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील मनुष्यबळ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

*जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खर्चाला मान्यता*
पालकमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२३-२४ मधील मार्च २०२४ अखेर झालेल्या १ हजार ४ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १३४ कोटी ९० लाख रुपयांच्या आणि आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ५१ कोटी ११ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये १ हजार २५६ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १४५ कोटी आणि आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ५५ कोटी ८९ लक्ष रुपये नियातव्यय अंतिम करण्यात आला आहे. राज्यस्तर बैठकांमध्ये पुणे जिल्ह्याकरिता २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये २५६ कोटी ८९ लक्ष एवढा वाढीव निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शैक्षणिक शुल्क माफी या योजनांविषयी सदस्यांना माहिती देण्यात आली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

img 20240721 wa0000
संपादकीय 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील , केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदींनी स्वागत केले.

विशाळगड अतिक्रमण बाबत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

img 20240719 wa0024
राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये*

*सद्या व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत, न्यायप्रविष्ट अतिक्रमणे वगळून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील*

*विशाळगड मार्गावरील मौजे मुसलमानवाडी येथील हिंसाचारग्रस्त भागाची केली पाहणी*

*कोल्हापूर, दि. 13 (जिमाका)*: किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व स्थानिक पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरुन परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या नुकसानाबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सर्वांना तातडीची मदतही शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विशाळगड अतिक्रमणाच्याबाबतीत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पीडितांना सांगितले. मुसलमानवाडी येथे विशाळगडावरील काही नागरिक व महिला आल्या होत्या. त्यांना सद्या विशाळगडावरील फक्त व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत, न्यायप्रविष्ट अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी सोबत आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

घटने आधी विशाळगडावर अतिक्रमण काढणे बाबत आंदोलकांनी केलेल्या मागणीवर सातत्याने प्रशासन विशेषता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि इतर शासकीय अधिकारी चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचे काम करत होते. विशाळगडावरील जी अतिक्रमणे आहेत, जी न्यायप्रविष्ट आहेत, तसेच मुंबई हायकोर्टामध्ये त्याविषयी काही केसेस सुरु आहेत, तसेच कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पध्दतीचा मार्ग या ठिकाणी काढला जाईल असे त्यांना सांगितले होते. हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल किंवा वरिष्ठ शासकीय वकील या सर्वांशी चर्चा केली जात होती. या संदर्भात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं. सर्व शांततेन घ्या, तुमची काय मागणी असेल याबद्दल सरकार कायद्यानी, नियमांनी सकारात्मक असेल. कायदा नियम हातात घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही, कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत बसून आपण मार्ग काढू असे बोलणे त्यांच्याबरोबर झाल्याचे उपमुखमंत्री पवार यांनी गावात सांगितले.

मुसलमानवाडीत राहणाऱ्या नागरिकांचा व गडावर असणाऱ्या अतिक्रमणाचा संबंध नव्हता. आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25-25 हजार रुपये असे 50 हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी नुकसानीबाबत तेथील सर्व गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्या पाहून 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव तयार केलेला आहे अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावातील नागरिकांना दिली. ते पुढे म्हणाले, आपण शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. त्या महाराष्ट्रात नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येही झालं आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये देखील होत आहे. हे जे घडले ते थोडसं वेगळ्या प्रकारचं घडलं. कोणीही काम करत असताना निष्पाप लोकांना असा त्रास होणार नाही ही खबरदारी घ्यायला हवी.
घटनेचे संपूर्ण व्हिडीओ पोलीसांनी काढलेले आहेत, कोण त्याच्यामध्ये काय करतय, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतय या सगळ्या गोष्टींची संपूर्ण शहानिशा केली जाईल आणि त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल.

*राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये*

विशाळगडाच्या घटनेबाबत प्रशासन आम्हाला वेळोवेळी माहिती देत होते. तरीही मी स्वत: पाहणी करण्यासाठी आलो. पुढील काळात काही स्वयंसेवी संस्थाही मदत करणार आहेत. ही मदत तहसिलदारांमार्फत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक दररोज याबाबत आढावा घेत आहेत. सरकारही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही व्हिडीओ, आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन वातावरण खराब होईल असा प्रयत्न करु नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्यान घेतली आहे. चुकीच्या गोष्टींच समर्थन सरकार करणार नाही. अशा प्रकारचे गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी दरवर्षी शासन निधी देत असते. अशा शिवकालीन किल्ल्यांवर अतिक्रमण होवू नये, अशी मागणी शिवप्रेमी व इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांची आहे. समाजा-समाजामध्ये फूट पडेल, कारण नसताना जातीय सलोखा बिघडेल आणि त्याच्यामधून राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी, संघटनांनी तसेच नेते मंडळींनी करु नये असे त्यांनी आवाहन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

img 20240719 wa0020

पुणे, दि.१९:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार होते.

प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर, हिंमत जाधव, विक्रांत देशमुख आदी उपस्थित होते.

शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे लोहगाव विमानतळ येथून साताराकडे प्रयाण झाले.

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

*महापालिका क्षेत्रात आभा कार्ड नोंदणी वाढविण्याची गरज- डॉ. ओमप्रकाश शेटे*

पुणे, दि. १९: आयुष्मान भारत-महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी दोन्ही महानगरपालिकांच्या क्षेत्रात आभा कार्ड नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांनीही या योजनेचा लाभ लक्षात घेऊन कार्ड काढण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.

एकत्रित आयुष्मान भारत- महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, सहायक आयुक्त धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक पी. एम. आंधळे आदी उपस्थित होते.

डॉ. शेटे म्हणाले, पुणे जिल्ह्यात ६३ लाख ६१ हजार पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत १३ लाख १० हजार लाभार्थ्यांचे ‘आभा (आयुष्मान भारत) कार्ड’ तयार करण्यात आले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व शिधा पुरवठा केंद्रे, सामान्य सुविधा केंद्रे (सीएससी), आपली सेवा केंद्रे, संग्राम केंद्रे आदी ठिकाणी शिबीरे आयोजित करावीत. आयुष्मान भारत ॲपवरही याची सुविधा असून त्याची माहिती नागरिकांना द्यावी, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, राज्याची पूर्वीची महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि २०१८ पासून सुरू करण्यात आलेली केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना एकत्रित करुन राबविण्यात आली. २८ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व कुटुंबांसाठी ‘एकत्रित आयुष्मान भारत- महात्मा फुले जन आरोग्य योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ जुलै २०२४ पासून विस्तारीत व्याप्तीसह ही योजना राबविण्यात येत आहे. ही भारतातील रोख रक्कम विरहीत (कॅशलेस) मोठी योजना आहे. दीड लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार यात कॅशलेस मिळतात.

या योजनेंतर्गत रुग्णावरील उपचारासाठी ठरवून देण्यात आलेल्या पॅकेजेसचे दर कमी असल्याने त्यात वाढ करण्याच्या रुग्णालयांच्या मागणीच्या अनुषंगाने १ जुलैपासून त्यामध्ये सरासरी २० टक्क्याहून अधिक वाढ करण्यात आली आहे. तसेच वेळेवेळी उपचाराचे पैसे चुकते केले जात असल्यामुळे रुग्णालयांनी रुग्णांना योजनेचा लाभ द्यावा. त्यांनी कॅशलेस काऊंटर सुरू करावेत, असे सांगून कामगिरीत कमी असलेल्या रुग्णालयांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी काही वेळ दिला जाईल. तथापि, त्यानंतरही कामगिरी सुधारली नाही तर योजनेच्या पॅनेलमधून त्यांना वगळण्यात येईल, असेही डॉ. शेटे म्हणाले.

*आयुष्मान योजनेत मोठ्या रुग्णालयांना सहभागी करण्यासाठी प्रयत्न करा-खासदार मेधा कुलकर्णी*
शहरात सर्वसामान्यांची नामांकित मोठ्या रुग्णालयांत उपचार मिळण्याची इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य होत नाही. त्यासाठी अशा रुग्णालयांना योजनेंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सहयोग दिला जाईल, असे खासदार श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कुटुंबांतील सदस्यांची आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी प्रक्रियेला गती देणे गरजेचे असून त्यासाठी पुरवठा विभाग, सीएससी केंद्रांच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या कोणत्याही नागरिकावर १ लाख रुपयांपर्यंत उपचार तात्काळ कॅशलेस पद्धतीने सुरू करण्यात येतील. महाराष्ट्रासोबत देश-परदेशातील नागरिकास योजनेचा लाभ देण्यात येईल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीत योजनेच्या जिल्हा वरीष्ठ समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

श्री.शेटे यांनी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींच्या समस्याही यावेळी जाणून घेतल्या.

चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी येथे पालखी निघाली पंढरपूरला सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला.

oplus 0
चेतना इंटरनॅशनल स्कूल येथे आज दिनांक 13/07/2024 रोजी पालखी सोहळ्याच्या आयोजन करण्यात आली होती कार्यक्रमास उपस्थित चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष माननीय उदय देशपांडे सर , सचिव विलास भोसले सर, खजिनदार सोमनाथ माने सर तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम इन्चार्ज प्रिन्सिपल ,सुधीर करगळ सर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमाला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सर्वप्रथम मुलांनी दिंडी परिक्रमा घेतली त्यानंतर नामघोषणाच्या गजरामध्ये मोठ्या प्रमाणावर रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आनंदी उत्सवामध्ये सहभाग घेतला व नाचत नाचत हरिनामाचा जप करत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर छोट्याशा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अभंग गवळण पोवाडे तसेच संतांचे महत्त्व व आषाढी वारीचे महत्त्व सांगितले तसेच कॅम्पसचे इंचार्ज सुधीर करगळ सर यांनी पालखी सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले. या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टाळ ,मृदंग, विना ,पालखी मोठ्या जल्लोषात पांडुरंगाच्या नामघोशात विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला तसेच चेतना फाउंडेशन मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले.
अशाप्रकारे या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शाळांजवळ 500 मीटरच्या परिघात ‘कॅफिनयुक्त’ एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर घालण्यात येणार बंदी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!
शाळांजवळ 500 मीटरच्या परिघात ‘कॅफिनयुक्त’ एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर घालण्यात येणार बंदी

*मुंबई – महाराष्ट्र सरकार कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्स संदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. राज्यातील शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफिन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करणार आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.*

*👉🅾️🅾️👉राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मरावबाबा आत्राम यांनी हे आश्वासन दिले.*

*👉🔴🔴👉MFDA लवकरच राज्यातील शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफीन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करेल. सध्याच्या नियमांनुसार, एक लिटर कार्बोनेटेड किंवा नॉन-कार्बोनेटेड पेयांमध्ये 145 मिली आणि 300 मिली दरम्यान कॅफिनचे प्रमाण अनुमत आहे, असं आत्राम यांनी सांगितलं.*

*👉🅾️🅾️👉कौन्सिलच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी आत्राम यांना बंदी घालण्यात येणाऱ्या पेयांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरातील MFDA अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.*

error: Content is protected !!